Friday, April 17, 2015

(no subject)

 अकोले , ता . १८:कोकिळेची कुहुकुहुऽऽ जेथे सुरू असते. त्या ठिकाणी तुमचे सहज लक्ष जाईल. येथेच तोरणांचे माणिक-मोती तुमच्यासाठीच वाट पाहत असतील. तोरणे म्हणजे साखरेच्या पाकातले रसगुल्लेच..सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये एव्हाना रानमेव्याच्या खजिन्याची ताटे भरू लागली आहेत. त्याच्या दरबारात जायचे असेल तर ‘मी’ पणा सोडायला हवा. काटय़ांचा आणि दगडांचा रोष मानून चालणार नाही. कुठची फांदी तुम्हाला अडवेल हे सांगता येणार नाही. तिला थेट सामोरे गेलात तर परिणाम भयानक होतील. त्या फांदीची हळुवार समजूत काढावी अथवा तलवार चालविल्याप्रमाणे हातातील शस्त्र चालवावे म्हणजे वाट मोकळी होईल. पण पाऊल जपून, कारण हे जंगल त्यांचं असतं, येथे फिरणाऱ्या प्राण्यांचा त्यावर हक्क असतो. आपण पाहुणे असतो, काही क्षणाचे! पावलापावलावर याचे भान ठेवून भल्या पहाटे सुटावे जंगलात
काटेरी फांद्यांवर पाचूंप्रमाणे हे पांढ-या द्राक्षांचे घोस लगडलेले असतात. ही फळे चवीला फारच छान असतात. परंतु, ती मिळविताना काटय़ांचा विचार करावा लागतो. तोरणांच्या जाळय़ांप्रमाणेच हिरवे, पिवळे वाटाणेच काही झाडांवर पैंजन अडकवल्याप्रमाणे लोंबकळत असतात. हिला आटकन म्हणतात. तीही याच कुळाचारातली. फक्त चव आंबट-गोड..
सह्याद्री पार करायचा तर करवंदांना अव्हेरून चालणार नाही. माघ महिन्यापासूनच त्यांची लगबग सुरू होते. आता परिपक्व झालेली करवंदे रंग बदलू लागली आहेत. आंबट-गोड करवंदांचा आस्वाद पुढील पंधरा दिवसांपासून सुरू होईल. डोंगरची काळी मैना तिला का म्हणतात हे डोंगरात फिरत-फिरत रानातल्याच एखाद्या पानाचा खोला करून (पानाचा द्रोण) त्यात ती घ्यावीत आणि मनाप्रमाणे त्याचा आस्वाद घ्यावा.
आता या करवंदांचा हिरवा साज पाहायला मिळतो. खिरमटीच्या थाळीत केव्हा-केव्हा यांच्याही उभ्या-आडव्या भेशी पडतात. असं म्हणतातहिरडय़ांमधून येणारे रक्त करंवदं खाताच चटकन बरेही होते.  आताशी भ्रमंती करायची तर भूक क्षमविण्याचा प्रश्नच नाही. सह्याद्रीच्या भ्रमंतीत मीठ, मसाला, चवीपुरते गूळ घेतले म्हणजे झाले. बाकी काही नको. आपली जीभ भली की आपण.. खायचे किती आणि कसे हेच समजत नाही. सोबत फोटो akl १८p १,२ कोकीळ  व करवंदे म्हणजेच डोंगरची काळी मैना  
5 Attachments
Preview attachment akl18p1.jpg
Preview attachment akl18p2.jpg
Preview attachment akl18p3.jpg
Preview attachment akl18n1.txt

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home