Friday, November 24, 2017

page 2

अकोलेपानं  २ --तालुक्यातील पर्यटनाचे योग्य मार्केटिंग केल्यास आणि पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटन हा रोजी खालोखाल रोजगार देणारा व्यवसाय ठरेल .
ग्रामीण भागात अर्थकारणाला गती आल्यामुळे तालुक्यात अनेक लहान मोठ्या  पतसंस्था च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती तालुक्यात झाली आहे . विविध बँकाच्या शाखाबरोबरच या पतसंस्थांच्या तालुक्यातील अर्थ कारणात मोठा वाटा आहे . प्रवरा , मुळा , आढळा ,या तिन्ही खोऱयातील तालुक्यातील शेतकरी प्रगतिशील आहेत शेतीचे नवनवीन तंत्र आत्मसात करण्यात येथील शेतकरी आघाडीवर असतो शेती बरोशेतकऱ्यांची नवीन पिढी   कृषी प्रक्रिया उद्योगांकडे वळू लागली आहे आवळ्यावर प्रक्रिया करणारा व्ही पी फूड स असेल किंवा दूध प्रक्रया करून उपपदार्थ करणारा सावंत डेरी उद्योग असेल अकोले राजूर रस्त्यावर सह्याद्री ओक्सी मोर सह बाटलीबंद पाण्याचे छोटे मोठे प्रकल्प उभे आहेत त्यांच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत खाजगी आणि सहकारी दूध प्रकल्पातही अर्थकारनातं वाटा राहिला आहे . तर तालुक्याच्या पश्चिम भागात पशुपालन हा महत्वाचा शेती पूरक व्यवसाय ठरला आहे प्रगतिशील शेतीमुळे गावोगावी लहान मोठे खते बियाणांचे विक्री केंद्र उभी राहिली आहेत . त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्माण झाला आहे . शेतीमध्ये होत असणारा रासायनिक खतांचा वापर कीटक नाशके जंतू नासिके या सर्वांचा दुष्परिणाम येथील जाणकारांना जाणवू लागले आहे . त्यातूनच  सेंद्रिय शेतीची चळवळ तालुक्यात हळू हळू आकार घेऊ लागली आहे . यात बायफ या संस्थेचा मोठा वाटा आहे तालुक्यातील उत्तर भागातील खिरविरे , माहेर , परिसरात बायफ मार्फत आदिवासी विकासात मोठा कार्यक्रम राबविला जातो आहे . आयफाच्या माध्यमातून कोंभाळणे येथील राहीबाई पोपेरे या आदिवासी महिलेची बियाणे बँक अनेकांच्या आकर्षणाचा कुतूहहलाचा विषय ठरला आहे . परिसरातील अनेक गावरान वांच्या संवर्धनच्या प्रसाराचे कार्य राहीबाई करीत आहे बायफच्या माध्यमातून पारंपरिक भात बियांच्या संवर्धनाचा कार्यक्रम राबिविण्यात येत आहे . एकदरे मानेहेरे सह तीन ठिकाणी बायफने बँक स्थापन केल्या असून त्यातून या परिसरातील काळ भात , आंबे मोहर , रायभोग , जिरवले , हाळी कोळपी , गरी कोळपी , यासारख्या १४ भात वाणाचे शुद्ध स्वरूपातील बियाणे शेतकऱ्यांना नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहे बायफच्या परसबाग प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना पुष्टिक फळे भाजीपाला उपलब्ध होऊ लागला आहे . कुपोषण रोखण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होणार आहे . लोकपंचायत हि संस्था हि मुळा खोरितात काळ भात संवर्धनाचे तसेच गावरान बियांचे संवर्धनचे काम करीत आहे . या संस्थांच्या प्रयत्नामुळे या परिसरात पुन्हा पारंपरिक बियाणे रुजेल अशी चिन्ह दिसत आहे . शाश्वत शेती विकासाच्या या कार्यक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांचा जीवनात स्थायी स्वरूपाचे बदल होणार आहे . शेती , दूध धंदा त्याबरोबरच शिक्षणातही आमूलाग्र बदल झाले असून अकोले एज्युकेशन , अभिनव या शैक्षणिक संस्था त्यासाठी पुढे येत आहे मात्र ७५ वर्षे उलटूनही सत्यनिकेतन संस्था कात टाकत नसल्याची खंतही व्यक्त होत आहे .

