Saturday, September 5, 2020

bapu:
लेखक : सुभाष पवार, पिंपळगाव बसवंत, नाशिक. मो नं. 9767045327.

FacebookTwitterEmailWhatsApp


Related Articles

 

तरच आणि तरच आपण व्याधीमुक्त होऊ : लेखक सुभाष पवार

2 days ago

 

‘या’ पोलिसाने केलं असं काही … ! जा


‘महासत्ता भारत’ टीम / नाशिक’ची उद्बोधक आणि प्रेरक कहाणी!!! शुभेच्छा आणि आशिर्वाद यातून वृद्धिंगत होत गेले जबाबदारीचे भान! !

5 hours ago नासिक 59 Views

 Listen to this

दहावीच्या सुट्ट्यांमधील हा एक प्रसंग असावा. एकदा पाचोरकरबाईंच्या इथे खताची गाडी खाली करण्याच्या कामासाठी मी गेलो होतो. गावात सात भरते त्याच्या अलीकडेच त्यांचे खताचे दुकान आहे. दुपारी तीन नंतरची वेळ असावी. आम्ही सर्व होतो. वडील,काका व इतर चुलत भाऊ. गाडी खाली करून नंतर जिथे थप्प्या लावल्या होत्या. तिथे बराचसा युरिया पडला होता. एक दोन थप्पी पार गोडाऊनच्या बाहेर ऑफिसच्या दरवाजाला खेटेल अशी लावली गेली.
खतांच्या गोण्यांनी गोडाऊन खचाखच भरले गेले होते. त्यामुळे त्यांच्या केबिनमध्येदेखील युरियाचा कचरा झाला होता. एक दोन जणांनी ते झाडले पण ते बरे दिसत नव्हते. मी पुन्हा झाडू हातात घेतला व ती संपुर्ण जागा अगदी चकाचक करून टाकली. बाई व माणसे एकमेकांशी बोलत होते. अजून पुढचा माल आला तर कोठे ठेवायचा वगैरे अशी काही चर्चा असावी. पण बाईंचे लक्ष सगळे माझ्या झाडण्यावर होते. तो भाग अक्षरशः चमकू लागला होता, इतका स्वच्छ झाला.

बाईंना व इतर माणसांनाही खुप कौतुक वाटत होते. बाईंनी उत्स्फूर्त पणे न राहवता सांगितलेच, बघा शेवटी शिक्षणाचा परिणाम असा असतो. तो चांगल्या ठिकाणी शिक्षण घेतो आहे. म्हणून इतके भारी काम करतो आहे. बाईंनी एक प्रकारे व्यक्त, अव्यक्त स्वरूपात, कळत न कळत मला भावी आयुष्याच्या दृष्टीने अनकोनेक आशिर्वाद दिले. सदिच्छा व्यक्त केल्या.

पुढील आयुष्यात वडनेरमधल्या अशा अनेक माणसांच्या अंतर्मनातून प्रकटलेल्या शुभेच्छा मला पुढे जाण्यास कारणीभूत ठरत गेल्या असे आज वाटते. कोणत्याही कामातील दांडगा उत्साह व अगदी मनापासून कोणतीही कृती करणे ह्या गोष्टी मला पुढे माझ्या वैयक्तिक जडणघडणीत नेहमी मोलाच्या ठरत गेल्या.
श्रमाची कामे असो किंवा बौद्धिक, सर्जनशील ही कामे आपल्या आनंदासाठी करणे व यातून इतरांनाही आनंद वाटावा ह्यात जी सौख्यकारक भावना असते यातून मी भावसमृद्ध होत तर गेलोच पण जगाकडे पाहण्याचा एक निकोप दृष्टीकोन उत्तरोत्तर माझ्यात वृद्धिंगत होत गेला. व ह्या सदिच्छांमधून निरंतर प्रेरणा मिळत गेली, की ज्यायोगे मी पुढे अनेक स्वरूपाची कामे ही अथकपणे करू शकलो.

वडनेर भैरव मधून टोमॅटोची एक्स्पोर्ट मोठ्या प्रमाणात होत असे, ह्या कामासाठी आम्ही व्यापाऱ्यांकडे त्यांच्या गाळ्यावर टोमॅटो पॅकिंगसाठी जात. यात टोमॅटो निवडणे, तो खोक्यात भरणे, खोके चांगले पॅक करणे वगैरे अशा स्वरूपाचे हे काम, पण ह्यापेक्षा यासाठी लागणारी लाकडी खोके बनवणे हे एक काम असायचे व आम्ही हे काम जास्त प्रमाणात घेत असू. आवक खूपच वाढलेली असायची त्यामुळे काही वेळेस दिवसा काम करून भागत नव्हते तर रात्रीही काम करावे लागे.

