अवेळी होणा-या पावसामुळे वीट व्यावसायिक
चिंतातूर बनले आहेत. हा व्यवसाय अवेळी पावसामुळे धोक्यात आला असून,
वनविभाग, महसूल विभाग, गौण खनिज बंदी अशा बाबींना वेळोवेळी तोंड द्यावे
लागते.
सांस्कृतिक ठेवा असलेला हा वीट व्यवसाय
वृद्धिंगत होण्यासाठी वित्तीय संस्थांबरोबरच सहकाराचीही आवश्यकता आहे. आज
मोठय़ा प्रमाणात स्त्रियांचे बचतगट कार्यरत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘पुरुष
बचतगट’ स्थापन होऊन त्या माध्यमातून कमी व्याजदराने मिळणारे सरकारी कर्ज
उपलब्ध होऊ शकते.
याद्वारे बचतगटांमुळे सहकारही वाढू शकतो.
असे झाल्यास वीट व्यवसाय नक्कीच उभारी घेऊ शकेल आणि त्यानंतरच ख-या अर्थाने
‘विठ्ठलाचे पायी वीट झाली भाग्यवंत’ असे म्हणताना वीट व्यावसायिक निश्चितच
सुखावतील.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home