दापोली बांधतिवरे व आसूद येथील धबधबे पर्यटकांना खुणावताहेत!
तालुक्यातील बांधतिवरे हा परिसर मोठया प्रमाणात असलेली शासनाच्या अखत्यारीतील फॉरेस्ट लँड यामुळे येथील वनराई जपली गेली आहे.
तालुक्यातील बांधतिवरे हा परिसर मोठया
प्रमाणात असलेली शासनाच्या अखत्यारीतील फॉरेस्ट लँड यामुळे येथील वनराई
जपली गेली आहे. याच परिसराला पाण्याचेही मोठे वरदान मिळाले आहे.
पावसाळयाच्या दिवसांत तर हा परिसर धुके, ढग व त्यातच निसर्गाने पांघरलेली
हिरवी शाल यामुळे येथील दृश्य नजरेचे पारणे फेडणारे असेच असते.
याच परिसरात दोन ते तीन धबधबे प्रसिद्ध
आहेत. येथील वातावरण खूपच आल्हाददायक असते. पावसाळयाच्या दिवसांत बांधतिवरे
येथे धबधब्यांवर सुट्टीच्या दिवसांत माहीतगार पर्यटक व दापोलीकरांची गर्दी
असते. दापोली शहराजवळच्या मौजे दापोली मार्गे बांधतिवरे येथे जाता येते.
बांधतिवरे येथील नदीवर पाणीयोजनेच्या
जॅकवेलजवळच्या परिसरातच हे दोन ते तीन धबधबे आहेत. दापोली शहरातून अवघ्या
५-६ कि.मी.अंतरावर हे धबधबे आहेत.
दापोली-सारंग, दापोली-ताडील या
एस.टी.बसेसने या ठिकाणी जाता येते. मात्र, या ठिकाणी जाण्यास खासगी वाहन
घेऊन जाणे अधिक उपयुक्त ठरते. दापोली शहरातून अवघ्या पाच ते सहा
कि.मी.अंतरावर असणा-या या ठिकाणी शहरातून ऑटोनेही जाता येते.
आसूदबाग येथील धबधबा
दापोली हण्र मार्गावर असलेल्या आसूद
गावातील आसूद बागेजवळ असलेला हा धबधबा आहे. हण्र मुख्य मार्गालगतच हा
धबधबा आहे. हा धबधबा बांधतिवरे धबधब्यापेक्षा लहान असला तरी चांगला आहे. हा
परिसरही स्वच्छ आहे.
आसूद बाग स्टॉपजवळ उतरून या धबधब्याकडे
जाता येते. दापोली, केळशी, हण्र, आंजर्ला, मुरूड, कर्दे, पांजपंढरी या
सगळया एस.टी.बसेस याच मार्गे जात असल्याने बसने जाणेही या ठिकाणी सोपे आहे.
दापोली शहरापासून अवघ्या ५-६ कि.मी. अंतरावर आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home