Tuesday, March 6, 2018

मधुकर तळपाडे (शिवसेना )

१८ अकोले ---मधुकर तळपाडे (शिवसेना )--- पदवीधर , (माजी जिल्हा पोलीस उपाधीक्षक ) शिवसेने उमेदवार २००९ व २०१४  शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष
मधुकर तळपाडे -- मी पोलीस जिल्हा उपाधीक्षक असताना तालुक्यातील राजकीय पुढारी जे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे त्यांनी मला आग्रह करून निवडणूक लढविण्यास सांगितले निवडून आणण्याचा हमी दिली त्यामुळे मी २००९ ला राजीनामा देऊन शिवसेनेकडून निवडणूक लढवली त्यात तिरंगी लढत झाल्याने पराभव झाला त्यानंतर २०१४ मध्येही मतविभागणीचा फायदा सत्ताधारी उमेदवाराला मिळाल्याने त्यातही पराभव झाला तरीही जनतेच्या सेवेसाठी आजही जनतेसोबत आहे . प्रामाणिकपणे काम करूनही अपयश आले असले तरी उद्याच्या यशासाठी प्रयत्न सुरूच राहणार असून तालुक्यातील जनतेने परिवर्तन घडविण्याचे ठरविले असून त्यामुळेच जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये मोठे यश मिळाले आहे . उद्याच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारून तालुक्यात क्रांती घडेल असे काम करू  जनतेने संधी द्यावी संधीचे सोने करू सोबत फोटो - RJU ६P १८


-सतीष  नामदेव भांगरे (सिव्हिल इंजिनियर )-शिवसेना , अकोले तालुका , वडील नामदेव भांगरे (व्यवसायिक व शेतकरी )- २०१४ काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभेची उमेदवारी केली सध्या शिवसेने कार्यरत आहे .
सतिष भांगरे ---
उच्च शिक्षण घेत  असतानाच तालुक्यातील जनतेला होणारा त्रास दिसत होता आणि तेव्हाच ठरवलं की आपण तालुक्यात बदल घडवून आणायचा, आजपर्यंत प्रखर विरोध करणार आणि पूर्णवेळ कार्यरत असणार नेतृत्व विरोधकांना लाभलं नाही म्हणूनच निवडणुकांचा विचार न करता सामाजिक कार्यकर्ता म्हणून आजही पूर्णवेळ कार्यरत आहे,

कोणतंही काम जीवापेक्षा मोठं नसतं. परंतु असं असूनही आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वांच्या हितासाठी संपूर्ण परिसर पिंजून लोकशाहीची तत्त्व जपत विकासाचं ध्येय उराशी बाळगुण पक्षवाढविण्यासाठी व लोकांच्या समस्या समजून घेण्याच काम गेली दोन वर्षे करतोय,  स्थानिक नेतृत्वाने आजपर्यंत मतांच विभाजन करून सत्ता टिकवून ठेवली परुंतु येणाऱ्या काळात नक्कीच विरोधकांनी एकत्र येऊन तालुक्यातील शेतकऱ्यांचा, गोरगरीब जनतेचा, तरुण पिढीच्या भविष्याचा विचार करावा असं मला वाटत

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक दर्जा अतिशय महत्त्वाची बाब आहे म्हणूनच वेळोवेळी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण व त्यांच्या समस्या सोडवणं हे माझं प्रथम कर्तव्य मी मानतो

हुकूमशाही पद्धतीचे राजकारण संपून  लोकशाही पद्धतिचे लोकांचे व लोकहिताचे राज्य आनने हे एकमेव उद्दिष्ट समोर आहे. त्यामुळे तालुक्यातील युवकांना एकत्र करून त्यांचे प्रश्न पदरमोड करून सोडवत आहे . मात्र तालुक्यात या निवडणुकीत परिवर्तन घडविण्याची इच्छा आहे . सोबत फोटो ---RJU ६P१६

सौ . सुनीताताई भांगरे ---(भाजप ) जिल्हा परिषद सदस्य ,  सातेवाडी गट २०१२ , राजूर गट२०१७- पती अशोकराव भांगरे
सौ . सुनीताताई भांगरे - अकोले तालुक्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलसंधारण ची कामे करून कुमशेत परिसरात पाणी अडविण्याचा कार्यक्रम यशस्वी करून दाखविला आज या परिसरातील गवे टँकर मुक्त केली आहे तर रस्ते आरोग्य केंद्र , अंगणवाडी , जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देऊन वैयक्तिक लाभाच्या योजनाही आदिवासी वाडी वस्तीवर पोचविल्या असून सामुदायिक विवाह  माध्यमातून गरीब मूला  मुलीच्या विवाहाचा खर्च करून आजपर्यंत १५० विवाह करण्यात आले महिला बचत गटस्थापन करून ३०० महिलांना रोजगारासाठी निधी उपलब्ध करून छोटे उद्योग सुरु करण्यात आले पापड . लोणचे , आदी व्यवसायाची सांगड घालून महिलांना त्यांच्या मालाला मार्केट मिळवून दिले आहे . तर निर्धार निराश्रित महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ दिला काँग्रेस पक्षात असताना राज्याच्या कमिटीवर काम केले आजही भाजप अनुसूचित जाती जमाती महिला राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे . ग्रामविकास मंत्री पंकजा ताई मुंढे यांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपंचायत माध्यमातून पेसा कायद्यन्तर्गत निधी उपलब्ध करण्यात आला असून महिलांना ग्रामपंचायत मध्ये सरपंच , उपसरपंच , सदस्य पदी संधी मिळाल्याने महिला गाव , तालुका , जिल्हा पातळीवर निर्णय प्रक्रियांत सहभागी होत आहे . अकोले तालुका हा विचारांचा तालुका असून ५० वर्षात तालुक्यात महिलांना तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिल्ने आवश्यक असताना गेली अनेक वर्षे सत्तेवर असणाऱ्यांनी महिलांना संधी मिळू दिली नाही भाजप सरकार महिलांना नवनवीन संधी उपलब्ध करून त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न करीत आहे अशी संधी उपलब्ध झाल्यास तालुक्याचे सक्षम नेतृत्व करू . तालुक्यात उच्च शिक्षण , मेडिकल कॉलेज , व्यवसायिक शिक्षण , औद्योगिक वसाहत होणे आवश्यक असून त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे .  सोबत फोटो RJU ६P १७








0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home