मा.श्री.आबासाहेब संभाजीराव थोरात (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, संगमनेर)
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका म्हणजे सर्वांगाने परिपूर्ण तालुका,राजकीय ,सामाजिक,शैक्षणिक,सहकार,व नैसर्गिकदृष्ट्या सुजलाम सुफलाम ह्या तालुक्याने आजूबाजूच्या घडणार्या दैनंदिन जीवनातील घडामोडींचा अचूक वेध घेत तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाला आणि राजकीय दृष्ट्या राज्याला विकासाची दिशा देणारा तालुका म्हणून सर्वदूर सर्वपरिचित असलेल्या संगमनेर तालुक्यात अनेक वैचारिक नेते येथे घडले . त्यात स्वर्गीय संभाजीराजे थोरात यांचा उल्लेख प्रामुख्याने करणे क्रमप्राप्त आहे. तालुक्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर काम करीत असतांना त्यांनी येथील शेतकरी हिताचे त्यावेळी दूरदृष्टी ठेवून घेतलेले विकासनशील निर्णय आज ही कृषि उत्पन्न बाजार समिति मधील धान्य साठवणुकीचे गोडावून असो अथवा शेती पंपांवरील विजमिटर हटाव आंदोलन असो त्यांच्या प्रगतशील विचारांची साक्ष देतात. शेती पंपासाठी लागणारी विजेची मीटर पद्धत बंद करून अश्वशक्ति पद्धत सरकारला लागूकरण्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे अहमदनगर जिल्हयाबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी न्याय मिळवून देणार्या ह्या अजातशत्रु नेत्याने संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासा साठीनेहमीच अग्रस्थानी राहून संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी बांधवांना हक्काची बाजारपेठ स्वबळावर संगमनेर सारख्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी येथील कष्टकरी शेतकर्याला दूधाचा योग्य व पुरेपूर मोबदला मिळण्यासाठी १९९४ साली एस.आर.थोरात दूध डेअरीची उभारणी केली. पहिल्या दिवशी २८ लिटर दूध संकलन करणारीडेअरी दूध उत्पादकांना मिळत असलेल्या योग्य दरा मुळे संगमनेर तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातून अल्पावधीत मोठ्या प्रमाणात दूध संकलन करू लागली . स्वर्गीय संभाजीराजे थोरात काळाचे पडद्याआड गेल्यानंतर त्यांचे सुपुत्र आबासाहेब थोरात यांनी थोरात उद्योग समूहाची सूत्रे समर्थपणे सांभाळीत उद्योग समुहाच्या यशाचा वाढता आलेख सांभाळीत संगमनेर तालुक्यातील असंख्य दूध उत्पादक शेतकर्यांना दूध उत्पादन करतांना त्याकडे व्यवसाय पाहण्याचे शिकवले आणि त्यामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून पडत असलेल्या दुष्काळाचा समर्थ पणे सामना करू शकला . कारण थोरात उद्योगसमूह दूध उत्पादक शेतकर्याच्या माघे कामधेनु प्रमाणे खंबीर पणे उभी आहे. आज तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी यांच्या विश्वासावर १७५००० लिटर दूध प्रतिदिन संकलन करून यशस्वीपणे हाताळणी करीत आहे.
