आदिवासी स्त्रिया आणि हरितालीका*
*आदिवासी स्त्रिया आणि हरितालीका*
आदिवासी समाजातील स्त्रीया नवऱ्याकडुन नविन कपडे मिळावेत म्हणून धरतात हरितालीका.....कारण संपूर्ण पावसाळा भर शेताची काम उरकुन कुठतरी आता पाऊस कमी पडत चालेला असतो आणि अशात हा हरितालीका सण येतो यात आदिवासी स्त्रिया मोठ्या प्रमाणात उपवास धरतात पण या उपवासामागच खर कारण धार्मिक भावना किंवा इतर काही नाही आदिवासी अनेक स्त्रीयाशी या सणाबद्दल विचारल असता कोणीही परिपूर्ण माहिती देत नाही परंतू एक मात्र नक्की कि या सणाला नवऱ्याकडुन नविन कपडे मिळतात म्हणून उपवास धरला जातो अस समजत....
*मुळात हरितालीका हा सण आणि ही प्रथा मुळातच आदिवासी मध्ये नाही* कारण जेव्हा आम्ही एखाद्या साठ सत्तर वर्षाच्या *आजीबाईला ह्या सणाबद्दल विचारतो तेव्हा त्यांना या सणाबद्दल काही च माहिती नाही* अस समजत मग आता आलेला हा ट्रेंड काय आहे तर हे आदिवासी स्त्री शिक्षणातील मागास पणा यातुन प्रामुख्याने समोर येतो आणि जी आदिवासी समाजातील स्त्री शिक्षणातील पहिली पिठी शिक्षण घेऊन आज मिरवत होती ती पुन्हा अशा बाह्य संस्कृती ची शिकार झाली.....
भारतीय हिंदु संस्कृती ही मनुवादी विचारावर आधारातीत आहे. आदिवासी हे हिंदु नाहीत त्यामुळे तसा आदिवासी चा आणि या सणाचा काही संबंध येत नाही ही *ब्राम्हणांनी बनवलेली एक अर्थनिती आहे स्वतः च्या समाजाला जिंवत ठेवण्यासाठी व इतरापेक्षा स्वतःला श्रेष्ठ दाखवणे तसेच आपल्या समाजातीलच काही निवडक लोकांचच कस इतर समाजावर वर्चस्व राहील हे यात काटेकोर पण बघितलेल आहे तसेच संपूर्ण वर्षभराच्या दिवसांच मोजमाप करून आपल आर्थिक गणित कस मांडता येईल याचा अगदी बारिक सारीक विचार करून आर्थिकनिती मांडलेली आहे* ....मग यांचे सण असोत उत्सव असोत लग्न सिजन असो,धार्मिक विधी असोत यात्रा उत्सव,देवदेवतांच्या मुर्ती स्थापना व विसर्जन असो हे तेव्हाच येतात जेव्हा लोकांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पिक असते किंवा ते काढुन बाजारात विकण्याची वेळ असते तुम्ही जर भारतातील कार गाड्या किंवा अनेक मोठ्या मौल्यवान वस्तू ची खरेदी विक्री बघितली तर जेवढी वर्षे भरात होत नाही तेवढी ती संप्टेबर आणि आँक्टोबर महिन्यात होते कारण भारतीय हिंदु लोक दिवाळी दसरा हे मुहुर्त शुभ मानतो आणि याच वेळेत गरिब ,शेतकरी ,कष्टकरी ,मजुर आपल्या हातातील पैसे मार्केट मध्ये टाकतो किंवा त्याला प्रभावित केल जाते आणि टपुन बसलेल्या लोणी खाणाऱ्यांना हीच संधी असती आपला माल बाजारत अव्वाच्या सव्वा भावाने विकण्याची असाच या हरितालीका सणाच पण आदिवासी स्त्रिया या पावसात शेतात काम करतात आणि हीच वेळ असते कि त्याच्या हातात पैसे असतात मग त्यांना मार्केट मध्ये कस आकर्षित करायच तर अशाप्रकारे सणाच थोतांड सांगुन लोकांना मानसिक गुलाम बनवायच *ज्या स्त्रिया थोड्याफार शिकलेल्या आहेत किंवा काही उच्च शिक्षितही आहेत तरी पण आपल्या तर्कबुध्दीचा वापर न करता अशा घटनांना सपशेल बळी पडतात* ....
असो कोनी काही सांगतो म्हणून आपण तसच वागायच का आपण हे किती वर्षापासून करत आलोत नक्की याचा आपणाला किती व कसा फायदा झाला तसेच तोटा कोणता झाला हे ही लक्षात घ्याव लागेल आज तोटा जरी वयक्तिक दिसत नसला तरी सार्वजनिक मात्र नक्कीच झाला कारण एकदाच बाजारात वाढलेल्या मागणी मुळे वस्तुच्या किंमती वाढतात हा अर्थशास्त्राचा नियम आहे अशा वेळी भांडवलदार आपल्या निकृष्ठ दर्जाच्या वस्तू ही चांगल्या किंमतीच्या बरोबरीने विकतात...मग या सर्व गोष्टी चा आपल्या कुटुंबावर काय परिणाम होतात हे ही लक्षात घेण गरजेच आहे...
ही झाली स्त्रीयांच्या बाबतीत असलेल्या सणाची गोष्ट पण दुसऱ्याच दिवशी गणपती बसतो मग गावातील मंडळे सजतात आणि काही महाभाग वर्षेभर दारू पित असतात पण गणपती मंडळाचे अध्यक्ष म्हणून मग मोठा गाजावाजा करत आख्या गल्लीला आणि गावाला वेठिस धरून वर्गणी मग सांउड सिस्टम ,जुगार शेवटी डिजेची वरात, या बाप्पाचा आणि आदिवासी समाज संस्कृती चा काही संबध नाही जर असेल तर तसा कळवावा देखिल *ज्या आज्या ,पंजाला मंदिरात गेला म्हणून खांबाला बांधुन मारल जायच आज त्याचेच वंशज ती मुर्ती घेऊन नागिण नाचतात* ....आदिवासी समाजात शिक्षणाच्या बाबतीत दर्जेदार शिक्षणांचा आकडा खुप कमी आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात येत नाहीत पण जर गावातील जि.प.शाळेसाठी कधी कोणी मदत मागितली तर हेच तरूण एक रूपया सुध्दा शाळेला देत नाहीत किंवा दहावी बारावीत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांचा सत्कार करत नाहीत पण मंडळावर वीस पंचवीस हजार मात्र खर्च करतात हे गावच्या समाजाच्या आणि स्वतःच्या किती फायद्याच आहे
हे आज आदिवासी समाजातील तरूणांनी विचार करण्याची गरज आहे .
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home