Tuesday, August 25, 2015

Marathi: पर्णगुंफी Parnagumphi Botanical name: Phyllocephalum scabridum. 'Common name: निळवंती Nilwanti .

मुसळधार पावसाचे तडाखे देऊन झाल्यावर आषाढ ओसरतो. अनेकदा ओला दुष्काळ, महापूर, अशा संकटातूनही जीवघेणी परीक्षा घेत आषाढ सरतो आणि श्रावण उजाडतो.
shravan‘‘आला श्रावण हो चला, बांधा झाडावर झुला
रिमझिम, रिमझिम जीव झाला वेडाखुळा!’’
असा सर्वानाच मोहून टाकणारा श्रावण! हिरव्यागार वनश्रीने नटलेला, सुगंधी फुलांनी सजलेला, अनेक उत्सवी सणांनी चैतन्यमय झालेला श्रावण! चैत्रादी मासगणनेतील पाचवा महिना. पौर्णिमेच्या आगेमागे श्रावण नक्षत्र असते म्हणून याचे नाव श्रावण.
मुसळधार पावसाचे तडाखे देऊन झाल्यावर आषाढ ओसरतो. अनेकदा ओला दुष्काळ, महापूर, अशा संकटातूनही जीवघेणी परीक्षा घेत आषाढ सरतो आणि श्रावण उजाडतो. ऊनपावसाच्या मनोहारी खेळाने श्रावण माणसांना थोडा दिलासा देतो. श्रावणात दरदिवशी काही ना काही धर्मकृत्ये असतातच.
श्रावण सोमवार म्हणजे शंकाराच्या व्रताचा वार. लोक दिवसा उपवास करून सायंकाळी तो सोडतात. शंकरावर अभिषेक, लघुरूद्र, ज्योर्तिलिंगाना भेट असे उपक्रम असतात. नवीन लग्न झालेल्या स्त्रिया शंकाराला, विविध धान्यांची शिवामूठ वाहतात. मंगळवारी देवीची पूजा, सर्व सुवासिनी सौभाग्याचं, समृद्धीचं दान मागतात. विविध खेळांनी सर्व स्त्रिया रात्र जागवतात, हा मोठा आनंदोत्सव असतो. श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी. नागोबाला दूध, लाहया वाहून पूजा करायची! निसर्गाचा समतोल राखणारे असे अनेक सण आपल्या धर्मशास्रत आढळतात.
पर्यावरणाचा एवढा सखोल विचार प्राचीन काळात झालेला बघून कौतुक वाटतं. शनिवारी पिंपळाची पूजा, शनीला तेल, तिळाच्या लाडूचा नैवेद्य! मुंज्या मुलाला जेवायला बोलवायचं! रविवारी आदित्याची पूजा! खिरीचा नैवेद्य! या सर्व प्रथांमागे विज्ञान आहे. आषाढातले ठप्प वातावरण हळूहळू निवळू लागते. हवेतील उष्णता वाढते. शेतामध्ये अन्नरस तयार होऊ लागतो. आषाढात रात्री जागवणारा सण एकही नसतो. पण श्रावणात गोकुळाष्टमी येते ती मध्यरात्रीच! ओल्या चा-यामुळे दुधदुभते वाढते. आहारावरचे नियंत्रण थोडे ढिले होते. गोडाधोडाचे सुगंध घराघरातून येऊ लागतात. रिमझिम पावसाबरोबरच सारे जनजीवन उत्साहित होते. वाजतगाजत येते, नारळीपौर्णिमा! किनारपट्टीवर वस्ती करणा-या बहुसंख्य लोकांना मत्स्यरुपाने अन्न पुरवणारा, व्यवसाय देणारा, जलचरांना आणि जलवाहनांना अंगाखांद्यावर सांभाळणारा समुद्र! सागरासंबंधीचे ऐन पावसाळयात बंद असलेले सर्व व्यवहार श्रावण पौर्णिमेपासून पुन्हा सुरू होणार पण त्यापूर्वी कृतज्ञताभावाने सागराची पूजा करायची. त्याला श्रीफळ अर्पण करून शांत व्हायची प्रार्थना करायची. घरातही नारळीभात करून नैवेद्य दाखवायचा.
नारळीपौर्णिमेचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे रक्षाबंधन! राखीपौर्णिमा याच दिवशी. बहिणभावाचं प्रेम राखी रुपाने व्यक्त करण्याचा, कौटुंबिक जिव्हाळयाचा हा सण. उत्तर भारतात तर रक्षाबंधन फार मोठया उत्साहात साजरे होते. भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी याची जाणीव करून देणारा हा हृद्य सण श्रावणाचं महत्त्व वाढवतो. सुताची पोवती करून विष्णू, शिव, सूर्य यांना वाहतात आणि कुटुंबातील स्री-पुरूषही ती हातात धारण करतात. श्रावण वद्य अष्टमी म्हणजे कृष्णाष्टमी. भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस. गोकुळाष्टमी नावाने तो मोठया जल्लोषाने साजरा होतो. सप्तमीच्या रात्री श्रीकृष्णाच्या प्रतिमेची पूजा करून उपवास करतात. काही ठिकाणी गोकुळाची प्रतिकृती उभी करतात. अष्टमीला जागोजागी उंचावरती दहीहंडी उभारतात. ती फोडण्यासाठी बालगोपाळ सज्ज होतात. त्यांच्यात स्पर्धा चालतात. बक्षिसे लावली जातात.
गोविंदा आला रे आला
मटकी संभाल ब्रीजबाला
असा जल्लोष सर्वाच्या परिचयाचा आहे. उत्तर भारतात या दिवशी नंदोत्सव करतात. राधाकृष्णाला झोपाळयावर बसवून झोके देतात. गीते गातात. वाद्यगान होते. श्रीकृष्ण जीवनाचे नाटयरुप दर्शनही विविध ठिकाणी सादर केले जाते. हळद-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने एकमेकांवर उडवतात. श्रावणातल्या प्रत्येक दिवसाला, तिथीवाराला काहीना काही महिमा चिकटलेला आहेच. श्रावण शुद्ध षष्ठी म्हणजे वर्णषष्ठी तिच्या पाठोपाठ शीतलासप्तमी. शीतलादेवीची पूजा करून दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा.
नमामी शीतलादेवी रासभस्थां दिगम्बरीम्।
मार्जनी किलशोपेतां शूर्पालश्चकृत मस्त काम्।।
श्रावणी हा महत्त्वाचा विधी. वैदिक विधी. श्रावणातल्या श्रवण नक्षत्रावर करावयाचा हा विधी. होमहवनपूर्वक सर्व ब्राह्मणांसह यथाविधी नवीन यज्ञोपवीत धारण करावयाचे. त्याआधी परमेश्वराची प्रार्थना. ‘मी अध्यापन, अध्ययन केलेल्या वेदांचे शिळेपण नष्ट होऊन त्यांची वृद्धी व्हावी. अशी प्रार्थना उत्सर्जन कर्म करावयाचे. पंचगव्य प्राशन करून नदीवर गोमयस्नान, भस्मस्नान, मृत्तिकास्नान करून देहशुद्धी, चित्तशुद्धी करायची. नव्या बटूनी मेखला, जानवे, दंड, कृष्णाजिन, कटिसूत्र, वस्र् धारण करून नव्या दमाने अध्ययनाला सुरूवात करायची. असे संस्कार गुरूशिष्य सर्वानाच प्ररेणा, उत्साह ताजेपणा देतात.
श्रावण अमावास्येला पोळयाचा सण! कृषिप्रधान अशा आपल्या देशात बैलांची पूजा, त्यांना सजविणे, मिरवणुकी काढणे, पुरणपोळी खाऊ घालणे इत्यादी उपचारांनी त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त करायचे. ही अमावास्या पिठोरी अमावास्या म्हणूनही ओळखली जाते. एकंदरीत संपूर्ण श्रावण महिना सण, व्रते, दानधर्म यांनी परिपूर्ण झाला आहे.

Saturday, August 22, 2015

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ हे केंद्र शासनाचे अभियान आहे.  या अभियानाबाबत पुणे येथे  20 व 21

ऑगस्‍ट रोजी दोन दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली होती. राज्‍यातील ज्‍या जिल्‍ह्यात शून्‍य ते

सहा वर्षे वयोगटातील दर हजारी पुरुष बालकांमागे मुलींच्‍या जन्‍माची संख्‍या घटलेली आहे, त्‍या

जिल्‍ह्यातील अभियानाशी संबंधित अधिकारी कार्यशाळेस उपस्‍थित होते.

  मुलींचा घटता जन्‍मदर ही एक फार मोठी चिंतेची बाब आहे. भारतीय संस्‍कृतीच्‍या महान परंपरेचा

दाखला देत असतांना, स्‍त्री शक्‍तीचे पूजन केलेजात असल्‍याचे गौरवाने सांगतअसतांना मुलींचीगर्भातच

हत्‍या करण्‍याचे, जन्‍म झाला असल्‍यास मारुन टाकण्‍याचे अघोरी प्रकार होत होते. हरियाणा, पंजाब या

प्रगत राज्‍यातच नव्‍हे तर मातृसत्‍ताक संस्‍कृती असणा-या ईशान्‍येकडील नागालॅण्‍ड, मेघालयामध्‍येही

मुलींच्‍या जन्‍माचेप्रमाण घटलेले लक्षात आले आहे. सामाजिक समतोल कायम राखण्‍यासाठी मुला-मुलींच्‍या

जन्‍माचे प्रमाण सारखे असणे गरजेचेआहे. यावर केंद्र शासन आणि राज्‍य शासन व्‍यापक प्रमाणावर

कायद्यांचीअंमलबजावणी आणि जनजागृती या माध्‍यमातून कार्य करत आहे.

 ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ ही  केंद्र शासन पुरस्‍कृत योजना आहे. ही योजना एक व्‍यापक अभियान

म्‍हणून राबविण्‍यासाठी पुणे येथे यशवंतराव चव्‍हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्‍ये  (यशदा) दोन दिवशीय

कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली होती. नवी दिल्‍लीच्‍या नॅशनल इन्‍स्‍टीट्यूट ऑफ पब्‍लीक कोऑपरेशन

एण्‍ड चाईल्‍ड डेव्‍हलपमेंटच्‍या  (निपसीड) तज्ञांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केले. 2001आणि 2011 च्‍या

जनगणनेनुसार महाराष्‍ट्र राज्‍यातील ज्‍या जिल्‍ह्यात शून्‍य ते सहा वर्षे वयोगटातील दर हजारी पुरुष

बालकामागे मुलींच्‍या जन्‍माची संख्‍या घटलेली आहे, त्‍या जिल्‍ह्यातील अभियानाशी संबंधित अधिकारी

कार्यशाळेस उपस्‍थित होते.  राज्‍यातील अहमदनगर, बीड, जळगाव, कोल्‍हापूर, सांगली,औरंगाबाद,

उस्‍मानाबाद, जालना, वाशिम व बुलढाणाया दहा जिल्‍ह्यांचाया अभियानात समावेश करण्‍यात आला आहे.

कार्यशाळेत  निपसीडचे संचालक डॉ. दिनेश पॉल, डॉ. रितापटनाईक, सहसंचालक डॉ. तेजिंदरकौर, मीनाक्षी

राठौर आणि इतरांनी ‘बेटीबचाओ,बेटीपढाओ’ अभियानाच्‍या संबंधित सर्व पैलूंवर प्रकाशटाकण्‍याचाप्रयत्‍न

   देशाचेपंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी 22 जानेवारी, 2015 रोजी हरियाणा राज्‍यातील पानीपत येथूनया

अभियानाचा शुभारंभकेला. पानीपत येथील तीनही युद्धे भारतीय इतिहासामध्‍ये महत्‍त्‍वाची ठरली आहेत.

‘मुलींचाघटता जन्‍मदर’ हे ही एक प्रकारचे सामाजिक युध्‍द असून ते जिंकण्‍यासाठी पानीपतहे

ठिकाणनिवडण्‍यात आले.  कार्यशाळेतील विषय हे व्‍यापक होते. महाराष्‍ट्रातील मुलींच्‍या जन्‍माचे घटते

प्रमाण, बालकांचे लैंगिक  शोषण विरोधी कायदा, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान तंत्र प्रतिबंधक

कायदा,शिक्षणाचा हक्‍क कायदा, मुलींबाबतचा सामाजिक आणि वर्तणुकीय दृष्‍टिकोन, सर्व शिक्षा

अभियानांतर्गत मुलींच्‍या शिक्षणाची स्‍थिती, बेटीबचाओ-बेटी पढाओ अभियानाच्‍या

यशस्‍वीतेसाठीमाध्‍यमांची भूमिका, प्रचार व प्रसिध्‍दी नियोजन या सारख्‍या विषयांवर सखोलचर्चा आणि

मार्गदर्शन झाले.

 देशातील इतर राज्‍यात या अभियानाच्‍या प्रचार आणि प्रसिध्‍दी साठी तसेच लोकसहभाग

मिळविण्‍यासाठी कोणते अभिनव व नावीन्‍यपूर्ण उपक्रम, कार्यक्रम राबविले जात आहेत, त्‍याचीही माहिती

यावेळी देण्‍यात आली. अभियानाशी संबंधित माहितीपट दाखवून जनमानस बदलण्‍याची किती आवश्‍यकता

आहे, हेही पटवून देण्‍यात आले.