असाच एक प्रसंग आठवतो. माल खूप आलेला होता. दुसऱ्या दिवशी गाड्या लोड होणार असतील कदाचित. म्हणून नाइटलादेखील खोके तयार करण्याचा आमचा प्रोग्राम सुरू झाला. काम अनेक टप्प्यावर होते. एकाच गाळ्यामध्ये एका बाजूला खोके बनवणे, दुसऱ्या बाजूला टोमॅटो निवडणे, तिसऱ्या बाजूला टोमॅटो पॅकिंग वगैरे. यात आम्ही खोके बनवण्याचे टेंडर घेतलेले होते.

काम करता करता सगळे थकले. मला आठवते, मी अजिबात थकलेलो नव्हतो. रात्रीचे अडीच तीन वाजलेले असावे. आमचे काम हे बसून किंवा सरळ उभे राहून नव्हते. तर कंबरेत वाकून काम करावे लागे, लाकडी फळ्या असायच्या त्या चुका, खिळ्यांनी हातोडीने ठोकून जोडायच्या व मग त्यातून मोठे 15 एक किलोचे खोके बनवायचे. मी करत गेलो. काही जण एक दीड लाच लुढकले (झोपले) साधारण अडीच पर्यंत आम्ही दोघेच जागे होतो.

एक शंकर जमधडे व मी. तो ही जागा होता कारण त्याला बोलण्यात मी अडकवून धरले होते. शेवटी अडीचला त्याचा डोळा लागलाच, तो म्हणाला, ‘सुभाष मी झोपतो आता, कंबर दुखायला लागले. तू पण झोप’. मी म्हटले, ‘ठीक आहे, तू झोप मी झोपतो थोड्या वेळाने’. असं म्हणता क्षणी काही सेकंदातच तो गाढ झोपी गेला. पण मला धड झोपही लागत नव्हती व ते काम अपुरे ठेऊन बस्स बसून घ्यावे, आता असेही वाटत नव्हते. कुठून एवढे बळ अंगात शिरले होते, ते ही कळत नव्हते. त्यानंतरही एक दोन तास मी एकटाच ते काम करत बसलो. तिथल्या त्या फळ्या सर्व संपवल्या मी.

समोर काही एखादे काम दिसले की ते झरझर संपवून त्याचा एकदाचा निपटारा करून मगच श्वास घ्यायचा, ह्यात वेगळाच आनंद वाटायचा. पण ह्यामुळे काहींना त्रास ही व्हायचा. कारण माझ्यामुळे कदाचित त्यांना जास्त काम करावे लागे. कारण एक दोनदा असेच घडले. गवंड्याच्या हाताखाली काम करायला जेव्हा आम्ही जात असू, तेव्हा ते काम अंगावरचे नसायचे तर रोजंदारीवरचे असायचे.

रोजंदारीचा मजुरांचा हिशोब असा, की काम करताना हात आखडता घ्यायचा. एक प्रसंग आठवतो, काम असे की रेती, सिमेंट कालवणे, पाणी टाकून माल तयार करणे आणि गवंड्याच्या हाताख

ाली त्या पाट्या भरून देणे. ह्यातील भरलेल्या पाट्या नेऊन देणे हे एक प्रारंभिक स्वरूपाचे काम, ह्यात काही वेळेस इतरही काम करावे लागे, जसे माल कालवणे, पाट्या भरून देणे, मला चैनच पटत नव्हती, कसं एकदा झरझर काम होईल, असे होऊन जायचे.

मधली सुट्टी झाली. गंवडी आम्हाला काही काम सांगून निघून गेला. जेवणं केलीत. माझं जेवण पटकन आवरलेही. माझ्या डोक्यात तेच माल बनवणे. मी म्हटलो, ‘चला’. अरे थांब. आता कुठे जेवण झाले. तू तर लयच… ‘बाकीच्यांनी बहुधा अंग टाकले. पण मला काही राहवले नाही, मी रेती घेतली. काही पाट्या, प्रमाणात सिमेंट टाकले, कालवले. माल बनवायला सुरुवात. त्यांच्या मते गवंडी आला की मग करू. पण माल मी तयार करून ठेवला, तेवढ्यात गवंडी ही आला.

माल रेडी म्हटल्यावर तो ही खुश झाला. आज बऱ्यापैकी काम वर चढले होते. रिटर्न येतांना मला सांगितले, अरे, भो तू एवढं पटापट नको करत जाऊ. तो गवंडी काय एवढा भानात नाहीये. वगैरे वगैरे कुटाळक्या…! एकदा असेच, हायस्कूलचे काम सुरू असताना खालून बहुधा दुसऱ्या मजल्यावर विटा वाहून नेण्याचे काम आम्ही घेतले. त्यात आम्ही तिघे भाऊ व आई. दुपारपर्यंत काम आवरून जाईल, असे काम होते. आम्ही खांद्यावर किंवा गोणीत किंवा अजून काही सोप्या मार्गाचा उपयोग करून विटा वाहू लागलो. अर्ध्यापर्यंत काम आले असेल.

