‘‘जंगल इथून सुरू होतं’’ हे
सांगायला तुमच्या स्वागताला उभी असते ती ‘कारवी’ एक निसर्गकन्या..
लावण्यवती.. नितांत सौंदर्याने नटलेली. दर तीन किंवा सात वर्षानी नियमित
मृत्यूचा शाप भोगणारी व आपल्या मृत्यूचाच प्रसंग अंग अंग फुलून सारे जंगल,
सारा परिसर धुंद करून टाकणारी अल्लड फुलणारी.. सध्या कारवी फोंडाघाटच्या
अनेक पठारांवर निरोपाचे हात हलवत आहे. गेल्या वर्षी ती आंबोलीत फुलली.
त्यापूर्वी ती महाबळेश्वरला फुलली. टप्प्या-टप्प्याने तिचा प्रवास सुरू
आहे.

सह्याद्रीचे जंगल आपल्याला चहूबाजूंनी हाक
मारत आहे. साद घालत आहे. ती साद थेट हृदयापर्यंत पोहोचली की, अगदी अनादी
अनंत अशी तृप्ततेची व मोक्षप्राप्तीचा आनंद आपल्याला मिळेल. समाधीची अवस्था
प्राप्त करून देणारी भावना असते ती. वर्णन करून सांगता नाही येणार.. तिला
पकडायला शब्दांचं सामर्थ्य अपुरं पडतं. हा सह्याद्री एस.टी. किंवा
रेल्वेच्या खिडकीतून पाहायचा नसतोच मुळी..गाईडच्या पाठीमागं फिरून दोन
पावलं टाकून दुर्बीणीतही पकडायचा नसतो.. केवळ पुस्तकाच्या पानांवरही
शोधायचा नसतो. जंगल ही अनुभवायची स्वतंत्र गोष्ट आहे. मानवी जीवनाला
स्थितप्रज्ञ करून सोडणारी..
अन ‘‘जंगल इथून सुरू होतं’’ हे सांगायला
तुमच्या स्वागताला उभी असते ती ही हजार पानांनी हसणारी ‘कारवी’ एक
निसर्गकन्या.. लावण्यवती. नितांत सौंदर्याने नटलेली. दर तीन किंवा सात
वर्षानी नियमित मृत्यूचा शाप भोगणारी व आपल्या मृत्यूचाच प्रसंग अंग अंग
फुलून सारे जंगल, सारा परिसर धुंद करून टाकणारी अल्लड फुलणारी.. सध्या
कारवी सह्याद्रीच्या फोंडाघाट भागात अनेक पठारावर फुलली आहे.
काही वणव्यात कापरासारखी पेटली, जळून
भस्मसातही झाली. गेल्यावर्षी तिचा आंबोलीत आविष्कार होता. त्यापूर्वीच्या
हंगामात महाबळेश्वर फुलून गेला होता. कारवीने जणू काही आपली पठार वाटून
घेतली आहेत. आणि त्या-त्या हंगामानुसार मधमाश्यांची भ्रमंती वर्षागणी
टप्प्या-टप्प्याने प्रवास करत आहेत. सप्टेंबरला फुललेली कारवी आता
निरोपाच्या वाटेवर आहे. आता लगबग आहे ती कारवीच्या दांडय़ांची.. या कारवीतून
मध गोळा करण्यासाठी लाखो मधमाश्या कारवीच्या प्रेमात पडल्या आहेत.
अशी ही सह्याद्रीतील कारवी पाहायची तर
पहिले म्हणजे पठार समजून घ्यायला हवे. कारवीच्या प्रमुख तीन जाती आहेत. तीन
वर्षानी, सात वर्षानी व बारा वर्षानी फुलणा-या. ‘कारवी व्हाईटी’ ही सात
वर्षाने फुलते तर ‘अकारा’ जातीची कारवी तीन वर्षाने फुलते. ‘खरवर’ जातीची
कारवी बारा वर्षाने फुलते. त्या फुलो-याचं स्वरूपही उत्सवासारखं असतं. पण
ते फुलणं म्हणजेच तिचा मृत्यू असतो. विचित्र वाटतं ना एकदम ज्या वयात
फुलायचं त्या क्षणी मरायचं. अगदी केळ फुलासारखे..केळयाचा लोंगर द्यायचा आणि
हे राम म्हणायचे. कारवीच्या या फुलण्याला ग्रामस्थ ‘कारवीला काटा आला’ असे
म्हणतात. हा एकदा काटा आला की, कारवीच्या फांद्या जमा केल्या जातात.