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील अभिजात निसर्ग

म.टा.वृत्तसेवा अकोले - -सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई (१६४६मि. )सह लहान मोठे पर्वतशिखरे डोंगर सुळके उरात धडकी निर्माण करणाऱ्या  येथील खोल दऱ्या हरिचंद्र गडाच्या कोकण कडयासह लहान मोठे कडे वैभवशाली इतिहास आणि संस्कृतीची साथ देणारे हरिचंद्र गड, रतन गडासह लहान मोठे डझन दिड डझन गड किल्ले  दंडकारण्यातील वनाचे अजूनही बर्यापैकी टिकून असणारे जंगल त्यातील जैव विविधता यांचा हा प्रदेश तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाळ्यात तीन ते पाच हजर मि मि पाऊस  पडतो, मुळा , प्रवरा,आढळा , म्हाळुंगी, कृष्णावंती या नद्या याच परिसरात उगम पावतात जिल्ह्याच्या मोठ्या भागाची तहान या नद्या भागवतात. मात्र येथील निसर्गाची भूभागाची हवामानाची ती विविधता एकेकाळी या भागाच्या विकासातील अडसर ठरली तालुक्यातील अनेक लहान मोठी खेडी, दुर्गम होती. चार महिने तालुक्याच्या मोठ्या भागाचा  संपर्क पावसाळ्यात अन्य भागाशी तुटायचा या निसर्गानेच मागासलेपणाचा शिक्का तालुक्याच्या माथी मारला होता.  मात्र हळूहळू हे चित्र बदलत आहे जल, जंगल, जमीन या नैसर्गिक स्रोतांचा सुयोग्य पद्धतीने वापर होऊ लागल्यामुळे तालुक्याचे चित्र काही वर्षात बदलले आहे.
विकासाच्या वाटेवरील     प्रगतीतील तालुका     अशी तालुकयाची नवी ओळख होऊ लागली आहे. या परिसरात बांधली गेलेली लहान मोठी धरणे   समृद्ध वनसंपदा डोंगर पठारावरून वाहणारा भन्नाट वारा  यांच्या जोडीला स  कष्टाळू माणसाचे अविरत प्रयत्न, संस्था, व्यक्ती यांचे  कमी अधिक योगदान विकास प्रक्रियेत आहे.
१९२६ साली बांधून पूर्ण झालेले ११ टी एम सीचे भंडारदरा धरण हा तालुक्याबरोबर जिल्हातील मोठा सिंचन प्रकल्प, सह्याद्रीच्या डोंगर रांगा  धो धो कोसळणारे पावसाचे पाणी २७० फुट उंचीच्या दगडी भिंतीने आडविले. आडवीलेले हे पाणी  नदीतून पाटात, पाटातून शेतात फिरू लागले. आणि उत्तर नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचे चित्र बदलले ओसाड माळ रानावर ऊस मळे उभे राहिले  साखर कारखाने निर्माण झाले पहिल्या सहकारी साखर कारखान्या च्या रूपाने सहकाराच्या नवीन  अध्यायाचा श्रीगणेशा झाला  अर्थात दुष्काळी    भागाचे रूप भंडारदरा   धरणा मुळे पालटले असले तरी अकोले तालुक्याला  मात्र आता पर्यंत त्याचा  फायदा झाला नव्हता कारण भंडारदरा धरणाचे कालवे धरणाच्या भिंतीपासून ८५ किलोमीटर वर सुरु होतात . पावसाळ्याबरोबरच आता १२ हि महिने   वाहत जाणारे प्रवरेच्या पाणी पाहात राहणे तालुक्याच्या नशिबी होते मात्र मागील शतकात ७० च्या दशकात अकोले तालुक्यात वीज येऊन पोहचली नदीवरून पाणी उपसा करण्यासाठी उपसासिंचन योजनेना चे तंत्र विकसित होत गेले आणि प्रवरेच्या पाण्याचा हळूहळू वापर  प्रवरा नदीकाठच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी  सुरु केला . मात्र भंडारदरायचा पाण्याचा वर्षानुवर्षे वापर करीत असलेल्या प्रस्थापितांना हे पाहावले नाही . आपल्या हक्काचे पाणी उचलणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी चोर ठरविले गेले . त्यातूनच हक्कच्या पाण्यासाठी मोठी चळवळ अकोले तालुक्यात उभी राहिली १९८८  साली  जनरेट्यामुळे भंडारदरा  धरणाच्या पाण्याचे फेर वाटप करावे लागले तालुक्याला १२ टक्के हक्काचे पाणी मिळाले लहान मोठ्या उपसासिंचन योजना प्रवरा खोऱ्यात उभ्या राहिल्या या पाण्यामुळे इथली शेतीचे स्वरूप पालटले उसा  बरोबरच टोमॅटो आणि अन्य  भाजीपाला पिके शेतकरी घेऊ लागला त्यामुळे प्रवरा खोऱ्याचा अर्थकारणाला गती मिळाली प्रवरा खोऱ्याचा हा भाग शेतीच्या दृष्टीने अतिशय प्रगत समजला जातो प्रवरेच्या पाण्यावर पिकणाऱ्या या उसामुळे अगस्ती सहकारी साखर कारखाना निर्मिती झाली विकासाचे एक नवीन केंद्र तालुक्यात उदयाला आले . आज अकोले तालुक्याच्या कृषी अ र्थ  कारणात भंडारदरा व अगस्ती  कारखान्याचा मोठा वाटा आहे .
 तालुक्याच्या उत्तर भागातील देवठाण येथे १०६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा धरणामुळे आढळा खोऱ्यातही मोठी क्रांती झाली असून ८ माही पद्धतीचे राज्यातील हे पहिले धरण आहे . आज आढळा लाभ क्षेत्रातील हिवरगाव , वीरगाव , पिंपळगाव ,डोंगरगाव , गणोरे परिसरातील शेतकरी डाळिंब , कांदा उत्पादनात अग्रेसर आहेत . गुणवत्तेमुळे इथली अनेक शेतकऱ्यांचे डाळिंब निर्यात होतात तर कांदा पिकामुळे  काही कोटीची उलाढाल होते . नुकतेच बांधून पूर्ण झालेल्या निळवंडे धरणामुळे प्रवरा खोऱयातील भंडारदरा पाण्यापासून वंचित असलेल्या भागास शाश्वत पाणी मिळणार आहे . वेगवेगळ्या उंचीवर डावा  आणि उजवा असे चार कालवे असणारे निळवंडे हे अपवादात्मक धरण या मोठ्या आणि माध्यम प्रकल्पाबरोबरच गेल्या दोन तपाच्या कालावधीत तालुक्यात वाकी , सांगवी , पाडोशी , टिटवी , बलठन ,कोथळे , आंबित , घोटी शिळवंडी , शिरपुंजे , बोरी , पिंपळगाव खांड , येसर ठाव , असे सुमारे डझनभर कमी अधिक क्षमतेचे लघु पाटबंधारे तलाव निर्माण झाले या तलावामुळे त्या त्या परिसरातील शेतीचा विकास झाला पूर्वी पावसाच्या पाण्यावर फक्त बाजरी अथवा भात  पिकाचा विचार असे मात्र या परिसरातील शेतकरी टोमॅटो , कांदा , भाजीपाला सारखी नगदी पिके घेऊ लागला आहे .
मुळा नदीवरील लहान मोठ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची साखळी त्यामुळे वाहत्या नदी काठच्या गावांना पाणी मिळू लागले आहे . तालुक्यात पावसाळ्यात ५० टि  एमसी पाणी पावसाळ्यामुळे पडते आजपर्यंत हे पाणी वाहून जात होते मात्र आता  किमान त्यातील १० ते १२ टक्के पाणी तालुक्यातील शेतकऱ्याला मिळू लागले आहे जिल्ह्याची तहान आणि विकासाची भूक भागविणारा इथील पाऊस इथली भूमिपुत्राला सुखाचे क्षण देऊ लागला आहे .
