
सह्याद्रीच्या गिरीशिखरावरून रोरावत कोसळणारे धबधबे म्हणजे अकोले
तालुक्याचे वैभव आहे. यंदा जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने रतनगड,
हरिश्चंद्रगड परिसरातील प्रपात धो धो कोसळू लागले आहेत. कात्राबाईचा धबधबा
हे साहसी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असते. रतनवाडी येथील अमृतेश्वर
मंदिरापासून सुमारे २.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्याजवळ
डोंगराच्या पोटात गुहा तयार झाली आहे. सुमारे तीस फूट गुणिले पंधरा फूट
आकाराच्या या गुहेतून समोर कोसळणारा धबधबा पाहताना देहभान हरपते. रतनवाडीचे
भगवान झडे पर्यटकांना तिथे घेऊन जाण्यासाठी मदत करतात.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home