Friday, November 24, 2017

abhinv

स्वगृहे पूज्यते पितर, स्वग्रामे पूज्यते प्रभू
स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते..

निसर्गाचे भरभरून देणे लाभलेला अकोले तालुका ज्ञानसमृद्ध व्हावा हे उदात्त स्वप्न काही समाजधुरिणांनी पाहिलं आणि ते वास्तवात उतरण्यासाठी अपर कष्ट घेतले. आपण लावलेला हा ज्ञानाचा वेलू गगनावर जातानाचा प्रवास पाहून आपले प्रयत्न सार्थकी लागल्याची कृतकृत्य भावना या आधुनिक ज्ञानतपस्वींच्या चेहऱ्यावर झळकत आहे. (संस्कृत सुभाषित)
सन १९९२ मध्ये मा. सुरेशजी कोते मा. मधुकरराव नवले, प्रा. रमेशचंद्र खांडगे, भाऊसाहेब नाईकवाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अकोले तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेची मुहूर्तमेढ रचली.
इंग्रजी हि ज्ञान भाषा असल्याने जगातील अफाट ज्ञानभांडाराचा लाभ घेण्यासाठी इंग्रजीच महत्त्व कालातीत असल्याचा कुणीच नाकारत नाही. अकोले सारख्या दुर्गम भागातील आदिवासी, गरीब मुलांना इंग्रजीचे शिक्षण मिळावं हि गरज लक्षात घेऊन तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कुठेही मागे पडू नये हा या शाळेच्या स्थापनेमागचा उदात्त हेतू, इंग्रजी शाळेचे हे ‘शिवधनू’ पेलण्यासाठी मग सर्वांचेच हात पुढे येऊ लागले. स्व. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आश्वासक पाठींब्याने अकोलेत १४ जून १९९२ रोजी पहिली इंग्रजी शाळा साकारली. अभिनव पब्लिक स्कूल, पटसंख्या होती अवघी १४. या पहिल्या बचचे ज्ञानदायीत्व स्वीकारले ते ज्ञानसंपन्न शिक्षक वृंदानं आणि शाळेच्या कल्पक संचालक मंडळा ने . शाळेच्या पहिल्या स्नेहसंमेलानाचा थाट काही औरच.सर्वांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडून वाहिला. या स्नेह्संमेलानाप्रसंगी मा. सुभाषराव देशमुखांची दुरदृष्टी दिसली. यासह मा. डा भालचंद्र कांगो, साहित्यिक व पुरागामी नेते गोविंदराव पानसरे, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, भालासाहेब थोरात, सिने अभिनेत्री मयुरी कांगो, प्रसिद्ध नेत्र त ज्ञ डा. सुधा कांकारिया यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन स्कूलच्या प्रगतीत महत्वाचा टप्पा ठरला. सन २००१ मध्ये संस्थेच्या विध्यमान उपाध्यक्ष, सेवाभावी व्यक्तिमत्त्व मा. सुरेशराव कोते यांचे संस्थेत आगमन झाले. त्यानंतर स्कूलच्या प्रगतीचा ‘वारू’ चौफेर धा वू लागला.
दि. २३ सप्टेंबर २००१ रोजी धामणगाव आवारी येथे पिताश्री स्व. मारुतीराव कोते यांच्या स्मरणार्थ संस्थेच्या इमारतीच भूमिपूजन मा. सुरेशराव कोते यांच्या हस्ते झालं. कोते यांच्या भरीव देणगीतून साकारली. मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलची दिमाखदार वास्तू. २५ डिसेंबर २००३ रोजी कै. मारुतीराव कोते शाळेच्या प्रांगणातील अर्धपुतळ्याचा अनावरण सोहळा संस्मरणीय ठरला. थोर समाजसेवक अण्णा हजारे आणि अनाथांच्या मत सिंधुताई सपकाळ यांचे आशीर्वाद या भव्य दिव्य सोहळ्यास लाभले. अत्याधुनिक सोयी – सुविधांसह सज्ज झालेल्या या ज्ञान मंदिराचा गुणात्मक दर्जाही सातत्यान लक्षवेधी ठरलाय. डिजिटल क्लासरूम ची संकल्पना शाळेत रुजली. अद्ययावत ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, इंटरनेट सुविधा, अद्ययावत संगणक कक्ष , देशी – विदेशी खेळांच्या प्रशिक्षणासह भव्य क्रीडांगण शालेय वैशिष्ठ्य आहेत.