 मुलगी म्‍हणजे परक्‍याचे धन समजणे, तिला पालक आपल्‍यावरील बोजा समजतात. इतकंच काय

दैनंदिन व्‍यवहारात सहजतेने मुलींना दुय्यम वागणूक दिली जाते. मुलगा म्‍हणजे वंशाचा दिवा ही मानसिकता

किती  चुकीची आहे, हेही सोदाहरण दाखवण्‍यात आले. कंपन्‍यांच्‍या नावाच्‍या पुढे ‘ब्रदर्स’लागलेले आपण

सहजतेने स्‍वीकारतो... पण तुम्‍हाला कधी ‘अमुकतमुक  एण्‍ड सिस्‍टर्स’ असे वाचायला मिळाले का?, आपण

कोणाकडे पाहुणे म्‍हणून जाणार असलो तर मुलासाठी बंदूक अथवातत्‍सम खेळ घेऊन जातो, मुलगी असेलतर

तिच्‍यासाठी बाहुली घेऊनजातो.  बोलतांनाही अगोदर पुरुषवाचक उच्‍चार होणार, जसे बाहुला-बाहुली. हे

सर्व इतक्‍या सहजतेने होते, की त्‍यामध्‍ये काही चूक आहे, हे आमच्‍याही लक्षात येत नाही.

   स्‍त्री भृणहत्‍येबाबतच्‍या सामाजिक संस्‍थांच्‍या जाहिरातींमध्‍ये काही प्रतिमा वापरल्‍या जातात,

त्‍याबाबतही अज्ञान दिसून येते. उदाहरणार्थ गर्भवती महिलेचे उघडे पोट दाखवून त्‍यामध्‍ये धारदार चाकू

खुपसण्‍याचा प्रयत्‍न, भृणाचा आकार आणि त्‍याची मान हाताच्‍या पंज्‍यामध्‍ये गच्‍च आवळलेली

यासारख्‍या प्रतिमांमुळे चुकीचा

संदेश जाण्‍याची भीतीच अधिक असते. काही वेळा पहिली मुलगी किंवा दोन मुलीअसलेल्‍या गर्भवतीमहिलेवर

यंत्रणांचे लक्ष, वगैरे  बातम्‍या  वाचण्‍यात येतात, अशा प्रकारची वक्‍तव्‍ये  चुकीचीआहेत.. संबंधित

महिलेच्‍या

व्‍यक्‍तीगत अधिकारांचेते उल्‍लंघन ठरते.. अनेकदा एखाद्या संस्‍थेकडून उत्‍कृष्‍टतेचे प्रमाणपत्र

मिळविण्‍याचा खटाटोप केला जातो, हा पूर्णपणे प्रसिध्‍दी स्‍टंट आहे. असे प्रमाणपत्र मिळविलेल्‍या किती

अंगणवाड्या,रुग्‍णालयांचा सेवादर्जासुधारलेला आहे, हा प्रश्‍नच पडतो.संबंधित संस्‍थेला पैसा मिळतो,पण

शासकीय यंत्रणांच्‍या दर्जात सातत्‍य राहतेच, असे नाही. अशा अनेक मुद्दयांचा ऊहापोह कार्यशाळेत झाला.

  अहमदनगरचे जिल्‍हाधिकारी अनिलकवडे आणि जळगावच्‍या जिल्‍हाधिकारीरुबलअग्रवाल यांनी

त्‍यांच्‍या जिल्‍ह्यात राबविण्‍यात येत असलेल्‍या उपक्रमांची माहिती दिली. स्‍त्री जन्‍माचे स्‍वागत,

महिलांच्‍या ग्रामसभा, कलापथक-पथनाट्य यातून जनजागृती, विविध प्रकारच्‍या स्‍पर्धा, प्रभातफेरींचे

आयोजन यांचाही विशेष उल्‍लेख करण्‍यात आला. अहमदनगरचे जिल्‍हाधिकारीकवडे हे तर प्रत्‍येक बैठकीत,

जाहीर कार्यक्रमात स्‍त्री-पुरुष समानता, वृक्षारोपण, नेत्रदान यासारख्‍या राष्‍ट्रीय उपक्रमांचा आवर्जून उल्‍लेख

करतात. जळगावच्‍या जिल्‍हाधिकारी रुबलअग्रवाल यांनी राष्‍ट्रीय स्‍तरावर गौरवलेल्‍या ‘गुड्डी-गुड्डा’ या

डिजीटल फलकाची माहिती सांगितली. 

 या अभियानाच्‍या यशस्‍वीतेसाठी व्‍यूहरचना (स्‍ट्रॅटेजी) ठरवण्‍यात आली आहे. 1) बालिकेच्‍या

समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्‍साहनाकरिता समाजात कायम स्‍वरुपी सामुदायिक चळवळ निर्माण करणे. 2)

उत्‍तम गव्‍हर्नस करिता समाजामध्‍ये घसरतचाललेल्‍या बालजन्‍मदर आणि प्रमाणातवाढ करण्‍यासाठी

जनजागृती करणे. 3) ज्‍या जिल्‍ह्यात व शहरात मुलींचा जन्‍मदर कमी झालेला आहे, अशा जिल्‍हा व

शहरांवर अधिक लक्ष केंद्रीत करुनत्‍या ठिकाणी एकात्‍मिक व कृतीशीलआराखडा तयार करणे.4)

सामाजिकबदलाचे प्रमुखघटक म्‍हणून पंचायत राज संस्‍था, शहरी स्‍थानिक समित्‍या, स्‍थानिक स्‍तरावरील

कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे, या कामामध्‍ये स्‍थानिक समुदाय, युवकमंडळे, महिलामंडळे यांचा सहभाग घेणे

5) सेवा देणारी रचना, योजना व कार्यक्रम हे लिंगभेद व बालहक्‍कास कारणीभूत आहेत का याची खात्री करणे

6) जिल्‍हा, तालुका व निम्‍नस्‍तरावर विविधसंस्‍था वसेवादेणारे विभाग यांचा समन्‍वय घडवून आणणे.

या अभियानाच्‍या नियोजन, अंमलबजावणी आणि संनियंत्रण(जिल्‍हा, तालुका व ग्रामपंचायत)या करिता

जिल्‍हा कृती दल कार्यरत असून त्‍याचे अध्‍यक्ष जिल्‍हाधिकारी आहेत. यामध्‍ये इतर विभाग म्‍हणून आरोग्‍य

व कुटुंब कल्‍याण, पंचायतराज, ग्रामविकास आणि  पोलीस विभाग इत्‍यादी यंत्रणा आहेत. तालुकास्‍तरावर

तालुका कृतीदल असून यामध्‍ये उपविभागीय अधिकारीआणि गट विकास अधिकारी प्रमुख आहेत.

ग्रामस्‍तरावरसरपंच आणि ग्रामसेवक यांच्‍या अध्‍यक्षतेखालीगाव पातळीवर समिती  आहे.

जिल्‍हाधिकारी यांच्‍या अधिनस्‍त त्‍यांच्‍या जिल्‍ह्यातील आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण विभाग, महिला व

बालविकास विभाग, सामाजिक न्‍याय विभाग, शिक्षण विभाग, पंचायत राज विभाग,ग्रामविकास,विधी व

न्‍याय विभाग, वैद्यकीयसंघटनांचेप्रतिनिधी,स्‍वयंसेवी संस्‍था यांचा समावेश आहे.

 मुलींच्‍या शिक्षणासाठी शासनाच्‍या विविध योजना आहेत, त्‍यांची व्‍यापक प्रसिध्‍दी झाल्‍यास या

अभियानासगती मिळूशकते. मुलींचे शारीरिक, मानसिक, आर्थिक आरोग्‍य संपन्‍नतेसाठी हे अभियान

महत्‍त्‍वाचे असल्‍याचे विशेषत्‍वाने नमूद करण्‍यात आले. लिंगभेदावर आधारितलिंग निवड प्रथा निर्मूलन

करणे, बालिकेच्‍या जीविताची वसुरक्षिततेचीहमी घेणे किंवा खात्री करणे व बालिकेच्‍या शिक्षणाची खात्री

करणे किंवा हमी घेणे ही या अभियानाची खास त्रिसूत्री आहे. ‘लेकींविषयीचादृष्‍टिकोनबदला, सर्वच काही

बदलेल’ हा एक मोठा संदेश या कार्यशाळेतून मिळाला.

राजेंद्र सरग,

जिल्‍हा माहिती अधिकारी,

अहमदनगर

2001 व 2011 च्‍या जनगणनेनुसार दर हजारी पुरुष बालकांमागे मुलींचा जन्‍मदर

खालीलप्रमाणे आहे

क्रमांक जिल्‍हा सन 2001 च्‍या

जनगणनेनुसार

सन 2011 च्‍या

जनगणनेनुसार

1 बीड 894 807

2 जळगाव 880 842

3 अहमदनगर 884 852

4 बुलढाणा 908 855

5 औरंगाबाद 890 858

6 वाशिम 918 863

7 कोल्‍हापूर 839 863

8 उस्‍मानाबाद 894 867

9 सांगली 851 867

10 जालना 903 870




Friday, August 21, 2015

अकोल्यापासून चे अंतर :
कसलेल्या डोंगरयात्रींची कठीण परीक्षा शिरपुंजे जवळचा भैरवगड
महाराष्ट्रात ४ भैरवगड आहेत पण अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात हरिश्चंद्रगडा समोर मुळा नदीच्या खोर्यात शिरपुंजे आणि कुमशेत या गावांमध्ये असलेल्या भैरवगड मध्ये कसलेल्या दुर्गयात्रींना अगदी कठीण परिश्रम करायला लावणारा आणि त्या परिश्रमाचे फळ म्हणजे भैरवगड तुम्हाला त्याचा माथ्यावरून कळसुबाई पासून ते हरिश्चंद्रगड-माळशेज-नाणे घाट -भीमाशंकर पर्यंन्तचे अवाढव्य सह्याद्रीचे एक बुलंद रूपाचे दर्शन घडवतो.
जायचे कसे:
शिवाजीनगर पुण्याहून अकोले गावाला जाणार्या कोणत्याही S T बस ने राजूरला उतरावे व तेथून अंबित गावी जाणारी s t पकडावी आणि शिरपुंजे गावी पायउतार व्हावे . स्वतःचे वाहन असेल तर उत्तम कारण एस टी आणि जीप ची सेवा या भागात फार कमी आह.
रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळेच्या इमारतीपासून पासून शेतांमधून जाणारी पायवाटेने २ कि मी चालून नंतर एक वाट डावीकडे वरती जायला लागते एक रस्ता भैरोबा (या गावात फक्त भैरोबा चा डोंगरावर कसे जायचे हे विचारावे ) आणि दुसरा रस्ता घनचक्कर(१५३२ मिटर) या महाराष्ट्रातील तिसर्या क्रमांकाचे उंचीचे डोंगलाला एक वाट जाते (भैरवगड आणि घनचक्कर डोंगर जोडून असलेले डोंगर आहेत पण भैरव गडावरून घनचक्कर ला जायला वाट नाही. दोन डोंगरांना एका खिंडने विभागले आहे .जर तुम्हाला घनचक्कर वरती जायचे असेल तर भैरवगड पूर्ण उतरून शिरपुंजे गावात परत यायला पाहिजे आणि शिरपुंजे वाडीतून घनचक्कर चा एक उतरणारा दांड चढून पठारावर जायला लागते.घनचक्कर हा एक चमत्कारी डोंगर आहे कारण हा डोंगर एवढा पसरला आहे आणि त्याला इतके दांड आहेत कि तुम्हाला हा डोंगर कोठून कुठे पोहोचवेल याचा नेम नाही म्हणजे या डोंगरावरून तुम्ही भांडारदारा ला सुद्धा जाऊ शकता,हरिश्चंद्रगड ला सुद्धा जाऊ शकता,कुमशेत मार्गे कोकणात पण उतरू शकता,रतनगड-हरिश्चंद्रगड ट्रेक करणार्यांना तर हा घनचक्कर मुदा चा डोंगर पार करावा लागतोच आणि त्यामुळेच या डोंगरावर सहसा कोणी डोंगरयात्री फिरकत सुद्धा नाही कारण जर वाटसरू नसेल तर कोणताही डोंगर यात्री घनचक्कर वर सहज हरवून जाईल म्हणून या डोंगराच्या ट्रेक ला यायचे असेल तर स्वतःचे वाहन आणू नये म्हणजे तुम्ही जेथून चढले आहात त्याच गावात उतरण्याची काळजी राहत नाही .घनचक्करच्या पठारावरून रतनगड ३ तासाच्या अंतरावर आहे पण हि फार बिकट वाट आहे .
 

