Monday, September 28, 2020

तमाशा किंवा तमाशा कलावंत म्हटले की लोकं नाक मुरडतात नाही तर तोंड वाकडे*

*तमाशा किंवा तमाशा कलावंत म्हटले की लोकं नाक मुरडतात नाही तर तोंड वाकडे* *करतात.त्यांना समाजात फारसा मान दिला जात नाही.*
*पण त्यांच्या मध्ये ही किती " टॅलेंट " असतो हे बघा....*
👇👇👇👇👇
स्वतंत्र भारताच्या प्रत्यक्ष "राष्ट्रपतींना"देखिल ,
दोन मिऩीटे "थांबा" असे सांगणारी ......
 सतत दोन वेळा " राष्ट्रपती पारीतोषीक " मिळवणाऱ्या
  🙏  " विठाबाई भाऊ नारायणगांवकर ..."🙏
    सन 1946 साली , कराड तालूक्यातील , 'गोळेगांव' मुक्कामी 
    त्यावेळचे नावाजलेले दोन फड समोरासमोर 'सामन्या'साठी ऊभे ठाकले होते..! 
  एक होता, भाऊ अकलेकर , तर दुसरा होता 
भाऊ नारायणगांवकर...
यांच्या सवालजवाबातील जुगलबंदी पाहण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय जमला असताना , केवळ तमाशात 'स्त्रिनर्तीका' नाही म्हणून कै.भाऊ नारायणगावकरांना हार पत्करावी लागली..!!
  ऊभ्या महाराष्ट्रात भाऊंनी आत्तापर्यंत "हार" पाहीली नव्हतीच....
  हा अपमान भाऊंच्या जिव्हारी लागला होता..!!
   त्यावेळी "विठा" , कै.मामा वरेरकरांच्या कलापथकात , मुंबईमध्ये काम करीत होती. स्वत: भाऊंनीच तिची अभिनयातील निपुणता वाढवण्यासाठी मामा वरेरकरांच्या विनंतीला मान देऊन तिला तेथे ठेवले होते.. 
  त्याच रात्री भाऊंनी मुंबई गाठली, व झाला प्रकार 'विठा'ला सांगितला मात्र...!!
  "विठा"च ती...वाघिनीसारखी चवताळून ऊठली , व जन्मदात्या बापाचा अपमानाचा सुड घेण्यासाठी , आपल्या वडीलांबरोबर दुसऱ्याच दिवशी ' कोळेगांव 'ला आली..!!
 त्याच रात्री तिथेच पुन्हा "सामना" सुरू झाला...
 'भाऊ अकलेकर व भाऊ नारायणगांवकर या मातब्बरांचा सामना पाहण्यासाठी अवघा 'कराड' तालूका लोटला होता...!!
  अनेक सवाल-जवाब झाले, पण कोणीही माघार घेत नव्हते.., रात्र सरत चालली होती...!!
  आणि पहाटेच्या ऊगवत्या "शुक्रचांदणी" बरोबरच, 
  "विठा" पहील्यांदाच वयाच्या अवघ्या आकराव्या वर्षी , बापासाठी पायऱ्यांना नमस्कार करून ' बोर्डा 'वर हजर झाली....!!!
  समोर बसलेल्या हजारोंच्या जनसमुदायास "मुजरा" करून , 
 'विठा'ने पहीलाच सवाल आकलेकरांच्या 'शेवंता'स विचारला...
 " पुरूष समागम थेंबापोटी
नार होतसे गरवार...
  परी नराश्रूच्या थेंबापोटी
नार कोण ती गरवार..?? "
   आणि विठाच्या पहील्याच सवालाने शेवंताची 'दातखिळ'च बसली..!
 तिच्याकडेच काय , पण तिच्या बापाकडे, अकलेकराकडेदेखिल या सवालाचे उत्तर नव्हतेच..!!
 नियमाप्रमाणे शेवटी विठानेच उत्तर दिले....
 " रम्य वनी हो रसक्रिडेत
 नारायण ते रमले गं..
प्रणयाचे ते कर्म देवाचे
 चोरून 'मोरा'ने पाहीले गं..
मोराच्या या दुष्क्रुत्याने 
  देव तयावर कोपले गं...
प्रणयाचे हे भाग्य तुजला
  नाही मिळणार वदले गं...
        मोराला शाप देताच वंशविस्तारासाठी मोर गयावया करू लागला..! तेव्हा देवाला दया येऊन , मोराच्या 'प्रणयविरहीत' वंशविस्तारासाठी त्याने मोराला 'उ:शाप' दिला...
  "गरजतील मेघ जेव्हा नभाला...
करशील आकांत बघून मेघाला...
अश्रू नेत्रांची गळतील भुईला..
 गिळताच ती भार्या तुझी
देईन जन्म पिलाला...!!!
  .... आणि हजारो जनसमुदायासमोर फक्त
 ...." विठा "च जिंकली होती...!!!
 व तेही जन्मदात्या बापाच्या अपमानाचा बदला घेऊनच..! तेही पहील्याच सलामीला..!!

    सुमारे अर्धशतक विठाबाईंनी महाराष्ट्र  हलवला , झुलवला , खुलवला व फुलवलादेखिल..!!
  नाटक, सिनेमा यामधूनदेखिल आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला..!
    
   मुंबईत चेंबूरच्या , आर. के. स्टुडीओमध्ये 
" राम तेरी गंगा मैली " या चित्रपटाचे शुटींग चालू असताना, विठाबाईंच्या गाड्या तिथून जात होत्या..तर शुटींग पाहायला आलेले लोक राज कपूर , मंदाकीनीला सोडून, विठाबाईंच्या फक्त गाड्या पाहण्यासाठी त्यांच्याभोवती गराडा घालून बसले होते. स्टुडीओच्या दारातून राज कपूरला ते द्रुष्य दिसले , तर त्याने शुटींग थांबवून , विठाबाईंना बोलावून घेतले....
  स्वत:च्या शेजारी विठाबाईंना बसवून घेऊन ,
या "चित्रसम्राटा"ने तीला स्वत:च्या "बरोबरी"च्या सन्मानाने वागवले..!
  कारण त्याला "विठाबाई" माहीत होती..!!
  ज्या काळात , हिंदी चित्रपटस्रुष्टी राज कपूरच्या ईशाऱ्यावर नाचत होती ,
 "मधूबाला"पासून तर "झिनत अमान" पर्यंत , त्याच्या चित्रपटामध्ये काम मिळावे म्हणून आघाडीच्या अभिनेत्री , राज कपुरपुढे "लोटांगण" घालत होत्या....
  त्याच "राज कपूर"ने स्वत:च्या चित्रपटात काम करण्याची विनंती  "विठाबाई"ला केली तर...
   " मै जहाँ हूँ , जिस दुनियामे हूँ , खुष हूँ...
   आपकी दुनिया मुझे कभी रास नही आ सकती...!!"
  असे बाणेदार पण नम्रपणे उत्तर देऊन , विठाबाईंनी स्वत:चे "विठापण" जपले...व ज्या जन्मदात्या बापासाठी तिने वयाच्या आकराव्या वर्षी तमाशाच्या बोर्डावर पाऊल ठेवले होते , त्याच बापाचे नांव पुढे चालवण्यासाठी "तमाशा" कलेसारख्या "जीवंत" कलेचीच सेवा करायची 'शपथ' तिने घेतली होती...
....व ऊभी हयातभर ती निभावलीदेखिल...!!!
 
