अकोल्यापासून चे अंतर :
महाराष्ट्रात ४ भैरवगड आहेत पण अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात हरिश्चंद्रगडा समोर मुळा नदीच्या खोर्यात शिरपुंजे आणि कुमशेत या गावांमध्ये असलेल्या भैरवगड मध्ये कसलेल्या दुर्गयात्रींना अगदी कठीण परिश्रम करायला लावणारा आणि त्या परिश्रमाचे फळ म्हणजे भैरवगड तुम्हाला त्याचा माथ्यावरून कळसुबाई पासून ते हरिश्चंद्रगड-माळशेज-नाणे घाट -भीमाशंकर पर्यंन्तचे अवाढव्य सह्याद्रीचे एक बुलंद रूपाचे दर्शन घडवतो.
जायचे कसे:
शिवाजीनगर पुण्याहून अकोले गावाला जाणार्या कोणत्याही S T बस ने राजूरला उतरावे व तेथून अंबित गावी जाणारी s t पकडावी आणि शिरपुंजे गावी पायउतार व्हावे . स्वतःचे वाहन असेल तर उत्तम कारण एस टी आणि जीप ची सेवा या भागात फार कमी आह.
रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळेच्या इमारतीपासून पासून शेतांमधून जाणारी पायवाटेने २ कि मी चालून नंतर एक वाट डावीकडे वरती जायला लागते एक रस्ता भैरोबा (या गावात फक्त भैरोबा चा डोंगरावर कसे जायचे हे विचारावे ) आणि दुसरा रस्ता घनचक्कर(१५३२ मिटर) या महाराष्ट्रातील तिसर्या क्रमांकाचे उंचीचे डोंगलाला एक वाट जाते (भैरवगड आणि घनचक्कर डोंगर जोडून असलेले डोंगर आहेत पण भैरव गडावरून घनचक्कर ला जायला वाट नाही. दोन डोंगरांना एका खिंडने विभागले आहे .जर तुम्हाला घनचक्कर वरती जायचे असेल तर भैरवगड पूर्ण उतरून शिरपुंजे गावात परत यायला पाहिजे आणि शिरपुंजे वाडीतून घनचक्कर चा एक उतरणारा दांड चढून पठारावर जायला लागते.घनचक्कर हा एक चमत्कारी डोंगर आहे कारण हा डोंगर एवढा पसरला आहे आणि त्याला इतके दांड आहेत कि तुम्हाला हा डोंगर कोठून कुठे पोहोचवेल याचा नेम नाही म्हणजे या डोंगरावरून तुम्ही भांडारदारा ला सुद्धा जाऊ शकता,हरिश्चंद्रगड ला सुद्धा जाऊ शकता,कुमशेत मार्गे कोकणात पण उतरू शकता,रतनगड-हरिश्चंद्रगड ट्रेक करणार्यांना तर हा घनचक्कर मुदा चा डोंगर पार करावा लागतोच आणि त्यामुळेच या डोंगरावर सहसा कोणी डोंगरयात्री फिरकत सुद्धा नाही कारण जर वाटसरू नसेल तर कोणताही डोंगर यात्री घनचक्कर वर सहज हरवून जाईल म्हणून या डोंगराच्या ट्रेक ला यायचे असेल तर स्वतःचे वाहन आणू नये म्हणजे तुम्ही जेथून चढले आहात त्याच गावात उतरण्याची काळजी राहत नाही .घनचक्करच्या पठारावरून रतनगड ३ तासाच्या अंतरावर आहे पण हि फार बिकट वाट आहे .
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home