प्रामुख्याने सह्याद्री पर्वतरांगा आणि
काही प्रमाणात मध्य प्रदेशात ही वनस्पती आढळते. अकेंथेसी कुळातील
मोनोकार्पिक प्रकारातील म्हणजे आयुष्यात एकदाच फुलणारी ही वनस्पती आहे.
प्रत्येक वर्षी पावसाच्या आगमनानंतर ही वनस्पती हिरवीगार होते, पावसाळा
संपल्यानंतर पाने गळून जाऊन फक्त वाळलेली खोडं शिल्लक राहतात, अशा प्रकारे
सात वर्षे हाच क्रम चालतो आणि आठव्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही झाडे
जांभळया फुलांनी बहरून जातात.
फुलल्यानंतर फुलांपासून बिया तयार होतात.
बिया जमिनीवर पडतात आणि झाड मात्र मरून जाते. जमिनीतील बिया या झाडाची
वंशवेल वाढवितात. पावसाळा आला की बिया पुन्हा रुजतात आणि तेच जीवनचक्र
पुन्हा चालू होते. झुडूप प्रकारातील हे झाड जमिनीपासून ५ ते १५ फुटांपर्यंत
वाढू शकते. खोडं चिवट, दणकट आणि पाने हिरवीगार, मध्यम आकाराची असतात. ज्या
वर्षी ही झाडे फुलांनी बहरतात त्यावर्षी त्या भागातल्या सह्याद्रीच्या
त्या सरीचा शृंगार काही न्याराच असतो.
खेडयातही माणसं या दिवसात मुद्दाम जंगलात
मांगर-झोपडया उभारून गुरांची जोपासना करतात. जन्म-मृत्यूचा हा विराट सोहळा
सा-या पश्चिम घाटात साजरा केला जातो. या कारवीच्या प्रेमात सारा निसर्गच
पडलेला असतो, मग मानवी जीव मागे राहणार कसा त्याला बोलावणे असो वा नसो तो
डोकावतोच. या कारवीच्या संगतीने अनेक छोटी-मोठी झुडपे उभी राहतात. हसतात,
बागडतात आणि निरोप घेतात..
मेलेल्या कारवीच्या मूळ कंदातून पहिल्याच पावसाबरोबर पुन्हा नवीन अंकुर फुटतो. अन् हसरी रुंद पानं भूईतून वर येत तरारतात. पुन्हा सगळी जंगलभूमी हिरव्या पदराखाली झोकून देतात.
मेलेल्या कारवीच्या मूळ कंदातून पहिल्याच पावसाबरोबर पुन्हा नवीन अंकुर फुटतो. अन् हसरी रुंद पानं भूईतून वर येत तरारतात. पुन्हा सगळी जंगलभूमी हिरव्या पदराखाली झोकून देतात.
सहयाद्री म्हणजे केवळ कारवीची झालर असेही
काही नाही हो! सह्याद्रीचा जन्म झाला तोच मुळी अग्नी अन् पृथ्वी यांच्या
धुंद प्रणयातून असं बाबासाहेब पुरंदरे म्हणतात, ते उगीच नाही. या
सह्याद्रीचे रूप विराट आणि उग्र आहे. शतकानुशतके ऊन-पावसाचे व
वा-या-वादळाचे आघात झेलणा-या त्याच्या कभिन्न काळया पोलादी रूपात निसर्ग
किती सुंदर सजवतो.
