Thursday, March 8, 2018

rajur jesht nagrik राजूर , ता . ८: सकारात्मक ऊर्जा आत घेऊन नकारात्मक ऊर्जा बाहेर सोडा म्हणजे तुमचे मानसिक आरोग्य सुस्थितीत स राहून तुम्हाला वृद्धपणातही जीवनातील खराखुरा आनंद घेता येईल असे उद्गार प्रसिध्द कायदेतज्ञ ऍड . बाळासाहेब वैद्य यांनी राजूर येथे बोलताना काढले . जागतिक महिला दिनाचे व त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वानंद जेष्ठ नागरिक संघाने वृद्ध महिला व जेष्ठ नागरिकांना १५० आधार काठ्या वाटप करण्यात आल्या . तर जेष्ठ नागरिकांसाठी वस्तू उभारण्याचा निर्णय घेण्यात आला . यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण माळवे , वृद्धाश्रम चे व्यवस्थापक व माजी प्राचार्य मुरलीधर बारेकर , संतोष बनसोडे , देविदास शेलार , स्वामी समर्थ संस्थेचे सचिव बापू काळे , उपस्थित होते . अध्यक्ष स्थानी उपसरपंच गोकुळ कानकाटे होते प्रास्तविक विश्वस्थ नंदकिशोर बेल्हेकर यांनी स्वानंद नागरिक संघाणे हाती घेतलेल्या कार्याचा आढावा घेतला व जेष्ठ नागरिक कार्यालयासाठी जागा वनिधीची आवश्यकता असल्याचे सांगितले . प्रसंगी बोलताना किरण माळवे यांनी राजूर ग्रामपंचायतीने याकामासाठी जागा उपलब्ध करून द्यावी निधीसाठी सर्वजण एकत्र येऊन इमारत उभारू असे सांगितले . यावेळी बोलताना बाळासाहेब वैद्य म्हणाले महिलांना वृद्धपणात जप त्यांच्या तक्रारी ऐकून घ्या त्यांना मानसिक आधार द्या आपल्यातील दुर्गुण बाजूला सारून जीवनात सकारत्मक राहा तुमचे वृद्धपणी आपोआपच दूर जाईल तर कोणत्याही व्यक्तीबद्दल मग तो तुमचा विरोधक कि असेना त्याचबद्दल चांगलेच बोला असा संदेश देत त्यांनी जेष्ठ नागरिक संघाला काठीचा आधार तर दिलाच परंतु त्यांचे प्रबोधनही केले दरवर्षी शिक्षणासाठी व वृद्धांसाठी आर्थिक मदत करणार असल्याचे ते म्हणाले अध्यक्षीय भाषणात उपसरपंच गोकुळ कानकाटे यांनी सरपच सौ हेमलताताई पिचड व मी जेष्ठ नागरिक संघाला सर्वोतोपरी मदत करू असे सांगितले सुत्रसंचलन नंदकिशोर बेल्हेकर तर आभार मधुकर पंडित यांनी मानले यावेळी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी जेष्ठ नागरिक जयवंतराव देशमुख यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात अली . सोबत फोटो rju ८p २,३ -जागतिक महिला दिनी महिलांना काठीचे वाटप करण्यात आले









0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home