निळवंडे , भंडारदरा , हे बहू उद्देशीय प्रकल्प आहे नदीतून वाहणारे पाणी प्रवरेच्या पाणी मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती साठी वापरले जाते भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणारा १२ मेगावॅट क्षमतेचा भ . ज. वि . प्रकल्प , रंधा धबधब्याजवळील ३४ मेगावॅट क्षमतेचा कोदणी जलविधुत प्रकल्प आणि निळवंडे धरणाच्या पायथ्याशी ७ मेगावॅट क्षमतेचा निळवंडे जलविधुत प्रकल्प असे ३ जलविधुत प्रकल्प भंडारदऱ्यातून सुटणाऱ्या पाण्यातून ५० ते ५५ मेगावॅट विजेची निर्मिती करतात विजेचा थेट लाभ तालुक्याला होत नसला तरी राज्याच्या विकासात योगदान देण्याचे काम हे प्रकल्प करीत आहे अशाच प्रकारचा २५० मेगावॅट क्षमतेचा घाटघर जलविधुत प्रकल्प अकोले (जिल्हा  नगर )शहापूर (जिल्हा ठाणे )तालुक्याच्या सीमारेषेवर उभा आहे . देशातील अशा प्रकारचा हा सर्वात मोठा प्रकल्प विजेची मागणी जास्त असताना च्या  काळात (पिकअप अवर )विजेची गरज काही प्रमाणात भागविण्याचे काम हा प्रकल्प करतो . वाहणाऱ्या पाण्याबरोबरच तालुक्याच्या डोंगर पठारावरून वाहणारा भन्नाट  वारा हि आता वीज निर्मिती करू लागला आहे . मुख्यतः तालुक्याच्या उत्तर भागातील विश्रामगड , बित्तम गड , डोंगर रंगावरील पठारावर वाऱ्याच्या प्रचंड झोतात भिडणाऱ्या वीजनिर्मिती करणाऱ्या पवन चक्क्या उभ्या राहिल्या आहेत तिरढे , पाच पट्टा ,पवन ऊर्जा प्रकल्प आणि कोंभाळणे खिरविरे पवन ऊर्जा प्रकल्पातून सुमारे १०० मेगावॅट क्षमतेच्या आसपास वीज निर्मिती होत आहे . या तालुक्याच्या नद्यांचे पाणी आणि वाहणारा वारा  वीज निर्मिती द्वारे राज्याच्या विकासाला हातभार लावत आहे . पावसाळ्यात इथे धो धो कोसळणाऱ्या पाऊसाचे आकर्षण असल्याने नाशिक , मुंबई , पुणे , नगर , औरंगाबाद व राज्याबाहेरील लोकांमध्ये वाढू लागल्याने त्यांचे पाय आपोआप घाटघर , भंडारदरा , हरीशचंद्रगड कडे वळतात  दरवर्षी हजारोच्या संख्येने येणाऱ्या या पर्यटकांमुळे पर्यटन  व्यवसायातून रोजगार निर्मिती वाढली आहे त्यामुळे स्थानिक आदिवासी जनतेला रोजगार उपलब्ध झाला आहे पूर्वी फक्त पावसाळ्यात  पर्यटक  येत असत आता या ना त्या कारणाने वर्षभर येत असतात मग कधी कळसुबाई हरीशचंद्रगड , रतनगड , घाटघर ,विश्रामगड , अलगं  , मलंग  , कुलंग गड सारख्या गड किल्ल्यावर भटकायला ट्रेकिंगला कधी कधी पावसाळ्याच्या उंबरठ्यावर काजवे पाहायला पावसाचा जोर कमी झाल्यावर सप्टेंबर , ऑक्टोबर मध्ये फुलणाऱ्या रानफुलांच्या भेटीला तर कधी भक्तिभावाने अगस्ती आश्रमाच्या भेटीला  साम्रद गावाजवळ असणारी एकमेव अद्वितीय अशी सांदणदरी आता मोठी अकृष्ण ठरली आहे . पर्यटकांचे जत्त्येच्या जथे या दरीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात पर्यटकांमुळे भंडारदरा सोबतच धरणाकाठचे गावे हरीशचंद्रगड पायथ्याशी असणारे आंबित पाचनई या सारख्या लहान मोठ्या खेड्यात पर्यटनाच्या माध्यमातून अनेकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे भंडारदरा शहरातील तारांकित , यश , आनंद अमित , तारांकित तोडीची हॉटेल उभी राहिली आहेत
तालुक्यातील पर्यटनाचे योग्य मार्केटिंग केल्यास आणि पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटन हा शेती व्यवसाला पूरक जोडधंदा म्हणून रोजगार देणारा व्यवसाय ठरेल . ग्रामीण भागात अर्थकारणाला गती आल्यामुळे तालुक्यात अनेक लहान मोठ्या  पतसंस्था च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती तालुक्यात झाली आहे . विविध बँकाच्या शाखाबरोबरच या पतसंस्थांच्या तालुक्यातील अर्थ कारणात मोठा वाटा आहे . प्रवरा , मुळा , आढळा ,या तिन्ही खोऱयातील तालुक्यातील शेतकरी प्रगतिशील आहेत शेतीचे नवनवीन तंत्र आत्मसात करण्यात येथील शेतकरी आघाडीवर असतो शेती बरोबर शेतकऱ्यांची नवीन पिढी   कृषी प्रक्रिया उद्योगांकडे वळू लागली आहे आवळ्यावर प्रक्रिया करणारा व्ही पी फूडस असेल किंवा दूध प्रक्रया करून उपपदार्थ करणारा सावंत डेअरी उद्योग असेल अकोले राजूर रस्त्यावर सह्याद्री ओक्सीमोर सह बाटलीबंद पाण्याचे छोटे मोठे प्रकल्प उभे आहेत त्यांच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत खाजगी आणि सहकारी दूध प्रकल्पातुन तालुक्याच्या अर्थकारनातं  मोठा वाटा राहिला आहे . तर तालुक्याच्या पश्चिम भागात पशुपालन हा महत्वाचा शेती पूरक व्यवसाय ठरला आहे प्रगतिशील शेतीमुळे गावोगावी लहान मोठे खते बियाणांचे विक्री केंद्र उभी राहिली आहेत . त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्माण झाला आहे . शेतीमध्ये होत असणारा रासायनिक खतांचा वापर कीटक नाशके जंतू नासिके या सर्वांचा दुष्परिणाम येथील जाणकारांना जाणवू लागले आहे . त्यातूनच  सेंद्रिय शेतीची चळवळ तालुक्यात हळू हळू आकार घेऊ लागली आहे . यात बायफ या संस्थेचा मोठा वाटा आहे तालुक्यातील उत्तर भागातील खिरविरे , मान्हेरे ,लाडगाव  , परिसरात बायफ मार्फत आदिवासी विकासाचा  मोठा कार्यक्रम राबविला जातो आहे .बायफच्या माध्यमातून कोंभाळणे येथील राहीबाई पोपेरे या आदिवासी महिलेची बियाणे बँक अनेकांच्या आकर्षणाचा कुतूहलाचा विषय ठरला आहे . परिसरातील अनेक गावरान वांनाच्या संवर्धनाच्या प्रसाराचे कार्य राहीबाई करीत आहे बायफच्या माध्यमातून पारंपरिक भात बियांच्या संवर्धनाचा कार्यक्रम राबिविण्यात येत आहे . एकदरे मानेहेरे सह तीन ठिकाणी बायफने बँक स्थापन केल्या असून त्यातून या परिसरातील काळ भात , आंबे मोहर , रायभोग , जिरवेल , हाळी कोळपी , गरी कोळपी , यासारख्या १४ भात वाणाचे शुद्ध स्वरूपातील बियाणे शेतकऱ्यांना नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहे बायफच्या परसबाग प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना पौष्टिक फळे भाजीपाला उपलब्ध होऊ लागला आहे . कुपोषण रोखण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होणार आहे . लोकपंचायत हि संस्था हि मुळा खोऱ्यात  काळ भात संवर्धनाचे तसेच गावरान बियांनाचे संवर्धनचे काम करीत आहे . या संस्थांच्या प्रयत्नामुळे या परिसरात पुन्हा पारंपरिक बियाणे रुजेल अशी चिन्ह दिसत आहे . शाश्वत शेती विकासाच्या या कार्यक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांचा जीवनात स्थायी स्वरूपाचे बदल होणार आहे . शेती , दूध धंदा त्याबरोबरच शिक्षणातही आमूलाग्र बदल झाले असून अकोले एज्युकेशन , अभिनव या शैक्षणिक संस्था त्यासाठी पुढे येत आहे मात्र ७५ वर्षे उलटूनही सत्यनिकेतन संस्था कात टाकत नसल्याची खंतही व्यक्त होत आहे .अकोले तालुक्यात शेती विकासाबरोबरच येथील जनतेचा आर्थिक स्थर उंचाविण्यासाठी शासकीय स्थरावर प्रयत्न होत असून जलयुक्त शिवार अभियानातून कायम दुष्काळी भाग असलेल्या कुमशेत , शिरपुंजे , आंबित परिसरात येथील आदिवासी महिला शेतकरी बागायती शेती फुलवू लागल्या आहेत . (शांताराम काळे ) सोबत फोटो भंडारदरा , 
10 Attachments

