ध्येय
गाठण्यासाठी जिद्दीला परिश्रम व योग्य नियोजनाची जोड दिली की, यश आपोआप
आपल्या पायाशी लोळण घालू लागते. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे
जहागीरदारवाडी (ता. उस्मानाबाद) येथील संगीता राठोड (चव्हाण) यांनी
नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे
उपजिल्हाधिकारी पदाला घातलेली गवसनी होय. अनेक अडचणींवर त्यांनी मात करून
हे यश संपादन केले, ते स्पर्धा परीक्षेबरोबरच इतरही क्षेत्रात वाटचाल
करणार्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे.
नवोदय विद्यालयात माध्यमिकपर्यंतचे शिक्षण झालेल्या संगीता यांचे आष्टी (जि. बीड) येथे डीएडचे शिक्षण झाले. डीएडच्या दुसर्या वर्षात असतानाच त्यांचा जहागीरदारवाडी येथील शिक्षक असणार्या उत्तम चव्हाण यांच्याशी विवाह ठरला. लहानपणापासूनच अधिकारी पदाचे स्वप्न उराशी बाळगणार्या संगीता यांना त्यांच्या स्वप्नाआड येणारा हा अनपेक्षित धक्का वाटू लागला . मात्र घरच्यांच्या शब्दांपुढे त्यांना हा मार्ग स्वीकारावा लागला. 2006 मध्ये लग्न झाल्यानंतर पूर्वीपासून सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा वेग संसाराचा गाडा हाकताना थोडा मंदावला असला तरी त्यांनी यामध्ये खंड पडू दिला नाही. याबाबत त्यांनी पती उत्तम यांच्याशी चर्चा करून आपले स्वप्न बोलून दाखविले. आपण शिक्षक आणि आपली पत्नीही शिक्षक असावी, या चाकोरीबद्ध विचारसरणीच्या जमान्यात उत्तम चव्हाण यांनी पत्नीच्या स्वप्नाला साकारण्यासाठी केवळ होकारच नाही तर त्यासाठी संसारी जीवनातील अनेक तडजोडी स्वीकारून पाठबळही दिले. पतीकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे संगीता यांना आणखीन बळ मिळाले. त्यांनी याच बळावर 2010 मध्ये पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास केली. परंतु, त्यांना खुनावत होते ते स्वप्न अंबर दिव्याचे. त्यामुळे त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. 2011 मध्ये पुन्हा त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. त्यांची नायब तहसीलदारपदासाठी निवड झाली. यामध्ये एका क्रमाने त्यांचे पोलिस उपाधीक्षक पदाची रँक हुकली. त्यानंतर नवीन पदाचे प्रशिक्षण सुरू ठेवत दुसरीकडे परीक्षेची तयारी कायम ठेवली. त्यानुसार 2012 मध्ये पुन्हा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. सध्या देऊळगाव येथे प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असतानाच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यांच्या जिद्द, चिकाटी व नियोजनबद्ध मेहनतीला फळ आले. त्यांची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली. त्यांचा हा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
संगीता राठोड यांनी असे मिळविले यश
संगीता राठोड यांचे शिक्षण नवोदय विद्यालयात झाले आहे. या विद्यालयात प्रत्येक पंधरा दिवसाला होणार्या सामान्यज्ञान स्पध्रेमुळे त्यांच्यात स्पर्धा परीक्षेची बीजे रोवली गेली. लग्नानंतर मुलगी झाल्याने थोडे दुर्लक्ष झाले. मात्र, मनातली जिद्द स्वस्थ बसू देत नसल्याने आपल्या 15 महिन्यांच्या चिमुकलीला माहेरी आईकडे सोडून अभ्यास सुरू केला. पहाटेपासून अभ्यासास प्रारंभ होई. घरातील सर्वच खोल्यांच्या भिंती स्पर्धा परीक्षेतील अभ्यासक्रमाची विविध उत्तरे, गणिताची सूत्रे, व्याकरण, प्रश्नोत्तरे, मुद्दे अशा पत्रकांनी भरलेल्या. स्वयंपाक करतानादेखील समोरच्या भिंतीवर प्रश्नोत्तरे अथवा बाजूला पुस्तक असे. दुपारी शाळा करून आठ किलोमीटरचा टमटमने प्रवास करीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात क्लाससाठी हजेरी लावली. घरी जाण्यास रात्री 9 ते 9.30 वाजत. परंतु, मनातली जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. पती उत्तम यांची सुरुवातीच्या काळात निलेगाव (ता. तुळजापूर) येथे जवळपास 70 किलोमीटरवर नियुक्ती होती. त्यामुळे ते दोन ते तीन दिवसांतून एकवेळा गावी परतत. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी उस्मानाबादेत घर केले आणि पुन्हा नव्या उमेदीने अभ्यास सुरू केला. या मेहनतीला फळ मिळून संगीता राठोड यांची उपजिल्हाधिकारी पदाकरिता निवड झाली.

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home