एलईडी ऊर्जा बचतीचा महाप्रकाश
घरात होणा-या खर्चामध्ये वाटा
असतो तो वीजबिलाचा. आता विजेचे दर कमी करणे कुणाच्याही हातात नाही; पण एक
तो खर्च कमी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय सुचवले जात आहेत. त्यातलाच एक
पर्याय म्हणजे एलईडी लाईट्सचा वापर.

आधीच्या काळात पिवळा बल्ब आला. त्यानंतर
टय़ूबलाईट आली. त्यानंतर हॅलोजन लाईट्स, पीएल लाईट बाजारात आले. नंतर सीएफएल
म्हणजे कॉम्पॅक्ट फ्लुरोसण्ट लाईट्स बाजारात आले. हे सीएफएल लाईट्स खूपच
लोकप्रिय झाले. या सगळ्या लाईट्सवर सर्वार्थाने मात करणारा लाईट म्हणजे
एलईडी लाईट.
विशेष म्हणजे केंद्र सरकारने एलईडी बल्बचा
वापर अधिक प्रमाणात करण्यासाठी कंबर कसली आहे. परिणामी या बल्बची मागणी
प्रचंड वाढली आहे. त्यामुळे उत्पादकही वाढले आहेत. त्यासाठी आता ग्राहकांनी
जागृत होऊन हे बल्ब खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
भारतीय ग्राहक पारंपरिक दिव्यांपासून
एलईडी दिव्यांकडे वळत असून, त्यांची ऊर्जा कार्यक्षमता, दीर्घ आयुष्य आणि
नियंत्रण हे फायदे त्यांच्या लक्षात आले आहेत. भारतात एलईडी वापरण्याचे
प्रमाण वाढले असून, ग्राहकांना एलईडी निवडताना अतिशय काळजी घ्यावी लागेल.
दुर्दैवाने सध्या बाजारपेठेत उपलब्ध
असणारे एलईडी हे आयात करण्यात आलेले स्वस्त, ब्रँडेड नसलेले एलईडी असून ते
सुरक्षेविषयी सूचना तसेच ऊर्जा कार्यक्षमतेत मागे पडणारे आहेत. अशी
उत्पादने बाजारपेठेत असताना ग्राहकांना एलईडी दिव्यांबद्दल महत्त्वाची
माहिती आणि कमी दर्जाच्या एलईडी दिव्यांपेक्षा त्याचे असलेले वेगळेपण याची
माहिती करून घेतली पाहिजे.
एलईडी उत्पादनांची निवड करताना खालील निकषांवर तुलना केली गेली पाहिजे.
प्रखरपणा किंवा ल्युमेन :
‘ल्युमेन’ हे प्रखर प्रकाश किंवा
प्रकाशाचे मापदर्शक आहे. एलईडी उत्पादनाचे ल्युमेन काळानुसार कमी होत जाते.
काही उत्पादनांचा ल्युमिन्स फ्लक्स (ल्युमेन्समध्ये मोजला जाणारा आणि
प्रोजेक्टरमध्ये सांगितला जाणारा प्रखर प्रकाशाचा निकष) सुरुवातीला चांगला
असतो आणि काही दिवस वापरल्यानंतर तो कमी होत जातो. एलईडी दिव्याचे आयुष्य
हे तो प्रखर प्रकाश देईपर्यंतच असते. एका चांगल्या एलईडी दिव्याची ल्युमेन
(प्रखरपणा) कमी होण्याची क्षमता त्याच्या आयुष्यापेक्षा ७० टक्क्यांनी कमी
असायला पाहिजे. जितके जास्त ल्युमेन तितका प्रकाश जास्त तेजस्वी असतो.
प्रत्येक दिव्याचा ल्युमेन वेगवेगळा असतो. ब्रँडेड दिव्याच्या बॉक्सवर ही माहिती दिलेली असते, तर कमी दर्जाच्या दिव्यांवर ही माहिती नसते.
प्रत्येक दिव्याचा ल्युमेन वेगवेगळा असतो. ब्रँडेड दिव्याच्या बॉक्सवर ही माहिती दिलेली असते, तर कमी दर्जाच्या दिव्यांवर ही माहिती नसते.
उपयुक्त आयुष्य :
वेगवेगळ्या सर्वसमावेशक घटकांचे समीकरण
मिळून अंतिम एलईडी दिवा तयार होतो. एखादा जरी घटक काम करत नसेल, तर दिवा
बंद पडतो आणि त्यामुळे हा निकष जागतिक दर्जानुसार मोजला गेला पाहिजे.
दिव्याचा दर्जा –
एलईडी लाईटमध्ये काही लहान एलईडी चिप्स
असतात, ज्या प्रकाश बाहेर टाकतात. या चिप्समधून बाहेर येणारा प्रकाश एकाच
रंगाचा असायला हवा. याला कलर रेंडिरग इंडेक्स (सीआरआय) म्हणतात. एलईडी
खरेदी करताना हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा असतो. जास्त सीआरआय मूल्य असलेला
दिवा एकाच रंगाचा प्रकाश बाहेर टाकतो. स्वस्त एलईडी दिव्यांचा सीआरआय
तितकासा चांगला नसतो, कारण त्यासाठी चांगल्या दर्जाचा फॉस्फरस वापरावा
लागतो, जो महाग असतो.
रंगातील सातत्य :
एलईडी तयार करणा-या एलईडी चिप्समधून बाहेर
येणारा प्रकाश एकाच रंगाचा असला पाहिजे. शिवाय, समान उत्पादनांनी, समान
रंगाचा प्रकाश दिला पाहिजे, नाहीतर ते वेगवेगळे दिसतात.
अधिकृतता :
एलईडी दिव्यांची भारतीय हवामानानुसार सर्व
बाबींवर चाचणी केली गेली पाहिजे. इतर पारंपरिक दिव्यांच्या स्रोतांप्रमाणे
एलईडीला लागणा-या सगळ्या विजेचे प्रकाशात रूपांतर होत नाही, मात्र ते
उष्णता निर्माण करत नाहीत. हिट सिंकद्वारे ही अनावश्यक उष्णता नाकारली
जाते. हिट सिंकचा वातावरणानुसार उष्णता अपव्ययाचा दर हा वातावरणावर अवलंबून
असतो. त्यामुळे एलईडी लाईट्स वेगवेगळ्या तापमानाला तपासले गेले पाहिजेत.
कमी दर्जाच्या एलईडीमध्ये योग्य हिट सिंक नसतोच, शिवाय ते उत्पादनाच्या
दर्जानुसार योग्य पद्धतीने तपासले गेलेले नसतात.
व्होल्टेज –
एलईडी उत्पादनांची कार्यकारी व्होल्टेज
रेंजची नेहमीच तुलना केली गेली पाहिजे, कारण त्यामुळे व्होल्टेज कमी-जास्त
होत असताना दिवा कितपत टिकेल, याचा अंदाज येतो. दर्जेदार एलईडीच्या बॉक्सवर
त्याची व्होल्टेज रेंजही लिहिलेली असली पाहिजे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home