abhinv

स्वगृहे पूज्यते पितर, स्वग्रामे पूज्यते प्रभू
स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते..

निसर्गाचे भरभरून देणे लाभलेला अकोले तालुका ज्ञानसमृद्ध व्हावा हे उदात्त स्वप्न काही समाजधुरिणांनी पाहिलं आणि ते वास्तवात उतरण्यासाठी अपर कष्ट घेतले. आपण लावलेला हा ज्ञानाचा वेलू गगनावर जातानाचा प्रवास पाहून आपले प्रयत्न सार्थकी लागल्याची कृतकृत्य भावना या आधुनिक ज्ञानतपस्वींच्या चेहऱ्यावर झळकत आहे. (संस्कृत सुभाषित)
सन १९९२ मध्ये मा. सुरेशजी कोते मा. मधुकरराव नवले, प्रा. रमेशचंद्र खांडगे, भाऊसाहेब नाईकवाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अकोले तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेची मुहूर्तमेढ रचली.
इंग्रजी हि ज्ञान भाषा असल्याने जगातील अफाट ज्ञानभांडाराचा लाभ घेण्यासाठी इंग्रजीच महत्त्व कालातीत असल्याचा कुणीच नाकारत नाही. अकोले सारख्या दुर्गम भागातील आदिवासी, गरीब मुलांना इंग्रजीचे शिक्षण मिळावं हि गरज लक्षात घेऊन तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कुठेही मागे पडू नये हा या शाळेच्या स्थापनेमागचा उदात्त हेतू, इंग्रजी शाळेचे हे ‘शिवधनू’ पेलण्यासाठी मग सर्वांचेच हात पुढे येऊ लागले. स्व. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आश्वासक पाठींब्याने अकोलेत १४ जून १९९२ रोजी पहिली इंग्रजी शाळा साकारली. अभिनव पब्लिक स्कूल, पटसंख्या होती अवघी १४. या पहिल्या बचचे ज्ञानदायीत्व स्वीकारले ते ज्ञानसंपन्न शिक्षक वृंदानं आणि शाळेच्या कल्पक संचालक मंडळा ने . शाळेच्या पहिल्या स्नेहसंमेलानाचा थाट काही औरच.सर्वांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडून वाहिला. या स्नेह्संमेलानाप्रसंगी मा. सुभाषराव देशमुखांची दुरदृष्टी दिसली. यासह मा. डा भालचंद्र कांगो, साहित्यिक व पुरागामी नेते गोविंदराव पानसरे, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, भालासाहेब थोरात, सिने अभिनेत्री मयुरी कांगो, प्रसिद्ध नेत्र त ज्ञ डा. सुधा कांकारिया यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन स्कूलच्या प्रगतीत महत्वाचा टप्पा ठरला. सन २००१ मध्ये संस्थेच्या विध्यमान उपाध्यक्ष, सेवाभावी व्यक्तिमत्त्व मा. सुरेशराव कोते यांचे संस्थेत आगमन झाले. त्यानंतर स्कूलच्या प्रगतीचा ‘वारू’ चौफेर धा वू लागला.
दि. २३ सप्टेंबर २००१ रोजी धामणगाव आवारी येथे पिताश्री स्व. मारुतीराव कोते यांच्या स्मरणार्थ संस्थेच्या इमारतीच भूमिपूजन मा. सुरेशराव कोते यांच्या हस्ते झालं. कोते यांच्या भरीव देणगीतून साकारली. मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलची दिमाखदार वास्तू. २५ डिसेंबर २००३ रोजी कै. मारुतीराव कोते शाळेच्या प्रांगणातील अर्धपुतळ्याचा अनावरण सोहळा संस्मरणीय ठरला. थोर समाजसेवक अण्णा हजारे आणि अनाथांच्या मत सिंधुताई सपकाळ यांचे आशीर्वाद या भव्य दिव्य सोहळ्यास लाभले. अत्याधुनिक सोयी – सुविधांसह सज्ज झालेल्या या ज्ञान मंदिराचा गुणात्मक दर्जाही सातत्यान लक्षवेधी ठरलाय. डिजिटल क्लासरूम ची संकल्पना शाळेत रुजली. अद्ययावत ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, इंटरनेट सुविधा, अद्ययावत संगणक कक्ष , देशी – विदेशी खेळांच्या प्रशिक्षणासह भव्य क्रीडांगण शालेय वैशिष्ठ्य आहेत.
शाळेच्या दैदिप्यमान प्रगतीची साक्षीदार ठरली २०००-०१ ची पहिली दहावीची बॅ च. १०० % निकालाची झालेली हि सुरुवात आजतागायत कायम आहे. अभिनवने ज्ञान समृद्ध केलेले हे हिरे जगाच्या कानाकोपऱ्यात आपले ज्ञान तेजाने झळकत आहेत.
संगीत, नृत्य, कला, क्रीडा, गायन, वादन, चित्रकला, वकृत्व आदि कलाप्रांतात अभिनवच्या विद्यार्थ्यांची मुशाफिरी राहिली आहे. मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी सुप्रसिध्द अभिनेते मा. राहुल सोलापूरकर, अभिनेत्री मयुरी कांगो, आदिती सारंगधर, सरला येवलेकर, ऋतुजा देशमुख, समीर गुजर, मृणाल कुलकर्णी आदि दिग्गज तारे-तारकांनी शाळेला भात देऊन मुलांचं कौतुक केलं आहे. राज्याचे तत्कालीन आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य मा. डा. सुधीरजी तांबे, विद्यमान आ. वैभव पिचड आदींचं मोलाचं सहकार्य स्कूलला वेळोवेळी लाभत आहे. अकोले सारख्या आदिवासी भागात शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय सुरु करून संस्थेने आणखी एक दमदार पाऊल टाकले. ए न.टी सी.ई. च्या परवानगीने मातोश्री पार्वतीबाई कोते  शिक्षणशाश्र महाविद्यालय आणि इंग्रजी व मराठी माध्यमाचे अध्यापक विद्यालायाचाही श्रीगणेशा झाला. या ज्ञान मंदिरांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला आहे. संस्थेच्या नेत्रदीपक प्रगतीच्या प्रवासादरम्यान २००९ – १० हे शैक्षणिक वर्ष मैलाचा दगड ठरले. संस्थेचे सायन्स फॅकल्टीचे ज्युनिअर कालेज सुरु झाले. अभिनव परिवाराच्या मातोश्री पार्वतीबाई कोतेंच्या ‘पुण्यतीर्थ’ या पुतळ्याच्या पावन अनावरण सोहळ्याला जगतगुरू शंकराचार्यांची संस्मरणीय उपस्थिती लाभली आणि अभिनव परिवार धन्य झाला. त्यानंतर संस्थेने विद्यार्थ्यांसाठी विविध ज्ञान कवाडे सुरु केली. याच शैक्षणिक वर्षात संस्थेचे ए म. बी.ए. अर्थात व्यवस्थापन शास्र महाविद्यालय शिक्षण सेवेत रुजू झालं. माजी केंद्रीय मंत्री मा. विजय नवले पाटील, पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य मा. डा. सुधीरजी तांबे यांच्या शुभहस्ते संस्थेच्या व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच दिमाखदार उद्घाटन झालं. अकोलेचा ग्रामीण विद्यार्थी खऱ्या अर्थाने कॉर्पोरेट होऊ लागला. संस्थेचा नावलौकिक ए म.बी.ए. च्या हुशार आजी माजी विद्यार्थ्यांनी वाढविला. हॉर्स राईडिंग, रायफल शुटींग तसेच क्रीडा क्षेत्रातील खरा लौकिक मिळवून देणारे सर्व क्रीडा प्रकार अभिनव मध्ये शिकविले जातात. विभागीय, राज्यस्तरीय , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिनव च्या विद्यार्थ्यांनी लौकिक वाढविला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील करार विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत सामवून घेत आहे.कौशल्य प्रणीत व अनुभवातून शिक्षण हे ब्रीद घेऊन अभिनव सातत्याने प्रगती साधत आहे.
के जी पासून पी जी च्या सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभिनव म्हणजे शैक्षणिक आविष्कारच...   

जयश्री देशमुख 
कॅम्पस डायरेक्टर   

maharashtra times vardhapn din






















Thursday, November 23, 2017

कै. यशवंतराव भांगरे आमदारकीच्या निवडणुकीला उभे होते. आजच्या सारखी साधने नसल्यामुळे विरोधी कार्यकर्ते सायकलवरून गावगावीप्रचार करत. शेंडी परिसरात विरोधी कार्यकर्त्यांचा प्रचार करणारा असाच एक जत्था यशवंतराव भांगरे यांना भेटला. या विरोधी कार्यकर्त्यांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. व रात्री त्यांच्या जेवण्याची सोय स्वतःच्या घरी केली.