शाळेच्या दैदिप्यमान प्रगतीची साक्षीदार ठरली २०००-०१ ची पहिली दहावीची बॅ च. १०० % निकालाची झालेली हि सुरुवात आजतागायत कायम आहे. अभिनवने ज्ञान समृद्ध केलेले हे हिरे जगाच्या कानाकोपऱ्यात आपले ज्ञान तेजाने झळकत आहेत.
संगीत, नृत्य, कला, क्रीडा, गायन, वादन, चित्रकला, वकृत्व आदि कलाप्रांतात अभिनवच्या विद्यार्थ्यांची मुशाफिरी राहिली आहे. मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी सुप्रसिध्द अभिनेते मा. राहुल सोलापूरकर, अभिनेत्री मयुरी कांगो, आदिती सारंगधर, सरला येवलेकर, ऋतुजा देशमुख, समीर गुजर, मृणाल कुलकर्णी आदि दिग्गज तारे-तारकांनी शाळेला भात देऊन मुलांचं कौतुक केलं आहे. राज्याचे तत्कालीन आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य मा. डा. सुधीरजी तांबे, विद्यमान आ. वैभव पिचड आदींचं मोलाचं सहकार्य स्कूलला वेळोवेळी लाभत आहे. अकोले सारख्या आदिवासी भागात शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय सुरु करून संस्थेने आणखी एक दमदार पाऊल टाकले. ए न.टी सी.ई. च्या परवानगीने मातोश्री पार्वतीबाई कोते  शिक्षणशाश्र महाविद्यालय आणि इंग्रजी व मराठी माध्यमाचे अध्यापक विद्यालायाचाही श्रीगणेशा झाला. या ज्ञान मंदिरांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला आहे. संस्थेच्या नेत्रदीपक प्रगतीच्या प्रवासादरम्यान २००९ – १० हे शैक्षणिक वर्ष मैलाचा दगड ठरले. संस्थेचे सायन्स फॅकल्टीचे ज्युनिअर कालेज सुरु झाले. अभिनव परिवाराच्या मातोश्री पार्वतीबाई कोतेंच्या ‘पुण्यतीर्थ’ या पुतळ्याच्या पावन अनावरण सोहळ्याला जगतगुरू शंकराचार्यांची संस्मरणीय उपस्थिती लाभली आणि अभिनव परिवार धन्य झाला. त्यानंतर संस्थेने विद्यार्थ्यांसाठी विविध ज्ञान कवाडे सुरु केली. याच शैक्षणिक वर्षात संस्थेचे ए म. बी.ए. अर्थात व्यवस्थापन शास्र महाविद्यालय शिक्षण सेवेत रुजू झालं. माजी केंद्रीय मंत्री मा. विजय नवले पाटील, पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य मा. डा. सुधीरजी तांबे यांच्या शुभहस्ते संस्थेच्या व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच दिमाखदार उद्घाटन झालं. अकोलेचा ग्रामीण विद्यार्थी खऱ्या अर्थाने कॉर्पोरेट होऊ लागला. संस्थेचा नावलौकिक ए म.बी.ए. च्या हुशार आजी माजी विद्यार्थ्यांनी वाढविला. हॉर्स राईडिंग, रायफल शुटींग तसेच क्रीडा क्षेत्रातील खरा लौकिक मिळवून देणारे सर्व क्रीडा प्रकार अभिनव मध्ये शिकविले जातात. विभागीय, राज्यस्तरीय , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिनव च्या विद्यार्थ्यांनी लौकिक वाढविला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील करार विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत सामवून घेत आहे.कौशल्य प्रणीत व अनुभवातून शिक्षण हे ब्रीद घेऊन अभिनव सातत्याने प्रगती साधत आहे.
के जी पासून पी जी च्या सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभिनव म्हणजे शैक्षणिक आविष्कारच...   

जयश्री देशमुख 
कॅम्पस डायरेक्टर   

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home