महाराष्ट्र राज्यात सलग अनेक वर्ष पडत असलेल्या दुष्काळात शेतकरी बांधवांना रोजचे जीवन जगणे मुश्किल झाले असतांना संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी मात्र दूध व्यवसायामुळे तग धरू शकला आहे. तालुक्यात एकेकाळी उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते परंतु सल्ग्च्य दुष्काळामुळे संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील ऊसाची लागवड कमी होवून मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप कमी झाले त्यामुळे उस कारखानदारी धोक्यात आली. अनेक कारखान्यांना उस मिळेनासा झाला त्यामुळे अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडून अनेकांची विक्री झाली. अनेक साखर कारखाने कर्जाच्या खाईत बुडाले परंतु संगमणेर तालुक्यातील शेतकरी ह्या कठीण काळात शेतीला जोड धंदा म्हणून दूध उत्पादनाला प्राधान्य देत राहिल्याने तालुक्यातील शेतकर्याला दुष्काळाची तीव्रता कमी प्रमाणात जाणवलीआजमितीला प्रत्येक शेतकर्याकडे कमीतकमी ३ दुभती जनावरे दावणीला दिसतात, त्या मुले येथील शेतकर्यांनी दूध उत्पादनकडे व्यावसायिक दृष्टीने बघितल्याने मिळणार्या पंधरवाडा पेमेंट मधून नित्याचे जीवन कंठण्याला मदत मिळाली त्यात कोणतीही अडचण न आल्याने येथील शेतकर्यांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च ,घरखर्च दूधच्या उत्पादनातून होवू लागल्याने खाजगी सावकार अथवा वित्तीय संस्थांच्या दारात उभे राहण्याची गरज पडली नाही. त्यामुळे येथील शेतकर्यांवर विदर्भासारखी आत्महत्या करण्याची वेळ आली नाही . येथील शेतकर्यांनी दूधाला शेती बरोबर पूरक व्यवसायाची जागा दिल्याने दुष्काळी परिस्तिथित दूधाचे उत्पादन वाढून राज्याच्या अर्थव्यवस्तेला हातभार लावण्याचे मोठे कान संगमणेर तालुक्यातून उभे राहिले एस.आर.थोरात दूध उद्योग समुहाच्या रूपाने आबासाहेब थोरात यांनी दूरदृष्टी ठेऊन केलेली वाटचाल तालुक्यातील शेतकर्यांसाठी संजीवनी साबीत झाली त्या मुले येथील शेतकरी खर्या अर्थी उभाराहिला राज्यात दुष्काळी परिस्तिथित सण शेतकरी कुटुंबांना परवडेनासे झाले अश्या वेळी थोरात उद्योग समूहाने महाराष्ट्र राज्यात शासन दरापेक्षा जसतीचा दूध दर देत २० रुपये प्रतीलिटर दूध दर देत दूधची खरेदी केली,राज्यात अनेक दूध व्यावसायिक संघ खाजगी दूध व्यावसायिक दूध संस्थांनी दुष्काळात दूधाचे दर कमी केले परंतु दूध उत्पादक शेतकर्याशी असलेली बांधिलकी जपत थोरात उद्योग समूहाने दूधाचे दर घटवले नाही पर्यायी तालुक्यातील इतर दूध व्यावसायिक संस्थांनाही दूध दर कमी करता आला नाही . दिपवाळी निमित्ताने राज्यात दूध दरफरक नं १ च देत वर्ष भर स्वच्छ दूध पुरवठा करणार्या शेतकर्यांना स्वतच्या नफ्यातून १=६० पैसे दूध दर फरक वाटण्यात आला त्यामुळे येथील शेतकरी बांधवांची दिपवाळी आनंदात साजरी झाली.
भारताची दुग्ध क्षेत्रातील भरारी पाहता २०१०/११ मध्ये १२१.८ दशलक्ष टन दूध उत्पादित होत असतांना २०११/१२ मध्ये १२७.९ दशलक्ष टन वार्षिक उत्पादन साध्यकरण्यास भारत देश यशस्वी झाला आहे. महाराष्ट्राचे दैनंदिन दूध उत्पादन १कोटी१० लाख लिटर असून त्यात अहमदनगर जिल्ह्याचे दूध उत्पादन २३ते २३.५ लाख लिटर होत आहे. संगमनेर तालुक्यात प्रतिदिनं ४ लाख लिटर दूधाचे उत्पादन केले जाते ,दुग्धव्यवसाय ग्रामीण कुटुंबांना लक्षावधी उत्पन्न देणारा एक महत्वाचा दुय्यम स्रोत बनला आहे आणि विशेषत: महिलांना व शेतकर्यांसाठी रोजगार व उत्पन्न ह्या दोन्ही संधी प्रदान करणारा सर्वात महत्वाचा जोड धंदा निर्माण झाला आहे . दूधाचे उत्पादन सर्वात लहान ,मध्यम शेतकरी,भूमिहीन शेतकरी शेतमजुर निर्मित करीत आहेत हे विशेष. दूध व दुग्धजन्य पदार्थांना देश विदेशात वाढती मागणी लक्षात घेता २०१५ मध्ये हा व्यवसाय ५ लाख कोटींची उलाढाल करू लागेल असे सुतोवाच असोच्याम या संस्थेने नुकतेच केले आहे.भारताचे दूध उत्पादन १५ कोटी टन होईल भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे जगाच्या एकूण उत्पादनपैकी 20 टक्के दूध भारतात उत्पादित होते. तथापि यातील बहुतांशी दूधाचा खप देशातच होतो देशातील दुग्ध व्यवसाय दरवर्षी १० टक्क्यांनी वाढत असून ग्रामीण भागातील ८ कोटी कुटुंबे दूधउत्पादनाच्याव्यवसायातआहेत.महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,बिहार,हरियाणा,गुजराथ,मध्यप्रदेश,पंजाब,राजस्थान,उत्तर प्रदेश,ही राज्ये दूध उत्पादनात अग्रेसर आहेत.भारतात उत्पादित दूधाच्या ६० टक्के दूध द्रव स्वरुपात दैनंदिन उपयोगात आणले जावून उर्वरित दुधापासून लोणी,तूप,चीज,दही,पनीर,आइसक्रीम,व मिठाई पदार्थ बनविले जातात.नागरिकांची वाढती क्रयशक्ती व आरोग्य विषयक जागरूकता यामुळे पिशवीतील दूधाला शहरी भागात प्रचंड मागणी वाढणार आहे.
