उकिरडा म्हटले कि माणसे नाके मुरडतात दुसरीकडे काही जण कचरा गोळा करून उपजीविका भागवतात राजूर येथून आठ दिवसात सुमारे ५ ०० किलो कचरा गोळा त्याच्या विक्रीतून उदरनिर्वाह
राजूर , ता. ७:कचरा - उकिरडा म्हटले कि माणसे नाके मुरडतात दुसरीकडे काही
जण कचरा गोळा करून उपजीविका भागवतात राजूर येथून आठ दिवसात सुमारे ५ ००
किलो कचरा गोळा त्याच्या विक्रीतून उदरनिर्वाह चालविणाऱ्या संगीत भाऊ पवार
वय ४० राहणार संगमनेर व त्यांच्या कुटुंबाची थक्क करून सोडणारी कथा हे
कुटुंब गावोगावचे जणू स्वच्छता दूत झाले आहे . जागतिक महिला दिनाच्या
पूर्वसंध्येला कचरा प्लास्टिक बाटल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या आपल्या
सोबत आणलेल्या पोत्यात भरताना घामाघूम झाल्या होत्या कारण संगमनेरला
त्यांना आठ दिवसाचा कचरा घेऊन पोहचायचे होते . त्यांच्या या कामाबद्दल
तनिष्का सदस्य यांनी या महिलेचे कौतुक करून त्यांची आस्थेने चौकशीही केली .
राजूरच्या बाजारात संगीताबाई व तिच्या मुलींनी परिसरात पडलेला कचरा
प्लास्टिक बाटल्या , प्लास्टिक पिशव्या गोळा करून महिनाभराचा रोजगार
मिळविण्याचे काम हे कुटुंब करते संगमनेर येथून ४५ किलो मिटर प्रवास करून हे
कुटुंब येते आठ दिवस हा कचरा गोळा करते ,त्यातून त्यांना आर्थिक उत्पन्न
मिळते व गावही स्वच्छ व प्लास्टिक मुक्त होते पवार कुटुंबीयांनी आठ दिवसात
५०० किलो कचरा म्हणजे २००० रुपये मिळविले त्यातच त्यांना खूप समाधान मिळाले
कोट- संगीताबाई पवार -- "साहेब पोटासाठी कसली अली लाज बाईने कष्टाला लाजू
नाही काम केले तर पोटाला चार घास सुखाचे मिळतील . ४ रुपये किलो कचरा ७
रुपये किलो पुठ्ठा , १० रुपये किलो प्लास्टिक विकून रोज २०० रुपये मिळतात
कधी कधी फारच कचरा मिळतो शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक कचरा मिळतो या
कचर्याला आम्ही सोने समजतो त्यातूनच आमचे कुटुंब चालते असेही संगीत पवार
म्हणाल्या , जागतिक महिला दिनाचे त्यांना विचारले असता महिला दिन
म्हणजे काय असते भाऊ . आम्हाला ते काय असते माहित नसते कष्ट आमच्या
रोजच्यालाच असतात महिला दिन म्हणजे काय त्याचे आम्हाला काय बी माहित नाय बघा
, असे म्हणत तिने पोत्याला गाठ मारली आणि घामाघूम अवस्थेत ते पोटे
डोक्यावर घेऊन तडातडा चालत आपल्या मुकामा च्या ठिकाणी गेली सोबत फोटो RJU
७P ३,RJU ७P ५,२
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home