  सन 1962 साली चिनने भारतावर आक्रमन केले होते..! पंतप्रधान मा.जवाहरलाल नेहरू , फार मोठ्या चिंतेत होते..नेहरूंनी 'क्रुष्णमेनन' यांना हटवून "संरक्षनमंत्री" या पदावर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व.यशवंतरावजी चव्हाण , यांच्या खांद्यावर 'संरक्षन' मंत्रीपदाची जबाबदारी दिली होती...!!
  अवघ्या भारतात ,
" 'हिमालया'च्या मदतीला 'सह्याद्री' धावला...."
 अशी महाराष्ट्राची शान वाढवणारी गोष्ट घडून आली होती...!
  भारताची तयारी नसताना , अचानक झालेल्या आक्रमनामुळे ,आपली पिछेहाट होत होती. त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य टिकवणे , ही मोठीच जबाबदारी स्व. चव्हाणसाहेबांवर होती.. सिमेवर बहूतेक ठिकाणी  
"मराठा बटालियन" झूंज देत होती..!  व त्यांचे मनोधैर्य टिकवण्याकरीता सैनिकांचे काहीतरी वेगळे मनोरंजन करणे आवश्यक होते.
 मा.यशवंतरावांनी , विठाबाईंनाच युद्ध चालू असताना सिमेवर सैनिकांसमोर कार्यक्रम करण्याची विनंती केली...!!
  देशसेवेच्या चालून आलेल्या सुवर्णसंधीला विठाबाईंनी तत्काळ हेकार दिला....
  डोळ्यासमोर बाँम्ब फुटत असताना , स्वत:च्या म्रुत्यूचीही तमा न बाळगता , विठाबाईंनी भारत-चिन सिमेवर "नेफा" आघाडीवर तब्बल दोन आठवडे मराठी तसेच हिंदी भाषेत कार्यक्रम दाखवून , 
 जे देशाची सेवा करतात , त्यांची सेवा करून फार मोठे राष्ट्रकार्य केले आहे...!!
  एवढ्या मोठ्या कार्याची व लोकरंजनातून लोकशिक्षणाची फार मोठी जबाबदारी , उभी हयातभर विठाबाईंनी पार पाडली...! व याची दखल प्रत्यक्ष भारत सरकारला घ्यावीच लागली..!!
  तत्कालिन राष्ट्रपती श्री.आर वेंकटरमन , यांच्या हस्ते विठाबाईंना 
" संगित नाटक अकाडमी पुरस्कार " स्विकारण्यासाठी "राष्ट्रपती भवन" दिल्ली , या ठिकाणी बोलावून घेण्यात आले..
    ता.18 एप्रील 1990 रोजी , महाराष्ट्राच्या 'तमाशा' क्षेत्रातील महान कलावंत "विठाबाई" यांना पुरस्कार देण्याचे नक्की झाले...!!!
  
  दिल्लीतील फिरोजशहा रोडवर असलेल्या ,
"रविंद्रनाथ भवन" येथे पुरस्कार देण्यासाठी भारताचे राष्ट्रपती 
मा. आर. वेंकटरमन , आपल्या सुविद्य पत्नी सौ.जानकीदेवी , यांच्यासोबत आले. 
   महाराष्ट्राच्या 'तमाशा' कलाक्षेत्रात " विशेष प्राविण्य " मिळवणाऱ्या , लोकरंजनातून लोकप्रबोधन व लोकशिक्षन देणाऱ्या , 
 " विठाबाई भाऊ (मांग) नारायणगांवकर " या लोकनाट्य तमाशाच्या 'मालकीण' ......
    "विठाबाई भाऊ खुडे" 
असे नांव पुकारल्याबरोबर विठाबाईंच्या डोळ्यात टचकन पाणीच आले...!!!
   जुन्या स्म्रुती जाग्या झाल्या..!
....आजपासुन बरोबर तिस वर्षांपुर्वी , 1961 साली, तत्कालीन 
 राष्ट्रपती 
मा.डाँ.राजेंद्रप्रसाद ,
 यांच्या हस्ते हाच पुरस्कार चुलतबंधू कै.बापु खुडे नारायणगांवकर , यांनी स्विकारण्याआगोदर , विठाबाईंना त्यांनी तो स्विकारण्याची विनंती केला होती .. , 
 पण विठाबाईंनी..
 " मी दुसरा मिळविनच..!!"
 असे बापूंना वचन दिले होते.....
 व त्या वचनाची पुर्तता आज झाली होती...!!!!
 ... गालावर ओघळनारे आनंदाश्रू पुसून विठाबाई पुरस्कार स्विकारण्यासाठी व्यासपिठावर राष्ट्रपती श्री.आर.वेंकटरमन , यांच्यासमोर कँमेऱ्यांच्या लखलखाटात उभ्या राहील्या....
  एका सुशोभीत ताटात एका युवतीने "विठाईं"साठी आणलेला पुरस्कार , तिला देण्यासाठी राष्ट्रपतींनी हातात घेतला.... , 
 .... तोच विठाबाईंनी हात दाखवून थांबवले ....
  सारे प्रेक्षाग्रह स्तब्ध झाले....
   .... त्याचवेळी "विठाबाई" भारताच्या महामहीम "राष्ट्रपतीं"ना म्हणाल्या.....
   " थांबा साहेब ..! 
आपण या पदावर जे आहात , त्यामागे तुमच्या पत्नी  "बाईसाहेबा"चेदेखील मोठे योगदान आहे....त्यांनाही व्यासपिठावर तुमच्या बरोबरीने उभे करा...!!! "
    आत्तापर्यंत पुरस्कार वितरणासाठी राष्ट्रपतींबरोबर कधीही त्यांच्या पत्नी व्यासपिठावर येत नसत...!
  नव्हे, तसा "प्रोटोकाँल" नसायचाच...!!
  पण "विठाबाईंनी" प्रत्यक्ष भारताच्या 
" महामहीम राष्ट्रपतीं " ना देखील हात दाखवून 
 "दोन मिनीटे" थांबायला लावून , 
  " स्त्रिशक्ती "चे महत्व ,
स्वत:च्या क्रुतीतून संपुर्ण राष्ट्रास दाखवून दिले...!!!
   सौ.जानकीदेवी , राष्ट्रपतींच्या शेजारी येऊन, उभ्या राहीपर्यंत , प्रत्यक्ष राष्ट्रपतींनाही "दोन मिनीटे" ताटकळत ठेवण्याची 
    " पात्रता "
एका महान "तमाशा कलावंतीनी" मध्ये , अखंड हिन्दूस्थानने पाहीली...!!!
     दुसऱ्या दिवशी संपुर्ण देशातील आघाडीच्या व्रुत्तपत्रात  पहील्याच पानावर ही "बातमी" ऊभ्या "हिन्दूस्थान"मध्ये 
"विठाईं"च्या नांव व फोटोसकट झळकली...!!!!
"विठाईं"च्या स्म्रुतीस शतश: नमन
🙏🙏🙏🙏🙏
 
 ( क्रुपया पुढे पाठवा व लेखाबद्दल अभिप्राय द्या)

Monday, September 21, 2020

राष्ट्रपती पदक विजेत्या तमाशाकलावंत"

.   👉   " 👈
          नृत्यसम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर
                  🍁 जुन्नरची एक ओळख  🍁
सन १९४६ साली कराड तालूक्यातील 'कोळेगांव' मुक्कामी त्यावेळचे नावाजलेले दोन तमाशा फड समोरासमोर 'सामन्या'साठी ऊभे ठाकले होते..! एक होता 'भाऊ अकलेकर' तर दुसरा होता 'भाऊ नारायणगांवकर.' यांच्या सवालजवाबातील जुगलबंदी पाहण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय जमला होता. केवळ तमाशात स्त्री नर्तिका नाही म्हणून कै. भाऊ नारायणगावकरांना हार पत्करावी लागली! ऊभ्या महाराष्ट्रात भाऊंनी आत्तापर्यंत कधी 'हार' पाहिलीच नव्हती.
  
हा अपमान भाऊंच्या जिव्हारी लागला होता. त्यावेळी विठा कै. मामा वरेरकरांच्या कलापथकात मुंबईमध्ये काम करीत होती. स्वत: भाऊंनीच तिची अभिनयातील निपुणता वाढवण्यासाठी मामा वरेरकरांच्या विनंतीला मान देऊन तिला तेथे ठेवले होते. त्याच रात्री भाऊंनी मुंबई गाठली व झाला प्रकार विठाला सांगितला. विठाच ती...वाघिनीसारखी चवताळून ऊठली व जन्मदात्या बापाचा अपमानाचा बदला घेण्यासाठी, आपल्या वडीलांबरोबर दुसऱ्याच दिवशी कोळेगांवला आली. त्याच रात्री तिथेच पुन्हा सामना सुरू झाला. 'भाऊ अकलेकर व भाऊ नारायणगांवकर' या मातब्बरांचा सामना पाहण्यासाठी अवघा कराड तालूका लोटला होता.
  
अनेक सवाल-जवाब झाले, पण कोणीही माघार घेत नव्हते. रात्र सरत चालली होती आणि पहाटेच्या ऊगवत्या शुक्रचांदणी बरोबरच विठा पहिल्यांदाच वयाच्या अवघ्या आकराव्या वर्षी बापासाठी पायऱ्यांना नमस्कार करून बोर्डावर हजर झाली. समोर बसलेल्या हजारोंच्या जनसमुदायास मुजरा करून विठाने पहिलाच सवाल आकलेकरांच्या शेवंतास विचारला...
 