Monday, August 17, 2015

झुला हितगुजाचा

कधी अलगद, कधी सुसाट, तर कधी बेभान होणारा हा झुला उंचच उंच गेल्यावर पुन्हा खाली येणारा, त्यामुळे तारतम्यतेचं दर्शन घडविणारा हा झुला जरी आकाशात उंचच उंच गेला तरी वास्तवाचं भान राखणारा. आकाशाला गवसणी घालणा-या मनाला पुन्हा जमिनीवर आणणारा. असं हे झुल्याचं ते अंगणातल्या फांदीवरचं हेलकावे खाणारं रूप मात्र काळाच्या पल्याड लुप्त झालंय. आणि मैत्रिणींच्या समवेत झुल्यासोबत साधलेलं हितगुजही काळाबरोबरच मागे सरलंय.
maitrinअंगणातल्या झुल्यामध्ये खरोखरच अजूनही जीव गुंतलाय. झुला कायम स्मरणात असला तरी त्याचं ते अंगणातल्या फांदीवरचं हेलकावे खाणारं रूप मात्र काळाच्या पल्याड लुप्त झालंय. मैत्रिणींच्या समवेत झुल्यासोबत साधलेलं हितगुजही काळाबरोबरच मागे सरलंय.
सुट्टीचा दिवस म्हणजे झुल्यासोबत झोके घेण्याचा दिवस. मैत्रिणींचा गोतावळा अंगणात जमा करून हास्याचा खळखळाट करून आता तुझी बारी, दहा झोके तुला.. दहा मला.. म्हणत एकमेकींना झोके देत गप्पांना आलेलं उधाण म्हणजे सागराची भरतीच. तिन्हीसांजेची दिवेलागण होईपर्यंत हुंदडण चालूच.
मे महिन्यात पाणी टंचाई. विहिरीवरून पाणी आणण्यासाठी वापरली जाणारी रस्सी (दोरी) सकाळी पाणी आणून झालं की ती झुल्यासाठी वापरावी पुन्हा काढून मग सकाळी पाणी आणण्यासाठी जावं. हा नित्यक्रम ठरलेला. झुला म्हणजे खरं तर दोन मैत्रिणींच्या जीवांची सांगड. खरं हितगुज, मनातलं गुपित या झुल्यासोबतच वाटून घेतलेलं.
दुपारी गार वा-याच्या झुळुकेबरोबर उंचच उंच झोके घेताना काळजाचा ठोका चुकायचा खरा तर अंतरात धडकी माजायची. पण स्वैर वाटायचं. हास्याच्या खळखळाटाने ती मजा खरोखर अनुभवण्याजोगी असायची. मध्ये ब्रेक म्हणजे चहाचा टाईम. मैत्रिणींच्या संगे चहा-बिस्किटाचा आनंद यावेळी वाटून घेतला जायचा. या झुल्याच्या निमित्तानेच तर मैत्रिणी घरी यायच्या. नाहीतर अभ्यासाची चिंता कुणालाच पडलेली नसायची.
गावात सात दिवसांचा विठ्ठलाच्या मंदिरात सप्ताह सुरू झाला की, आमच्या शनिवार, रविवारची दुपार मंदिराच्या बाहेर भल्या मोठा वडाचा झाडाच्या पारंब्यावर रेंगाळलेली. मंदिरात सगळ्या स्त्रिया भजन, अभंगात, टाळ-मृदंगाच्या सुस्वर स्वरात दंग झालेल्या असताना आम्ही या वडाच्या पारंब्यावर झुल झुल झुलायचो. मनसोक्त झोके घ्यायचो. खेळून खेळून घामाघूम झाल्यावरही न दमता, पुढच्या दुपारीही इथेच यायचं ठरवून एकमेकींना जणू वचन द्यायचो.
पण भजनात दंग झालेल्या आमच्या घरातल्यांची मनं मात्र आमच्याकडेच लागलेली असायची. घरी आल्यावर मग देवळात भजनाला यायचं सोडून तिथे वडाच्या झाडाच्या पारंब्यावर जीव गुंतवत बसायचं. आम्ही त्या पारंब्यावर मनसोक्त झोके घ्यायचो.
‘झुला’ बांधताना आंब्याच्या मजबूत फांदीवर रस्सी बांधण्याची आमची जागा ठरलेली असायची. त्या रस्सीचे वळ फांदीवर उमटायचे. पण झुल्यावर झोके घ्यायची हौस काही फिटायची नाही.
आजवर झुल्याचं रूप काही कथाकारांनी आपल्या कथांमधून उलगडलं आहे तर कवितांमधूनही या झुल्याची रुपकं उलगडली गेली आहेत. स्त्री मनाच्या कप्प्यात झुल्याचं स्थान अगदी अबाधित आहे. स्त्री मनाची सांगड या झुल्याशी घातली गेली आहे. अगदी एकाकी स्त्रीचं मन या झुल्यापाशी व्यक्त होऊ शकतं. मनातल्या भावना, सुख, दु:ख हे स्त्रिया झुल्यापाशी मांडू शकते. एखादा आनंद व्यक्त करताना या झुल्यावर झोके घेताना एखादं गाणंही यावेळी तिच्या ओठातून गुणगुणलं जाऊ शकतं.
झुल्यासोबत रममाण होताना खरोखरंच कशाचं भान राहत नाही. तहान भूक हरपून या झुल्यासंगे स्त्री मन एकरूप होऊन जातं. मैत्रिणींचं हितगुज आपसुक इथे साधलं जातं. मनातलं गोड गुपित सांगताना झुला नकळतच साक्षीदार बनून जातो. कधी झुल्यासोबत उंचच उंच झोके घेताना मन आकाशाला गवसणी घालतं. तर गर्रकन गिरकी घेताना मनातील गूढ यावेळी उकललं जातं.
घामाने चिंब झालेल्या मनाला गार वा-याची झुलूक नकळतच सुखावून जाते. हिरमुसलेल्या मनाला झुल्याच्या साथीने मैत्रीचा हिंदोळा खुद्कन हसवून जातो. मैत्री अंतरी ठसवून जातो. आंब्याच्या डहाळीवर कारकूर होणारा झुला आंतरिक हितगुज साधत मैत्रिणींच्या मनाचा ठाव घेतो. संवादाची परिसीमा गाठतो.
पूर्वी माहेरवाशिणी सणाच्या निमित्ताने एकत्रित आल्या की झुल्यासंगे झोके घेत आपल्या आठवणींचे किस्से उलगडायच्या. सुखं, दु:खं या झुल्यासोबतच वाटून घ्यायच्या. गुजगोष्टींची देवाण-घेवाण या झुल्याच्या माध्यमातूनच व्हायची. कुणाचं सासर कसं आहे, नव-याच्या स्वभावाचं वर्णन, सासूचा खाष्टपणा, नणंदेची गाथा आदी या झुल्याच्या माध्यमातूनच उलगडत जाणारी तर कुणी माहेरी सासरच्या दोन्ही आठवणीत रममाण होऊन मनसोक्त गप्पा मारताना या झुल्यातच गुंगून जाणारं.
आजवर झुला हा माहेरच्या आठवणींचा एक हिस्सा बनून राहिला आहे. झुला म्हणजे आपल्याच माहेरचा पाहुणा. तो आपण सासरी आणू शकत नाही. लग्नाआधी आंब्याच्या, चिकूच्या फांद्यांना बांधलेला हा झुला आणि त्यासोबत अल्लडपणे घेतलेले उंचच उंच झोके, हे सासरी येता येताच लुप्त होऊन जातात. आठवणींच्या रूपाने अलगद मनावर कोरले जातात. तो अल्लडपणा काहीसा विरून जातो. मैत्रिणीच्या आठवणीही मनातल्या मनात झिरपून जातात.
‘झुला’ मनात असला तरी या झुल्यासोबतचे क्षण मात्र ताजेतवाने करणारे ठरतात. मैत्रिणींच्या संगे घालवलेला, हुंदडलेला काळ डोळ्यांसमोरून तरळत जातो. एकेएकीची वाट विखुरली जाते. सासरच्या पाठवणीच्या रूपाने एक एक मैत्रीण आठवणींचे रूप बनून डोळ्यांत सामावते.
ते अल्लड वय सरलं तरी झुला चिरतरुणच. कधीतरी अभ्यासाची घोकंपट्टी त्या झुल्यावर बसून केल्याची जाणीव आहे. कधी काही बिनसलं म्हणून रागानेही त्या झुल्यावर बसून स्वत:ला त्यात गुंतवून घेतलं आहे. मैत्रिणींशी घेतलेला अबोलाही आणि त्यानंतर पुन्हा सारं सुरळीत होऊन मनमुराद गप्पाही या झुल्यावरच बसून मारल्या आहेत.
चिंचा, बोरं खिसे भरून आणून या झुल्यासोबत वाटून घेतली आहेत. कधी अलगद, कधी सुसाट, तर कधी बेभान होणारा हा झुला उंचच उंच गेल्यावर पुन्हा खाली येणारा, त्यामुळे तारतम्यतेचं दर्शन घडविणारा हा झुला जरी आकाशात उंचच उंच गेला तरी वास्तवाचं भान राखणारा. आकाशाला गवसणी घालणा-या मनाला पुन्हा जमिनीवर आणणारा.
एप्रिल-मे महिन्यात हुंदडणा-या मनाला झुल्याचा भक्कम आधार मिळायचा. उन्हाची तिरीप सरली की दुपारी झाडाच्या सावलीत हा झुला सुखद जाणीव करून द्यायचा. झोके घेताना मनसोक्त मनमुराद आठवणी सोबत घ्यायचा. पाणी टंचाई असे तोवरच आम्ही हा सारखा सोडायचो, बांधायचो, कारण रस्सी लागायची पाणी आणण्यासाठी, पण एकदा का आकाशात विजा चमकल्या, ढगांचा गडगडाट झाला, मुसळधार पाऊस पडला की तो झुला आंब्याच्या त्या डहाळीवर एकटाच चिंब पावसासोबत तसाच निथळत राहायचा.. आम्हाला पुन्हा त्याची आठवण होईपर्यंत..!

|

जामरुंगमधील जलयुक्त शिवाराची कामे निकृष्ट

कर्जत तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायतीमधील जामरुंग गावामध्ये जलयुक्त शिवारअंतर्गत कामे करण्यात आली होती.
jamrukhनेरळ- कर्जत तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायतीमधील जामरुंग गावामध्ये जलयुक्त शिवारअंतर्गत कामे करण्यात आली होती. ४९.२२ लाख खर्चून पाणलोट विकासाची कामे करण्यात आली होती.
मात्र खोदण्यात आलेल्या नऊ मातीच्या बंधा-यात पाणीच रोखले जात नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या काम निकृष्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्यसरकारने कृषी, पाटबंधारे, ग्रामविकास, महसूल, आदिवासी उपयोजना आणि वन या विभागांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान राबवण्यास सुरुवात झाली.
कर्जत तालुक्यातील तीन गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानासाठी करण्यात आला. त्यातील टेंबरे ग्रामपंचायतमधील जामरुंग गावामधील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तेथे मातीचे बांध आणि लूज बोर्डर खोदण्याचे नियोजन झाले. त्यासाठी जामरुंग या महसुली गावच्या परिसरात असलेल्या आदिवासी वाडया परिसरात हे मातीचे बंधारे खोदले.
त्यासाठी जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला. मात्र आदिवासी उपयोजनेमधून तब्बल चार ते सहा रुपये खर्चून बांधले गेलेल्या या मातीच्या बंधा-यात पाणी साचून राहत नाही. त्याला कृषी विभागाचे चुकीचे नियोजन जबाबदार असल्याची टीका होत आहे. जे नऊ मातीचे बंधारे खोदले आहेत. त्यात पाण्याचा थेंबही साठून राहत नसल्याने खर्च केलेली रक्कम पाण्यात गेला आहे.
जर पावसाळ्यातही या बंधा-यात पाणी साचून राहत नसेल तर उन्हाळ्यात त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याचे स्पष्ट आहे. बंधा-याचे दगडी पिचिंग केल्यानंतरही त्यातून पाणी वाहून जात असल्याने या बंधा-याचा उपयोग नसल्याचे स्पष्ट आहे.