ऐन, साग, किंजळ, जांभूळ, कदंब, शिसम,
शेकडो वृक्ष-लतांनी सारा सह्याद्री हिरवागार होतो. अनेक प्राचीन
देवस्थानांची व लेण्या-मंदिरांची सजावट त्याच्या अंगावर कोरली तरी
सह्याद्री दिसतो तो तालमीच्या मातीतून, अंग घुसळून घामाने निथळत आलेल्या
राकट अन् हिरवट रामोशासारखा.. नाजूकपणाला इथे स्थान नाही. आभाळाला भिडणारे
उंचच उंच कडे, पाताळाशी नातं सांगणा-या खोलखोल द-या, भीषण दरडी..
अंधाराने भरलेल्या शेकडो-शेकडो गूढ गुहा.
त्यातून वाहणारे नागाच्या फुत्कारासारखे विषारी वारे, डोंगराच्या पसरत
जाणा-या अरुंद सोंडा.. भयानक आवाज करीत दरीत झेपावणारे भीषण धबधबे अन्
रात्रंदिवस सागरलाटांप्रमाणे अंग घुसळत बेफामपणे फेसाळत राहणारे घनगर्द
जंगल.. त्यातील असंख्य प्राणी.. पक्षी.. शेकडो प्रजाती..
या हिरव्या रंगाने जीव वेडावतो. एखाद्या
पर्यटन स्थळी नव्हे तर एखाद्या अस्पर्श डोंगर-झाडीत एखाद्या झ-याकाठी कधी
एकांतात बसलात तुम्ही.. एखादी रात्र अनुभवलीत झाडांच्या सांदीत किंवा
मचाणावर बसून मग तुम्हाला अनुभवायला येईल की जंगल मुकं नसतं.. त्याला बोली
आहे.. ते बोलतं आपल्याशी.. हृदयाच्या भाषेने. आम्हाला जन्मताच या
रानभुलीचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले. आम्ही कोकणातील असल्याचा
अभिमान वाटतो यासाठीच. सागराची गाज ऐकत सह्याद्रीच्या कुशीत शिरायचे भाग्य
फारच थोडय़ांच्या वाटयाला येते.
मग बोलक्या पायवाटा सापडतात. आम्ही काही
जंगलाचे शास्त्रीय अभ्यासक नाही. शिकार हे आपल्या कुळाचाराचे व शौर्याचे
प्रतीक अशी एक समजूत पिढयान् पिढया चालत आलेली.. हे संस्कार आपसुक
आमच्यापर्यंत पोहोचलेले. आता वनविभागाचा कायदा आला आणि आम्हालाही आमची
जबाबदारी समजली आहे.
पण अशाच गोष्टीमुळे रानवाटा तुडवल्या
गेल्या रात्रीचा, दिवसाचा आणि सायंकाळचा सह्याद्री अनुभवता आला. डांबरी
रस्ता सोडून पायवाटांची संगत धरली की अंगावरची शहरी झूल आपोआपच उतरून ठेवली
जाते. प्रथम लहानसहान झुडपं लागतात. जाळय़ांचा घेर वाढत जातो. जंगलाला
सुरुवात होते ती मुळी या कारवीच्या स्वागतानेच. मग तुमच्या दोन्ही बाजूंना
दूरदूपर्यंत एकतर झाडांची भरदिवसा जमिनीवर अंधार पाडणारी झूल डोलत असते अन्
रिकाम्या जागी कारवी, बकरा अशी झुडपं रिकामी जागा भरून काढतात.
चोरटया शिका-यांचे ठरलेले सांकेतिक छुपे
तळ दिसतात. तिथे बोर्ड नसतो. पण कशाचा तरी आडोसा असतो. चार-पाच चुली
पेटवायची सोय असते. बारमाही पाणी ही सर्वात मोठी गरजेची बाब. सरपण वगैरे
नंतर गोळा करता येतं. तिथली झाडं देखील धुरानं व वस्तीच्या खुणांनी
माणसाळल्यासारखी वाटतात. या सह्याद्रीच्या ‘सरी’ किंवा ‘सानी’ जाग्याच
असतात.
सह्याद्री वाटतो तितका सोपा नाही. जातीवंत
वाटाडया सोबत नसेल तर नवख्या माणसाने या सह्याद्रीच्या कुशीत आंधळेपणाने
घुसू नये. मग तुम्ही इतिहासाचे गड-किल्ल्यांचे अभ्यासक असा, प्राणी-पक्षी
यांचे संशोधक असा की गिरीभ्रमण (हायकिंगला) जाणारे योद्धे असा. जंगलातल्या
चकव्यात सापडून जीव गमावलेले अनेक जण मला माहीत आहेत. अस्वलाच्या
हल्ल्यातून जेमतेम जीव बचावलेली माणसं मी पाहिली आहेत.