शेंडी (भंडारदरा )चे भांगरे घराणे म्हणजे तालुक्यातील अनेकांचे हक्काचे घर परिसरातील आदिवासी बरोबरच सर्व साधारण माणसांबरोबरच सामाजिक शैक्षणिक
राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा हा हक्काचा निवारा. गेली ३ पिढ्यांपासून तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात विशेष ठसा उमटवणाऱ्या या घराण्याने अतिथी देवो भव 
हा मंत्र मनापासून जपला आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणसांपासून उच्च पदास्थानपर्यंत कुणाचेही येथे हसत मुखाने स्वागत होते. हा मंत्र आता तिसऱ्या पिढीकडून चौथ्या पिढीकडे येऊ घातला असून अमित अशोक भांगरे या सुशिक्षित व सुसंस्कारित तरुणाने समाजकारणातून उद्योग उभारणी साठी  आगेकूच केली आहे . त्यामुळे  घराण्याण्यातील पुढची पिढी शिकली. अशोक भांगरे यांचा मुलगा अमित नेदरलंडस येथे कृषी
व्यवस्थापन शाखेत उच्च शिक्षण  अभ्यास पूर्ण करून त्याने एमबीए प्रवेश घेतला आहे . तर आपल्या
घराण्याच्या स्वभावाशी सुसंगत 
असणाऱ्या आतिथ्य शिलतेच्या स्वभावाला अनुकूल असणाऱ्या आतिथ्य शिलतेच्या म्हणजे हॉटेल व्यवसायात या घराण्याने आता आपले बस्तान बसविले आहे.
शेती आणि पशुपालन हा मूळ व्यवसाय असणाऱ्या भांगरे घराण्याची पुढील पिढी परदेशात उच्च शिक्षण घेण्याइतपत प्रगती  झाली आहे. मागील शतकात अनेक
वर्ष आमदारकी उपभोगणाऱ्या या घराण्याला अलीकडच्या काळात राजकीय क्षेत्रात लक्षणीय आमदारकी पुन्हा मिळविता आली नसली तरी तालुक्यातील जनतेच्या
हृदयातील त्यांचे स्थान आजही आढळ आहे. भांगरे मुळचे तालुक्यातील एकदरा या आदिवाशी खेड्यातले बऱ्याच  वर्षापूर्वी हे घराणे भंडारदरा काठच्या शेंडीला येऊन
स्थिरावले. दिवंगत गोपाळराव भांगरे हे तालुक्याचे पहिले आमदार त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे पुतणे कै.यशवंतराव भांगरे अकोल्याचे ३ वेळा आमदार होते.
आदिवासी समाजातील ज्या घराण्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले त्यात भांगरे घराणे अग्रेसर होते. कै. गोपाळरावाणा  ३ भाऊ त्यातील २ जन शिक्षक होते. शिक्षकी पेशात
असल्यामुळे कै गोपाळ रावांना १९५२ मध्ये आमदारकीची संधी मिळाली. शेती बरोबरच पशु पालन या घराण्याचा मूळ व्यवसाय, काही वर्षापूर्वी शंभर सव्वाशे गायांचा कळप त्यांच्या घरी नांदायचा.
नवीन पिढीने शेतीतील प्रगती बरोबर व्यवसायाची कास धरली. ६० वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे  उपहार गृह त्यांनी चालविण्यास घेतले होते. तसेच शेंडीला हॉटेलही सुरु केले.
शेंडी मधील पहिली पीठ गिरणी आणि भात गिरणी त्यांनी सुरु केली. आता भांगरे घराणे हॉटेल व्यासायात चांगले स्थिरावले आहे. भंडारदरा येथे त्यांची वेगवेगळ्या
दर्जाची ६ हॉटेल्स आहे. तसेच पालघर जिल्ह्यातही पेट्रोलपंप  व हॉटेल आहे.  प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या सुमारे २५० ते ३०० लोकांना या हॉटेल व्यासायातून रोजगार उपलब्ध झाला आहे. २ चुलते
आणि १३ चुलत भावंडाचे हे कुटुंब. आज यातील काही जन नोकरी करतात. हॉटेल व्यासायाचा विस्तार करण्याबरोबरच भंडारदरा जलाशय परिसरात एक आयुर्वेदिक योग
उपचार केंद्र सुरु करण्याचा त्यांचा मनोदय आहे. आतिथ्य शीलता हा गुणधर्म ह्या घराण्याने ३ पिढ्यांपासून जपला आहे. घरी आलेल्या पाहुण्याचे नेहमी स्वागत केले जाते.
सर्वच पक्षांच्या तालुक्यातील छोटया मोठ्या कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी, विवीध अधिकार्यांनी याचा अनुभव घेतला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पासून आजच्या
पिढीतील तेजस ठाकरेपर्यंत अनेकांचे आदरतिथ्य भांगरे कुटुंबांनी केले आहे. या घराण्याचा आदर तिथ्याचा एक किस्सा नेहमी सांगितला जातो. कै. यशवंतराव भांगरे 
आमदारकीच्या निवडणुकीला उभे होते. आजच्या सारखी साधने नसल्यामुळे विरोधी कार्यकर्ते सायकलवरून गावगावीप्रचार करत. शेंडी परिसरात विरोधी कार्यकर्त्यांचा 
प्रचार करणारा असाच एक जत्था  यशवंतराव भांगरे यांना भेटला. या विरोधी कार्यकर्त्यांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. व रात्री त्यांच्या जेवण्याची सोय स्वतःच्या घरी केली. 
हि परंपरा आजही कायम आहे. यामुळे भंडारदराला येणारे विर्रोधी पक्षांचे लहानमोठे कार्यकर्ते हक्काने भांगरे यांच्या घरी येतात. भंडारदरयात आत्ता आनंदवन, यश,रिसोर्ट
सारखी भांगरे यांच्या मालकीची हॉटेल्स आहेत. मात्र तेथे उतरणारी विवीध शासकीय अधिकारी, आमदार ,मंत्री, हे बऱ्याच वेळा भांगरे यांच्या घराच्या जेवणाचा आस्वाद
घेण्यास पसंत करतात. सध्याच्या पिढीतील अशोकराव भांगरे जि.प.चे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी सुनीताताई भांगरे ह्या विद्यमान जिप सदस्य आहे. त्यांचा
भाऊ दिलीप भांगरे पंचायत समिती सदस्य आहे. या आदिवासी भागातील विविध सामाजिक, संस्कुतिक, शैक्षणिक तसेच कौटुंबिक अडचणी सोडवण्यास सक्रीय पुढे असतो.
राजकीय सत्ता असो अथवा नसो जनमानसातील या घराण्याचे स्थान टिकून आहे. त्यामुळे ३ पिढ्यांपासून अनेकांना भांगरे यांचे घर हे आपले घर वाटत आहे. अशोक भांगरे यांचे चुलते पांडुरंग बाबा हेच कुटुंबातील सर्व निर्णय घेतात त्यांचे कुटुंबात सुमारे ५०० माणसे जोडली असून.दोन चुलते ,सहा चुलत्या ,तेरा चुलत भावंडे ,२३ चुलत बहिणी या शिवाय आते मामे भावंडे असा हा मोठा गोतावळा . ठिकठिकाणी सध्या विखुरलेले असले तरी दिवाळी सारख्या सणांच्या निमित्ताने हि सर्व भावंडे आवर्जून एकत्र येतात . घराचे गोकुळ बनून जाते. वर्षा दोन वर्षातून तीन चार जणांचे विवाह असतात त्यामुळे भंडारदऱ्याच्या   गार्डन मध्ये साजरा होणारा भांगरे घराण्यातील विवाह सोहळा हा एक प्रकारे सामुदायिक विवाह सोहळाच असतो. या सोहळ्याच्या निमित्ताने नातेवाईक जमा होतात त्यामुळे कौटुंबिक नाते संबंधांना उजाळा मिळतो. नवीन बदलांना सामोरे जात असतांना आधुनिकतेची कास धरतांना या घराण्याने आपल्या सांस्कृतिक प्रथा परंपरा हि आत्मीयतेने जपल्या आहेत. दिवाळी , सण  वार , लग्न समारंभ यावेळी सर्वजण एकत्र येतात तेव्हा त्यांचे घर गोकुळासारखे वाटते . अशोक भांगरे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष , समाज कल्याण सभापती व ६ वेळा आमदारकीला उभे राहून पराभूत होऊनही आजही हा राग कुणावरही न काढता आपले काही चुकले असेल या भावनेतून आजही समाज प्रवाहात टिकून आहे . राजकीय सत्ता असो अथवा नसो जनमानसातील या घराण्याचे स्थान टिकून आहे त्यामुळे तीन पिढ्यांपासून अनेकांना भांगरे आपल्या घरातील वाटत आहे गावागावात आजही त्यांचा कार्यकर्ता त्यांची वाट पाहत असतो - त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत व संस्काराचा वारसा संवर्धन करीत अमित यानेही समाजिक बांधिलकी जपली आहेसमाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी आजच्या आधुनिक युगात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील समीकरणे बदलले आहेत. पुरोगामीची जागा आधुनिकीकरणाने काबीज केली आहे. सामाजिक व राजकीय नेत्यांनी आणि कार्यकत्र्यांनी पूरोगामी विचारांची नाळ सोडून आधूनिकीकरणाशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे समाजकारणा पासून आपले बहुसंख्ये नेते दुरावले आणि राजकारणाशी जोडले गेले परिणामी राजकारण्यांवरिल सामाजिक विश्वास ढळू लागला आहे. हे लक्षात घेवून समाजकारण आणि राजकारण यांचा समन्वय साधून भा.ज.पा. चे जेष्ट नेते अशोक भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत समाजमनाच्या -हदयात प्रेमाची इमारत उभा करण्याचे निखळ काम अमित अशोकराव भांगरे हे उमदे युवा नेतृत्व करत आहेत या कार्यशैलीमुळेच आपली समाजकारणात आणि राजकारणात यशाचे एक पाऊल पुढे टाकत दमदार वाटचाल करित आहेत. सोबत फोटो