|

धबधबा एकावर एक फ्री

पाऊस कोसळायला लागला की सिंधुदुर्गातील कडीकपा-यातून अवखळ धबधबे धावू लागतात. आंबोलीचा धबधबा, नांगरतासचा धबधबा, नापणे, मुटाट, मणचे, मांगेली, असनिये हे ज्ञात आणि डोंगरभागातून अजून कितीतरी अज्ञात धबधबे पावसाळयात उतू-मातू जात असतात. स्थानिक वृत्तपत्रे फोटोसहित हे धबधबे निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचवत असतात. त्याबद्दल खरोखरंच त्यांच कौतुक करायला हवं. कारण डोंगरद-यात जाऊन कडयावरून कोसळणारे, फेसाळणारे हे धबधबे पाहणे आणि त्याखाली आंघोळ करणे म्हणजे स्वर्गीय आनंद म्हणजे नेमके काय हे अनुभवण्यासारखंच असतं. पण हा अनुभव एकटया-दुकटयाने घेण्यात मजा नाही. त्यासाठी हवा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप. त्यातही नुसताच मैत्रिणींचा ग्रुप असला तर..? पूछो मत यार!
waterfall1
पाऊस कोसळायला लागला की सिंधुदुर्गातील कडीकपा-यातून अवखळ धबधबे धावू लागतात. आंबोलीचा धबधबा, नांगरतासचा धबधबा, नापणे, मुटाट, मणचे, मांगेली, असनिये हे ज्ञात आणि डोंगर भागातून अजून कितीतरी अज्ञात धबधबे पावसाळयात उतू-मातू जात असतात.
स्थानिक वृत्तपत्रे फोटोसहित हे धबधबे निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचवत असतात. त्याबद्दल खरोखरंच त्यांच कौतुक करायला हवं. कारण डोंगरद-यात जाऊन कडयावरून कोसळणारे, फेसाळणारे हे धबधबे पाहणे आणि त्याखाली आंघोळ करणे म्हणजे स्वर्गीय आनंद म्हणजे नेमके काय हे अनुभवण्यासारखंच असतं. पण हा अनुभव एकटया-दुकटयाने घेण्यात मजा नाही. त्यासाठी हवा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप. त्यातही नुसताच मैत्रिणींचा ग्रुप असला तर..? पूछो मत यार!
आम्ही इनरव्हील क्लब सावंतवाडीच्या मैत्रिणी दरवर्षी एका तरी धबधब्याला भेट द्यायची म्हणतो. त्यामुळे बरेचसे धबधबे पुन्हा पुन्हा पाहून आणि न्हाऊन झालेत. यावेळी कुणीतरी सुचवलं मुटाट धबधब्यावर जायचं. तिथे फारशी गर्दी नसते. यथेच्छ डुंबायला मिळेल. अर्थात या संदर्भातही वादविवाद होताच.
कुणी म्हणालं तिथं धबधब्याखाली डुंबायला फारस पाणीच नसतं, तर कुणी म्हणालं, पाणी इतकं जोरात असतं की त्या पाण्यात उतरताच येत नाही. शेवटी ‘हातच्या कांकणाला आरसा कशाला’ म्हणत निघालोच. तिथली दोन-तीन जुनी देवळेही पाहण्यासारखी आहेत, शिवाय विजयदुर्ग किल्लाही तिथून तसा जवळच.
आयोजनाची सारी जबाबदारी प्रसिडेंट रियाने उत्साहाने घेतली आणि सल्लागार करंदीकर वहिनी. दोघींचा छोटया-मोठया सहली आयोजनाचा अनुभव दांडगा. सकाळीच निघालो. वीस मेंबर नक्की झालेत. नेहमीप्रमाणे ऐनवेळी काहींनी कारणे पुढे करीत दगा दिला. पण उरलेल्या शिलेदारांनी इतरांची कुमक असो वा नसो धबधबा लढवायचाच अशी स्वयंप्रतिज्ञा करीत ऐसपैस गाडीत ऐसपैस बैठक मारली. निघालो. दोन अडीच तासांचा तर प्रवास. गप्पा रंगल्या. हळूहळू पर्समधल्या चॉकलेटच्या, वेफर्सच्या, बिस्कीटच्या, चिवडया-चकलीच्या पुडया फुटून गाडीच्या प्रत्येक सीटवर फिरू लागल्या.
मुटाटचा धबधबा तसा आड बाजूलाच. फारसं तिथं कुणी जात नाही. आम्ही निघालो खरं पण तो कुठे आहे, ना धड आम्हाला माहीत ना आमच्या ड्रायव्हर अतुलला. गाडी थांबवून कुणाला विचारावं तर ‘हडेन आसा आणि तडेन आसा..’ खरं तर पावसात सगळीकडेच पाणी धबधबत असतं. खेडयातील लोकांना त्यांचं काय अप्रूप! आपली शेती भली की शेतीपुरता पाऊस भला! ह्या नसत्या हौशीमौजी करायला वेळ कुणाला असतो!!
शेवटी रस्ता चुकलोच. रस्त्यावरून जाणा-या एका गृहस्थाला विचारलं, तर तो म्हणाला, ‘हे मुटाट नव्हे, तुम्ही मंच्याला आलात. पण इथे सुद्धा खूप मोठा धबधबा आहे. फारसं कुणी येत नाही पाहायला. पण सिंधुदुर्गातील हा सर्वात उंच धबधबा. शंभर फुटांवरून कोसळतो. तुम्ही बघाच तिथे एक देऊळ आहे त्याच्या मागे आहे धबधबा. देऊळ जुनं आहे. आता तिथं गाववाल्यांनी..’ गृहस्थ उत्साही.
चुकून गावांत आलेल्या टुरिस्टना किती सांगू, किती नको अशी त्याची अवस्था.. आणि आमचा वैतागलेला ड्रायव्हर हां.. हां.. हो.. हो.. करीत नीट न ऐकता त्याने गाडी दामटवली. जंगलात एका छोटयाशा देवळापाशी थांबलो, धबधब्याबद्दल विचारावं तर आजूबाजूला कुणी नाही, देवळात कुणी चुकार भाविक किंवा निदान सकाळी पुजारी असेल म्हणून चौकशीसाठी देवळात गेला तर तिथेही कुणी नाही.
कोसळणा-या पाण्याचा आवाज येत होता, म्हणजे इथेच कुठे तरी जवळपास असावा.. आमचा ड्रायव्हर शोध मोहिमेवर निघाला. आम्हीही देवळाच्या आजूबाजूला भटकतोय. तेवढयात जोराचा पाऊस आला आणि आम्ही छत्र्या बंद करून ठेवल्या. मनसोक्त भिजलो. गुमास्ते, कुलकर्णी, सडेकर, देसाई वहिनी मात्र देवळांत बसून आमची मस्ती पाहत न भिजताच भिजत होत्या. त्यांनी पचेल तेवढाच पाऊस आणि मानवेल इतकीच मस्ती करायची ठरवली होती.
बहुधा मी, रिया, मिना, उल्का, कविता, करंदीकर वहिनी जशा पाऊसच झालो होतो. आजूबाजूला कुणीही नाही. आमचा ड्रायव्हरही नाही. आम्ही आणि पाऊस, पाऊस आणि आम्ही. कौलारू देवळाच्या चारी बाजूने केवढया तरी जोराने पागोळया सांडत होत्या. घर, संसार, वय, हुद्दा अन् मुद्दा विसरून, ‘सोहंम’ झालेल्या आम्ही! चक्क ‘झुकुझुकु आगीन गाडी’.. करत एकमेकांचे खांदे पकडत देवळाभोवती पागोळयाखालून धावलो.
कल्पना करा, चाळिशी, पन्नाशी, सत्तरीच्या कुणी आम्ही धो-धो पावसात ‘झुकुझुकु आगीन गाडी खेळतोय..’ भल्याभल्यांना वेड लावायची ताकद निसर्गात असते ती अशी! या सगळया ‘आनंदी आनंद गडे..’मध्ये आमच्या ड्रायव्हरने धबधबा सापडल्याची सुवार्ता देऊन आमच्या आनंदाचा अगदी कडेलोट केला होता.
खरं म्हणजे आम्ही गाडी करून निघालो होतो, मुटाटचा धबधबा पाहायला आणि पोहोचलो ‘मंचा’च्या धबधब्यापाशी जो आमच्या ध्यानीमनीही नव्हता. जसा काही हा एकावर एक फ्री धबधबा मिळाला आम्हाला. तेव्हा त्याचं अप्रुप होतंच. अडचणीतून वळचणीतून झाडीतून आवाजाच्या रोखाने निघालो. आणि तो दिसला! त्याने जिंकलं! केवढा मोठा निसर्गाचा हा खजिना झाडामाडात लपलाय! वा-यावर लांबवर येणा-या त्याच्या तुषाराने सांगावा आणला. पण त्याच्या मुळाशी जाणं सोपं नव्हतं. नाही म्हणायला थोडीशी वाट सिमेंट-दगडांनी तयार केली होती. पण त्यावरही शेवाळ दाटलं होतं.
पण धबधबा पाहून अंगात वारं शिरलेली मी त्या निसरडया दगडावरून घसरत, उठत बसत ‘इंच इंच लढवू’च्या आवेशात धबधब्याच्या दिशेने निघाले. ग्रुप मागे पडला. उडणारे तुषार नाका-तोंडाला गुदगुदल्या करताहेत, कोसळणा-या पाण्याच्या आणि भणाणणा-या वा-याच्या आवाजात त्यांचं बोलणं, हसणं कानाच्या पलीकडे जात चाललेलं. पण तेवढयात एकच गिल्ला. ‘थांब.. थांब.. पुढे जावू नकोस, ही बघ उल्का पडली.. उल्का पडली.. आम्ही मागे फिरतोय..’’ मागे वळून पाहिलं तर उल्का थरथरत उभी. तिने ब-यापैकी गटांगळया खाल्ल्या होत्या.
हातापायाला लागलं होतं. तिला पाहून आता माझेही पाय कापायला लागलेत. मी बरीच धबधब्यापाशी पोहोचले होते. आता पंधरा-वीस फुटांवर धबधबा. पण मला मागे बोलावण्याचा रेटा इतका वाढला की हातातोंडाशी आलेला धबधबा सोडून मी मागे फिरले. त्या निसरडयातून मागे फिरणं आणखीनच कठीण. धोपटत घसरत झाडांच्या काटक्या, खडकाची टोकं पकडत मी कशी तरी आले खाली.
आपल्या जिल्ह्यात कितीतरी असे नैसर्गिक खजिने डोंगरद-यात लपले आहेत. अलौकिक आनंदाचे हे ठेवे! भरभरून आनंद लुटावा असे. पण असा हा आनंद लुटायला त्यांच्यापर्यंत पोहोचता तर आलं पाहिजे! नुसतच ‘येवा कोकण तुमचाच आसा..’ म्हणून कसं चालेल.. ‘या’ म्हणताना तिथवर पोहोचायला आवश्यक सुविधा तर पाहिजेत! पण हे करायचं कुणी..? इथंच तर घोडं पेंड खातंय!! असो!
धबधब्यापाशी पोहोचायची इच्छा तर अपुरीच राहिली. दुरूनच दर्शन झालं. धबधब्याखाली नाही निदान धबधब्याच्या खाली वाहत आलेल्या पाण्यात तरी आंघोळ करायची म्हणून वहाळासारख्या वाहणा-या त्या गार गार पाण्यात शिरलो. मला पोहता येतं या पूंजीवर बिनधास्त पाण्याच्या धावत्या धारेत शिरण्याचं माझं धाडस आणि जशी काही मी आता त्या धारेला लागून वाहून जाणारच अशा खात्रीने मैत्रिणींचा आरडाओरडा. अर्धा तास डुंबलो.
एव्हाना दुपार होत आलेली. पण पावसाळी वातावरण असं की सकाळचे सहा वाजलेत असं वाटावं. पण पोट दुपार होत आल्याचं सांगत होतं. आणि आमची जेवायची सोय तर मुटाटला एका घरगुती खानावळीत केली होती. तेव्हा तिथं जाणं क्रमप्राप्त होतं. पण ह्या नाही तरी मुटाटच्या धबधब्याखाली आंघोळ करायचीच ठरवून ओल्यात्या अंगाने अन् निथळत्या कपडयाने आम्ही गाडीत चढलो. सिट्स भिजू नयेत म्हणून उभ्याच राहिलोत. मुटाट तसं मंचापासून अगदी जवळ. पोहोचलोत आमच्या इच्छीत धबधब्यापाशी. बाप रे! धबधब्याचे ते अक्राळ विक्राळ रूप!! तोबा! तोबा!!
सकाळपासून धो-धो कोसळणा-या पावसाचा लोंढा त्या धबधब्याच्या रूपाने खडकांना टक्कर देत उसळत फुसांडत धावत होता. त्याचं लाल पाणी खालच्या दरीत कोसळत होतं. त्या प्रवाहात हत्ती शिरला असता तरी मुंगीसारखा पाण्याबरोबर उडाला असता. तिथं आमची त्याच्या आजूबाजूलाही जायची काय प्रज्ञा. नुसतच काठाशी कुडकुडत उभं राहून धबधब्याचे ते रौद्र तांडव नृत्य पाहत होतो. जशी काही एक मोठी पांढरीशुभ्र सुनामी लाट आदळत खिदळत अंगावर धाऊन येतेय, असं वाटत होतं.
न राहून मी जरा पुढे सरकले. काठावरून त्या धावत्या पाण्याला नुसता स्पर्श करावा वाटलं. पण पाण्याची अजिबात भीती नसलेली मी प्रवाहात शिरायचा आगाऊपणा करीन म्हणून मीना, रियाने मला पकडूनच ठेवलं. मी पुढे गेले तर प्रवाहात सापडून माझे कसे बारीक तुकडेच नव्हे तर खीमा होणार इथपासून, आम्हाला सावंतवाडीत परतून लगेच तुझी शोकसभा घ्यावी लागणार, दरवर्षी तुझ्या स्मृतिप्रीत्यर्थ तुझ्या घरच्यांच्या खर्चाने कसे कविसंमेलन घ्यावं लागणार, इथपर्यंत उपस्थित सर्व भगिनींचा उत्स्फूर्त परिसंवाद रंगला आणि मी जित्याजागतेपणी तो अनुभवला.
साहजिकच त्या धबधब्यात भिजण्याची इच्छा करकच्चून बांधून ठेऊन आम्ही त्या छोटयाशा पुलावरून समोरच्या देवळात देवदर्शनाला निघालो. एवीतेवी भिजलोच होतो आणि ओल्यात्या अंगाने देवदर्शन घेतलं. तर अधिक फलदायी होतं! त्यामुळे आधी दर्शन आणि मग ओले कडपे बदलाचे ठरवून आम्ही पूल पार करायला निघालो. तर त्या तेवढया वाटेतही निसरडं.
मघापासून दगड धोंडयात सावरलेल्या मी, तिथं मात्र देवळासमोरच पाय घसरून सपशेल लोटांगण घातले आणि पुढे पुढे करणा-या मला समोरच्या देवानेच अद्दल घडवली. अशा दोन समजुतीने माझ्या सख्या मनापासून खिदळल्या. हायहुय करीत थोडं नाराजीनेच देवाकडे पाहिले. ती एक मोठी सुरेख शंकराची पिंडी होती. दरवाजा बंद होता. त्यावर लिहिलं होतं ‘स्त्रीयांनी आत येऊ नये’ ब-याच देवळात असा बोर्ड वाचायला मिळतो. काय पाप केलंय बापडया स्त्रियांनी? ‘आम्ही सारी तुझी लेकुरे’ म्हणताना हा भेदभाव का? आता मनू नाही तरी मनूचे वारस असे अजूनही इथे तिथे भेटतात. असो. देऊळ मात्र छान होतं.
तिथं शांतपणे बसून धबधब्याचं ते संगीत ऐकत बसावं! धावत येऊन दरीत उडी मारणारं पाणी डोळय़ांत साठवून घ्यावं! तोही अनुभव थोडा वेळ घेऊन बाजूच्या शेडमध्ये कपडे बदलायला गेलो. दरम्यान अर्धा तास गेला असेल आणि अहो आश्चर्यम्!! मघा चवताळलेला धबधबा आता शांत होत आला होता. त्यातून धावणारं पाणी अध्र्याहून कमी झालेलं. चक्क पाण्याखालचा काळा कातळ दिसत होता. किती छान! मघाशी जवळपासही फिरकू न देणारा धबधबा आता त्यातून आरपार चालत जावं असा. हवं तर मस्त बसून खेळत पाणी अंगावर घ्यावं. अध्र्या तासात हा इतका बदल! कमालच!! बराच वेळ पाऊस थांबला होता. पाण्याचा लोंढा कमी झाला होता अर्थातच धबधब्यानेही बालरूप घेतलं होतं. एकूणच हा धबधब्याचा मूड पावसावर अवलंबून असतो तर! पण आता काही उपयोग नव्हता. पुन्हा कपडे बदलून धबधब्यात शिरण्याइतकं त्राण नव्हते. भूक पोटात तणतणत होती. तेव्हा आधी पोटपूजा.
टीपटॉप घाटे काकू आमच्या स्वागताला पुढे आल्या. घराच्या पुढच्या पडवीवर भला मोठा झोपाळा. एकावेळी पाच-सहा माणसं मागे-पुढे बसतील असा. अंगणात इतर फुलझाडांसोबत कळयाफुलांनी बहरलेले दुर्मीळ ब्रह्मकमळाचे झाड. सगळया त्या झोपाळयावर झेपावल्याच. आत जेवणं वाढायची तयारी. अगदी पाहुण्यांकडे जाऊन घरगुती चविष्ठ जेवण जेवावं असं मस्त(आणि स्वस्तपण) गरम गरम जेवण. आग्रहाने हवं नको वाढणं. आम्हा बायकांच्या नशिबी असं कुणीतरी आग्रहाने वाढलं जाणारं आयतं जेवण म्हणजे पर्वणीच की!
जेवण झाल्यावर सुस्ती आली होती. पण ३०-३२ किमी. वर विजयदुर्ग किल्ला साद घालत होता. भरल्या पोटाने तृप्त मनाने ‘अन्नदाता सुखीभव’ म्हणत निघालो. अंधारण्याआधी निघायचं होतं. पावसाने आता शहाण्यासारखं आम्हाला छत्रीशिवाय मोकळं सोडलं होतं. चक्क ढगांना बाजूला सारून सूर्य डोकावत होता. मुटाटचा तो धबधबा (त्यांच्यावर फ्री मिळालेला) अनपेक्षित सापडलेल्या मंचेचा धबधबा, पाऊसधारा! गार गार वारा!! एकूणच खूप न्यारा गेला तो दिवस!!

