सुशिक्षित सासुरवास
आपण कितीही समाज पुढारला आहे,
सगळे कसे सुश्ििक्षत लोक आहेत, असं म्हणत असलो तरीदेखील प्रत्यक्ष माणसांशी
आपला संबंध येतो तेव्हा कळतं, माणसं कशी आहेत ती. मी लग्न करून घरात आले.

आमची सासू तशी खाष्टच! पण घरात वहिनी
असल्याने मला सुरुवातीला त्यांचा खूप आधार वाटायचा. लग्नानंतर सुरुवातीला
मी सगळं त्यांना विचारूनच करत होते.
पण कामाची सवय नसल्यामुळे स्वयंपाक असा
फारसा जमायचा नाही. तरीही मी करत होते. इतके वर्ष वहिनींनीच केलं मग आता मी
करते असं म्हणून दोन्ही वेळची सगळी कामं मीच करायचे.
तेव्हा एका शब्दानेही तू दमून आली आहेस तर
बस, राहू दे, मी करीन संध्याकाळचं, असं काही त्या म्हणाल्या नाही. उलट
घरीच असूनही त्या बसून राहायच्या.
तेव्हा आमच्या सासूबाईंनीही कधी माझी बाजू
घेऊन संध्याकाळचं तू कर असं वहिनींना काही म्हटलं नाही. असं करता करता
र्वष गेलं. शेवटी एक दिवस मी संध्याकाळी घरी आल्यावर बसूनच राहिले. त्याचा
त्यांना राग आला आणि त्यानंतर संध्याकाळी भांडय़ांचा हा ढीग पडू लागला.
दोन-दोन भाज्या आणि शिवाय एक्स्ट्रा
पदार्थ असं दररोज साग्रसंगीत जेवण त्या करू लागल्या. आमचा एल आकारातला ओटा
होता तो पूर्ण भांडय़ांनी भरून जायचा.
दिवाळीच्या वेळी तर हा भांडयाचा पसारा
अधिकच वाढायचा. कारण दुपारच्या वेळी त्या फराळ करून ठेवायच्या आणि शिवाय
रात्रीचं जेवण. पण मी कधी कोणाला काही बोलले नाही. निमूटपणे सगळं सहन करत
होते.
कित्येकदा भांडी घासता घासता आसवांना वाट मोकळी करून दिली होती. तेव्हा तर जाऊ आणि सासू यांची चांगलीच गट्टी जमली होती.
त्या घरी असूनही सासूबाई त्यांना भाजी
निवडून द्यायला मदत करायच्या. इतकंच काय पण अगदी कपडयाचा साबण झिजला तर
त्याचं बिलही त्यांनी माझ्यावरच फाडलं होतं. जणू काही माझ्याशिवाय घरात
कोणी कपडयाचा साबण वापरतच नव्हतं.
इतकंच काय लग्नानंतरचं पहिलं र्वष सगळे सण
साजरे केले जायचे. पण माझ्या सासरच्यांनी माझा एकही सण कधी साजरा केला
नाही. उलट ऐन दिवाळीच्या दिवशी मायलेकरांच्या भांडणात मलाच घराबाहेर जा असं
सुनवण्यात आलं होतं. माझा नवरा म्हणजे अतिशय देवमाणूस.
तो नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिला म्हणून
मी हे सगळं सहन करू शकले. या गोष्टीला आठ-नऊ र्वष झाली. सासूही गेली.
लग्नानंतरचे जे दिवस कौतुकाचे असतात त्या दिवसात कधी कौतुक तर सोडा; पण दोन
शब्द प्रेमाचेही मिळाले नाहीत. त्यामुळे हे कायमस्वरूपी लक्षात राहिलं
आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home