तणावाचे तण
तण म्हणजे जमिनीवर, शेतात
वेडंवाकडं वाढलेले गवत. शेतात तण माजतात अगदी त्याच पद्धतीनं ते आपल्या
मनातही फोफावतात. मनात नको त्या विचारांची गर्दी झाली की, तणाव निर्माण
होतो.

पण आपण नेमकं तिथेच चुकतो. ऑफिसमध्ये काम
करत असताना आपल्या डोक्यात घरचे विचार येतात आणि घरी असल्यानंतर ऑफिसमधले
विषय पाठपुरावा करतात. या वाईट सवयींमुळे एकाग्रता साधता येत नाही. जिथे
एकाग्रता नसते, तिथे एकता नसते. परिणामी, आमचं जीवन म्हणजे ‘एक ना धड
भाराभर चिंध्या’ बनून जातं. साधारणत: अतिहुशार लोकांना या तापाचा सामना
जास्त कारवा लागतो. कारण आपण हुशार आहोत. हा अहंगंड झाल्यानं त्यांचा
स्वत:बद्दल गोड गैरसमज असतो. ज्याप्रमाणे वर्गातील हुशार विद्यार्थी
परीक्षेच्या वेळी पेपर लिहायला बसतो आणि आपल्याला सगळ्याच प्रश्नांची
उत्तरं येतात या अतिविश्वासानं त्याचा घात होतो. पेपर लिहिताना मनाचा गोंधळ
उडाल्याने चांगले गुण मिळत नाहीत.
अगदी आपल्या डोक्यातील अनावश्यक
विचारांसारखे या नको त्या विचारांनी आपल्याला दुर्गुण चिकटतात. घरातील व
घराबाहेरील ताण-तणाव कमी करण्यासाठी माणूस व्यसनांच्या आहारी जातो. ही मादक
पदार्थाची व्यसनं हळूहळू त्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनतात.
व्यसनांच्याद्वारे तणावावर तात्पुरता विजय मिळवता येतो. काही काळापुरता
आपला मेंदू बधिर करण्याची क्षमता त्यात असल्याने व्यसनांची संख्या आणि गरज
सतत वाढतच जाते. त्यामुळे आपण आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांनी त्रस्त होतोच;
पण आपलं शरीरही साथ देईनास होतं. शेतात वाढलेले तण ज्याप्रमाणे पूर्ण
पिकाचा नाश करतात, त्याप्रमाणे कुविचारांच्या बिजातून फोफावलेले तण आपल्या
मेंदू आणि बुद्धीला भ्रष्ट करतात. यासाठी आपण खेडय़ातल्या शेतक-याला गुरू
मानणं गरजेचं आहे. आपल्या मनातील कुविचारांचे तण सातत्यानं काढण्यासाठी
प्रयत्न करणं अशक्य नाही. दररोज मनाला वळण लागेल अशा क्रिया करणं, हा
त्यावरील उपाय आहे.
ध्यानधारणेपासून सदाचरणापर्यंत अनेक
टप्प्यांवर मनाला वळण लावणं शक्य आहे. फक्त गरज आहे निष्ठापूर्वक
प्रयत्नांची. आपण तसं करू शकलो नाही, तर दोन संन्याशांच्या गोष्टीप्रमाणे
मनावर अनावश्यक बाबींचं ओझं वाढतच जाईल.
दोन संन्यासी होते. नेहमीच्या पद्धतीनुसार पायी भ्रमंती करत ते फिरत असत. त्यांपैकी एक तरुण तर दुसरा पन्नाशी पार केलेला अनुभवी.
प्रवासादरम्यान या दोन संन्याशांना नदी
पार करायची होती. त्याचवेळी एक तरुण स्त्रीसुद्धा पैलतीरावर जाण्यासाठी उभी
होती. दोन संन्याशांना पाहून तिला आधार वाटला. त्यांना नमस्कार करून तिनं
पैलतीरावर जाण्यासाठी मदतीची याचना केली. पन्नाशीतील संन्याशानं काहीही न
बोलता त्या तरुणीला खांद्यावर घेऊन नदी पार केली. पैलतीर येताच त्या
स्त्रीनं दोन संन्याशांचे मन:पूर्वक आभार मानले आणि ती निघून गेली.
संन्याशीही पुढच्या प्रवासाला लागले. चार दिवसांनी ते आश्रमात पोहोचले; पण
मधल्या काळात त्या तरुण शिष्यानं वरिष्ठ शिष्यांशी अबोला धरला. नामस्मरणात
मग्न असलेल्या त्या वरिष्ठ शिष्यांचं मात्र नेहमीप्रमाणेच दिनर्चया सुरू
होती. आश्रम समोर दिसू लागल्यावर त्याला थोडा धीर आला आणि धाडस करून तो
उद्गारला ‘‘स्वामीजी आपण संन्यासी आहोत. त्या तरुणीला नदी पार करण्यासाठी
आपण खांद्यावर उचलून घेतलंत, हा संन्याशी धर्माचा भंग नव्हे का?’’ त्याचा
तो प्रश्न अपेक्षित असल्याप्रमाणेच स्वामीजींनी मागे वळून पाहिले आणि ते
म्हणाले, ‘‘अरे मुला मी तर त्या भगिनीला चार दिवसांपूर्वीच पैलपार सोडलं;
पण तुझ्या विचारांतून मात्र ती अजूनही पार होऊ शकली नाही, हे बरं नव्हे!’’
मन व्हावे उन्मन।
हरपो देहभान।
अखंड ईशध्यान। घडो देवा।
अनाथांच्या हाकेसी
धावुनिया जासी
घेई बा पोटासी। स्वामीराया।
हरपो देहभान।
अखंड ईशध्यान। घडो देवा।
अनाथांच्या हाकेसी
धावुनिया जासी
घेई बा पोटासी। स्वामीराया।
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home