|

सह्याद्रीतील किलबिल

सह्याद्री म्हटला की, आठवतात उंच टोकदार कडे, उंचच उंच टेकडीवरून कोसळणारे धबधबे, नद्यांचे रुणुझुणू वाहणारे पाणी.. आणि या हिरवळीत दिसणारे पशू-पक्षी! आता या सह्याद्रीत हत्ती, पटेरी वाघ यांच्यासह काळे वाघही दाखल झाले आहेत. प्राणी संपत्तीने समृद्ध असलेले हे जंगल वेगवेगळ्या धरणप्रकल्पांमुळे  विपुल पाण्याचे क्षेत्र होऊ लागले आहे. या सा-या वातावरणात वन्यजीव संवर्धनही मोठया प्रमाणावर वाढत आहेत. सह्याद्रीप्रेमी भाऊ काटदरे नेहमीच जंगलचे मित्र असतात. त्यांनी या भटकंतीतील अनुभव सांगितले आहेत.
OLYMPUS DIGITAL CAMERA
आकाशाला गवसणी घालणा-या.. अनेक नद्या-उपनद्यांना जन्म   देणा-या.. उंचच उंच धबधब्यांना अंगाखांद्यावर खेळविणा-या..असंख्य वन्यजीवांना आपल्या पंखाखाली आश्रय देणा-या सह्याद्रीच्या पर्वतरांगा भारताच्या दक्षिणेस कणखरपणे उभ्या आहेत. दख्खनच्या पठाराला समांतर विस्तारलेल्या या पर्वतरांगा निमुळत्या कोकण किनारपट्टीला भारताच्या मुख्य भूमीपेक्षा वेगळेपण देतात. म्हणूनच सह्याद्रीचे आगळेपण विशेष आहे. या सह्याद्रीच्या पश्चिम घाटात जैवविविधतेबरोबरच शेकडो पक्ष्यांच्या जाती आहेत. त्यामुळे सह्याद्रीच्या द-याखो-यांत सातत्याने किलबिलाट घुमत असतो.
जागतिक स्तरावरील जैवविविधतेने संपन्न अशा पहिल्या दहा जागांपैकी एक असा तुरा सह्याद्रीच्या शिरपेचात रोवलेला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत ५०० फुलझाडे, १३४ सस्तन प्राणी, १७९ उभयचर प्राणी, असंख्य शोध न लागलेल्या वनस्पती आढळतात. जागतिक स्तरावरील ३२५ हून अधिक अस्तित्व धोक्यात असलेल्या वनस्पती येथे आढळतात. अंदाजे १६०० कि. मी. सह्याद्रीच्या रांगा गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेपासून केरळ ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या आहेत.
यात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ यांची सरासरी उंची १२०० मीटर आहे. ६५ लाख वर्षापूर्वी जेव्हा भारत आणि मादागास्कर वेगवेगळे झाले तेव्हा दख्खनच्या पठाराचा दक्षिणेकडील भाग तुटला व १०० फूट उंचवटा राहिला, याचेच कालांतराने पर्वतरांगांमध्ये रूपांतर झाले. या पर्वतरांगांमध्ये त्याच्या उंचीनुसार व सपाटीनुसार वेगवेगळे अधिवास पाहायला मिळतात. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे जंगल, गवताळ प्रदेश, पाणथळ प्रदेश, झुडपे, समुद्रकिनारे, शेती यांचा समावेश होता.
सह्याद्रीच्या प्रदेशात अतिवृष्टी होते. छोटे खळखळणारे ओढे मिळून प्रचंड धबधबे तयार होतात व एक अनोखा असा आवाज करत उंच डोंगरांच्या कडयावरून जलदगतीने वाहतात. सह्याद्रीच्या खोलगट भागांत नद्यांना पूर येऊन आपल्याबरोबर आणलेल्या जीवनसत्त्वाने शेजारची भातशेती संपन्न करतात. डोंगरमाथ्यावरच्या पावसामुळे तेथे सुंदर व घनदाट अशी वने तयार होतात.
पर्वतांच्या उतारांवर ओलसर पानझाडीची वने पसरलेली आहेत. अशा वनात फिरताना आपल्याला पक्ष्यांचा गोड किलबिलाट ऐकायला येतो. काही आपल्या प्रेमिकांसाठी गातात तर काही आपल्या पिल्लांना मायेने साद घालत असतात. काही इतर नर पक्ष्यांपासून आपली टेरिटोरी प्रांत संरक्षित करतात. कोतवालासारखे काही पक्षी उत्कृष्ट नक्कल करू शकतात. ज्याने त्यांचे शत्रू अचंबित होतात. केवळ दृष्टी अननुभवी पक्षी निरीक्षकाला अपुरी पडते. कारण पक्षी अनेकदा घनदाट पानांमध्ये दडून राहतात.
कधी कधी अशी संधी चालून येते की एखाद्या छोटयाशा आवारात विविध प्रकारचे पक्षी काही क्षणातच पाहायला मिळतात. अशा पक्ष्यांच्या थव्यांना ‘मिक्स हंटिंग फ्लोक्स’ म्हणतात. सगळ्याच जातीचे पक्षी यात सामील होतात. निर्भयी कोतवाल पळसाच्या प्रज्वलित फुलांवर मध पिताना दिसतो. तेवढयात जणू काही लाल रत्न असलेली अंगारक पक्ष्यांची जोडी येऊन झाडावर बसते तेव्हा आपण अगदी नि:शब्द होतो.
उद्योगी मधमाशा मध गोळा करण्यात मग्न असतात. जेव्हा हिरवेगार वेडा राघूंचा थवा त्यांच्यावर तुटून पडतो. माशीमार असतातच. त्यातील टीबीएफसी नर आपल्या निळ्या-नारंगी कोटमध्ये रुबाबदार दिसतो. राजेशाही थाटात स्वर्गीय नर्तक नावाचा पक्षी जणू पांढरी शुभ्र पायघोळ झगा घालून कीटकांच्या मागे भरारी मारत असतो. ज्योतीसारखी उजळणारी पाठ असलेला सुतारपक्षी झाडाच्या खोडांवर आपल्या लांब जीभेने भक्ष्य खुरपत असतो. तेवढयात साधा दिसणारा ioro  गवतासारखा हिरवागार woodshrike चंचल fantail  उडून येतात. सह्याद्रीच्या वनात फिरताना तुम्हाला अनेकदा अशा पक्ष्यांचे संमिश्र थवे दिसतील तेव्हा आपल्या मनाच्या कोपरांत एक  मोहक चित्र अनुभवण्यास मिळेल.
सह्याद्रीच्या काही भागात खुरटलेली झुडपे आढळतात. करकोचासारखे पक्षी अशा प्रदेशात पाहायला मिळतात. आपण तित्तराला तर ओळखतच असाल. महाराष्ट्रातील काही भागात त्याला अत्यंत क्रूरतेने मारून त्याचे मांस खाल्ले जाते. इवलेसे सहजा न सापडणारे वटवटे पक्षी अशा प्रदेशात राहतात. त्यातील एक म्हणजे श्वेतकंठी वटवटया जो महाराष्ट्रात हिवाळ्यात स्थलांतर करतो. नावाप्रमाणेच त्याचा गळा पांढरा शुभ्र असतो. झुडुपांमध्ये आढळणारे पक्षी शोधायचे म्हटले तर कठीण. कारण ते मनुष्याची नजर चुकवून गुपित राहतात. या पक्ष्यांना अचूक ओळखणे वर्षानुवर्षे पक्ष्यांचे निरीक्षण करणा-यालादेखील अवघड ठरते.
सह्याद्रीतील मोठया प्रमाणात वाहणा-या नद्यांमुळे इथे अनेक पाणथळ जागा तयार झाल्या आहेत. या पाणथळ जागांमध्ये पक्ष्यांचे प्रचंड थवे दिसतात. बदके तर उत्तरेतील लडाखच्या शिखरांमधून लांबलचक सफर करून इथे पोहोचतात. पाणकावळे, तुतारी, पाणकोंबडी, बगळा, उघडचोच करकोचांसारखे पक्षी निवांतपणे पाण्याच्या काठावर मासे, बेडूक, कीटक शोधत असतात. तिरंदाज नावाचा एक पक्षी आपली मान सापासारखी डोलवत पाण्यात पोहताना दिसतो. यामुळे इंग्लिशमध्ये त्याला ‘स्नेक बर्ड’ असे नाव पडले आहे.
सह्याद्रीचा काही भाग गवताळ प्रदेशात समाविष्ट होतो. तेथील चांडोल व वटवटे विणीच्या हंगामातील मनोरंजक प्रदर्शनासाठी सुप्रसिद्ध आहेत. मादीला खूश करायला आकाशात विविध गोलांटया मारतात व सुंदर आवाजात गायन करतात. अशा मोहक प्रदर्शनास कुठली मादी नकार देऊ शकते. गवताच्या बिया खाणा-या मुनियादेखील अशा अधिवासांत आढळतात. या चिमुकल्या पक्ष्यांचे थवे लांब गवतावर बसून त्यातील बिया आपल्या चोचीने खाताना दिसतात.
दुर्दैवाने मनुष्याच्या हव्यासापोटी या मुनियांना पकडून अनेकदा पिंज-यात बंदिस्त केले जाते. मग सुंदर मुनियांच्या जोडया मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटसारख्या ठिकाणी केवळ १५० ते २०० रुपयांना विकल्या जातात. अशा प्राण्यांच्या व्यवसायात घेऊन जाणारे बरेचसे पक्षी प्रवासात मृत्यू पावतात. या निरपराध पक्ष्यांच्या इवल्याशा डोळ्यांसमोर त्यांचा परिवार नष्ट होतो. त्यांचे उर्वरित जीवन पिंज-यात मर्यादित राहते. निर्दयीपणे मानव सौंदर्याच्या नावाखाली आपल्या अशा केविलवाण्या परिस्थितीत असलेल्या पक्ष्यांना घरात डांबून ठेवतो.
सह्याद्रीच्या पश्चिमेस पसरलेला आहे..सोनेरी वाळूच्या किना-यांनी नटलेला कोकण! या किना-यावर ‘कुरव’ व ‘सुरय’ पक्ष्यांचे प्रचंड मोठे थवे पाहायला मिळतात. हे पक्षी कुशल दर्यावादी असतात. ते अत्यंत शौर्याने समुद्राच्या खवळलेल्या लाटांमध्ये झेप घेऊन मासे पकडतात. जलदगतीने पसरणारी शेतीदेखील काही पक्ष्यांना आसरा देते. ‘खाटीक’ पक्षी उंच झुडुपावर बसून आपल्या अवतीभोवती लक्ष ठेवून असतो.
