दाईच्या सेवेतून मिळाले सुरक्षित मातृत्व --सौ .सुनंदा तुकाराम बरमाडे
दाईच्या
सेवेतून मिळाले सुरक्षित मातृत्व --सौ .सुनंदा तुकाराम बरमाडे राजूर , ता . ७:- -आपण खेडोपाडी काम करतांना
अनेक समस्यांना तोंड देतांना ग्रामीण जनतेला बघतो. त्यातीलच एक प्रमुख समस्या म्हणजे सुरक्षित बाळंतपण जवळपास रुग्णालय व तशी सेवा उपलब्ध नसल्याने आजही आदिवासी दुर्गम भागात घरीच दायीच्या मदतीने बाळंतपण केले जाते.शेणीत ता.अकोले जि.अहमदनगर येथील सौ. सुनंदाबाई बरमाडे यांनी गेली पंधरा वर्ष दायी म्हणून या भागात सेवा दिली आहे. त्यांच्या अनुभवांवर व प्रत्यक्ष कार्यावर आधारित हि यशोगाथा आहे. ती सुमारे ८८ गर्भवतीना सुरक्षित मातृत्व देणाऱ्या सौ सुगंधाबाई यांची हि यशोगाथा...
अकोले जि.अहमदनगर हा आदिवासी तालुका म्हणून प्रसिध्द आहे. दुर्गम भाग व अपुऱ्या आरोग्याच्या सोई यामुळे इथे लोकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. या भागात विविध विकास कामांना गती देण्यासाठी बायाफ मित्र
जनरल मिल्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन २००० पासून इथे “आदिवासी विकास कार्यक्रम” हा प्रकल्प राबविला जात आहे. प्रकल्पाचा मुख्य उद्देश अन्न सुरक्षा, दर्जेदार शिक्षण ,सामाजिक आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन व मदत करून त्यांचा दर्जा वाढविणे हा आहे. या प्रकल्पात एकुण २० गावांचा सामावेश आहे. सुमारे ११५ स्वयम सहाय्यता समूहांना सहभागी करून घेतांना २००० कुटुंब या प्रकल्पात सहभागी झालेलं आहे. या उपक्रमाचाच भाग म्हणून महिलांचे आरोग्य उत्तम राहावे व त्यांना येणाऱ्या आरोग्याच्या विविध समस्या सोडवत्या यावा. प्रकल्प आरोग्य तपासणी डॉक्टरांच्या मार्गदर्शन व औषधांची मदत नियमपणे देता आहेत. आरोग्याविषयी काम करतांना याभागात स्त्रियांना प्रसूतीसाठी खूप दूरवर जावे लागते व दळणवळणाच्या सोयी अपुऱ्या असल्याने बऱ्याचदा गंभीर प्रश्न निर्माण होतात यावर खोलवर अभ्यास केल्यानंतर या भागात दायी किंवा सुईन म्हणून काम करणाऱ्या महिलांना प्रशिक्षण व आवश्यक साधनांची किट देऊन त्यांना मदत देण्याचे ठरविण्यात आले. त्यात सौ सुनंदाबाई यांचाही समावेश होता. कामाची सुरुवात सौ सुनंदाबाई या गेली पंधरा वर्षे दायी म्हणून कार्यरत आहेत.या भागात प्रसुतीच्या कामात मदत करताना त्यांनी सुरुवातीला ....खाजगी वैध्कीय
अधिकाऱ्याकडून.. -------यांचेकडे मार्गदर्शन घेतले. त्यांना मदत करताना त्यांना विविध शास्रीय गोष्टी व त्यांचे महत्त्व समजून घेतले. त्यांनी आपले मुळ गाव शेणित व आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवर सेवा देण्यास प्रारंभ केला. मुळातच सेवेची आवड व गरीब जनतेची अडचण पाहून त्यांनी या कामात स्वतःला झोकून दिले.
या कामाची लाज न बाळगता लोक देतील तो मोबदला स्वीकारायचा हा त्यांचा स्वभाव आहे. कधीकधी २-४ किलोमीटरचे अंतर पायी जाऊन कामे केली. परंतु समोरच्यांनी परिस्थिती नसली कि एक नारळ व ११ रु. सन्मानाने स्वीकारून त्या परत येत. आज आपण बघतो वैद्कीय क्षेत्रात बऱ्याचदा प्रसुतीच्या कामांचे हजारो रुपये डॉक्टर उकळतांना दिसतात. बऱ्याचदा गरज नसतांनाही सिजर करूनही फसवणूक होते. या सर्व बाबींचा अभ्यासही सौ सुनंदाबाई यांनी केली आहे. यावर आपल्या गावातील स्त्रियांची फसवणूक टाळण्यासाठी त्या सरकारी दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला देतात. आणि जर रात्री अपरात्री सरकारी दवाखान्या पर्यंत पोहोचणे शक्य झाले नाहीतर स्वतः अशा केस मध्ये प्रसूती करून देतात. गेली ...२० ........ वर्षे त्यांनी हि सेवा ग्रामस्थांना उपलब्ध करून दिलेली आहे.
प्रकल्पाची मदत व सहभाग - प्रकल्पाने या भागातील आरोग्याच्या समस्या समजावून घेतल्यानंतर सर्व प्रथम या भागातील सर्व दायींची गाव निहाय यादी तयार केली. त्यांच्या घरी जाऊन व भेट घेऊन त्यांना याकामात येणाऱ्या अडचणी व समस्या जणून घेतल्या. त्यांचा अनुभव व सामन्याला त्यांची असलेली गरज ओळखून या दायीवर योग्य ते संस्कार व त्यांना मदत देण्याचा निर्णय प्रकल्पाने घेतला. त्यांच्या सोबत झालेल्या मुलाखतीतून समजले कि त्या कुठल्याही साधनांशिवाय प्रसूतीची कामे करतात. हे कामे करतांना वेळेवर साबण, ब्लेडपाण, आयोडीन, कातरी, हातमोजे, दोरा, कापूस यासारख्या वस्तू त्यांना कधीच वेळेवर मिळत नसायच्या. तसेच त्यांना शास्र्त्रीय दृष्ट्या प्रसूती कशी करावी याची माहिती हि आवश्यक होती. सौ. सुनंदाबाई यांच्यासह एकुण १५ दायींचे या भागातून निवड करण्यात आली आहे.
निवडण्यात आलेल्या दायींना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले. स्थळ व वेळ सर्व नक्की करून शासनाच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मला येणारे यांना बोलावून एक दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. प्रशिक्षणात प्रसुतीपूर्वी व नंतर घ्यावयाची निगा, बाळाची निगा, प्रसुतीच्या वेळी वेदना कमी करण्याचे उपाय व मातेची काळजी या विषयी सखोल मार्गदर्
...
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home