मा.श्री.आबासाहेब संभाजीराव थोरात (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, संगमनेर)



          अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका म्हणजे सर्वांगाने परिपूर्ण तालुका,राजकीय ,सामाजिक,शैक्षणिक,सहकार,व नैसर्गिकदृष्ट्या सुजलाम सुफलाम ह्या तालुक्याने आजूबाजूच्या घडणार्‍या दैनंदिन जीवनातील घडामोडींचा अचूक वेध घेत तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाला आणि राजकीय दृष्ट्या राज्याला विकासाची दिशा देणारा तालुका म्हणून सर्वदूर सर्वपरिचित असलेल्या संगमनेर तालुक्यात अनेक वैचारिक नेते येथे घडले . त्यात स्वर्गीय संभाजीराजे थोरात यांचा उल्लेख प्रामुख्याने करणे क्रमप्राप्त आहे. तालुक्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर काम करीत असतांना त्यांनी येथील शेतकरी हिताचे त्यावेळी दूरदृष्टी ठेवून घेतलेले विकासनशील निर्णय आज ही कृषि उत्पन्न बाजार समिति मधील धान्य साठवणुकीचे गोडावून असो अथवा  शेती पंपांवरील विजमिटर हटाव आंदोलन असो त्यांच्या प्रगतशील विचारांची साक्ष देतात. शेती पंपासाठी लागणारी विजेची मीटर पद्धत बंद करून अश्वशक्ति पद्धत  सरकारला लागूकरण्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे अहमदनगर जिल्हयाबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी न्याय मिळवून देणार्‍या ह्या अजातशत्रु नेत्याने संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासा साठीनेहमीच अग्रस्थानी राहून संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी बांधवांना हक्काची बाजारपेठ स्वबळावर संगमनेर सारख्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी येथील कष्टकरी शेतकर्‍याला दूधाचा योग्य व पुरेपूर मोबदला मिळण्यासाठी १९९४ साली एस.आर.थोरात दूध डेअरीची उभारणी केली. पहिल्या दिवशी २८ लिटर दूध संकलन करणारीडेअरी दूध उत्पादकांना मिळत असलेल्या योग्य दरा मुळे संगमनेर तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातून अल्पावधीत मोठ्या प्रमाणात दूध संकलन करू लागली . स्वर्गीय संभाजीराजे थोरात काळाचे पडद्याआड गेल्यानंतर त्यांचे सुपुत्र आबासाहेब थोरात यांनी थोरात उद्योग समूहाची सूत्रे समर्थपणे सांभाळीत उद्योग समुहाच्या यशाचा वाढता आलेख सांभाळीत संगमनेर तालुक्यातील असंख्य दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूध उत्पादन करतांना त्याकडे व्यवसाय पाहण्याचे शिकवले आणि त्यामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून पडत असलेल्या दुष्काळाचा समर्थ पणे सामना करू शकला . कारण थोरात उद्योगसमूह दूध उत्पादक शेतकर्‍याच्या माघे कामधेनु प्रमाणे खंबीर पणे उभी आहे. आज तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी यांच्या विश्वासावर १७५००० लिटर दूध प्रतिदिन संकलन करून यशस्वीपणे हाताळणी करीत आहे.
  महाराष्ट्र राज्यात सलग अनेक वर्ष पडत असलेल्या दुष्काळात शेतकरी बांधवांना रोजचे जीवन जगणे मुश्किल झाले असतांना संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी मात्र दूध व्यवसायामुळे तग धरू शकला आहे. तालुक्यात एकेकाळी उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते परंतु सल्ग्च्य दुष्काळामुळे संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील ऊसाची लागवड कमी होवून मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप कमी झाले त्यामुळे उस कारखानदारी धोक्यात आली. अनेक कारखान्यांना उस मिळेनासा झाला त्यामुळे अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडून अनेकांची विक्री झाली. अनेक साखर कारखाने कर्जाच्या खाईत बुडाले परंतु संगमणेर तालुक्यातील शेतकरी ह्या कठीण काळात शेतीला जोड धंदा म्हणून दूध उत्पादनाला प्राधान्य देत राहिल्याने तालुक्यातील शेतकर्‍याला दुष्काळाची तीव्रता कमी प्रमाणात जाणवलीआजमितीला प्रत्येक शेतकर्‍याकडे कमीतकमी ३ दुभती जनावरे दावणीला दिसतात, त्या मुले येथील शेतकर्‍यांनी दूध उत्पादनकडे व्यावसायिक दृष्टीने बघितल्याने मिळणार्‍या पंधरवाडा पेमेंट मधून नित्याचे जीवन कंठण्याला मदत मिळाली त्यात कोणतीही अडचण न आल्याने येथील शेतकर्‍यांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च ,घरखर्च दूधच्या उत्पादनातून होवू लागल्याने खाजगी सावकार अथवा वित्तीय संस्थांच्या दारात उभे राहण्याची गरज पडली नाही. त्यामुळे येथील शेतकर्‍यांवर विदर्भासारखी आत्महत्या करण्याची वेळ आली नाही . येथील शेतकर्‍यांनी दूधाला शेती बरोबर पूरक व्यवसायाची जागा दिल्याने दुष्काळी परिस्तिथित दूधाचे उत्पादन वाढून राज्याच्या अर्थव्यवस्तेला हातभार लावण्याचे मोठे कान संगमणेर तालुक्यातून उभे राहिले एस.आर.थोरात दूध उद्योग समुहाच्या रूपाने आबासाहेब थोरात यांनी दूरदृष्टी ठेऊन केलेली वाटचाल तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी संजीवनी साबीत झाली त्या मुले येथील शेतकरी खर्‍या अर्थी उभाराहिला राज्यात दुष्काळी परिस्तिथित सण शेतकरी कुटुंबांना परवडेनासे झाले अश्या वेळी थोरात उद्योग समूहाने महाराष्ट्र राज्यात शासन दरापेक्षा जसतीचा दूध दर देत २० रुपये प्रतीलिटर दूध दर देत दूधची खरेदी केली,राज्यात अनेक दूध व्यावसायिक संघ खाजगी दूध व्यावसायिक दूध संस्थांनी दुष्काळात दूधाचे दर कमी केले परंतु दूध उत्पादक शेतकर्‍याशी असलेली बांधिलकी जपत थोरात उद्योग समूहाने दूधाचे दर घटवले नाही पर्यायी तालुक्यातील इतर दूध व्यावसायिक संस्थांनाही दूध दर कमी करता आला नाही . दिपवाळी निमित्ताने राज्यात दूध दरफरक नं १ च देत वर्ष भर स्वच्छ दूध पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांना स्वतच्या नफ्यातून १=६० पैसे दूध दर फरक वाटण्यात आला त्यामुळे येथील शेतकरी बांधवांची दिपवाळी आनंदात साजरी झाली.