"पुरूष समागम थेंबापोटी
नार होतसे गरवार...
परी नराश्रूंच्या थेंबापोटी
नार कोण ती गरवार..??"
आणि विठाच्या पहील्याच सवालाने शेवंताची दातखीळच बसली. तिच्याकडेच काय? पण तिच्या बापाकडे अकलेकरांकडेदेखील या सवालाचे उत्तर नव्हते. नियमाप्रमाणे शेवटी विठानेच उत्तर दिले...
"रम्य वनी हो रासक्रीडेत
नारायण ते रमले गं..
प्रणयाचे ते कर्म देवाचे
चोरून मोराने पाहीले गं..
मोराच्या या दुष्कृत्याने 
देव तयावर कोपले गं...
प्रणयाचे हे भाग्य तुजला
नाही मिळणार वदले गं...
मोराला शाप देताच वंश विस्तारासाठी मोर गयावया करू लागला. तेव्हा देवाला दया येऊन मोराच्या प्रणयविरहीत वंशविस्तारासाठी त्याने मोराला उ:शाप दिला...
"गरजतील मेघ जेव्हा नभाला...
करशील आकांत बघून मेघाला...
अश्रू नेत्रांची गळतील भुईला.
गिळताच ती भार्या तुझी
देईन जन्म पिलाला गं..."
आणि हजारो जनसमुदायासमोर फक्त विठाच जिंकली होती.  तेही जन्मदात्या बापाच्या अपमानाचा बदला घेऊनच! तेही पहिल्याच सलामीला.

सुमारे अर्धशतक विठाबाईंनी महाराष्ट्र हलवला, झुलवला, खुलवला व फुलवला देखील. नाटक, सिनेमा यामधून देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
    
मुंबईत चेंबूरच्या आर. के. स्टुडीओमध्ये 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटाचे शुटींग चालू असताना, विठाबाईंच्या गाड्या तिथून जात होत्या...तर शुटींग पाहायला आलेले लोक राज कपूर, मंदाकीनीला सोडून विठाबाईंच्या फक्त गाड्या पाहण्यासाठी त्यांच्याभोवती गराडा घालून बसले होते. स्टुडिओच्या दारातून राज कपूरला ते दृष्य दिसले, तर त्याने शुटींग थांबवून, विठाबाईंना बोलावून घेतले... स्वत:च्या शेजारी विठाबाईंना बसवून घेऊन 
या चित्रसम्राटाने तीला स्वत: सन्मानाने वागवले. कारण त्यांना विठाबाई माहित होती. ज्या काळात हिंदी चित्रपटसृष्टी राज कपूरच्या ईशाऱ्यावर नाचत होती, मधूबालापासून तर झीनत अमानपर्यंत त्यांच्या चित्रपटामध्ये काम मिळावे म्हणून आघाडीच्या अभिनेत्री राज कपुरपुढे लोटांगण घालत होत्या. त्याच राज कपूर यांनी स्वत:च्या चित्रपटात काम करण्याची विनंती विठाबाईला केली पण...
"मै जहाँ हूँ, जिस दुनियामे हूँ, खूष हूँ. आपकी दुनिया मुझे कभी रास नही आ सकती" असे बाणेदार पण नम्रपणे उत्तर देऊन, विठाबाईंनी स्वत:चे 'विठापण' जपले. ज्या जन्मदात्या बापासाठी तिने वयाच्या आकराव्या वर्षी तमाशाच्या बोर्डावर पाऊल ठेवले होते, त्याच बापाचे नांव पुढे चालवण्यासाठी तमाशा कलेसारख्या जीवंत कलेचीच सेवा करायची शपथ तिने घेतली होती व ऊभी हयातभर ती निभावलीदेखील.
 
सन 1962 साली चिनने भारतावर आक्रमण केले होते. संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावजी चव्हाण यांच्या खांद्यावर नुकतीच नेहरूंनी जबाबदारी दिली होती. भारताची तयारी नसताना अचानक झालेल्या आक्रमणामुळे आपली पिछेहाट होत होती. त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य टिकवणे, ही मोठीच जबाबदारी स्व. चव्हाणसाहेबांवर होती. सीमेवर बहूतेक ठिकाणी मराठा बटालीयन झूंज देत होती. त्यांचे मनोधैर्य टिकवण्याकरीता सैनिकांचे काहीतरी वेगळे मनोरंजन करणे आवश्यक होते.
मा.यशवंतरावांनी विठाबाईंनाच युद्ध चालू असताना सीमेवर सैनिकांसमोर कार्यक्रम करण्याची विनंती केली. देशसेवेच्या चालून आलेल्या सुवर्णसंधीला विठाबाईंनी तत्काळ हेकार दिला. डोळ्यांसमोर बाँम्ब फुटत असताना, स्वत:च्या मृत्यूचीही तमा न बाळगता विठाबाईंनी भारत-चीन सीमेवर नेफा आघाडीवर तब्बल दोन आठवडे मराठी तसेच हिंदी भाषेत कार्यक्रम करून, जे देशाची सेवा करतात, त्यांची सेवा करून फार मोठे राष्ट्रकार्य केले आहे. एवढ्या मोठ्या कार्याची व लोकरंजनातून लोकशिक्षणाची फार मोठी जबाबदारी, उभी हयातभर विठाबाईंनी पार पाडली. याची दखल प्रत्यक्ष भारत सरकारला घ्यावीच लागली. तत्कालीन राष्ट्रपती श्री.आर वेंकटरमन यांच्या हस्ते विठाबाईंना 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' स्विकारण्यासाठी 'राष्ट्रपती भवन' दिल्ली या ठिकाणी बोलावून घेण्यात आले..
    
१८ एप्रिल १९९० रोजी महाराष्ट्राच्या तमाशा क्षेत्रातील महान कलावंत 'विठाबाई' यांना पुरस्कार देण्याचे नक्की झाले. दिल्लीतील फिरोजशहा रोडवर असलेल्या,"राष्ट्रपती भवन" येथे पुरस्कार देण्यासाठी भारताचे राष्ट्रपती मा. आर. वेंकटरमन, आपल्या सुविद्य पत्नी सौ.जानकीदेवी यांच्यासोबत आले. महाराष्ट्राच्या तमाशा कलाक्षेत्रात 'विशेष प्राविण्य' मिळवणाऱ्या, लोकरंजनातून लोकप्रबोधन व लोकशिक्षण देणाऱ्या विठाबाई भाऊ नारायणगांवकर या लोकनाट्य तमाशाच्या मालकीण विठाबाई भाऊ खुडे असे नांव पुकारल्याबरोबर विठाबाईंच्या डोळ्यात टचकन पाणीच आले. असंख्य जुन्या स्मृती जाग्या झाल्या. बरोबर तीस वर्षांपुर्वी १९६१ साली तत्कालीन राष्ट्रपती मा.डाँ.राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते हाच पुरस्कार चुलतबंधू कै. बापु खुडे नारायणगांवकर यांनी स्विकारण्या आगोदर विठाबाईंना  तो स्विकारण्याची विनंती केली होती. पण विठाबाईंनी,'मी दुसरा मिळविनच' असे बापूंना वचन दिले होते व त्या वचनाची पुर्तता आज झाली होती.

गालावर ओघळणारे आनंदाश्रू पुसून विठाबाई पुरस्कार स्विकारण्यासाठी व्यासपीठावर राष्ट्रपती श्री.आर. वेंकटरमण यांच्यासमोर कँमेऱ्यांच्या लखलखाटात उभ्या राहिल्या. एका सुशोभित ताटात एका युवतीने विठाबाईंसाठी आणलेला पुरस्कार तिला देण्यासाठी राष्ट्रपतींनी हातात घेतला, तोच विठाबाईंनी हात दाखवून राष्ट्रपतींना थांबवले...सारे प्रेक्षागृह स्तब्ध झाले. त्याचवेळी विठाबाई भारताच्या महामहीम राष्ट्रपतीना म्हणाल्या...'थांबा साहेब, आपण या पदावर जे आहात, त्यामागे तुमच्या पत्नी बाईसाहेबांचेही मोठे योगदान आहे. त्यांनाही व्यासपीठावर बोलवून तुमच्या बरोबरीने उभे करून मला पुरस्कार देण्यात यावा.' आत्तापर्यंत पुरस्कार वितरणासाठी राष्ट्रपतींबरोबर कधीही त्यांच्या पत्नी व्यासपीठावर येत नसत. नव्हे, तसा 'प्रोटोकाँल' नसायचाच. पण विठाबाईंनी प्रत्यक्ष भारताच्या राष्ट्रपतींना देखील हात दाखवून दोन मिनिटे थांबायला लावले. 'स्त्रीशक्ती'चे महत्व स्वत:च्या कृतीतून संपुर्ण राष्ट्रास दाखवून दिले. सौ.जानकीदेवी राष्ट्रपतींच्या शेजारी येऊन उभ्या राहीपर्यंत प्रत्यक्ष राष्ट्रपतींनाही दोन मिनिटे ताटकळत ठेवण्याची धाडस एका महान तमाशा कलावंतीनीमध्ये अखंड हिन्दुस्थानने पाहिले.
     
