1 भूतकाळातील आठवणींना उजाळा देत,देणग्यांच्या वर्षावात 'अगस्ती'च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला सुरुवात (फोटो:नानजीभाई ठक्करवाला ठाणावाला यांचा मानपत्र देऊन सत्कार करतांना प्रेमानंद रुपवते,सुरेश कोते,सतीश नाईकवाडी,व इतर मान्यवर छाया प्रतिबिंब,अकोले) अकोले1प्रतिनिधी:भूतकाळातील विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत,आणि आपला खिसा रिता करीत असंख्य माजी विद्यार्थ्यांनी आज अकोलेतील अगस्ती विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी आपले वेगळेपण दाखवून दिले.मोठ्या संख्येने हजर असणार्या 'सिलेब्रेटी'नी तब्बल साडेतीन तास भाषणांची बॅटिंग करूनही कार्यक्रमाला कंटाळलेपणा आला नाही.भावनीक ओलावा असणारा हा कार्यक्रम सकाळी 11.15 ला सुरु झाला.व तब्बल साडेतीन तास हा कार्यक्रम चालला.या दरम्यान पावसाची लागलेली हजेरी ना कार्यक्रम थांबू शकली.ना कार्यक्रम सोडून दिग्गज निमंत्रीत व्यासपीठ सोडून गेले.ना विद्यार्थी वर्गात चुळबूळ झाली. अगस्ती विद्यालयाच्या 'सुवर्ण महोत्सवी' वर्षाला आज सकाळी सव्वा अकरा वाजता सरस्वती पूजन करून आणि संस्था चालक स्वातंत्र्य सैनिक बाबूराव नाईकवाडी यांच्या प्रतिमेचे नानजीभाई,सुरेश कोते,व प्रमुख पाहुण्यांनी पूजन करून करून झाली.कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी गणपतराव नाईकवाडी होते.संस्थेच्या सचिव श्रीमती दुर्गाबाई नाईकवाडी,माजी विद्यार्थीनी व न्यायाधीश मानसी परदेशी,आदी मान्यवर यावेळी व्यासपिठावर हजर होते.सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र सादर केलेले 'महाराष्ट्र गीत' सर्वांची शाबासकी मिळवून गेले.आणि त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाची उंची क्षणाक्षणाला वाढतच गेली. 11 हजार,21 हजार,41 हजार,51 हजार ते प्राचार्य रमेशचंद्र खांडगे यांनी जाहीर केलेले 11 लाख रुपये देणगीचे योगदान म्हणजे पावलोपावली कार्यक्रमाची उंची आभाळाला जाऊन भिडणारी ठरली.आभार जेंव्हा सुरु झाले तेंव्हाच सर्व भानावर आले. यावेळेस उद्योजक नानजीभाई ठक्करवाला यांनी भाषणाला सुरुवात केली.आणि पावसाने हजेरी सुरु केली.मात्र त्यापलीकडे जाऊन विद्यार्थी व शिक्षकांनी संयम दाखवीत परिस्थिती कौशल्याने हाताळली.आणि पाऊस आला असे वाटत असतांनाच या पवित्र क्षणी पावसानेही पलायन करून सर्वांचे 'हौसले' बुलंद केले. नानजीभाई म्हणाले,विद्यार्थ्यांनी आई वडिलांना दररोज नमस्कार करावा.देवापेक्षा ते श्रेष्ट आहेत.त्याचे भान विद्यार्थी वर्गाने ठेवावे.भ्रुण हत्या टाळावी. मात्रुभाषेला आई मानतांना इंग्रजी भाषेला मावशीचे स्थान कायम राहू द्यावे.याकडे लक्ष वेधून नानजीभाई म्हणाले की मात्रु देवू भव,पित्रु देवो भव,आचार्य देवो भव हे सूत्र आचरणात कायम ठेवावे.जात,धर्म,निरपेक्षतेला शिक्षण प्रक्रियेत अनन्यसाधारण महत्व असले पाहिजे अशी पुस्ती जोडली. प्रेमानंद रुपवते,नामदेव शास्री,सुरेश कोते,सुवर्णा ठाकरे,प्राचार्य रमेशचंद्र खांडगे,मधुकर नवले,क्रुष्णागर जेजूरकर,उद्योजक एम.के.धुमाळ,अण्णासाहेब वाकचौरे,पत्रकार सुधीर लंके,वकील बाळासाहेब वैद्य,वकील वसंत मनकर,उद्योजक नितीन गोडसे,आदींची यावेळेस समयोचित भाषणे झाली. संस्थेचे कार्याद्यक्ष सतीश नाईकवाडी यांनी स्वागत केले.प्रास्ताविक प्राचार्य संपत नाईकवाडी यांनी केले.नानजीभाई यांचा यावेळेस मानपत्र देऊन भावपूर्ण सत्कार केला गेला.या मानपत्राचे वाचन घनःश्याम माने यांनी केले.सूत्र संचालन प्रकाश आरोटे यांनी केले.उपप्राचार्य एस.व्ही.कोते यांनी आभार मानले. 2 दादासाहेब रुपवते यांचा 23 रोजी स्म्रुती दिन अकोले1प्रतिनिधी:अकोलेचे सुपुत्र आणि माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांचा स्म्रुती दिन येत्या 23 तारखेला मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान सभाग्रुहात सायंकाळी 5.30 वाजता साजरा केला जाणार आहे.त्यानिमित्ताने प्रा.तुळशीराम जाधव यांची 'समतेची गाणी' ही कार्यक्रम होईल.व त्यानंतर अभिवादन सभा पार पडेल.अशी माहिती प्रेमानंद रुपवते यांनी दिली.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home