  भारताची दुग्ध क्षेत्रातील भरारी पाहता २०१०/११ मध्ये १२१.८ दशलक्ष टन दूध उत्पादित होत असतांना २०११/१२ मध्ये १२७.९ दशलक्ष टन वार्षिक उत्पादन साध्यकरण्यास भारत देश यशस्वी झाला आहे. महाराष्ट्राचे दैनंदिन दूध उत्पादन १कोटी१० लाख लिटर असून त्यात अहमदनगर जिल्ह्याचे दूध उत्पादन २३ते २३.५ लाख लिटर होत आहे. संगमनेर तालुक्यात प्रतिदिनं ४ लाख लिटर दूधाचे उत्पादन केले जाते ,दुग्धव्यवसाय ग्रामीण कुटुंबांना लक्षावधी उत्पन्न देणारा एक महत्वाचा दुय्यम स्रोत बनला आहे आणि विशेषत: महिलांना व शेतकर्‍यांसाठी रोजगार व उत्पन्न ह्या दोन्ही संधी प्रदान करणारा सर्वात महत्वाचा जोड धंदा निर्माण झाला आहे . दूधाचे उत्पादन सर्वात लहान ,मध्यम शेतकरी,भूमिहीन शेतकरी शेतमजुर निर्मित करीत आहेत हे विशेष. दूध व दुग्धजन्य पदार्थांना देश विदेशात वाढती मागणी लक्षात घेता २०१५ मध्ये हा व्यवसाय ५ लाख कोटींची उलाढाल करू लागेल असे सुतोवाच असोच्याम या संस्थेने नुकतेच केले आहे.भारताचे दूध उत्पादन १५ कोटी टन होईल भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे जगाच्या एकूण उत्पादनपैकी 20 टक्के दूध भारतात उत्पादित होते. तथापि यातील बहुतांशी दूधाचा खप देशातच होतो देशातील दुग्ध व्यवसाय दरवर्षी १० टक्क्यांनी वाढत असून ग्रामीण भागातील ८ कोटी कुटुंबे दूधउत्पादनाच्याव्यवसायातआहेत.महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,बिहार,हरियाणा,गुजराथ,मध्यप्रदेश,पंजाब,राजस्थान,उत्तर प्रदेश,ही राज्ये दूध उत्पादनात अग्रेसर आहेत.भारतात उत्पादित दूधाच्या ६० टक्के दूध द्रव स्वरुपात दैनंदिन उपयोगात आणले जावून उर्वरित दुधापासून लोणी,तूप,चीज,दही,पनीर,आइसक्रीम,व मिठाई पदार्थ बनविले जातात.नागरिकांची वाढती क्रयशक्ती व आरोग्य विषयक जागरूकता यामुळे पिशवीतील दूधाला शहरी भागात प्रचंड मागणी वाढणार आहे.
महागाई ,चार्‍याची टंचाई ,अकुशल मनुष्यबळ,दूध साठवण्यासाठीची शितगृहांचा अभाव व दूधाचे भाव ठरविण्यात असलेली अपारदर्शकता यामुळे काही ठिकाणी दूध उत्पादन घटल्याचे ही दिसते . परंतु संगमनेर तालुक्यात एस.आर.थोरात उद्योग समूहाने महत्वाची भूमिका बजावत गुरांची योग्य रीतीने पैदास व त्यांच्या आरोग्याची काळजी ,पशुखाद्य निर्मिती,गवत व हिरवाचारा निर्मिती अश्या अनेक पैलूंवर काम करीत संगमनेर तालुक्यातील शेतकरी खर्‍या अर्थी जोपासला.त्यामुळेग्रामीण भागातील अर्थव्यवस्था टिकून राहण्यास मदत झाली. शेतकर्‍याला दुष्काळी परिस्तिथित कर्ज काढण्याची गरज पडली नाही हे विशेष.
आबासाहेब थोरात यांच्या विचारातून थोरात उद्योग समूहाचे गगनगिरी नावाने श्रीखंड,आम्रखंड,शुद्ध गाय तूप,बटर,पनीर,दूध पावडर,सुगंधी दूध,खवा,लस्सी,ताक,दही अशी विविध दूधपासून बनविलेल्या पदार्थांची निर्मिती होवून अनेक बाजारपेठात उपलब्ध होवू लागली. उच्चतम गुणवत्तेच्या आधारावर तयार झालेल्या दुग्धजन्य पदार्थांना स्थानिक बाजारपेठा बरोबर मुंबई,पुणे,नाशिक,सह गुजराथ ,विदर्भ,मराठवाड्यासह,आंतरराष्ट्रीयबाजारपेठतसौदीअरेबिया,नेपाळ,दक्षिणआफ्रिका,बांग्लादेश,नायजेरिया,दक्षिण कोरिया,ओमान,ह्या देशात मोठ्या प्रमाणावर मागणी आजही कायम आहे. डेयरीच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूध वाढीसाठी कमीतकमी खर्चात योग्य नियोजनातून व्यवस्थापन,अल्पवेळेत हिरवा चारा उत्पादन,गगनगिरी पशुखाद्य पुरवठा,पशू पालन,वासरू संगोपन या सारख्या दूध उत्पादन क्षेत्राशी निगडीत असलेल्या विषयांवर तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन पर शिबिरांचे नित्य आयोजन केले जाते.
जगात जरी दूध उत्पादनात भारताचा पहिला नंबर लागत असला तरी गायींची संख्या व उत्पादनाचा विचार करता यात मोठी तफावत असल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यात आपण मागे आहोत . दूध व्यवसाय पुढील काळात गुणवत्तेवर आधारित असणार असल्याने व्यवस्थापणावर दूध धंद्याची यशस्वीता अवलंबून राहणार आहे.दूध व्यवसायात प्रत्यक्ष काम करण्याची आवश्यकता असून दूध धंद्या बाबत १ लिटर दूध उत्पादन करीत असलेल्या शेतकर्‍या बरोबर संवाद साधला गेला पाहिजे,त्याच्याशी चर्चा झाली पाहिजे.शेतकर्‍यांनी देखील जनावरांची सखोल माहिती ठेवली पाहिजे.जागतिक बाजार पेठेशी दोन हाथ करतांना येथील शेतकर्‍यांनी जनावरांची संख्या कमी व दूधाचे उत्पादन जास्त अश्या संकल्पनेचे धोरण अवलंबावे लागणार आहे. छोट्या शेतकर्‍यांनी अधिक जागरूक राहून कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे काळाची गरज बनली आहे.व्यावहारिक ज्ञानाशिवाय दूध धंदा पुढील काळात परवडणार नाही,गायीचे दूध वाढले पाहिजे जनावरांच्या जातीवर दूधची प्रत व गुणवत्ता अवलंबून असते त्यात हा अनूवांशिक गुण आहे.शेतकर्‍यांनी जनावरे सांभाळतांना ती किती दूध देतात,किती दिवस देतात त्याची गुणवत्ता काय,त्यांना कोणकोणत्या प्रकारची औषधे द्यावी लागतात .त्यांना देण्यात येणारे पशुखाद्य त्यांचे प्रमाण ,लसीकरण या सारखे महत्वाचे तंत्रशुद्ध पद्धती अंगिकारल्या पाहिजे . मागील काही वर्षाचे विचार करता आपली जनावरे या पुढील काळात दूध देण्यास सक्षम आहेत किंवा नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे.पाण्यावर अधिक भर देवून चारा ,खाद्य यांचे प्रमाण ठरवून ते वेळेतच दिले गेले पाहिजे .आपल्या कडील शेतकरी बांधवांकडे नियोजनाचा अभाव असल्याने व्यवस्थापणावर अधिक खर्च होत असल्याने मिळणारे उत्पादन कमी असते.वासराचे संगोपन देखील महत्वाचे असून ही वासरे सदृढ राहिली तर दूध उत्पादन वाढणार असते. अधिक श्रम करून कमी खर्चात गुणवत्ता पूर्वक दूध उत्पादन करणे आपल्यासाठी पुढील काळात आव्हान असणार आहे. जनावरांना आवश्यक असणारे घटक मिळाल्यास दूध उत्पादन वाढते याचे भान शेतकर्‍यांना नसते त्यामुळे शेतकरी अनेकवेळा चारा व पशुखाद्य याचा जनावरावर भडिमार करीत असतो त्यामुळे दुभत्या जनावराची प्रकृती बिघडते व त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो . गुणवत्ता असल्याशिवाय या पुढील काळात दूध स्वीकारणे बंद होणार आहे हा धोका ओळखून शेतकर्‍यांनी चांगल्या प्रतीचे दूधाचे उत्पादन करणे गरजेचे आहे.
 दूध उत्पादनाला शेती पूरक व्यवसाय न मानता व्यापारी दृष्टीकोण ठेवून दूध उत्पादन वाढीसाठी सर्व पूरक नियोजन एस आर थोरात उद्योग समुहा तर्फे राबविली जात आहेत त्याचा परिणाम तालुक्यासह राज्यातील दूध उत्पादन वाढीस झाला आहे. डेअरी मार्फत शेतकरी बांधवांसाठी मायक्रो ट्रेनिंग सेंटर ची स्थापना करण्यात आली असून अनेक दूध उत्पादक शेतकरी याचा लाभ घेत आहेत. थोरात उद्योग समुहाच्या वतीने आजोला हायड्रोफोनिक गवत निर्मितीवर विशेष संशोधन केले जात असून तालुक्यातील शेतकर्‍यांना गवत निर्मितीसाठी प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी निमगाव पागा येथील श्री अनिल कानवडे यांच्या फार्म हाऊस वर सुविधा पुरविण्यात येत आहेत . दूध उत्पादना बरोबर गांडूळ खत ,वीर्य प्रक्रिया ,दुभत्या गायीचे वासरू संगोपन प्रशिक्षण केंद्र ठिकठिकाणी उभारून गो पालक शेतकर्‍यांना प्रशिक्षित केले जात आहे. एस आर थोरात उद्योग समूहाने दूध उत्पादक शेतकर्‍याला व्यवसायाच्या केंद्र स्थानी ठेवून डेयरीच्या स्थापने पासूनराज्यात दूध उत्पादक शेतकर्‍याला राज्यात नं १ चा दूध दर फरक देणारा उद्योग समूह अशी ख्याति मिळवली आहे. थोरात डेअरीला ISO,HACCP,AGMARK,BIS,APEDA,EXPORT INSPECTION EGENCY FDA,अशी अनेक मानांकणे मिळाली आहेत .

