अकोले , ता . ६: अकोले तालुका ग्राम पंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना
धक्का देत तरुणांना व उमेदवारांना संधी मिळाली असून काही पुढार्यांनी
मात्र आपले बुरुज ढासळू दिले नाहीत माजी सभापती कैलास वाकचौरे यांनी कळस
मध्ये आपले वर्चस्व सिद्धकेले , भाजपचे जालिंदर वाकचौरे , शिवाजी धुमाळ ,
मच्छिंद्र धुमाळ यांनी आपले स्थान टिकविले तर ढोकरी येथे राष्ट्रवादीचे
विकास शेटे ,हिवरगाव सभापती अंजनाताई बोंबले , कोतूळ मध्ये सीताराम
देशमुख यांना या निवडणुकीतफारसे यश आले नाही .राजेंद्र देशमुखयांच्या
गटाला ९ जागा तर सीताराम देशमुख यांच्या गटाला ७ जागा मिळाल्या असून माजी
सरपंच इंदिरा गोडे या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत , बहिरवाडी
ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी चे विठ्ठल चासकर गटाला ३ जागा तर विरोधी
गटाला ४ जागा मिळाल्या आहेत आदिवासी भागातील निवडणुकीत पक्षाला बाजूला
सारत स्थानिक विकास मंडळे स्थापन करून निवडणुकात तरुण कार्यकर्त्यांनी
निवडणुकीत विजय मिळविला आहे . मात्र
अकोले ग्रामपंचायत निवडणुकीत ११ बिनविरोध व चाळीस पैकी ३१ जागा अश्या ४२ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस ने आपले वर्चस्व असल्याचे सांगितले आहे तर भाजप सेनेनेही ५१ पैकी १६ शिवसेना व २ भाजप असे १८ जागांचा दावा केला आहे .

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home