नको त्या जागी चुली मांडून मग त्या धुरानं
उठलेले आग्यामोहोळ मागे लागल्यावर जीव खाऊन धावणा-या व कडयावरून दरीत पडून
मरणा-या हौशी तरुणांच्या हृदयद्रावक कथा मला ठाऊक आहेत..असो, तर या सा-या
भटकंतीत कारवी नेहमीच सावलीसारखी साथ देत राहते. ती जंगलात फार मोठी
भूमिका पार पाडते. आकाशातून बंदुकीच्या गोळीच्या वेगाने येणारा पावसाचा
प्रत्येक थेंब ती आपल्या अंगावर झेलते व मग अलगद भूईवर सोडते. त्यामुळे
जमिनीची धूप होत नाही. तिची कोवळी पानं काही वेळा पाळीव प्राण्यांना अन्न
म्हणूनही उपयोगी पडतात.
भेकर(बाकिंग डिअर), गेळा किंवा पिसई
(मृषकमृग) रानडुक्कर, रानकोंबडया, चकात-या, सांबर, रानगवे या सा-यांना ही
कारवी पदराखाली घेते. ‘मांसभक्षक प्राणी’ व ‘माणूस’ नावाच्या क्रूर
प्राण्यापासून त्याचे रक्षण करते. काही ठिकाणी कारवी एवढी सलग उगवते की
माणसाला पुढे पाय टाकू देत नाही.
या कारवीच्या संरक्षणात जंगलातली विपुल
प्राणी-पक्षी यांची दुनिया अद्याप सुरक्षित आहे. कुडाच्या झोपडया व भिंती
बांधण्यासाठी कारवीच्या काठय़ांचा उपयोग होतो. कारवीची भिंत गुंफायची
(कुडायची) व मग शेणमातीने लिंपायची. तिला चारपाच वर्षे वाळवीसुद्धा लागत
नाही.
शहरी माणसांना याचं नावीन्य वाटणार नाही; पण जंगलात कारवीने कुडलेला व भिंती लिपलेला बावीसहाती ‘मांगर’ जंगलातलं घर गुराख्यांनी तयार केलेले मी पाहिले आहे. त्याच्या भिंती लिंपताना त्यात भाताचं राहिलेलं गवत किंवा चगाळी, शेण मिसळावं लागतं. मग भक्कम भिंत तयार होते. या घरात मिळणारा थंडावा एसीची गरज भासू देत नाही..
शहरी माणसांना याचं नावीन्य वाटणार नाही; पण जंगलात कारवीने कुडलेला व भिंती लिपलेला बावीसहाती ‘मांगर’ जंगलातलं घर गुराख्यांनी तयार केलेले मी पाहिले आहे. त्याच्या भिंती लिंपताना त्यात भाताचं राहिलेलं गवत किंवा चगाळी, शेण मिसळावं लागतं. मग भक्कम भिंत तयार होते. या घरात मिळणारा थंडावा एसीची गरज भासू देत नाही..
प्राण्यांना आणि पक्ष्यांना पदराखाली
झाकून घेणा-या कारवीची दाटी जिथे संपते व जनावरांच्या पायवाटा कारवी बनातून
जिथे बाहेर पडतात, तिथे चोरटे शिकारी विविध प्रकारे बसकण करून बसतात. कधी
ही बसकण झाडावर असते तर कधी किल्ल्याच्या बुरुजाप्रमाणे दगडाचा गोल ‘घुड’
तयार करून एक-दोन शिकारी आत लपतात. क्वचित एखाद्-दोन जाळय़ांचे शेंडे
वाकवूनही जमिनीवर बसकण केली जाते. मग माणसे लाकडात खिळा मारावा तशी स्तब्ध
होतात.