दुसऱ्या दिवशी संपुर्ण देशातील आघाडीच्या वृत्तपत्रात पहिल्याच पानावर ही बातमी उभ्या हिन्दूस्थानमध्ये 'महाराष्ट्राची मुलाखत मैदानी तोफ विठाबाई नारायणगावकर' हे नाव व फोटोसकट झळकली.

      🙏🙏विठाबाईंच्या स्मृतींस शतश: नमन !!!🙏🏼🙏🏼
लेखक - बाबाजी कोरडे
राजगुरूनगर
☀️🌸☀️🌸☀️🌸☀️🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
                 🙏🙏 काॅपी पेस्ट पोस्ट.🙏 🙏
                   *][ श्री. रामचंद्र शिंदे-पाटील ][*
Rvsp 140920

शिक्षणातून सत्याची पाऊलवाट*

*शिक्षणातून सत्याची पाऊलवाट*

*दिवसभरात एकदाही खोटे बोललो नाही. सत्यं वद हे पाठ करणे नव्हे तर ती सत्याची साधना आहे. शिक्षणातून हे पेरले जाणे महत्वाचे आहे. त्या पाऊलवाटेचा महामार्ग झाला, की समाज व राष्ट्र प्रगतीची उंच भरारी घेते. शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉगमालिका*


Nilesh Jadhav
Sep 21, 2020, 9:00 AM

शिक्षणाचा हेतू हा माहितीचे संकलन करणे नाही, तर ज्ञानाची निर्मिती करणे हा आहे. त्याच बरोबर आत्मज्ञानाचा शोध घेणे हाही आहे. शिक्षणांतून ज्ञानाची प्रक्रिया होऊन सत्याचा साक्षात्कार होत असतो. तो ज्यांना झाला त्यांनी जगावर ठसा उमटविला आहे. त्यासाठी निरंतर शिक्षणाची साधना केली जाते. शिक्षण जर सत्याचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करणार नसेल, तर ते शिक्षण पोटभरू स्वरूपाचे आहे असे म्हणायला हवे .

शिक्षणातून माहिती साठवून आणि ती परीक्षेच्या वेळी पेपरमध्ये ओकून आपणाला केवळ पदवी मिळविता येईल, पण आयुष्याच्या वाटचालीत जगण्याला जीवनाच्या उंचीवर पोहचविता येणार नाही. जीवन ही साधना आहे ती सत्याची. शिक्षण हे स्वतःला घडविण्याचे साधन आहे. त्यामुळे शिक्षणातून सत्याचा प्रवास घडायला हवा. तो थांबेल तर व्यक्तिचा जीवनप्रवासही थांबेल. सत्याचा शोध थांबला, की राष्ट्र व समाजाच्या प्रगतीचे चक्रेही रूतून बसतात. त्यामुळे स्वराज्याकडून अंधारयुगाकडे प्रवासाला सुरूवात होते. सत्याची धारणा मस्तकात प्रकाश निर्माण करते आणि त्याव्दारे भवताल प्रकाशमान होण्यास सुरूवात होते. शिक्षण हेच मुळतः प्रकाशाचा स्त्रोत आहे. त्यामुळे शिक्षणातून सत्याची पाऊलवाट निर्माण करावी अशी अपेक्षा चुकीची नाही.

शिक्षण हे समाज व राष्ट्रनिर्मितीचे साधन आहे असे सातत्याने बोलले जाते. कोणताही समाज व राष्ट्र हे व्यक्ति विकासावर मोठे होत असते. ज्या देशात स्वतःला झोकून देणारा, कार्यसंस्कृतीचे जतन करणारा, समर्पणाची वृत्ती धारण करणारा समाज असतो तेथे राष्ट्र उभे राहाते. जेथे व्यक्तिपेक्षा राष्ट्र अशी धारणा असेल तेथे समाज अधिक उन्नत असतो. अशा उन्नत समाजावरती राष्ट्र उभे राहात असते. शिक्षणातून असा उन्नत समाज निर्माण करण्याचे आव्हान असते. शिक्षणांने सत्याचा सतत पाठलाग करायचा असतो. सत्य हे जीवनाचे सार आहे. त्याचे मागे धावत राहाणे, त्याचा शोध घेणे, त्या दिशेने प्रवास सुरू ठेवणे महत्वाचे असते.

कधीकाळी आपल्या गुरूकूल परंपरेच्या अनुषंगाने जेव्हा चर्चा होत राहाते. तेव्हा गुरू आपल्या शिष्यांना संदेश देत असत. तो संदेश म्हणजे शिक्षणांचे सार होते. त्या संदेशाचे जीवनभर पालन करणे हाच शिष्यासाठी जीवन दिशा होती. त्यावेळी “सत्यं वद्, धर्मं चर, स्वाध्यायात न प्रमदा ” असा विचार होता. यातील सत्य ही धारणा होती. त्या वाटेवर चालत राहावे यासाठी गुरूकूल परंपरेतील गुरूजी प्रयत्न करीत होते.त्यांचा जीवनप्रवास हाच सत्याचा अनुभव होता. ते ख-या अर्थाने आचार्य होते. त्यांना शिष्यांनी कसे जगावे यासाठी उपदेश करण्यापेक्षा जीवन वस्तूपाठ घालून दिला होता.

व्यांसानी आपल्या गुरूकुलातील विद्यार्थ्यांना “सत्यं वद” असा स्वाध्याय दिला होता. तो स्वाध्याय अनेक शिष्यांनी पूर्ण केला होता. पण तो स्वाध्याय धर्मराजाने पूर्ण केला नव्हता. मग गुरूनीं त्याला दोन तीन दिवसांनी पुन्हा विचारले तरी अभ्यास अपूर्ण होता. अखेर काही दिवसांनी धर्मराजा गुरूनां म्हणाले “आता माझा स्वाध्याय पूर्ण झाला आहे”. खरेतर एवढया हुशार असलेल्या विद्यार्थ्याला इतका छोटा अभ्यास करण्यासाठी इतके दिवस कसे लागले? गुरूजींना त्याला विचारले, तर ते म्हणाले तुम्ही जे सांगितले होते ते तर पहिल्या दिवशीच मी पाठ केले होते. पण जे पाठ केले होते ते शिकणे नाही आणि स्वाध्याय करणे तर नाहीच. मी तो स्वाध्याय करतांना पहिल्या दिवशी काही खोटे बोललो. हळूहळू खोटे बोलणे कमी होत गेले. आज दिवसभरात एकदाही खोटे बोललो नाही. सत्यं वद हे पाठ करणे नव्हे तर ती सत्याची साधना आहे. शिक्षणातून हे पेरले जाणे महत्वाचे आहे. त्या पाऊलवाटेचा महामार्ग झाला, की समाज व राष्ट्र प्रगतीची उंच भरारी घेते.

