page 2
अकोलेपानं २ --तालुक्यातील पर्यटनाचे योग्य
मार्केटिंग केल्यास आणि पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटन हा रोजी
खालोखाल रोजगार देणारा व्यवसाय ठरेल .
ग्रामीण
भागात अर्थकारणाला गती आल्यामुळे तालुक्यात अनेक लहान मोठ्या पतसंस्था
च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती तालुक्यात झाली आहे .
विविध बँकाच्या शाखाबरोबरच या पतसंस्थांच्या तालुक्यातील अर्थ कारणात मोठा
वाटा आहे . प्रवरा , मुळा , आढळा ,या तिन्ही खोऱयातील तालुक्यातील शेतकरी
प्रगतिशील आहेत शेतीचे नवनवीन तंत्र आत्मसात करण्यात येथील शेतकरी आघाडीवर
असतो शेती बरोशेतकऱ्यांची नवीन पिढी कृषी प्रक्रिया उद्योगांकडे वळू
लागली आहे आवळ्यावर प्रक्रिया करणारा व्ही पी फूड स असेल किंवा दूध
प्रक्रया करून उपपदार्थ करणारा सावंत डेरी उद्योग असेल अकोले राजूर
रस्त्यावर सह्याद्री ओक्सी मोर सह बाटलीबंद पाण्याचे छोटे मोठे प्रकल्प उभे
आहेत त्यांच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या
आहेत खाजगी आणि सहकारी दूध प्रकल्पातही अर्थकारनातं वाटा राहिला आहे . तर
तालुक्याच्या पश्चिम भागात पशुपालन हा महत्वाचा शेती पूरक व्यवसाय ठरला आहे
प्रगतिशील शेतीमुळे गावोगावी लहान मोठे खते बियाणांचे विक्री केंद्र उभी
राहिली आहेत . त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्माण झाला आहे .
शेतीमध्ये होत असणारा रासायनिक खतांचा वापर कीटक नाशके जंतू नासिके या
सर्वांचा दुष्परिणाम येथील जाणकारांना जाणवू लागले आहे . त्यातूनच
सेंद्रिय शेतीची चळवळ तालुक्यात हळू हळू आकार घेऊ लागली आहे . यात बायफ या
संस्थेचा मोठा वाटा आहे तालुक्यातील उत्तर भागातील खिरविरे , माहेर ,
परिसरात बायफ मार्फत आदिवासी विकासात मोठा कार्यक्रम राबविला जातो आहे .
आयफाच्या माध्यमातून कोंभाळणे येथील राहीबाई पोपेरे या आदिवासी महिलेची
बियाणे बँक अनेकांच्या आकर्षणाचा कुतूहहलाचा विषय ठरला आहे . परिसरातील
अनेक गावरान वांच्या संवर्धनच्या प्रसाराचे कार्य राहीबाई करीत आहे
बायफच्या माध्यमातून पारंपरिक भात बियांच्या संवर्धनाचा कार्यक्रम
राबिविण्यात येत आहे . एकदरे मानेहेरे सह तीन ठिकाणी बायफने बँक स्थापन
केल्या असून त्यातून या परिसरातील काळ भात , आंबे मोहर , रायभोग , जिरवले ,
हाळी कोळपी , गरी कोळपी , यासारख्या १४ भात वाणाचे शुद्ध स्वरूपातील
बियाणे शेतकऱ्यांना नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहे बायफच्या परसबाग
प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना पुष्टिक फळे भाजीपाला उपलब्ध होऊ लागला आहे
. कुपोषण रोखण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होणार आहे . लोकपंचायत हि संस्था
हि मुळा खोरितात काळ भात संवर्धनाचे तसेच गावरान बियांचे संवर्धनचे काम
करीत आहे . या संस्थांच्या प्रयत्नामुळे या परिसरात पुन्हा पारंपरिक बियाणे
रुजेल अशी चिन्ह दिसत आहे . शाश्वत शेती विकासाच्या या कार्यक्रमामुळे
अनेक शेतकऱ्यांचा जीवनात स्थायी स्वरूपाचे बदल होणार आहे . शेती , दूध धंदा
त्याबरोबरच शिक्षणातही आमूलाग्र बदल झाले असून अकोले एज्युकेशन , अभिनव या
शैक्षणिक संस्था त्यासाठी पुढे येत आहे मात्र ७५ वर्षे उलटूनही सत्यनिकेतन
संस्था कात टाकत नसल्याची खंतही व्यक्त होत आहे .
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home