महागाई ,चार्याची टंचाई ,अकुशल मनुष्यबळ,दूध साठवण्यासाठीची शितगृहांचा अभाव व दूधाचे भाव ठरविण्यात असलेली अपारदर्शकता यामुळे काही ठिकाणी दूध उत्पादन घटल्याचे ही दिसते . परंतु संगमनेर तालुक्यात एस.आर.थोरात उद्योग समूहाने महत्वाची भूमिका बजावत गुरांची योग्य रीतीने पैदास व त्यांच्या आरोग्याची काळजी ,पशुखाद्य निर्मिती,गवत व हिरवाचारा निर्मिती अश्या अनेक पैलूंवर काम करीत संगमनेर तालुक्यातील शेतकरी खर्या अर्थी जोपासला.त्यामुळेग्रामीण भागातील अर्थव्यवस्था टिकून राहण्यास मदत झाली. शेतकर्याला दुष्काळी परिस्तिथित कर्ज काढण्याची गरज पडली नाही हे विशेष.
आबासाहेब थोरात यांच्या विचारातून थोरात उद्योग समूहाचे गगनगिरी नावाने श्रीखंड,आम्रखंड,शुद्ध गाय तूप,बटर,पनीर,दूध पावडर,सुगंधी दूध,खवा,लस्सी,ताक,दही अशी विविध दूधपासून बनविलेल्या पदार्थांची निर्मिती होवून अनेक बाजारपेठात उपलब्ध होवू लागली. उच्चतम गुणवत्तेच्या आधारावर तयार झालेल्या दुग्धजन्य पदार्थांना स्थानिक बाजारपेठा बरोबर मुंबई,पुणे,नाशिक,सह गुजराथ ,विदर्भ,मराठवाड्यासह,आंतरराष्ट्रीयबाजारपेठतसौदीअरेबिया,नेपाळ,दक्षिणआफ्रिका,बांग्लादेश,नायजेरिया,दक्षिण कोरिया,ओमान,ह्या देशात मोठ्या प्रमाणावर मागणी आजही कायम आहे. डेयरीच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकर्यांना दूध वाढीसाठी कमीतकमी खर्चात योग्य नियोजनातून व्यवस्थापन,अल्पवेळेत हिरवा चारा उत्पादन,गगनगिरी पशुखाद्य पुरवठा,पशू पालन,वासरू संगोपन या सारख्या दूध उत्पादन क्षेत्राशी निगडीत असलेल्या विषयांवर तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन पर शिबिरांचे नित्य आयोजन केले जाते.