भारतीय स्वातंत्र्याचे अध्यर्यू मोहनदास करमचंद गांधी यांचे आत्मचरित्र “ माझे सत्याचे प्रयोग ” म्हणजे सत्याच्या दिशेने चालण्यासाठीचा संघर्ष आहे. सत्याची पाऊलवाट म्हणजे सहज चालण्याचा मार्ग नाही. त्या वाटेने जातांना हितसंबंधाला बाधा येते. स्वहिताच्या आड अनेकदा सत्य येते. त्यामुळे सत्याच्या वाटेने जसे कमावणे होते त्या प्रमाणे गमावणे पण होते. सत्याने पारलौकिक समाधानाचा मार्ग निश्चित मिळतो पण भौतिक आणि वास्तवाच्या जगात हव्या असलेल्या गोष्टी कशा मिळणार? अनेकदा सत्याने मन संभाळणे होत नाही. सत्य बोलले तरी अनेकांची मने दुखवली जाण्याची शक्यता असते. सत्य म्हणजे अंजन असते आणि ते जीवनाच्या सुखासाठीचे अंतिम साधनही. त्यामुळे गांधीजीनी जीवनभर सत्याची धारणा केली. त्या वाटेने प्रवास सुरू ठेवला. राजकारणात राहूनही त्यांनी तत्व आणि विचाराशी प्रतारणा केली नाही.तेव्हा सत्य हा विचार आणि जगण्याचा मार्ग म्हणून अधोरेखित केला होता. त्यांनी लहानवयापासून झालेल्या चुका कबूल करण्याची क्षमता आणि चूकांबददलचा पश्चाताप व्यक्त केला होता. कधीकाळी लहान वयात हरिश्चंद्र तारामती यांची गोष्ट ऐकली होती. सत्यव्रती हरिश्चंद्राचा प्रभाव पडला होता. शिक्षणात हजारो गोष्टी येतात पण त्या गोष्टीचा मार्ग अनुसरणे होत नाही. कारण तो प्रवास सत्याच्या दिशेने घडत नाही.

कृष्णमूर्ती म्हणत असे, की सत्यासारखा दुसरा धर्म नाही. सत्य तर शिक्षकापेक्षा महत्वाचे आहे.सत्य हे नेहमीच स्वतंत्र असते. त्याला कोणी बंधिस्त करू शकत नाही आणि तेही बंधिस्त राहू शकत नाही. सत्यावरती कोणाची मालकी असत नाही. ज्या दिवशी सत्याचा शोध थांबतो त्या दिवशी व्यक्ती असू दे नाहीतर राष्ट्र त्यांची अधोगती ठरलेलीच. जगात शिक्षणाने ज्ञानाची आराधना करावी असे म्हटले जाते याचे कारण ज्ञान हे सत्य असते. ज्ञानाच्या निर्मितीकरीता अनेक टप्प्यातून जावे लागते त्या प्रत्येक टप्प्याच्या प्रक्रियेतून जे हाती येते ते सत्याच्या शिवाय दुसरे काहीच नसते. संशोधनाच्या प्रक्रियेतून जे हाती येते ते कितीही वाईट असले तरी स्विकारावे लागते, कारण ते प्रक्रियेचे फलित असते. ते फलित हे सत्य असते. सत्याची धारणा जागृत करण्यासाठी बरेच काही पेरावे लागणार असते. त्यासाठी ज्यांने पेरायचे त्यालाच सत्याच्या काटेरी मार्गावर चालावे लागते.

वर्गात कधीकाळी तपासणीसाठी अधिकारी येणार असतील, तर कालचाच घटक दृढ करून पुन्हा दुस-या दिवशी शिकविला जात होता. पहिल्या दिवशीचे प्रश्न आणि उत्तरे घेतली जात होती आणि त्यादिवशी फळ्यावरती सुविचार लिहिलेला होता “नेहमी खरे बोलावे ”. आता सुविचार खरा की कृती खरी असा प्रश्न पडतोच ? विदयार्थी शब्दांनी नाही, तर कृतीने शिकतात म्हणून त्यांचा प्रवास सुरू राहातो कोणत्याही सत्याच्या प्रवासाशिवाय. सत्य हे जीवन व्यवहारात दिसायला हवे. सत्याची कास धरून चालणे कठिण असले तरी त्याच मार्गाने जाणे हे अंतिम ध्येय राखायला हवे. समाजात सत्याचे बोल दिसत नाही.त्या मार्गाने जाणा-याला प्रतिष्ठा मिळत नाही. कधीकाळी गांधीजी देखील राजकारण सत्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही असे म्हणत होते.आज ती सत्याची वाट सत्तेने घेतली आहे. राजकारणात सत्याचा स्पर्शाचा छाया हळूहळू हरवत चालली आहे. व्यवस्थेत आश्वासनाचा पाऊस पडतो, मात्र ती आश्वासन माणसांचा आधार बनत नाही. जाहीर व्यासपीठावरील भाषणावरील समाजाचा विश्वास उडत चालला आहे हे लक्षण सत्यापासून दूर जाण्याचे आहे. त्यामुळे समाजाचा –हास होतांना पाहावयास लागतो आहे. जे बोललो ते हे नव्हते असे लोक जाहीरपणे सांगतात, तेव्हा आपण व्यक्तिगत जीवना बरोबर सामाजिक जीवनात देखील सत्याचे उच्चाटन केले आहे का असा प्रश्न पडतो.

आज शिक्षणात सत्याचा शोध नाही. सत्याचा विचार असला तरी वर्तन नाही आणि अनुकरणासाठीची पाऊलवाट नाही.सत्य म्हणजे प्रकाश असतो.आपल्या अवतीभोवती जेव्हा अंधार असतो तेव्हा त्याचा अर्थ सत्याचा अभाव असणे आहे.शिक्षण घेऊन भविष्यासाठीची पाऊलवाट दिसत नाही याचा अर्थ विद्यार्थ्याच्या आय़ुष्यात ज्ञानाचा प्रकाश नाही.जीवनात चालत राहूनही दुःख संपत नाही म्हणजे सत्याचे बोट सुटले आहे.जेथे जेथे सत्य दूर जाते तिथे तिथे खोटा सन्मान,आदर मिळत राहातो पण आंतरिक नाही.डोळ्यात अश्रू असले तरी सुखाचे, आंनदाचे अजिबात नाही.त्यामुळे शिक्षणातून सत्याचा प्रवास सुरू होणे हेच राष्ट्राच्या उत्थानाचा एकमेव मार्ग आहे. शिक्षणातून माहिती मिळेल पण त्यातून ज्ञानाची प्रक्रिया करीत आपल्याला सत्याच्या प्रकाशात समाज व राष्ट्राला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. ते प्रयत्न सर्वांना सुखी ठेवण्याचा असणार आहे. त्यामुळे सत्य पेरत राहण्याची गरज आहे. शिक्षणातून सत्याची पेरणी म्हणजे अवघे जग प्रकाशमान करण्याचा प्रयत्न असणार आहे.

- संदीप वाकचौरे

(लेखक-शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

Monday, September 14, 2020

रेशन

अकोले प्रतिनिधी = अकोले पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तालुक्यातुन संगमनेर ला काळ्या बाजारात जाणारा रेशनिंगचा तांदूळ भरलेला ट्रक पकडला असुन यावेळी ट्रकमध्ये साडे १२ टन तांदूळ गोण्यात भरलेला होता.
        आज रविवार असतानाही काळ्या बाजारातील रेशनिंग चा साडे बारा टन भरलेला तांदूळ घेऊन ट्रक जात असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिस निरीक्षक अरविंद जोधळे यांना कळाल्याने त्यांनी पाठवलेल्या पथकाने सायंकाळी ६:३० वा दरम्यान  राजुर येथून संगमनेर ला जाणारा साडे बारा टन रेशनिंगचा तांदूळ भरलेला एम.एच.१७ ए.जी.२४८३ हा ट्रक मनोहरपर फाटा येथे पकडुन अकोले पोलिस स्टेशन ला आणला.यावेळी चालक शहेबाज मणियार याने सदर तांदूळ हा राजुर येथून आणला असल्याचे सांगितले असल्याचे समजते. सदर घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांनी अकोले पोलिस स्टेशन भेट देवून चाैकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे सुचना दिल्यानंतर राञी उशीरापर्यंत पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Saturday, September 5, 2020

thkababa

श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !

लेखक- भाऊसाहेब चासकर

सह्याद्रीच्या डोंगररांगात कळसुबाईच्या कुशीत थबथबणारा पाऊस, रोरावत वाहणारा बेफाम वारा, कोकणकडय़ावरुन आपल्याच मस्तीत कोसळणाऱ्या धबधब्यांचा धीरगंभीर आवाज, अगणित ओढ्या-नाल्यांचा खळखळाट, बिबट्याया डरकाळ्या, मोरांचा केकारव, कावळ्यांची कावकाव, अनेकानेक पक्ष्यांची किलबिल असे निसर्गाचे संगीत ऐकतच ठकाबाबा गांगड लहानाचे मोठे झाले. उपजीविकेचे साधन म्हणून बाबा पशुपालन करत. अगदी लहान असल्यापासून बाबा रानात गुरे चारायला जात. तिकडे गेले की निबीड अरण्यातल्या, नीरव शांततेत सभोवतालच्या पशुपक्ष्यांचे आवाज त्यांच्या कानावर पडायचे. जंगलाचे बारकाईने निरीक्षण करणारे ठकाबाबा गुरे राखताना पशुपक्ष्यांच्या आवाजाला प्रतिसाद देऊ लागले. बाबांची कावकाव, चिवचिव ऐकली की घवाघवा कावळे गोळा होत. बाबा भूऽऽभूऽऽ आवाज काढू लागले की कुत्री जोरजोरात भुंकत खवळून बाबांच्या अंगावर धावून येत. इतके अलौकिक कसब बाबांना साधले होते. बाबा रूढ अर्थाने शाळेत गेले नव्हते. मात्र बिनभिंतीच्या शाळेत शिकताना बाबांनी आपल्या अचाट कौशल्याच्या बळावर निसर्गाची अफाट परिभाषा अवगत केली होती. म्हणूनच तर बाबा ‘निसर्गाचा आवाज’ बनू शकले. निसर्गाचा हा आवाज नुकताच निसर्गतत्त्वात विलीन झाला...

