आंबोल- महाबळेश्वर हे
पर्यटकांच्या पसंतीचे थंड हवेचे ठिकाण सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज आहे.
त्याउलट संधुदुर्ग जिल्ह्याचे निसर्गरम्य पर्यटन स्थळ आंबोली हे उपेक्षितच
राहिले आहे. निसर्गाने भरभरून देऊनही प्रशासनाच्या नियोजनशून्य भूमिकेमुळे
तसेच लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळेच आंबोलीचे पर्यटन धोक्यात आले आहे.
दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक
आंबोलीला भेट देतात. जंगल सफरी, पक्षी निरीक्षण, साहसी खेळ यासाठी आंबोलीची
निवड केली जाते. मात्र, कायदेशीररित्या साहसी खेळांसाठीचे परवाने येथे
उपलब्ध होत नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होतो.
एखादे दुसरे हॉटेल वगळता पर्यटकांना
पुरेशा सुविधा प्राप्त नसल्याने अलीकडे पर्यटक आंबोलीत न थांबता
गोव्यासारख्या राज्याकडे जाणेच पसंत करतात. यामुळे आंबोलीचे पर्यटन आगामी
काळात धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेली दोन वर्षे येथील बस स्थानकात साधा
रस्ताही नाही. विशेष म्हणजे आंबोलीसारख्या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी
शौचालयाची व्यवस्था नसल्याने पर्यटक या ठिकाणी थांबण्यास टाळतात.
पर्यटनस्थळांवरील रस्त्यांचे कामही निकृष्ट झाले आहे. पथदीपांचीही
दुरवस्थाच आहे. त्यामुळे पर्यटक आंबोलीत न थांबणेच पसंत करतात.
सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर असलेल्या
आंबोली पर्यटनस्थळाच्या विकासासाठी पर्यटन विकास आराखडा करणे गरजेचे आहे.
त्यासाठी पर्यटनतज्ज्ञांबरोबरच स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना विश्वासात
घेणे गरजेचे आहे. याबाबत मलबार नेचर कॉन्झव्र्हेशन क्लबचे अध्यक्ष काका
भिसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आंबोलीच्या पर्यटन विकासासाठी
आवश्यक असणा-या अनेक गोष्टींचा उलगडा केला.
मुळात आंबोली पर्यटनस्थळाचा प्रारूप
आराखडा तयार करून त्याप्रमाणे पर्यटनस्थळांचा विकास के ल्यास ख-या अर्थाने
पर्यटनवृद्धी होऊ शकेल. आंबोली हे पुणे, मुंबई, कोल्हापूर, बेंगलोर अशा
भागातून गोव्याकडे जाणा-या पर्यटकांसाठीचे तसेच पर्यटन सिंधुदुर्ग
जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटन सिंधुदुर्गाच्या
पर्यटनस्थळांची माहिती देणारे माहिती केंद्र उभारल्यास पर्यटकांसाठी मोठी
सोय होऊ शकेल.
यातून काही जणांना रोजगारही उपलब्ध होईल.
सिंधुदुर्गातून थेट गोव्यात जाणारे पर्यटक सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळांकडे
वळतील. आंबोलीतील पर्यटनस्थळांचीही माहिती झाल्याने आंबोली पर्यटनासही मदत
होईल. माहिती केंद्राबरोबरच टुरिस्ट गाईडची संकल्पना राबविल्यास
पर्यटनवृद्धीबरोबरच त्या माध्यमातून रोजगार निर्मितीही होऊ शकेल.
या माहिती केंद्रातून जिल्हयातील
पर्यटनस्थळांच्या माहितीबरोबरच येथील कला, संस्कृती, जैवविविधता, खाद्य
संस्कृती, येथील जनजीवन याची सचित्र माहिती उपलब्ध करणे गरजेचे आहे.
त्यासाठी जिल्हयातील मनमोहक, निसर्गरम्य पर्यटनस्थळांची, धार्मिक स्थळांची
छायाचित्रे उपलब्ध करणेही गरजेचे आहे.
जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्रातील
व्यक्तींचे, हॉटेल व्यावसायिकांचे फोन नंबर्स व त्यांची संपूर्ण माहिती
आंबोलीतच उपलब्ध झाल्यास पर्यटकांना फार मोठी मदत मिळू शकेल व
गोव्यासारख्या परराज्यात जाणारे पर्यटक जिल्ह्यातच थांबल्याने जिल्ह्याच्या
पर्यटनवृद्धीस फार मोठी मदत होऊ शकेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home