मोठा भाऊ, लहान भाऊ दत्तू आणि आई ह्यांनी मध्ये मध्ये दम खायला सुरुवात केली. दोन चार फेऱ्या झाल्या की मग बसायचे. मग मलाही बसावं लागायचं. पण जास्त वेळ नाही तर थोडाच वेळ. माझी लगेच घाई व्हायची, चला. मी म्हणायचो, ते लगेच थोडे चमकून व थोडे वैतागून पहायचे. हळूच थोडे प्रेमाने व दमून अरे थांब जरासा..बरं.. एकदा म्हणायचो, दुसऱ्यांदा डायरेक्ट उठायचो, मग त्यांनाही उठावे लागे. नाईलाजास्तव. मग नंतर असे व्हायचे माझ्या दोन फेऱ्या व्हायच्या त्यांची तेवढ्या वेळात एक फेरी व्हायची.

मला त्यांच्या व इतर अनेकांच्या शारीरिक, मानसिक क्षमतेचा अंदाज येऊन जायचा, पण मी जास्त complaints ह्याविषयी केली नाही. थोडंस संभाळातच गेलो मी अनेक प्रसंगी. कारण प्रत्येकाची कुवत एकसारखी कधीच नसणार मग कशाकरता कुरकुरत बसायचे, मी एवढे करतो मग तुम्हाला का नाही जमत.
खरे तर ह्या पाठीमागे एक भक्कम मानसिक शक्ती कार्यरत होती. जी कोणत्या ना कोणत्या वेळी काहींच्या शुभेच्छा व सदिच्छांच्या रुपात मला प्राप्त होत असे, एक मानमान्यता भेटत होती. हे आशीर्वाद मला अशाप्रकारे बळ देत होते, सामर्थ्य निर्माण करत होते. माझ्यातील जबाबदारीचे भान माझ्यात निर्माण करत होते. ही एक प्रेरणा होती. बरीचशी अंत:प्रेरणा….!

मला पैशांशी घेणे नव्हते, ते तर असेही मिळणारच होते. मिळालेल्या पैशांचा जास्त विचारही करत नव्हतो, द्या भावाकडे, द्या आईकडे, किंवा दुसऱ्यांरोबर असलो, तर जो कोणी असेल प्रमुख, द्या त्यांच्याकडे, नंतर घरी आल्यावर घेऊ वाटून. मिळणारी मजुरी महत्वाची नव्हती तर होत असलेले काम महत्वाचे मानत असल्याने कळत नकळत ह्या गोष्टींचा एक विशिष्ट प्रभाव निर्माण होत होता व तो प्रभाव ज्यांना कामात चालढकल करायची असते त्यांच्यासाठी जास्त नाही पण काहीसा त्रासदायक ही ठरत होता.

हे वलय मला जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची अंतरदृष्टी प्राप्त करून देत होता. जास्त काम करण्याची वेळ आली नाही. वयाच्या 19 व्या वर्षीच मी पर्मनंट जॉबला ही लागलो. उन्हाळी सुट्टी किंवा दिवाळीची सुट्टी ह्या दरम्यानचीच कामे. कदाचित हे आपल्याला आयुष्यभर करावे लागणार नाही, काही वर्षे करावे लागणार, याची जाणीव मला सतत होत असल्याने मी जास्त जोर देऊन काम करत असावो. पण मी का थकत नव्हतो, हा प्रश्न मात्र अनेकांना सतावत गेला असेल. हीच सवय पुढील आयुष्यात अवघड वाटणारी कामे चुटकीसरशी करण्यात परावर्तित झाली.

मोठमोठी आव्हाने पेलण्यास समर्थ करत गेली. श्रम मग ते कोणत्याही स्वरूपाचे असो, एका अनामिक तन्मयतेने, समरस होऊन जेव्हा केली जातात तेव्हा त्याचा इफेक्ट निश्चितच आदर्श कार्यप्रणालीवर होत जातो.

आपली कार्यप्रणाली ही अधिकाधिक आदर्शवत होत जायला हवी, जेणेकरून त्याचे खुप चांगले परिणाम समस्त समाजजीवनावर होतात. जबाबदारी मनापासून व स्वतः पुढाकार घेऊन स्वीकारण्याची उदात्त सवय ह्यामुळे अंगी रुजत गेले. हा घरातूनच आई वडिलांच्या आदर्श संस्कारांचा परिणाम आहे असे वाटते.

लेखक : सुभाष पवार, पिंपळगाव बसवंत, नाशिक. मो नं. 9767045327.

FacebookTwitterEmailWhatsApp


Related Articles

 

तरच आणि तरच आपण व्याधीमुक्त होऊ : लेखक सुभाष पवार

2 days ago

 

‘या’ तालुक्यात विवाहितेची मुलीसह आत्महत्या

4 days ago

 

‘या’ तालुक्यात झाला वयोवृद्धाचा खून!

4 days ago

जास्त वाचलेल्या बातम्या

अखेर गणेश विसर्जनाला गालबोट!

4 days ago 4,079

कोरोनानंतर पुन्हा दुसरी धोकादायक लाट येणार?

1 week ago 3,856

कोरोनाबाधितांना लुटणार्‍या ‘त्या’ रुग्णालयाचा परवाना रद्द!

2 weeks ago 3,136

हत्याकांडातले

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home