उडदावणे (तालुका अकोले) हे बाबांचे गाव. नगर जिल्ह्याच्या पश्चिमेच्या टोकाकडील भंडारदरा धरणापासून १२ किलोमीटर अंतरावर हे गाव वसले आहे. कळसुबाईच्या शिखराच्या दक्षिण बाजूच्या उतारावरून जर एखादा दगड घरंगळत आला तर तो आरामात बाबांच्या अंगणात पोहोचेल! ठकाबाबा शाळेत गेले नाहीत. अगदी लहान असल्यापासून ठाकरी तमाशात सोंगाड्याची भूमिका करत असत. काही दिवस त्यांनी मावशीची भूमिकाही वठवली होती. तमाशातल्या संवादाचे स्क्रिप्ट वगैरे लिहिलेले नसायचे. रंगमंचावर प्रवेश झाला की उत्स्फूर्तपणे सुचेल ते बोलायचे. तिथले संवाद आणि अभिनय सारे सारे बाबांच्या अलौकिक प्रतिभेची साक्ष देणारे होते. सोंगाड्या आणि मावशीची भूमिका साकारताना बाबा श्रोत्यांना खळखळून हसवायचे. आठ नऊ वर्षे बाबांनी तमाशात नाच्याचे काम केले. नृत्य सादर करतानाच्या त्यांच्या लकबी पाहण्याजोग्या असत. बोहाडा हा आदिवासींचा अनोखा सांस्कृतिक उत्सव. यात बाबा सोंगं नाचवत. बाबा जातिवंत लोककलाकार. इरसाल आणि मिश्कील स्वभावाचे. पेंद्या आणि वाकड्या ही त्यांच्या अत्यंत आवडीची पात्रं. बोहाडीमध्ये ही पात्रं विशेष आकर्षण बिंदू असत. बाबा स्वत: अस्सल गमत्या होते. विविध उत्सवाच्या वेळेस ठाकरी लोकगीते आपल्या विशेष शैलीत ते सादर करत. उत्स्फूर्तता ही जर का प्रतिभा मोजायची मोजपट्टी ठरवली तर या निकषावर बाबा उच्च कोटीतले प्रतिभावंत होते!

इथल्या आदिवासींचे कांबडनृत्य प्रसिद्ध आहे. सन १९६५ सालच्या प्रजासत्ताकदिनी येथील आदिवासी कलाकारांचे पथक दिल्लीतील राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झाले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या लोकनृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात पहिला क्रमांक मिळविला. तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या हस्ते कलाकारांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या पथकात ठकाबाबांचा सिंहाचा वाटा होता. पथकातील कलाकारांची पंतप्रधानांनी आणि इंदिरा गांधींनी आवर्जून विचारपूस केली. काही मदत हवी असल्यास ती देऊ केली. खुद्द पंतप्रधानांनी सांगूनही या भोळयाभाबडया आदिवासींनी काहीही मागितले नाही. कोणतेही शहर बघितलेले नसलेल्या आदिवासींना दिल्ली बघायला मिळाली याचाच कोण आनंद झालेला!

पुढे काही कारणाने ठाकरी तमाशे मोडले. बाबा गुरे राखायला रानावनात जात. रानावर, शेती-शिवारावर आणि जगण्यावर बाबांनी भरभरून प्रेम केले. भंडारदरा परिसरातल्या अभिजात निसर्गात निरनिराळे ऋतू सोहळे सुरु असतात. जलोत्सव, फुलोत्सव, काजव्यांचा उत्सव... हे ऋतूविभ्रम बघायला मोठ्या संख्येने पर्यटक इकडे येतात. प्राणी-पक्ष्यांचे आवाज काढत, लोकगीते म्हणून दाखवत बाबा पर्यटकांचे मनोरंजन करु लागले. त्यातून बाबांना दोन पैसे मिळू लागले. इतर दिवशी शेतातली कामे करायची, गुरे राखायची आणि शनिवार-रविवार भंडारदऱ्यात यायचे. धरणाच्या सांडव्यावर, बागेत, हॉटेल्स किंवा विश्रामगृहांच्या परिसरात बाबांचा डेरा पडे. दहा-पाच पर्यटक जमले, की एकपात्री प्रयोग सुरु होई. बाबांच्या हातात लॅमिनेशन केलेला एक कागद असे. त्यावर बाबा कोणत्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज काढतात हे लिहिलेले असायचे. मोराचा आवाज काढा, अशी फर्माईश आली रे आली की बाबा तो आवाज काढत. प्राणी-पक्षी यांचे हुबेहुब आवाज बाबा काढत. वाऱ्याचा, तांडवनृत्य करणाऱ्या पावसाचे दृश्य आपल्या आवाजातून ते ताकदीने उभे करत. लहान बाळाच्या रडण्याच्या भावस्पर्शी आवाज ऐकणाऱ्याच्या काळजात शिरायचा. खालचा ओठ नाकावर टेकवत ते क्षणात चेहऱ्याचा आकार बदलायचे. हे करताना ते स्वत:चा श्वास बराच वेळ रोखून धरत. गोलाकार पोट मळणारे, चेहरा आणि मानेची रचना नागफणीच्या आकाराची करणारे अवलिया आणि हरहुन्नरी कलावंत होते ठकाबाबा. पर्यटक बाबांच्या कलेला भरभरून दाद देत. बाबांचा आत्मविश्वास दुणावत गेला.

विसेक वर्षे बाबा भंडारदऱ्याला येणाऱ्या पर्यटकांचे मनोरंजन केंद्र बनले होते. कोणी पैसे दिले नाहीत म्हणून ते नाराज झाले नाहीत. आपल्या अंगी असलेली कला लोकांपर्यंत पोहोचते आहे, याचे त्यांना जास्त अप्रूप असायचे. भंडारदरा परिसरात सिनेमांचे शुटींग सुरु असे. बाबांच्या अंगी असलेले गुण बघून त्यांना काही दिग्दर्शकांनी त्यांना सिनेमांत काम करायची संधी दिली. चिनू, भागमभाग, सरगम अशा सिनेमांत लहानशा भूमिका कल्या. विशेष काम नसले की ठकाबाबा कंदमुळांच्या शोधात ते रानात हिंडत. ओढ्यांकाठी खेकडे पकडत. धरणातून पकडून आणलेले मासे स्वत: करून खाणे त्यांच्या विशेष आवडीचा भाग होता.

वेगवेगळ्या पुरस्कारांनी ठकाबाबांचा सन्मान झाला. राज्याच्या सांस्कृतिक विभागाने पुरस्कार देऊन गौरव केला. मात्र त्यांची वृद्ध कलावंत पेंशनची केस अनेक वर्षे तशीच तरंगत राहिली होती. कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या या कलाकाराला दीड हजार रुपयांची पेन्शन सुरु होण्यासाठी २०१६ साल उजाडले. तेव्हा बाबा ८५ वर्षांचे होते. सामान्य लोकांपासून थेट देशाच्या पंतप्रधानांपर्यंत अनेकांच्या कौतुकाचा धनी ठरलेला, वाहवा मिळवलेला हा कलावंत अखेरपर्यंत आर्थिक वंचनेत आयुष्य कंठत राहिला. कोरड्या कौतुकाने ठकाबाबांच्या पदरात काही पडले नाही. भाकरीच्या चंद्राच्या शोधात त्यांना आयुष्य कंठावे लागले. सुमार म्हणता येतील असे अनेक कलावंत सुखनैव जगत असताना ठकाबाबा मात्र उपेक्षेचे धनी राहिले. अर्थात निसर्गाच्या सहवासात अत्यंत श्रीमंत आयुष्य जगलेल्या बाबांना याविषयी त्यांच्या मनात खेद, खंत असे काहीही नव्हते. त्यांना विमानात बसायची अनिवार इच्छा होती. केंद्रे नावाच्या उद्योजकांनी बाबांची कला बघितली. त्यांनी बाबांना हॅलिकोप्टरमध्ये बसवून ही इच्छाही पूर्ण केली. आता मला खुशाल मरण येऊ दे, अशी बाबांची त्यानंतरची प्रतिक्रिया!

ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता. बाबांनी अखेरपर्यंत रानाला जपले आणि रानाने बाबांना जपले, मोठे केले, नाव दिले. वयाच्या ८७व्या वर्षी ते कलेवर निस्सीम प्रेम करत होते. जाण्यापूर्वी दोन दिवस आधी बाबांनी त्यांचा मुलगा सखारामला बोलवले. जवळ बसवले. दोन्ही हातांनी हात घट्ट पकडले. म्हणाले, “गावातला बोहाडा चालू ठिवा. कला जिती ठिवा. मी गेल्याव घरातल्या, गावातल्या लोकांनी कोणीच रडायचं न्हाई. ढोल वाजवायचे. गाणी सांगायची...” त्यांच्या इच्छेनुसार सखाराम, नातेवाईकांनी आणि गाववाल्यांनी बाबांना अखेरचा निरोप दिला. कळसुबाईच्या आसमंतात ढोलाचा आवाज निनादला, ढोलकीने ताल धरला, ताशा कडाडला. मरणाचा सोहळा झाला. मात्र ‘निसर्गाचा आवाज’ जेव्हा निसर्गत्त्वात विलीन झाला तेव्हा वारा स्तब्ध झाला होता. प्राणी थबकले होते. पक्ष्यांची किलबिल थांबली होती. सारं सारं रान क्षणभर मुकं झालं होतं...
----------
(लेखक प्रयोगशील शिक्षक आणि निसर्ग निरीक्षक आहेत.) ९४२२८५५१५१

bapu:
लेखक : सुभाष पवार, पिंपळगाव बसवंत, नाशिक. मो नं. 9767045327.

FacebookTwitterEmailWhatsApp


Related Articles

 

तरच आणि तरच आपण व्याधीमुक्त होऊ : लेखक सुभाष पवार

2 days ago

 

‘या’ पोलिसाने केलं असं काही … ! जा


‘महासत्ता भारत’ टीम / नाशिक’ची उद्बोधक आणि प्रेरक कहाणी!!! शुभेच्छा आणि आशिर्वाद यातून वृद्धिंगत होत गेले जबाबदारीचे भान! !

5 hours ago नासिक 59 Views

 Listen to this

दहावीच्या सुट्ट्यांमधील हा एक प्रसंग असावा. एकदा पाचोरकरबाईंच्या इथे खताची गाडी खाली करण्याच्या कामासाठी मी गेलो होतो. गावात सात भरते त्याच्या अलीकडेच त्यांचे खताचे दुकान आहे. दुपारी तीन नंतरची वेळ असावी. आम्ही सर्व होतो. वडील,काका व इतर चुलत भाऊ. गाडी खाली करून नंतर जिथे थप्प्या लावल्या होत्या. तिथे बराचसा युरिया पडला होता. एक दोन थप्पी पार गोडाऊनच्या बाहेर ऑफिसच्या दरवाजाला खेटेल अशी लावली गेली.
खतांच्या गोण्यांनी गोडाऊन खचाखच भरले गेले होते. त्यामुळे त्यांच्या केबिनमध्येदेखील युरियाचा कचरा झाला होता. एक दोन जणांनी ते झाडले पण ते बरे दिसत नव्हते. मी पुन्हा झाडू हातात घेतला व ती संपुर्ण जागा अगदी चकाचक करून टाकली. बाई व माणसे एकमेकांशी बोलत होते. अजून पुढचा माल आला तर कोठे ठेवायचा वगैरे अशी काही चर्चा असावी. पण बाईंचे लक्ष सगळे माझ्या झाडण्यावर होते. तो भाग अक्षरशः चमकू लागला होता, इतका स्वच्छ झाला.

बाईंना व इतर माणसांनाही खुप कौतुक वाटत होते. बाईंनी उत्स्फूर्त पणे न राहवता सांगितलेच, बघा शेवटी शिक्षणाचा परिणाम असा असतो. तो चांगल्या ठिकाणी शिक्षण घेतो आहे. म्हणून इतके भारी काम करतो आहे. बाईंनी एक प्रकारे व्यक्त, अव्यक्त स्वरूपात, कळत न कळत मला भावी आयुष्याच्या दृष्टीने अनकोनेक आशिर्वाद दिले. सदिच्छा व्यक्त केल्या.

पुढील आयुष्यात वडनेरमधल्या अशा अनेक माणसांच्या अंतर्मनातून प्रकटलेल्या शुभेच्छा मला पुढे जाण्यास कारणीभूत ठरत गेल्या असे आज वाटते. कोणत्याही कामातील दांडगा उत्साह व अगदी मनापासून कोणतीही कृती करणे ह्या गोष्टी मला पुढे माझ्या वैयक्तिक जडणघडणीत नेहमी मोलाच्या ठरत गेल्या.
श्रमाची कामे असो किंवा बौद्धिक, सर्जनशील ही कामे आपल्या आनंदासाठी करणे व यातून इतरांनाही आनंद वाटावा ह्यात जी सौख्यकारक भावना असते यातून मी भावसमृद्ध होत तर गेलोच पण जगाकडे पाहण्याचा एक निकोप दृष्टीकोन उत्तरोत्तर माझ्यात वृद्धिंगत होत गेला. व ह्या सदिच्छांमधून निरंतर प्रेरणा मिळत गेली, की ज्यायोगे मी पुढे अनेक स्वरूपाची कामे ही अथकपणे करू शकलो.

वडनेर भैरव मधून टोमॅटोची एक्स्पोर्ट मोठ्या प्रमाणात होत असे, ह्या कामासाठी आम्ही व्यापाऱ्यांकडे त्यांच्या गाळ्यावर टोमॅटो पॅकिंगसाठी जात. यात टोमॅटो निवडणे, तो खोक्यात भरणे, खोके चांगले पॅक करणे वगैरे अशा स्वरूपाचे हे काम, पण ह्यापेक्षा यासाठी लागणारी लाकडी खोके बनवणे हे एक काम असायचे व आम्ही हे काम जास्त प्रमाणात घेत असू. आवक खूपच वाढलेली असायची त्यामुळे काही वेळेस दिवसा काम करून भागत नव्हते तर रात्रीही काम करावे लागे.

असाच एक प्रसंग आठवतो. माल खूप आलेला होता. दुसऱ्या दिवशी गाड्या लोड होणार असतील कदाचित. म्हणून नाइटलादेखील खोके तयार करण्याचा आमचा प्रोग्राम सुरू झाला. काम अनेक टप्प्यावर होते. एकाच गाळ्यामध्ये एका बाजूला खोके बनवणे, दुसऱ्या बाजूला टोमॅटो निवडणे, तिसऱ्या बाजूला टोमॅटो पॅकिंग वगैरे. यात आम्ही खोके बनवण्याचे टेंडर घेतलेले होते.

काम करता करता सगळे थकले. मला आठवते, मी अजिबात थकलेलो नव्हतो. रात्रीचे अडीच तीन वाजलेले असावे. आमचे काम हे बसून किंवा सरळ उभे राहून नव्हते. तर कंबरेत वाकून काम करावे लागे, लाकडी फळ्या असायच्या त्या चुका, खिळ्यांनी हातोडीने ठोकून जोडायच्या व मग त्यातून मोठे 15 एक किलोचे खोके बनवायचे. मी करत गेलो. काही जण एक दीड लाच लुढकले (झोपले) साधारण अडीच पर्यंत आम्ही दोघेच जागे होतो.

एक शंकर जमधडे व मी. तो ही जागा होता कारण त्याला बोलण्यात मी अडकवून धरले होते. शेवटी अडीचला त्याचा डोळा लागलाच, तो म्हणाला, ‘सुभाष मी झोपतो आता, कंबर दुखायला लागले. तू पण झोप’. मी म्हटले, ‘ठीक आहे, तू झोप मी झोपतो थोड्या वेळाने’. असं म्हणता क्षणी काही सेकंदातच तो गाढ झोपी गेला. पण मला धड झोपही लागत नव्हती व ते काम अपुरे ठेऊन बस्स बसून घ्यावे, आता असेही वाटत नव्हते. कुठून एवढे बळ अंगात शिरले होते, ते ही कळत नव्हते. त्यानंतरही एक दोन तास मी एकटाच ते काम करत बसलो. तिथल्या त्या फळ्या सर्व संपवल्या मी.

