शिक्षकांची शिकवणी व्हॉट्सअॅपवर
राज्यातील सरकारी, अनुदानित
आदी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून सतत
अपडेट ठेवण्याची तयारी प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे.

राज्यात गेल्या काही वर्षामध्ये सरकारी,
अनुदानित शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने त्यात सुधारणा
करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून गेल्या चार वर्षापासून प्रयत्न
केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्राथमिक शिक्षण घेणा-या
विद्यार्थ्यांची शिकवण्याच्या पद्धतीत असलेल्या त्रूटी आणि अडचणी दूर
केल्या जातील.
यासाठी प्राथमिक शिक्षणाच्या अध्ययन
पद्धतीत काय सुधारणा झाल्या पाहिजेत यासाठी पहिल्यांदाच शिक्षकांसोबतच
शिक्षण विभागातील तज्ज्ञांकडून येत्या ५ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने माहिती
मागवली जात आहे. त्या आधारे विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीत वाढ करून
अध्ययन स्तर उंचावण्यासाठी आणि प्रामुख्याने भाषा, गणित आणि विज्ञान या
विषयातील अवघड संकल्पना शिक्षकांना सहजपणे सोडविता येण्यासाठी व्हिडीओ आणि
त्यासाठी ई-साहित्य तयार केले जाणार आहे.
हे साहित्य विषयानुसार तयार केले जाणार
असून यात विविध संकल्पना, प्रत्येक अध्ययन पद्धतीतील अडचणींची उकल केली
जाईल. शिक्षकांच्या गरजानुसार ही माहिती तातडीने अँड्रॉईड मोबाईलवर
व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून पाठविली जाणार असून यामुळे शिक्षकांना येत्या
काळात व्हॉटस्अॅपद्वारे शिक्षण देणे सोपे होणार आहे.
गुणवत्तेच्या त्रुटी होणार दूर
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि
अनुदानित १ कोटी ४ लाख प्राथमिक शाळा आहेत. या शाळांवर ७ लाख २४ हजार
शिक्षक आहेत. प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात अनेक त्रुटी दूर
होण्यासाठी संबंधित विषयांची व्हीडिओ क्लिप व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून
प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. याची तयारी अजून प्राथमिक
स्तरावर सुरू असून शिक्षक आणि संबंधितांकडून आम्ही सूचना, अभिप्राय मागवत
आहोत.
- महावीर माने, संचालक, प्राथमिक शिक्षण विभाग
- महावीर माने, संचालक, प्राथमिक शिक्षण विभाग
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home