Wednesday, March 7, 2018

दातृत्वाची प्रचिती कष्टकरी आदिवासी समाजातील भाऊसाहेब सोंगाळ (मुळ रा. म्हाळुंगी, हल्ली रा. कळस बुद्रुक) यांना आली.

राजूर , ता . ७:उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हाताला कळू नये असे दातृत्व जोपासण्याची मनिषा असणार्‍या कळस येथील सखुबाई पुंजा वाकचौरे यांच्या दातृत्वाची प्रचिती कष्टकरी आदिवासी समाजातील भाऊसाहेब सोंगाळ (मुळ रा. म्हाळुंगी, हल्ली रा. कळस बुद्रुक) यांना आली.
प्रवरा काठावरील कळस सारख्या संपुर्ण बागायती क्षेत्र असलेल्या गावात सध्या शेत जमीनीचे भाव गगनाला भिडले आहेत. साधारण दीड ते पावणे दोन लाख रुपये गुंठ्याने जमिनी खरेदी विक्री होताना दिसते. अशा कालखंडात सौ. सखुबाई पुंजा वाकचौरे या दानशूर मातेने आदिवासी समाजातील गरीब, कष्टकरी व्यक्तीला घरकुल बांधण्यासाठी एक गुंठा जागा मोफत बक्षिसपत्र करुन दिले आहे. स्वमालकीची जागा असल्याने त्यांना कुटुंबातून होणारा विरोध धुडकावत हा निर्णय घेतला असून सोंगाळ कुटुंबांना आता राहण्यासाठी हक्काचे घर मिळाले आहे.
कळस येथे भाऊसाहेब सोंगाळ याला प्रधानमंत्री घरकुल योजनेत घरकुल मंजूर झाले. मात्र त्याचे नावे जागा नसल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. त्याचे सासरे व मेहुणे त्यांचे जमीन असताना सुद्धा त्याला जागा देण्यास तयार नव्हते. सोंगाळी यांनी त्यांच्या समाजातील महिलेला पैसे देतो म्हटला तरी तिनेही जागा दिली नाही. गावात ज्यांचेकडे जमीन वाट्याने करीत होता, त्या सर्वांना त्याने विचारले मात्र त्याला जागा देण्यास कोणीही तयार झाले नाही. आता सोंगाळ यांचे घरकुल रद्द होणाची वेळ आली, नातेवाईकांनी वेळेला हात वर केले, कोणीही मदत करेना अन् पैसे देऊनही जमीन मिळेना म्हणून सोंगाळ हातबल झाले.
ही गोष्ट ज्यावेळी सखुबाई वाकचौरे यांना समजली. त्यांनी त्याला बोलावून घेऊन तू माझ्या जमिनीत घर बांध. हा प्रकार जेव्हा वाकचौरे यांच्या कुटुंबियांना समजला तेव्हा त्यांनी यास विरोध केला. मात्र गरीबाला घरकुल भेटतय अन् त्याला आयुष्याचा स्वतःचा निवारा होतो हे पाहून कुटुंबियांनी त्याला साथ दिली. व सोंगाळ यांना जागा देण्यास ते सर्व तयार झाले. तीन बाजूंनी ज्या जागेला रस्ता आहे असा एक गुंठा जागा सोंगाळ यांना बक्षीस दिली. त्याठिकाणी ग्रामपंचायतच्या मार्फत टुमदार घरकुल उभं राहिलं.
सखुबाई वाकचौरे यांनी अतिशय गरीब परीस्थिती व विडी बांधण्याचे काम करून दोन्ही मुलांना शिक्षण दिले. पती कोणताही व्यवसाय अथवा शेती करत नसताना आधी विडी बांधण्यातून व नंतर वडिलोपार्जित असणारे शेतीत कुठलीही सिंचनाची व्यवस्था नसणार्‍या माळरानावर बागायती शेती केली. सून सविता वाकचौरे हिच्या मदतीने दूध धंदा सुरू केला. शेती, दुध या जोड धंद्यात जम बसविला. कुठलेही शिक्षण नसतानाही मानवता दृष्टीने गोरगरीबाला मदत करण्याची वृत्ती त्यांनी या प्रसंगातून समाजाला दाखवून दिली.
आपण ज्या गरीबीतून आलो त्या परिस्थितीची जाणीव ठेऊन गरिबाला मदत करण्याची वृत्ती अंगी बाळगली आहे. त्यांचा मुलगा भाऊसाहेब वाकचौरे यालाही समाजसेवेचे बाळकडू दिले असून राजकारण, पत्रकारिताच्या माध्यमातून ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले देव तेथेची ओळखावा’ अशी शिकवण त्यांनी दिली. अकोले तालुका संजय गांधी निराधार शासकीय समितीच्या अध्यक्षपदी असल्याने या माध्यमातून गरीब, दिन, दलित निराधार, अपंग यांना लाभ मिळवून देण्याचे काम करीत आहे.

चौकट
घरकुल पूर्ण झालेवर भाऊसाहेब सोंगाळ  व त्याचे पत्नीच्या तोंडावर हसू फुललेले पाहून मला जे समाधान लाभले त्याचे कुठल्याही शब्दात वर्णन करता येणार नाही. माणसात देव पाहायला संतांनी सांगितले ते प्रत्यक्षात आचरणात आणले पाहिजे
    सखुबाई पुंजा वाकचौरे

मला घरासाठी कोणीच जागा देईना. नातेवाईक, जमीन करतो ते मालक अन पैसे देऊन सुद्धा जागा मिळेना घरकुल रद्द होईल असे सांगण्यात मात्र या मातेने  कुठलाही मोबदला न घेता  जागा दिली अन घरकुल उभं राहिलं घर नसले मुळे मुलाला कोणी मुलगी देत नव्हते पण घर उभं राहिलं अन मुलाचं लगेच लग्न जमलं हे म्हणजे देवाचं कार्य आहे
   भाऊसाहेब सोंगाळ घरकुल लाभार्थी फोटो rju ७p ११ सखुबाई पुंजा वाकचौरे


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home