कीटक दिसला की त्याच्यामागे उडी मारतो व आपल्या पायात पकडून फाडून टाकतो. पोट भरले की इतर कीटक जवळील झुडपाच्या काटय़ांवर अडकवून ठेवायचे. म्हणून त्याला खाटीक नाव पडले. निळे पंख असलेला आकर्षक ‘नीलपंख’ शेतीमधील नुकसानकारक कीटक खातो. त्याचे विणीतील प्रदर्शन पाहून आपण स्तंभित होतो. आकाशात वेडयावाकडया गोलांटया मारत कर्कश आवाजात गाऊन तो आपल्या प्रेमिकेला खूश करतो. गव्हाणी घुबडाचे भक्ष्य मुख्यत: उंदीर, घुशी आहे. परंतु, मानवाच्या अंधश्रद्धेमुळे या सोनेरी-पांढ-या घुबडाला मारले जाते. काळ्या जादूच्या सबबीखाली या पक्ष्यांचा जीव घेतला जात आहे.
१०० से. मी. ‘महाधनेश’ जुन्या भक्कम झाडांच्या वनात निवास करतो. अंगठयाएवढा असलेला सूक्ष्म ‘फुलटोच्या’ देखील इथे राहतो. पक्ष्यांच्या रंगामध्येही विविधता आढळते. खूप छोटे अंगारक माणिकासारखे फुलांमध्ये लपाछपी खेळत असतात. ‘हळद्या’चा गडद, पिवळा रंग पाहून मन प्रसन्न होते. शुष्क झाडाच्या तपकिरी पालवीत लाल डोके व हिरवेगार अंगाचे ‘तुईया’ पोपट तुई-तुई आवाज गात असतात.  तित्तीर, लाव्हे, वटवटे हे वृक्षाखालील झाडाझुडपांच्या दाटीमध्ये लपून बसतात. अंधुक मातीचा रंग असणारे हे पक्षी सहज नजरेस पडत नाहीत.
सह्याद्रीच्या रांगांतून फिरायला जातो तेव्हा जणू काही पक्ष्यांचा ऑर्केस्ट्राच चालू असतो. पिसारा फुलवून मोर आपले स्वागत करायला ‘म्याँव’ असे ओरडत असतो. ‘सुभगा’ची नक्कल चालू असतेच. ‘मलबारी कस्तुर’ हा त्यात वैशिष्टय़पूर्ण पक्षी आहे. विणीच्या हंगामात कुठल्याही चित्रपटातील नटासारखा आपल्या प्रेयसीला शिट्टया मारून बोलावत असतो. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तो आपले समृद्ध पश्चिम घाट वगळता जगात कुठेच सापडत नाही. पश्चिम घाटात १६ पक्ष्यांच्या जाती आढळतात.
मलबारी पोपट, वायनाडचा हासकस्तुर, मलबारी राखी धनेश, पांढ-या पोटाचा टकाचोर, निलांग, राखाडी डोक्याचा बुलबुल, तांबूस-तपकिरी वटवटया हे १५०० मीटर उंचीपर्यंत पायथ्याच्या सपाट भागापासून ते डोंगरामध्ये आढळतात. पांढ-या पोटाचा आखूड पक्षी, काळा-नारिंगी माशीमार, निलगिरी नीलांग, तांबूस-तपकिरी छातीचा हासकस्तुर व राखाडी छातीचा हासकस्तुर हे पर्वतांवरच्या जंगलात आढळतात.
हासकस्तुरचा आवाज ऐकू आल्यावर कोणीतरी हसतोय हा भास होतो. यातील मलबारी धनेश भारतातील एकमेव धनेश ज्याच्या चोचीला सपाटशिंग नाही. मानेच्या पाठीवर चेसबोर्ड असलेले अत्यंत नैपुण्यतेने झाडांच्या फांद्या चुकवत अतिवेगाने उडणारे निलगिरी वृक्ष कबुतर पर्वतावरच्या जंगलाच्या पायथ्याशी आढळते. तेथे लाल रत्नासारख्या चकाकत आपल्या बाकलेल्या चोचीने फुलांतील मध पिणारा किरमिजी पाठीचा सूर्यपक्षी देखील सूर्यप्रकाशात राहतो.
दोन मर्यादित क्षेत्र प्रजाती पर्वतावरच्या गवताळ प्रदेशातही दिसतात. निलगिरी तीरचिमणी व रुंद शेपटीचा गवती वटवटया इतर दोन म. क्ष. पक्षी ‘टायटलर’चा पर्ण वटवटया व कश्मिरी माशीमार पश्चिम हिमालयातील प्रजनन क्षेत्रातून हिवाळी स्थलांतरित म्हणून पश्चिम घाट एकमेव पक्षीक्षेत्रात येतात. तसेच आपल्याला सह्याद्रीत अनेक स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतील. साधी भिंगरी हिवाळ्याच्या मोसमात अगदी सहजपणे दिसते. शेकडो अमूर ससाणे हिवाळ्यामधून पूर्व आफ्रिकेत सफर करतात. तेव्हा त्यांच्या मार्गात भारत उपखंड येतो.
काही तज्ज्ञ मानतात की, हे पक्षी भारतानंतर अरबी समुद्रावरून उडत थेट आफ्रिकेतच विश्रांतीला थांबतात. या ससाण्यांच्या स्थलांतराची पहिली नोंद भारतातील ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सलिम अली यांनी रायगड येथे ३ डिसेंबर १९५० रोजी केली. गेल्या काही वर्षात मुंबई, लोणावळा येथून शेकडोंनी उडणा-या या ससाण्यांची नोंद झाली आहे. काही पक्षी उभ्या दिशेने स्थलांतर करतात. हा स्थलांतराचा प्रवास उंच पर्वतराजीमध्ये राहणारे पक्षी करतात.
हिवाळ्यात उंच पर्वतांची शिखरे ढगांनी आच्छादली जातात. आसपासचे काहीच दिसत नाही. सोसाटयाचा वारा वाहत असतो. पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो. मग येथे खाण्याचा तुटवडा निर्माण होतो. म्हणून पक्षी शिखरांवरून पायथळाशी येतात. पाऊस कमी झाला ती पुन्हा वरील शिखरांवर जातात. पावसाळ्याच्या काळात तिबोटी खंडया कोकणात विणीसाठी पधारतो. इंद्रधनुष्याच्या रंगांनी नटलेला खंडया नद्यांच्या काठांवर बीळ खणून ५ ते ७ अंडी घालतो. हा खंडया पावसाळ्याच्या गडद पालवीतून रॉकेटसारखा उडताना दिसतो.
सह्याद्रीत मुख्यत:  वने आहेत. त्यामुळे मानवाने केलेली या वनांचा विद्ध्वंस ही एक काळजीची बाब आहे. पावसाळा संपला की दररोज २० ते २५ लाकडाने भरलेले ट्रक सह्याद्रीच्या घाटात जाताना दिसतात. वृक्षतोडीचे दुष्परिणाम स्थानिकांनाच भोगावे लागतात. रत्नागिरीतील मुंबके गावाचेच उदाहरण घेऊया. टेकडीवरील झाडे तोडल्यानंतर माकडांचे कळप थेट गावात येऊन गोंधळ घालू लागले. घरातून अन्नधान्य व बागेतील सर्व फळे चोरून ही माकडे गावाला वेठीस धरत आहेत.
अधिवास नष्ट झाल्याने पक्ष्यांचेदेखील हाल होतात. कंकणेर व  घुबड हे वड, पिंपळसारख्या भक्कम झाडांच्या ढोलीत वर्षानुवर्षे घरटी बनवितात. काही मिनिटांतच जेसीबीने त्यांची घरे पाडून टाकतात. दुसरीकडे सुतार पक्षी प्रतिवर्षी झाडांच्या खोडात नवे बीळ खणून घरटे बनवतो. वृक्षतोडीमुळे हा पक्षी मग एकाच झाडाच्या खोडात आपली घरटी बनविण्यास भाग पडतो. ज्याने ते झाड पोकळ होऊन जाते. मग कधी वा-याच्या जोराने तेदेखील पडते व सुताराची एकमेव घरटं बांधण्याची जागा नष्ट होते. अधिवास नाहीसे होत असल्यामुळे पक्ष्यांना खाण्याचा तुटवडाही निर्माण होतो.
सह्याद्रीच्या विनाशक अशी आणखी एक शक्ती आहे ती म्हणजे बेफिकीर खाणकाम. पर्वतांना फोडून स्फोट करून iron ore, manganese, baux, limestone चे साठे खणले जातात. जैवविविधतेने संपन्न असलेल्या आपल्या प्रदेशात होणा-या या खाणकामाचे दुष्परिणाम आपण नजरअंदाज करू शकत नाही. यातून निर्माण झालेला कचरा पाण्याच्या साठय़ांमध्ये फेकल्याने पाणी प्रदूषित होते. या नदीकाठांवर वर्षानुवर्षे राहिलेले पक्षी विषबाधेने मृत्युमुखी पडतात. हळहळू पक्षी इथे येणे बंद करतात. प्रदूषित हवेने गावक-यांना श्वसनाचे आजार होतात. इवलेसे पक्षी तर भुर्रकन उडून जातात. पण ते जाणार तरी कुठे  खाणकाम, वृक्षतोडी, औद्योगिकीकरणामुळे त्यांची घरे नष्ट झालेली असतात.
आज ते स्वत:च्या मायभूमीत भारताच्या ५ टक्के जीडीपीचे निर्वासित ठरले आहेत. पक्ष्यांचे सौंदर्य मनमोहक असतेच. पण त्याचबरोबर ते आपल्या शेतीसाठी उत्कृष्ट कीटकमार ठरतात. कृत्रिम औषधांपेक्षा जास्त परिणामकारक सूर्यपक्ष्यासारखे पक्षी फुलातील मध पिताना परागकण एका फुलातून दुस-या फुलांत पोहोचवून फलोत्पादनाचे महत्त्वाचे कार्य करतात. गिधाड व कावळे आपले सफाई कामगार असतात. कारण ते दरुगधी व रोगराई पसरू देत नाहीत. निसर्गातील नाजूक तराजू ते सांभाळत पक्षी जगभरातील कवींना उत्तेजित करीत असतात.
प्राण्यांची साखळी खरं तर पर्यावरण संतुलन राखण्यात मदत करत असते. गिधाडासारखा पक्षी स्वच्छतापक्षी म्हणून ओळखला जातो. कावळेही याच मालिकेतील! पशू-पक्षी यांच्या सहवासात राहताना अनेक अनुभव येतात. सध्या सह्याद्रीमध्ये हरिण, सांबर, गवे, बिबटे, पटेरी वाघ, हत्ती अशा अनेक प्राण्यांच्या जाती ज्या दुर्मीळ म्हणून आपण ओळखतो त्या पाहायला मिळत आहेत. त्या सर्व पक्ष्यांचे संवर्धन आणि त्यातून पर्यावरण संतुलन या गोष्टी अधिक जोमाने व्हायला हव्यात. आता जंगल समृद्ध व्हायला लागली आहेत. सह्याद्रीतील ओढही काहीशी कमी झाली आहे. परंतु, एवढं पुरेसं नाही. बराच पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे आमच्या सह्याद्री भ्रमंतीत आणि पर्यावरण संवर्धनात तुमचीही साथ असू द्या!

|

व्यवसायाभिमुख शेतीतून प्रगतीचा चढता आलेख!