दूध उत्पादना बरोबर गांडूळ खत
,वीर्य प्रक्रिया ,दुभत्या गायीचे वासरू संगोपन प्रशिक्षण केंद्र ठिकठिकाणी उभारून गो पालक शेतकर्‍यांना प्रशिक्षित केले
जात आहे. एस आर थोरात उद्योग समूहाने दूध उत्पादक शेतकर्‍याला व्यवसायाच्या केंद्र स्थानी ठेवून डेयरीच्या स्थापने
पासूनराज्यात दूध उत्पादक शेतकर्‍याला राज्यात नं १ चा दूध दर फरक देणारा उद्योग समूह अशी ख्याति मिळवली
आहे. थोरात डेअरीला ISO,HACCP,AGMARK,BIS,APEDA,EXPORT INSPECTION EGENCY FDA,अशी अनेक मानांकणे
मिळाली आहेत .दूध उत्पादना बरोबर गांडूळ खत
,वीर्य प्रक्रिया ,दुभत्या गायीचे वासरू संगोपन प्रशिक्षण केंद्र ठिकठिकाणी उभारून गो पालक शेतकर्‍यांना प्रशिक्षित केले
जात आहे. एस आर थोरात उद्योग समूहाने दूध उत्पादक शेतकर्‍याला व्यवसायाच्या केंद्र स्थानी ठेवून डेयरीच्या स्थापने
पासूनराज्यात दूध उत्पादक शेतकर्‍याला राज्यात नं १ चा दूध दर फरक देणारा उद्योग समूह अशी ख्याति मिळवली
आहे. थोरात डेअरीला ISO,HACCP,AGMARK,BIS,APEDA,EXPORT INSPECTION EGENCY FDA,अशी अनेक मानांकणे
मिळाली आहेत .

दूध उत्पादना बरोबर गांडूळ खत
,वीर्य प्रक्रिया ,दुभत्या गायीचे वासरू संगोपन प्रशिक्षण केंद्र ठिकठिकाणी उभारून गो पालक शेतकर्‍यांना प्रशिक्षित केले
जात आहे. एस आर थोरात उद्योग समूहाने दूध उत्पादक शेतकर्‍याला व्यवसायाच्या केंद्र स्थानी ठेवून डेयरीच्या स्थापने
पासूनराज्यात दूध उत्पादक शेतकर्‍याला राज्यात नं १ चा दूध दर फरक देणारा उद्योग समूह अशी ख्याति मिळवली
आहे. थोरात डेअरीला ISO,HACCP,AGMARK,BIS,APEDA,EXPORT INSPECTION EGENCY FDA,अशी अनेक मानांकणे
मिळाली आहेत .

Thursday, November 16, 2017

vinod tavde