Sunday, July 5, 2015

पोटासाठी चिमुकलीची ‘तारेवरची कसरत’!
Nashik,CoverStory,
जेलरोड | दि. ४ वार्ताहर पोटाची खळगी भरण्यासाठी माणसाला काहीना काही काम करावे लागते. खेळण्या बागडण्याच्या वयातच मुलांना डोंबारीचे खेळ सादर करून जनतेची करमणूक करावी लागते, यापेक्षा दुर्दैव ते काय! नाशिकरोडमधील रेजिमेंटल प्लाझा परिसरातील काल दुपारचे हे बोलके छायाचित्र चिमुकल्यांची दशा दर्शविणारे ठरावे. हसण्या बागडण्याच्या वयात आई-वडिलांना मदत म्हणून दोरीवरच्या उड्या, दोन्ही बाजूने बांबूला बांधलेल्या दोरीवर ७ ते ८ फुटावरून चालताना डोक्यावर तांब्या ठेवून चालणे, सायकलची रिंग घेऊन चालणे आदी जिवघेणी कसरत करावी लागते. हे डोंबारी संपूर्ण शहर परिसरात ठिकठिकाणी खेळ सादर करतात. जिथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत यांना सतावत असताना मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कोठून आणणार अशी यांची बिकट परिस्थिती असते. शहरात एकीकडे ‘शाळाबाह्य बालकांची सर्वेक्षण मोहिम’ राबविण्यासाठी प्रशासन सरसावले असताना पोटाची खळगी भरण्यासाठी या चिमुकलीची ‘तारेवरची कसरत’ नजरेत पडू नये याचे आश्‍चर्य वाटते!

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home