सांस्कृतिक
मंत्री विनोद तावडे : म्हापसेकरांच्या घराचे पहा!
मुख्यमंत्र्यांच्या दारात मुंबईतले रोज शंभर बडे बिल्डर त्यांच्या फायली घेऊन उभे असतात. एखाद्या फायलीवर सही करताना पंडित म्हापसेकरांसारख्या पाच जणांचा विचार केला तरी राज्यात खर्या अर्थाने सांस्कृतिक कार्य होईल. ‘तबला’ हाच म्हापसेकरांचा श्वास आहे. वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा त्यांच्या बोटांतील जादू कायम आहे. हिंदी सिनेसृष्टीतील टुकार संगीतकार व कलाकारांचेही आज वर्सोवा, जुहू, वरळी परिसरात आलिशान फ्लॅट व बंगले आहेत, पण संगीताला जादुई तबल्याने समृद्ध करणारे पंडित म्हापसेकर ‘निवारा’ शोधीत आहेत. म्हापसेकर आज कुठे राहतात? यापेक्षा ते कोणत्या अवस्थेत राहतात ते पहा. एका अत्यंत जीर्ण व कधीही पडेल अशा अतिधोकादायक इमारतीत ते राहत आहेत. मालक इमारतीची दुरुस्ती करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. इमारतीत राहणार्या भाडेकरूंची डागडुजीसाठी पैसे काढण्याची ऐपत नाही. पुन्हा ही जीर्ण इमारत मिलिट्री झोनमध्ये येत असल्याने ५०० मीटर परिसरात चार मजल्यांपेक्षा जास्त मजल्यांची इमारत बांधता येत नाही. त्यामुळे ‘फायदा’ नसल्याने बिल्डर इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी पुढे येत नाहीत.
पंडित म्हापसेकर त्या जीर्ण इमारतीत तबला व ‘बोटे’ वाचवून राहत आहेत.
इतिहास असा घडला!
पंडित म्हापसेकरांसारख्या अस्सल कलावंतांची मुंबईत घरासाठी वणवण होते व त्याची खंत महाराष्ट्राच्या एकाही राज्यकर्त्यास वाटू नये. ज्यांना ‘म्हापसेकर कोण?’ हे अजूनही कळले नसेल त्यांच्यासाठी ५० वर्षांपूर्वीचा एक प्रसंग देतो व विषय संपवतो.
१४ मे १९६९.
सकाळी ११ वाजता.
स्थळ - बिर्ला मातोश्री सभागृह.
कला जगतातील एका ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत सभागृह खचाखच भरले होते. ११ वाजता इतिहासाला सुरुवात झाली. पंडित रमाकांत म्हापसेकर यांचे तबलावादन आणि नृत्यांगना सितारादेवी यांचा पदन्यास अशी जुगलबंदी सुरू झाली आणि रंगत गेली. ही जुगलबंदी किती काळ चालेल याचा नेम नसल्याने रसिक प्रेक्षक सभागृहात जेवणाचे डबे घेऊन आले होते. सभागृहाबाहेर ऍम्ब्युलन्स व पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या. साधारण ही जुगलबंदी फार तर आठ ते नऊ तासांच्या वर चालणार नाही असा अंदाज होता, पण पंडित म्हापसेकरांची बोटे थकत नव्हती व सितारादेवींच्या पायातली बिजली विझत नव्हती. सितारादेवी नाचत होत्या व म्हापसेकरांची बोटे तबल्यावर थिरकत होती. रसिक प्रेक्षक त्या जुगलबंदीने अक्षरश: गुंग होऊन गेले होते. तब्बल पावणेतेरा तासांनंतर नृत्यबिजली थकली. सितारादेवी जागेवरच बसल्या, पण पंडित म्हापसेकरांची बोटे त्याच वेगात तबल्यावर फिरत होती.
म्हापसेकर हे खरे तबला नवाज होते व आहेत. आज म्हापसेकरांना घर नाही, पण ते कलेचे स्वामी आहेत. हायकोर्टाच्या न्यायाधीशांना निवृत्तीनंतर सरकारकडून घरांसाठी भूखंड हवे आहेत, पण म्हापसेकरांसारख्यांना घर देणार्यांवर त्यांनी बंदीहुकूम बजावला आहे.
हे काय सुरू आहे?
काय काय बंद करायचे?
मानवतावाद्यांच्या
कुर्हाडीचा घाव मुंबईच्या उरल्यासुरल्या टांगेवाल्यांवरही बसला आहे.
‘हे बंद करा व ते बंद करा’ असे आदेश न्यायालये रोजच देत आहेत. मानवतावाद्यांनी जो फालतू उच्छाद मांडला आहे त्यातून मुंबईचे उरलेसुरले टांगेवालेही सुटले नाहीत. पिसाळलेले कुत्रे मारायचे नाहीत. बैलगाड्यांच्या शर्यती करायच्या नाहीत असे आदेश बजावण्यात आलेच आहेत. आता निसर्गाचा समतोल बिघडेल म्हणून पाणी पिऊ नका, नद्या आटतील. श्वास घेऊ नका, हवा कमी होईल, एवढेच काय ते आदेश द्यायचे बाकी आहेत. घोडेगाड्यांबद्धल जो गदारोळ माजवला जात आहे त्यावर श्री. अनिल जांभेकर यांनी टिपण पाठवले. ते म्हणतात, ‘‘माझ्या लहानपणी या गाड्या आणि टांगेच आमच्या उपयोगी पडले आहेत. या गाड्यांचे चालक, मालक एक तर अशिक्षित आणि गरीब असतात. त्यांचा हा पिढीजात व्यवसाय असल्याने सहसा दुसर्या उद्योगधंद्यांकडे वळत नाहीत. त्यांना हा व्यवसाय बंद करायला लावून बेरोजगार बनवण्यात काय अर्थ आहे? कोणी तरी न्यायालयात जाते व न्यायालय निकाल देऊन मोकळे होते. मुंबई व ठाण्यात पूर्वी टांगे होते. आज मुंबईत थोडे उरले आहेत. कल्याणसारख्या शहरात आजही ‘टांगा’ ही सवारी आहे. माथेरान, महाबळेश्वर, पाचगणीत घोड्यांच्या गाड्या आहेत व त्यातून रोजगार मिळतोय. उद्या बैलाला नांगरास जुंपू नका असेही हे मानवतावादी सांगतील. माणसांनी ढोर मेहनत केलेली चालते, पण बैल व घोडा यांच्याकडून काम करून घ्यायचे नाही, न्यायालये निर्णय देतात म्हणजे काय करतात? या प्रश्नाचे उत्तर रिकाम्या टांग्याचे घोडे शोधत आहेत. त्यांचा मालक बेरोजगार म्हणून तेसुद्धा उपाशी आहेत!
संजय राऊत

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home