जगात जरी दूध उत्पादनात भारताचा पहिला नंबर लागत असला तरी गायींची संख्या व उत्पादनाचा विचार करता यात मोठी तफावत असल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यात आपण मागे आहोत . दूध व्यवसाय पुढील काळात गुणवत्तेवर आधारित असणार असल्याने व्यवस्थापणावर दूध धंद्याची यशस्वीता अवलंबून राहणार आहे.दूध व्यवसायात प्रत्यक्ष काम करण्याची आवश्यकता असून दूध धंद्या बाबत १ लिटर दूध उत्पादन करीत असलेल्या शेतकर्या बरोबर संवाद साधला गेला पाहिजे,त्याच्याशी चर्चा झाली पाहिजे.शेतकर्यांनी देखील जनावरांची सखोल माहिती ठेवली पाहिजे.जागतिक बाजार पेठेशी दोन हाथ करतांना येथील शेतकर्यांनी जनावरांची संख्या कमी व दूधाचे उत्पादन जास्त अश्या संकल्पनेचे धोरण अवलंबावे लागणार आहे. छोट्या शेतकर्यांनी अधिक जागरूक राहून कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे काळाची गरज बनली आहे.व्यावहारिक ज्ञानाशिवाय दूध धंदा पुढील काळात परवडणार नाही,गायीचे दूध वाढले पाहिजे जनावरांच्या जातीवर दूधची प्रत व गुणवत्ता अवलंबून असते त्यात हा अनूवांशिक गुण आहे.शेतकर्यांनी जनावरे सांभाळतांना ती किती दूध देतात,किती दिवस देतात त्याची गुणवत्ता काय,त्यांना कोणकोणत्या प्रकारची औषधे द्यावी लागतात .त्यांना देण्यात येणारे पशुखाद्य त्यांचे प्रमाण ,लसीकरण या सारखे महत्वाचे तंत्रशुद्ध पद्धती अंगिकारल्या पाहिजे . मागील काही वर्षाचे विचार करता आपली जनावरे या पुढील काळात दूध देण्यास सक्षम आहेत किंवा नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे.पाण्यावर अधिक भर देवून चारा ,खाद्य यांचे प्रमाण ठरवून ते वेळेतच दिले गेले पाहिजे .आपल्या कडील शेतकरी बांधवांकडे नियोजनाचा अभाव असल्याने व्यवस्थापणावर अधिक खर्च होत असल्याने मिळणारे उत्पादन कमी असते.वासराचे संगोपन देखील महत्वाचे असून ही वासरे सदृढ राहिली तर दूध उत्पादन वाढणार असते. अधिक श्रम करून कमी खर्चात गुणवत्ता पूर्वक दूध उत्पादन करणे आपल्यासाठी पुढील काळात आव्हान असणार आहे. जनावरांना आवश्यक असणारे घटक मिळाल्यास दूध उत्पादन वाढते याचे भान शेतकर्यांना नसते त्यामुळे शेतकरी अनेकवेळा चारा व पशुखाद्य याचा जनावरावर भडिमार करीत असतो त्यामुळे दुभत्या जनावराची प्रकृती बिघडते व त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो . गुणवत्ता असल्याशिवाय या पुढील काळात दूध स्वीकारणे बंद होणार आहे हा धोका ओळखून शेतकर्यांनी चांगल्या प्रतीचे दूधाचे उत्पादन करणे गरजेचे आहे.
दूध उत्पादनाला शेती पूरक व्यवसाय न मानता व्यापारी दृष्टीकोण ठेवून दूध उत्पादन वाढीसाठी सर्व पूरक नियोजन एस आर थोरात उद्योग समुहा तर्फे राबविली जात आहेत त्याचा परिणाम तालुक्यासह राज्यातील दूध उत्पादन वाढीस झाला आहे. डेअरी मार्फत शेतकरी बांधवांसाठी मायक्रो ट्रेनिंग सेंटर ची स्थापना करण्यात आली असून अनेक दूध उत्पादक शेतकरी याचा लाभ घेत आहेत. थोरात उद्योग समुहाच्या वतीने आजोला हायड्रोफोनिक गवत निर्मितीवर विशेष संशोधन केले जात असून तालुक्यातील शेतकर्यांना गवत निर्मितीसाठी प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी निमगाव पागा येथील श्री अनिल कानवडे यांच्या फार्म हाऊस वर सुविधा पुरविण्यात येत आहेत . दूध उत्पादना बरोबर गांडूळ खत ,वीर्य प्रक्रिया ,दुभत्या गायीचे वासरू संगोपन प्रशिक्षण केंद्र ठिकठिकाणी उभारून गो पालक शेतकर्यांना प्रशिक्षित केले जात आहे. एस आर थोरात उद्योग समूहाने दूध उत्पादक शेतकर्याला व्यवसायाच्या केंद्र स्थानी ठेवून डेयरीच्या स्थापने पासूनराज्यात दूध उत्पादक शेतकर्याला राज्यात नं १ चा दूध दर फरक देणारा उद्योग समूह अशी ख्याति मिळवली आहे. थोरात डेअरीला ISO,HACCP,AGMARK,BIS,APEDA,EXPORT INSPECTION EGENCY FDA,अशी अनेक मानांकणे मिळाली आहेत .
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home