पूर्वी शेती उच्च, नोकरी दुय्यम, धंदा कनिष्ठ अशी वर्गवारी होती. ही मध्यंतरीच्या कालावधीत बदलून नोकरी उच्च मानली जाऊ लागली.
farming 1पूर्वी शेती उच्च, नोकरी दुय्यम, धंदा कनिष्ठ अशी वर्गवारी होती. ही मध्यंतरीच्या कालावधीत बदलून नोकरी उच्च मानली जाऊ लागली. पण आताची परिस्थिती पाहिली तर पुन्हा एकदा शेतीला उच्च स्थान मिळाले आहे.
नवनवीन बदलांना आत्मसात करीत आधुनिक पद्धतीने व्यवसायाभिमुख शेतीशिवाय आता पर्यायच उरला नाही. या संबंध घडामोडीत ख-या अर्थाने प्रगतीचा आलेख उंचावयाचा असल्यास शेतीकडे वळलेच पाहिजे.
दोडामार्ग तालुक्यात यासाठी अगदी पोषक वातावरण आहे. मुंबई, कर्नाटक, गोवा ही महत्त्वाची बाजारपेठेची शहरे जवळच्या अंतरावर आहेत. शिवाय तिलारी येथे मोठे धरण, त्याच्यासोबत विर्डी व शिरवल या ठिकाणची धरणे यांच्या प्रशासनाकडून सिंचन क्षेत्राचे नियोजन झाल्यास शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे.
दोडामार्ग तालुका निर्मितीनंतर गेल्या काही वर्षात दोडामार्ग तालुक्याची कृषी क्षेत्रातील प्रगती निश्चितच वाखणण्याजोगी आहे. शासनाने महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन समोर ठेवून तालुक्यात तिलारी प्रकल्प साकारल्याने त्याचा फायदा शेतक-यांना होऊ लागला आहे. त्यामुळे एरव्ही मुंबई-पुण्यासारख्या शहरात नोकरीच्या निमित्ताने धावणारी तालुक्यातील तरुण पिढी आता शेती बागायतीकडे वळू लागली आहे.
शेतीतून उत्पन्न मिळविण्यासाठी आता तालुक्यातील युवा पिढी पुढे सरसावल्याने निश्चितच कृषी क्षेत्रातील ही क्रोंती तालुक्याला विकासाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवणारी ठरेल यात तीळमात्र शंका नाही. त्यासाठी तिलारी प्रकल्पाने अधिकाधिक पडीक क्षेत्र सिंचनाखाली आणणे आवश्यक आहे.
शासनाने दूरदृष्टी बाळगून तालुक्यात गोवा राज्याच्या सहकार्याने दीड हजार कोटींचा तिलारी धरण प्रकल्प साकारला आहे. शिवाय तालुक्यातील माटणे मतदारसंघ ओलिताखाली आणण्याच्या दृष्टीने ४८ कोटी रुपयांच्या विर्डी धरण प्रकल्पाचे कामही सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात दोडामार्ग तालुका कृषी क्षेत्रात जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वात पुढे गेलेला दिसणार आहे.
तिलारी धरणात चालू वर्षी १६ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. या पाण्याचा उपयोग फळबागा फुलविण्यासाठी होत आहे. तालुक्यातील तरुण पिढी मुबंई- पुण्यासारख्या शहरांकडे नोकरीसाठी न जाता आता कृषी व्यवसायांकडे वळू लागली आहे. त्यामुळेच आज तिलारी धरणाच्या पाण्यावर फुलविलेल्या केळी बागा घोटगेवाडी, घोटगे- परमे, कुडासे, मणेरी या परिसरात पाहावयास मिळतात.
गेल्या पाच वर्षात केळी बागायतीच्या लागवडीतून या भागात लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. तालुक्यातील कुंब्रल, कोलझर पंचक्रोशीतही नारळ, सुपारी बागायती बहरू लागली आहे. नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून येथील बागायतदारांनी मोठया कष्टाने सुपारी व नारळ बागा फु लविल्या आहेत. शासनाच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणा-या १०० टक्के फलोत्पादन योजनेचाही पुरेपूर वापर करून आर्थिकदृष्टया सक्षम बनविणा-या काजू पिकाचीही मोठया प्रमाणात लागवड केली आहे.
आतापर्यंत तालुक्यातील साडेसहाशे हेक्टर जमिनीवर नारळ लागवड, ६ हजार ५०० हेक्टर जमिनीवर फळझाड लागवड, १२३ हेक्टर जमिनीवर मसाला पीक तर १ लाख हेक्टर जमिनीवर भातपीक लागवड करण्यात आली आहे.
निश्चितच गेल्या काही वर्षात दोडामार्ग तालुक्याची कृषी क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. त्यामुळे भविष्यात निश्चितच त्याचा परिणाम तालुक्याच्या विकासावर होणार असून आगामी काळात तालुक्याला विकास प्रक्रियेत आणण्यात कृषी क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.
सिंचनाखाली क्षेत्र वाढणे आवश्यक
दोडामार्ग तालुक्यात तिलारी या ठिकाणी असणारे धरण जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी एकटे पुरसे आहे. पण समाधानकारक बाब म्हणजे शिरवल आणि विर्डी या ठिकाणीही धरणे साकारत आहेत. या ठिकाणच्या पाण्याचा वापर शेतक-यांसाठी होणे आवश्यक असून केवळ कागदोपत्री सिंचनाखाली क्षेत्रात वाढ न होता. शेतक-यांच्या जमिनीपर्यंत पाणी पोहोचणे आवश्यक असून तसे नियोजन संबंधित विभागाकडून केले पाहिजे.
.. तर लाखोची उलाढाल
काजू, आंबा, रबर, तेलताड, नारळ, केळी, सुपारी या उत्पादनासाठी दोडामार्गात पोषक वातावरण आहे. जवळ बाजारपेठ आहे. ही उत्पादने व्यावसायिक पद्धतीने घेतल्यास प्रतिवर्षी लाखो रुपयांची उलाढाल शक्य आहे. त्या उलट नोकरी हजाराचा टप्पा पार करू शकत नाही.

दोडामार्ग शहरासोबतच संपूर्ण तालुक्याचे आराध्यदैवत व पावसाळी पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले ठिकाण म्हणजेच कसईनाथ डोंगर. धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आलेल्या या कसईनाथ डोंगरावर असलेला शिवलिंग तसेच पांडवाच्या वास्तव्याच्या खुणा यामुळे दर श्रावणी सोमवारी कोल्हापूर, बेळगाव, गोवा येथील हजारो भाविक आणि या पिरॅमिडरूपी या डोंगरावरून चहूबाजूंचे दिसणारे विलोभनीय दृष्य पाहण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने गर्दी करत आहेत. येणारा सोमवार हा चालूवर्षीच्या श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार असल्याने भाविक व पर्यटकांची कसईनाथवर मोठी गर्दी उसळणार आहे.
दोडामार्ग शहरापासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर वसलेल्या पांडवकालीन कसईनाथ डोंगरावर श्रावणी सोमवारी भाविकांचा मोठय़ा प्रमाणावर गर्दी वाढत आहे. तपश्चर्येस बसलेल्या ऋषिमुनीप्रमाणे व तालुक्याच्या प्रवेशद्वारावरून एका पिरॅमिडसारखा दिसणारा डोंगर म्हणजेच दोडामार्गचा कसईनाथ डोंगर. या डोंगरावर स्वयंभू प्रकट झालेला शिवलिंग आहे. विशेषकरून दर श्रावणी सोमवारी या डोंगरावर भाविकांची मोठी गर्दी उसळते. त्याच बरोबर पावसाळय़ात डोंगरमाथ्यावरून दिसणारे हिरवेगार निसर्गसौंदर्य व दोडामार्ग शहराचे दृष्य पाहण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने या ठिकाणी येतात. गेल्या तीन श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी होतीच येता सोमवार श्रावणातील शेवटचा असल्याने कसईनाथ डोंगरावर भाविकांची अलोट गर्दी उसळणार आहे.
दरम्यान शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी कसईनाथाची सफर ही एक श्रावणातील पर्वणीच ठरत आहे. दोडामार्ग शहरवासीयांचे आराध्यदैवत असलेल्या या कसईनाथ डोंगरावर पांडवांनी अज्ञातवासात असताना एक रात्र वास्तव्य केल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येते तसेच पांडवांच्या वास्तव्याच्या खुणादेखील त्याठिकाणी दिसून येतात. पांडव अज्ञातवासात असताना डोंगरावर रात्रीच्या मुक्कामासाठी आले होते. रात्री जेवणासाठी त्यांनी ‘वाळंण’ लावली होती. ही सर्व तयारी करत असतानाच सूर्य केव्हा उगवला हे त्यांना कळलेच नाही. सूर्य उगवताच पांडव जाण्यास निघाले. जाता-जाता त्यांनी जेवणासाठी लावलेली ‘वाळंण’ तशीच ठेवत त्याची राखणं करण्यासाठी नंदीला त्याठिकाणी ठेवले होते. आतादेखील या डोंगरावर पाषाण रूपी नंदी, ‘वाळंण’ व स्वयंभू शिवलिंग तसेच इतर देवतांच्या पाषाणरूपी मूर्ती पाहावयास मिळतात. हा डोंगर सर करतानादेखील काही अंतरावर पाषाणरूपी देवी देवतांच्या मूर्ती आढळतात व याच ठिकाणी भाविक  थोडासा विसावादेखील घेतात.
या डोंगराची निर्मिती रामायण काळात झाल्याचेही सांगण्यात येते. रामायणातील शेवटच्या युद्धा दरम्यान लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता. त्यावेळी त्याच्या औषधांसाठी रामभक्त हनुमानाने हिमालयातून द्रौनागिरी पर्वत उचलून नेला होता. हा पर्वत उचलून नेत असताना पर्वताचा एक तुकडा पडून या डोंगराची निर्मिती झाल्याचे सांगण्यात येते. कसेही असले तरी एखाद्या पिरॅमिडसारखा शहरापासून लगतच डौलदारपणे उभा असलेला कसईनाथ दोडामार्ग तालुक्यातील पर्यटनस्थळात मानाचे स्थान मिळविण्यात यशस्वी झाला आहे.
श्रावण महिन्यात आजूबाजूचा संपूर्ण परिसर हिरवागार असतो, जसे ‘धरणी मातेने हिरवी झालरच ओढली असावी’असा भास या डोंगरावरून पाहताना वाटते. हा डोंगर चढत असताना मधे लागणा-या धबधब्यांवर आंघोळ करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतेच तसेच काही पॉइंटवरून दिसणारी मनमोहक दृश्य पाहण्यासाठीदेखील पर्यटकांची गर्दी होत आहे. एकदा येऊन गेलेला भाविक वा पर्यटक हा पुन्हा या ठिकाणी आलाच पाहिजे, असेच काहीसे या कसईनाथ डोंगराचे वैशिष्टय़ आहे.
केसरकरांना स्मरणपत्र पाठवायचे काय?
आमसभेत कसई दोडामार्ग पर्यटनस्थळ श्रावणापूर्वी सुसज्ज केले जाईल, असे चंदन गावकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले. आमसभा उलटून आता तीन महिने झाले तरी याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. बैठक घेतली जाईल, असे सांगण्यात आले पण त्यासाठीही त्यांना वेळ मिळाला नाही. आता त्यांना स्मरणपत्र पाठवायचे काय? असा सवाल ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

Friday, August 7, 2015

जात्यावरच्या ओव्या, भूपाळया गेल्या कुठे?..