रात्रीच्या चांदण्यात किंवा पहाटेच्या मंद
उजेडात कारवीत ‘पायसर’ म्हणजे पावलांचा आवाज खूप दूरवरून यायला लागतो.
केवळ पाने वाजली.. तर दोन पायांचे जीव म्हणजे रानकोंबडं किंवा
कोंबडी-कुडतुडी येत असते. उडी मारत कारवी मोडत दबकत आले तर गेळा-पिसोरा
किंवा भेकर आणि कडाकड वाळलेली कारवी मोडत काहीतरी पुढे येत असेल तर मोठं
सावज म्हणजे रानडुक्कर किंवा सांबर समजावं या तयारीने शिकारी सज्ज होऊन
हत्यार उचलतात. हळुवारपणे त्याचा घोडा उचलतात, ट्रिग्गरवर अलगद बोट ठेवतात.
काही क्षणात बार दणाणतो आणि धुराचा दाट
लोट जाळकांडातून उठतो. ती कारवी निवारा व आश्रय देते तिचीच पायवाट व
पाचोळयाची चाहूल अशा दुर्दैवी प्राण्यांच्या मरणाला कारणीभूत होते. कारवीत
एकप्रकारे ‘गोचीड’ (चामउवा) व पावसाळयात ‘कानटं’ म्हणजे जंगली जळवा मोठया
संख्येने लागतात. ‘जळू’ अंगावर उडी मारून चिकटते व आपलं रक्त प्यायला लागते
ते आपल्या कधीच लक्षात येत नाही. नंतर आपल्या शरीरावर एक नवीन गाठ
उठल्यासारखी भासते तेव्हा काडीसारखी जळू अंगठयाएवढी झालेली असते.
माहीतगार लोक तिला बिडी किंवा सिगारेटचा
चटका देतात, तसेच तंबाखू खाऊन थुंकल्यावरही जळू गळून पडते. त्या दिवशी
पायाच्या घोटयाजवळ एक जळू लगडली आहे असे माझ्या उशिरा लक्षात आले. तशीच
ओढून काढली तर रक्ताची धार लागली. रक्त कशानेच थांबेना तेव्हा एका धनगर
बांधवाने घोंगडीची दशा काढून तिची राख चिमटीत घेऊन तिथे दाबली अन् काय
आश्चर्य.. रक्त एकदम थांबलं. अशा या महारूद्र सह्याद्रीची अंगकाठी मर्दानी
धाटणीची असली तरी सर्वानी त्याला सजवायचा प्रयत्न जागोजागी केलाय. तसा
सह्याद्री हा पश्चिम घाटाचा एक भाग मानला व त्याची सुरुवात थेट गुजरातच्या
सीमेलगत मानली तरी त्याचे खरे वैभव आहे ते म्हणजे स्वराज्याची राजधानी
किल्ले ‘रायगड’. आणि गड-किल्ल्यांच्या अजब नमुने!
सह्याद्रीची रांग केवळ उत्तर-दक्षिण अशी
नाही. तिला समांतर असे वीस पंचवीस मैलाचे अनेक फाटे आहेत. मुख्य
पवर्तरांगांशी समांतर असे हे फाटे आहेत. पोलादपूर-खेड-चिपळूणकडून आपण पुढे
आलो की या फाटय़ांवर महिपतगड, सुमारगड, रसाळगड असे अनेक किल्ले उभे आहेत.
पूर्वी सा-या देशाचा व्यापार कोकण किनारपट्टीच्या बंदरातून सागरी मार्गाने चालायचा. तेव्हा कोकणातली बंदरे, गावे वैभवसंपन्न होती. बलिपत्तन ऊर्फ खारेपाटण तर व्यापाराचे व राजकीय हालचालीचे केंद्र होतेच, त्याचबरोबर वेंगुर्ला, मालवण, निवती, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी संपन्न बाजारपेठा होत्या. या ठिकाणी आलेला माल आंबाघाट, फोंडाघाट, हणमंताघाट, कशेडीघाट अशा घाटांतील पायवाटांनी देशावर जायचा व त्याबरोबर रक्षणासाठी सैन्याच्या तुकडया असायच्या व मुक्कामासाठी एखादे बळकट ठाणे किंवा सा-या मार्गासाठी नजर ठेवणारा एखादा तरी बळकट दुर्ग असायचा.