समोर काही एखादे काम दिसले की ते झरझर संपवून त्याचा एकदाचा निपटारा करून मगच श्वास घ्यायचा, ह्यात वेगळाच आनंद वाटायचा. पण ह्यामुळे काहींना त्रास ही व्हायचा. कारण माझ्यामुळे कदाचित त्यांना जास्त काम करावे लागे. कारण एक दोनदा असेच घडले. गवंड्याच्या हाताखाली काम करायला जेव्हा आम्ही जात असू, तेव्हा ते काम अंगावरचे नसायचे तर रोजंदारीवरचे असायचे.

रोजंदारीचा मजुरांचा हिशोब असा, की काम करताना हात आखडता घ्यायचा. एक प्रसंग आठवतो, काम असे की रेती, सिमेंट कालवणे, पाणी टाकून माल तयार करणे आणि गवंड्याच्या हाताख

ाली त्या पाट्या भरून देणे. ह्यातील भरलेल्या पाट्या नेऊन देणे हे एक प्रारंभिक स्वरूपाचे काम, ह्यात काही वेळेस इतरही काम करावे लागे, जसे माल कालवणे, पाट्या भरून देणे, मला चैनच पटत नव्हती, कसं एकदा झरझर काम होईल, असे होऊन जायचे.

मधली सुट्टी झाली. गंवडी आम्हाला काही काम सांगून निघून गेला. जेवणं केलीत. माझं जेवण पटकन आवरलेही. माझ्या डोक्यात तेच माल बनवणे. मी म्हटलो, ‘चला’. अरे थांब. आता कुठे जेवण झाले. तू तर लयच… ‘बाकीच्यांनी बहुधा अंग टाकले. पण मला काही राहवले नाही, मी रेती घेतली. काही पाट्या, प्रमाणात सिमेंट टाकले, कालवले. माल बनवायला सुरुवात. त्यांच्या मते गवंडी आला की मग करू. पण माल मी तयार करून ठेवला, तेवढ्यात गवंडी ही आला.

माल रेडी म्हटल्यावर तो ही खुश झाला. आज बऱ्यापैकी काम वर चढले होते. रिटर्न येतांना मला सांगितले, अरे, भो तू एवढं पटापट नको करत जाऊ. तो गवंडी काय एवढा भानात नाहीये. वगैरे वगैरे कुटाळक्या…! एकदा असेच, हायस्कूलचे काम सुरू असताना खालून बहुधा दुसऱ्या मजल्यावर विटा वाहून नेण्याचे काम आम्ही घेतले. त्यात आम्ही तिघे भाऊ व आई. दुपारपर्यंत काम आवरून जाईल, असे काम होते. आम्ही खांद्यावर किंवा गोणीत किंवा अजून काही सोप्या मार्गाचा उपयोग करून विटा वाहू लागलो. अर्ध्यापर्यंत काम आले असेल.

मोठा भाऊ, लहान भाऊ दत्तू आणि आई ह्यांनी मध्ये मध्ये दम खायला सुरुवात केली. दोन चार फेऱ्या झाल्या की मग बसायचे. मग मलाही बसावं लागायचं. पण जास्त वेळ नाही तर थोडाच वेळ. माझी लगेच घाई व्हायची, चला. मी म्हणायचो, ते लगेच थोडे चमकून व थोडे वैतागून पहायचे. हळूच थोडे प्रेमाने व दमून अरे थांब जरासा..बरं.. एकदा म्हणायचो, दुसऱ्यांदा डायरेक्ट उठायचो, मग त्यांनाही उठावे लागे. नाईलाजास्तव. मग नंतर असे व्हायचे माझ्या दोन फेऱ्या व्हायच्या त्यांची तेवढ्या वेळात एक फेरी व्हायची.

मला त्यांच्या व इतर अनेकांच्या शारीरिक, मानसिक क्षमतेचा अंदाज येऊन जायचा, पण मी जास्त complaints ह्याविषयी केली नाही. थोडंस संभाळातच गेलो मी अनेक प्रसंगी. कारण प्रत्येकाची कुवत एकसारखी कधीच नसणार मग कशाकरता कुरकुरत बसायचे, मी एवढे करतो मग तुम्हाला का नाही जमत.
खरे तर ह्या पाठीमागे एक भक्कम मानसिक शक्ती कार्यरत होती. जी कोणत्या ना कोणत्या वेळी काहींच्या शुभेच्छा व सदिच्छांच्या रुपात मला प्राप्त होत असे, एक मानमान्यता भेटत होती. हे आशीर्वाद मला अशाप्रकारे बळ देत होते, सामर्थ्य निर्माण करत होते. माझ्यातील जबाबदारीचे भान माझ्यात निर्माण करत होते. ही एक प्रेरणा होती. बरीचशी अंत:प्रेरणा….!

मला पैशांशी घेणे नव्हते, ते तर असेही मिळणारच होते. मिळालेल्या पैशांचा जास्त विचारही करत नव्हतो, द्या भावाकडे, द्या आईकडे, किंवा दुसऱ्यांरोबर असलो, तर जो कोणी असेल प्रमुख, द्या त्यांच्याकडे, नंतर घरी आल्यावर घेऊ वाटून. मिळणारी मजुरी महत्वाची नव्हती तर होत असलेले काम महत्वाचे मानत असल्याने कळत नकळत ह्या गोष्टींचा एक विशिष्ट प्रभाव निर्माण होत होता व तो प्रभाव ज्यांना कामात चालढकल करायची असते त्यांच्यासाठी जास्त नाही पण काहीसा त्रासदायक ही ठरत होता.

हे वलय मला जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची अंतरदृष्टी प्राप्त करून देत होता. जास्त काम करण्याची वेळ आली नाही. वयाच्या 19 व्या वर्षीच मी पर्मनंट जॉबला ही लागलो. उन्हाळी सुट्टी किंवा दिवाळीची सुट्टी ह्या दरम्यानचीच कामे. कदाचित हे आपल्याला आयुष्यभर करावे लागणार नाही, काही वर्षे करावे लागणार, याची जाणीव मला सतत होत असल्याने मी जास्त जोर देऊन काम करत असावो. पण मी का थकत नव्हतो, हा प्रश्न मात्र अनेकांना सतावत गेला असेल. हीच सवय पुढील आयुष्यात अवघड वाटणारी कामे चुटकीसरशी करण्यात परावर्तित झाली.

मोठमोठी आव्हाने पेलण्यास समर्थ करत गेली. श्रम मग ते कोणत्याही स्वरूपाचे असो, एका अनामिक तन्मयतेने, समरस होऊन जेव्हा केली जातात तेव्हा त्याचा इफेक्ट निश्चितच आदर्श कार्यप्रणालीवर होत जातो.

आपली कार्यप्रणाली ही अधिकाधिक आदर्शवत होत जायला हवी, जेणेकरून त्याचे खुप चांगले परिणाम समस्त समाजजीवनावर होतात. जबाबदारी मनापासून व स्वतः पुढाकार घेऊन स्वीकारण्याची उदात्त सवय ह्यामुळे अंगी रुजत गेले. हा घरातूनच आई वडिलांच्या आदर्श संस्कारांचा परिणाम आहे असे वाटते.

लेखक : सुभाष पवार, पिंपळगाव बसवंत, नाशिक. मो नं. 9767045327.

FacebookTwitterEmailWhatsApp


Related Articles

 

तरच आणि तरच आपण व्याधीमुक्त होऊ : लेखक सुभाष पवार

2 days ago

 

‘या’ तालुक्यात विवाहितेची मुलीसह आत्महत्या

4 days ago

 

‘या’ तालुक्यात झाला वयोवृद्धाचा खून!

4 days ago

जास्त वाचलेल्या बातम्या

अखेर गणेश विसर्जनाला गालबोट!

4 days ago 4,079

कोरोनानंतर पुन्हा दुसरी धोकादायक लाट येणार?

1 week ago 3,856

कोरोनाबाधितांना लुटणार्‍या ‘त्या’ रुग्णालयाचा परवाना रद्द!

2 weeks ago 3,136

हत्याकांडातले