आमची आजी अगदी पहाटे उठायची. कोंबडा आरवला की तिची पहाट व्हायची. ‘आजीच्या जवळ घडयाळ कसले आहे. चमत्कारिक मात्र आम्हाला ते कळले होते.
villege jateआमची आजी अगदी पहाटे उठायची. कोंबडा आरवला की तिची पहाट व्हायची. ‘आजीच्या जवळ घडयाळ कसले आहे. चमत्कारिक मात्र आम्हाला ते कळले होते. पहाटे उठून आजी ‘वळयत’ जाते मांडायची पायलीभर नाचणे तासाभरात दळून संपवायची.
पहाटेची निरव शांतता, जात्याची मंजुळ घरघर यात आजीच्या कंठातून उमललेल्या सुमधुर ओव्यांचा मिलाफ हवाहवासा वाटायचा! आजीच्या ओव्या आमच्या घराच्या प्रत्येक अवयवाला परिचयाच्या आहेत. आजीच्या ओव्यांचे आमच्या घरावर संस्कार झाले आहेत.
पहिली माझी ओवी गं पहाटेच्या वेळेला
राम या देवाला .. राम या देवाला
दुसरी माजी ओवी गं यशोदेच्या कान्हाला
कृष्ण या देवाला.. कृष्ण या देवाला
तिसरी माझी ओवी गं.. पंढरपूर तीर्थाला
विठ्ठल देवाला.. विठ्ठल देवाला
संत जनेच्या मदतीला विठ्ठल धावला होता. असं सांगितलं जातं. आमची आजी या ओव्या देवांच्या चरणी अर्पण करायची. त्या मनमुक्त म्हणायची. दळता दळतानाच स्वत:लाच हरवायची.  तिची देवावरील श्रद्धा भाव प्रेम तिच्या ओवीत आणि दळतानाच्या समर्पणात दडले होते.
आमच्या आजीने श्वासाच्या अंतापर्यंत जाते ओढले पण ती कधी थकल्याचे जाणवले नाही. किंवा दळण्यासाठी कधी कुरकुरही केली नाही. याचे श्रेय कोकणच्या निसर्गाला आहे. अशा प्रकारचे निरामय आरोग्य कोकणच्या माणसाला लाभले आहे. कोकणच्या नंदनवनात नांदणारे हेच ते तेजस्वी चैतन्य जे प्रत्येक माणसाच्या हृदयात नांदते आहे. हा चैतन्यरूपी विठ्ठल प्रत्येकाच्या हृदयात वास करतो आहे. पण हा खरा देव आम्हाला कधी कळलाच नाही. म्हणूनच एकेकाळी तुकाराम महाराज आंतरिक म्हणाले..
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन
विसरोनी गेले ख-या देवा
कोकणात नांदणारा निसर्गरूपी देव आपला खरा देव आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश ही सगळी पंचतत्त्वे, आपल्या देशात नांदतात, आपला देहत्व मुळी परमेश्वर स्वरूपी चैतन्याचा आविष्कार आहे. म्हणूनच निसर्गाच्या प्रत्येक नियमाला आपण बांधील आहोत. त्यांच्याशी आपलं अतुट नातं आहे. निसर्गाच्या नियमांशी आपण सुसंगत वागलेच पाहिजे. या निसर्गाच्या नियमांशी आपले वाडवडील सुसंगत वागले. म्हणूनच या निसर्ग देवतेने त्यांना आमच्या आजीसारखे निरामय आरोग्य बहाल केले. आमच्या आजोबांनाही निरामय असे दीर्घायुष्य लाभले.
आमचे आजोबा वारकरी होते. गळयात तुळशीमाला धारण केली होती. केशरी गंधाचा टिळा कपाळी लावीत. आजोबा प्रात:काळी लवकर उठायचे ‘उठा उठा सक ळीक वाचे स्मरावा गजमुख’ हे गजाननाचे स्मरण प्रात:काळच्या मांगल्याला भारून टाकायचे. आजोबांच्या या भूपाळया संस्कार रूपे आम्हालाही अवगत आहेत.
पहाटेच्या आजीच्या ओव्या आणि आजोबांच्या भूपाळया. पहाटे कोंबडा आरवल्यापासून उजाडेपर्यंत काम करतानाही भगवंताचे स्मरण माणसाच्या हृदयातील ईश्वरतेचा विकास आहे. त्याच्या प्रक्षेपणाचा प्रकाश आहे! ही दिव्यत्वाची प्रभा आहे.
आपल्या संचीतात पुण्याईचा साठा करणारे हे पुण्यधन आहे! हे दिव्यत्व हे पुण्यधन तुम्हाला आम्हाला सगळय़ांना या निसर्ग देवतेने अगदी सहज बहाल केले आहे. निसर्गाच्या या वरदानाचा आपण सदुपयोग करू या. सूर्यनारायण एकदा या भूतळावर अवतरला की चैतन्याचे सगुण साकार आविष्कार या भूतलावर चराचरात लवथवताना दिसतात.
पाखरांचा किलबिलाट काय सांगतो आपल्याला? .. काय सांगत असतात ही पाखरे अनाकलणीय भाषेतून?.. कुठे लपून बसलीय ती सुरेल तालात चिवचिवणारी नाजुक मैना? ..ही खारूताई आपल्या मिशा पुसत सकाळी सकाळीच काय कुरतडते आहे आणि कसली धावपळ चालली आहे तिची? गाय हंबरते आहे गोठयातून आणि ते पाहा तिचे वासरू शेपूट उंचावून उंडरते आहे.. बाबानी या वासराला मोकळे सोडले वाटते.. आता बाबा गाईच्या दुधाची गरम गरम धार काढतील.. अजूनही गाय हंबरते आहे..
वासरू तिच्या कासेला ढुशी देणार.. तेव्हाच ती पान्हा सोडणार.. हा हवाहवासा घुंगरांचा कर्णमधुर आवाज.. नक्कीच आबानी बैलगाडी जुंपली. देवळातल्या घंटानादाने परिसर भारून गेलाय. विठ्ठलाच्या देवळात सकाळची आरती सुरू झाली.. आरतीचा आवाज कृष्णा काकांचा आहे. गुरे वासरे आता माळावर चरतायत.. गुराखी काळया खडकावर घोंगडी अंथरून बसलाय, कोवळया रूपेरी किरणात..
पोरीबाळी नदीवरून भरले हांडे घेऊन रमत गमत घराकडे परतल्यात. प्रात:काळच्या रूपेरी किरणांचा सडा अंगणभर पसरून आला त्याने आपले हातपाय सर्वदूर पसरलेत.. झाडांच्या पानांतून झिरपणारी रूपेरी सिताचवरी झाडाखाली नाचते आहे. उबदार नाजुक सुकुमार वा-याची झुळुक मनाला सुखावते आहे. सारेच वास्तव्य बोलके आणि मंगलमय मनाला पावित्र्याच्या मंदिरात घेऊन जाणारे.. सदैव हवेहवेसे वाटणारे!

Thursday, August 6, 2015

अकोले , ता . ६:  अकोले तालुका ग्राम पंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत तरुणांना व  उमेदवारांना संधी मिळाली असून काही पुढार्यांनी मात्र आपले बुरुज ढासळू दिले नाहीत माजी सभापती कैलास वाकचौरे यांनी कळस मध्ये आपले वर्चस्व सिद्धकेले , भाजपचे जालिंदर वाकचौरे , शिवाजी धुमाळ , मच्छिंद्र धुमाळ यांनी आपले स्थान टिकविले तर ढोकरी येथे राष्ट्रवादीचे विकास शेटे  ,हिवरगाव सभापती अंजनाताई बोंबले , कोतूळ मध्ये सीताराम देशमुख यांना या निवडणुकीतफारसे यश   आले नाही .राजेंद्र   देशमुखयांच्या गटाला ९ जागा तर सीताराम देशमुख यांच्या गटाला ७ जागा मिळाल्या असून माजी सरपंच इंदिरा गोडे या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत , बहिरवाडी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी चे विठ्ठल चासकर गटाला  ३ जागा तर विरोधी गटाला ४ जागा मिळाल्या आहेत आदिवासी भागातील निवडणुकीत पक्षाला बाजूला सारत स्थानिक विकास मंडळे स्थापन करून निवडणुकात तरुण कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विजय मिळविला आहे . मात्र
अकोले ग्रामपंचायत निवडणुकीत ११ बिनविरोध व चाळीस पैकी ३१ जागा अश्या ४२ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस  ने आपले वर्चस्व असल्याचे सांगितले आहे तर भाजप सेनेनेही ५१ पैकी १६ शिवसेना व २ भाजप असे १८ जागांचा दावा केला आहे .
















अकोले , ता . ६:  अकोले तालुका ग्राम पंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत तरुणांना व  उमेदवारांना संधी मिळाली असून काही पुढार्यांनी मात्र आपले बुरुज ढासळू दिले नाहीत माजी सभापती कैलास वाकचौरे यांनी कळस मध्ये आपले वर्चस्व सिद्धकेले , भाजपचे जालिंदर वाकचौरे , शिवाजी धुमाळ , मच्छिंद्र धुमाळ यांनी आपले स्थान टिकविले तर ढोकरी येथे राष्ट्रवादीचे विकास शेटे  ,हिवरगाव सभापती अंजनाताई बोंबले , कोतूळ मध्ये सीताराम देशमुख यांना या निवडणुकीतफारसे यश   आले नाही .राजेंद्र   देशमुखयांच्या गटाला ९ जागा तर सीताराम देशमुख यांच्या गटाला ७ जागा मिळाल्या असून माजी सरपंच इंदिरा गोडे या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत , बहिरवाडी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी चे विठ्ठल चासकर गटाला  ३ जागा तर विरोधी गटाला ४ जागा मिळाल्या आहेत आदिवासी भागातील निवडणुकीत पक्षाला बाजूला सारत स्थानिक विकास मंडळे स्थापन करून निवडणुकात तरुण कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विजय मिळविला आहे . मात्र
अकोले ग्रामपंचायत निवडणुकीत ११ बिनविरोध व चाळीस पैकी ३१ जागा अश्या ४२ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस  ने आपले वर्चस्व असल्याचे सांगितले आहे तर भाजप सेनेनेही ५१ पैकी १६ शिवसेना व २ भाजप असे १८ जागांचा दावा केला आहे .

Monday, August 3, 2015

हळद लावूनी आले ऊन। कुंकूमाक्षता फुलांमधून।।

कवी बा. भ. बोरकरांच्या या काव्यपंक्तीची अनुभूती सध्या माळरानांवर सडय़ांवर अनुभवता येत आहे. हे सौंदर्य बघताना मन एवढं रमून जातं की, कोण कोणात हरवलं आहे तेच समजत नाही.
pink flowersहळद लावूनी आले ऊन।
कुंकूमाक्षता फुलांमधून।
झाडांमधून झडे चौघडा।
घुमते पाणी लागून धून।।
निळींतूनी हिरव्यात भुरळली।
पिवळी सोनपिसोळी।
रत्नांच्या गहिवरात न कळे।
कोण हरवले कुणात।।
कवी बा. भ. बोरकरांच्या या काव्यपंक्तीची अनुभूती सध्या माळरानांवर सडय़ांवर अनुभवता येत आहे. हे सौंदर्य बघताना मन एवढं रमून जातं की, कोण कोणात हरवलं आहे तेच समजत नाही. श्रावणातल्या निसर्गाने सृष्टीसौंदर्यच बदललं आहे. एरव्ही स्थितप्रज्ञाप्रमाणे असणारे सडे हिरवेगार होताना रानफुलांनी रंगीबेरंगी झाली आहेत. इथलं हे अनोखं सौंदर्य न्याहाळताना रंगांच्या उधळणीत मन हरखून जात आहे.
‘नको नको रे पावसा, असा घालूस धिंगाणा’, असं म्हणण्याची वेळ आणलेल्या आषाढाच्या धो-धो बरसणा-या पावसानं श्रावणाच्या आगमनाबरोबरच आपली धुसफूस सोडली. क्षणात सर सर क्षणात ऊन असा ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे.
पावसाच्या या खेळाबरोबरच सिंधुदुर्गात रस्त्याच्या दुतर्फा मोकळे सडे पिवळ्या रंगांनी झळाळून उठले आहेत. उन्हाळ्यात काळ्या भिन्न रामोशासारखा पडलेल्या राकट कातळालाही या श्रावणाने पुलकीत बनवतो. हिरवा पिवळा जांभळा पांढरा निळा किती रंग सांगावेत, फुलांची नक्षीही कितीतरी एक पाकळीच्या फुलापासून सात पाकळ्यांच्या फुलांपर्यंत अशा कितीतरी कलाकुसर पाहायला मिळतात.
विविध रंगांच्या उधळणीत कातळावरील खुललेलं सौंदर्य मन मोहरून टाकत आहे. हे न्याहाळताना काही क्षण तिथेच थबकतात. आयुष्य केवळ एका दिवसाचं घेऊन येणारी ही फुले.. तरीही सौंदर्यात कोणतीही कसर न ठेवणा-या या निसर्गापासून बरंच काही शिकता येण्यासारखं आहे. या इवल्याशा रानफुलांनी सडय़ावर फुलोत्सवच भरवला आहे. पावसाळ्यात दाखल होणारी ही विविध रंगी रानफुलं आपल्या नाजूक तरलतेनं सर्वाचं लक्ष वेधून घेतात.
पिवळी जर्द हरणं, त्यातच पांढ-या धनगराची पागोटी भुई आमरी, पांढ-या निळ्या रंगांच्या ऑर्किड्स, जांभळय़ा रंगांचे सीतेचे अश्रू अशा किती नि कितीक रानफुलं मनाला खिळवून ठेवतात. या रंगांच्या रंगातून सडय़ावर कधी निळे, जांभळे गाणं रंगतं. तर कधी सोन सळा येते, असे कितीतरी रंग ऊन-पावसाच्या खेळात सायंकाळी झळाळून उठतात.
पावसाने कातळावर साचलेल्या डबक्यानजीक गोंडा, जांभळी मंजिरी आणि धनगराचे पागोटे बहराला येते. टपो-या मोत्यांचीच उधळण व्हावी किंवा कातळाला पांढरे तुरे फुटावेत, असा भास निर्माण करतात. अशा रंगाता न्हाऊन निघणारे हे श्रावणाचं सौंदर्य आता मोकळ्या सडय़ावर बहरू लागलंय.