पूर्वी सा-या देशाचा व्यापार कोकण किनारपट्टीच्या बंदरातून सागरी मार्गाने चालायचा. तेव्हा कोकणातली बंदरे, गावे वैभवसंपन्न होती. बलिपत्तन ऊर्फ खारेपाटण तर व्यापाराचे व राजकीय हालचालीचे केंद्र होतेच, त्याचबरोबर वेंगुर्ला, मालवण, निवती, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी संपन्न बाजारपेठा होत्या. या ठिकाणी आलेला माल आंबाघाट, फोंडाघाट, हणमंताघाट, कशेडीघाट अशा घाटांतील पायवाटांनी देशावर जायचा व त्याबरोबर रक्षणासाठी सैन्याच्या तुकडया असायच्या व मुक्कामासाठी एखादे बळकट ठाणे किंवा सा-या मार्गासाठी नजर ठेवणारा एखादा तरी बळकट दुर्ग असायचा.
विशाळगड सोडल्यानंतर अनेक लहान-मोठे दुर्ग
उभे आहेत. त्यात फोंडयाजवळचा शिवगड आहे. गगनगड आहे, भैरवगड व
मनोहर-मनसंतोषगड आहे. पण या सा-यात लक्षात राहतो तो ‘रांगणा किल्ला’
ताराराणीच्या व संताजी, धनाजीच्या ऐन रणधुमाळीच्या काळात औरंगजेबापासून
स्वराज्याचा बचाव करणारा हाच तो पोलादी किल्ला.
‘छत्तीस टाकी’ व चार ते पाच किलोमीटरचा
घेर असणारा हा भव्य किल्ला चौफेर फिरायला बराच वेळ लागतो. पायथ्याशी
चिक्केवाडी नावाचे गाव आहे. तर कोल्हापूर-गारगोटीमार्गे एक रस्ता थेट
चिक्केवाडीपर्यंत आहे, तर अंजिवडे किंवा माणगाव खो-यातील हनमंताघाट किंवा
धु-याच्या वाडीकडून अथवा नारूर गावातूनही गडावर जाता येते.
गडाचा पायथा सिंधुदुर्गात व गडावर प्रशासन
कोल्हापूर जिल्ह्याचे असा हा ऐन सीमेवरचा भव्य किल्ला आज उपेक्षित व भग्न
अवस्थेत आहे. ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अशी याची स्थिती आपण केली आहे. आज
गडावर रांगणाई देवीचे मंदिर व तीन जलस्रेत आहेत. त्यात एक बांधीव तलाव व
दोन मोठया विहिरी आहेत. हल्ली तरुणांमध्ये बरीच जागृती होत असून अनेक तरुण
मंडळे या रांगणागडाला भेटी देत असतात. या सर्व गडकिल्ल्यांना कारवीची साथ
असते..अगदी जीवाभावाची..
पोटाच्या विकारांवर प्रभावी
कारवीच्या पानांच्या अर्काचा उपयोग
पूर्वीच्या काळापासून पोटाचे विकार व इतर अनेक आजारांवर केला जातो. चरक
संहितेतही याचा उल्लेख केला गेलेला आहे. ग्रामीण भागातील आयुर्वेदिक औषधी
देणारे लोक कारवीचा उपयोग औषधांसाठी करतात. कारवीच्या फुलांपासून तयार
होणारे मध बहुउपयोगी व फार महाग असते. प्रामुख्याने त्याचा उपयोग शरिरातील
रक्तवृद्धीसाठी होतो.
कारवीच्या खोडांचा उपयोग शेतकरी पिकांना
आधार देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील गरीब लोक कुडाच्या भिंती व छप्पर
बनविण्यासाठी करतात. कारवीच्या मुळांवर काही परजीवी वनस्पतीही वाढतात, त्या
वनस्पती त्यांना आवश्यक असणारे अन्नद्रव्य शोषून घेतात व वाढतात. या
वनस्पतीचे वैज्ञानिक नाव स्ट्रोबीलेन्थस केंलोसस
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home