Monday, August 31, 2020

फो फ सांडी समस्या

अहमदनगर जिल्ह्यातील मॉरिशस  म्हणजे अकोल्यातील "फोपसंडी" गांव
               अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका म्हणजे निसर्ग सौदर्याचे माहेरघर. भंडारदरा धरण, रंधा फॉल, रतनगड, कळसुबाई शिखर, हरीचंद्र गड, सांदण दरी  हे पर्यटन स्थळे महाराष्ट्राच्या नकाशात पर्यटनाचे माहेरघर म्हणून जनतेला माहीत आहे.पावसाळ्यात हजारो पर्यटक सुट्टीच्या दिवशी येथे भेट देतात.अगदी तासनतास ट्रॅफिक जॅमचा इकडे येतांना अकोला सोडल्यानंतर  अनुभव घ्यावा लागतो. 
                  मात्र  पर्यटकांच्या नजरेतून सुटलेलं व निसर्ग सोंदर्याने भरलेलं प्रति "मॉरिशस" असलेलं हे 1200 लोकवस्तीचे " फोपसंडी" गांव अकोलेपासून अवघे अंदाजे 40 कि. मी. अंतरावरील अनेक मोठमोठे डोंगर पार करून दरीच्या तळाशी वाड्या, पाड्यावर वसलेलं अतिदुर्गम गांव आहे.
             या गांवचा इतिहास ही रंजक आहे. साधारणतः 1925 च्या सुमारास संगमनेर प्रांताचे इंग्रज अधिकारी  "फोप" हे  घोड्यावरूनजंगलात फिरत फिरत या दरीत उतरले. तेथे त्यांना आदिवासींची वस्ती आढळली. या "पोफला" येथील निसर्ग खूप आवडला.व येथे तो दर रविवारी येऊ लागला. येथे राहण्यासाठी त्यांनी "मांडवी नदीच्या" तिरावरील टेकडीवर त्याचे रेस्ट हाऊस बांधले. तेथून तो वरील चार ही जिल्ह्याच्या सिमेवरील डोंगर,  कोंबड किल्ला(कुंजीर गड),  चोहोबाजूंनी धबधबे  पाहण्याचा आनंद घेत असे. पोफच्या या राहण्याने नंतर या गावाला "पोफसंडी" म्हणू लागले. नंतर त्याचा अपभ्रंश होऊन "फोपसंडी" हे नांव रूढ झाले.ते आजतागायत तसेच आहे.
                      स्वातंत्र्यानंतर ही 50 वर्षे हे गांव शासनाच्या सर्व सोई सुविधांपासून वंचित होते. अगदी निवडणुकीच्या वेळी ही गाढवावरून 10 कि.मी. मतदान पेट्या नेल्या जात होत्या. 1997 मधील गावातीलच दत्तात्रय मुठे ही व्यक्ती पुणे येथून परत गावांकडे आली. व गांवात  रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, एस टी इत्यादी सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांपासून ते तालुका स्तरापर्यंत सतत पत्रव्यवहार केले,पायपीट केली. सर्वात प्रथम गावांत बस येण्यासाठी त्यांनी सरकारदरबारी प्रयत्न केले.शेवटचे हत्यार गावकऱ्यांनी गावातच  सांघिक आमरण उपोषणाबाबतचे हत्यार उपसले. नाईलाजाने अधिकारी वर्गांना गावात  पायी यावे लागले. शेवटी गावांत रस्ते आले, बस आली. 2005 ला गावांत मा.आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड यांचे प्रयत्नाने वीज आली. रस्ते, वीज यासाठी स्थानिकांनी श्रमदानाचा मोठा सहभाग उचलल्याचे या योजना इथपर्यंत पोहचू शकल्या. आज गांव 100 टक्के हागणदारी मुक्त दिसून आले. गावांत 10 वी पर्यंत शाळा, आहे. वाड्या वस्त्यांवर सिमेंट रस्ते आहेत. नळयोजना आहेत.अकोले येथून रोज एक मुक्कामी बस येते. गावांत अंगणवाड्या आल्या आहेत. नदीवर, ओढ्यावर बंधारे आहेत.
     💐 अजूनही काय सुधारणा आवश्यक आहे 💐
१) गावांत पर्यटनवाढीच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. म्हणजे स्थानिकांना पर्यटनातून रोजगार मिळेल.
२) दळणवळणासाठी रस्ते अजून मोठे व चांगले होणे गरजेचे आहे.
३) येथून माळशेज घाट अवघा 10 कि. मी. अंतरावर आहे. किमान 3 कि. मी. डोंगर फोडून रस्ता केला तर माळशेज अगदी जवळ येईल.व दळणवळण, पर्यटन वाढेल.
४) गावांत बँक येणे आवश्यक आहे.
५) सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलीही दूरध्वनी सेवा, मोबाईल सेवा, इंटरनेट सुविधा गावात नाही.ते होणे गरजेचे आहे.
६) गावातील दूध दररोज 5 कि.मी घेऊन जावे लागते.त्यासाठी गावातच डेअरी होणे आवश्यक आहे.
             या गांवचे अनेक  वैशिष्टये सांगता येतील त्यातील काही प्रामुख्याने खाली देत आहे.
१) अहमदनगर, नाशिक, पुणे, ठाणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेवटचे गांव)
२) पावसाळ्यात तुफान पर्जन्यवृष्टी होत असल्याने अजूनही गावातील बहुतांश आदिवासी गुराढोरांसह पावसाळ्याचे चार महिने गुहेचा आसरा घेतात..
३)) या गावात  सकाळी नऊ वाजता सूर्योदय व संध्याकाळी साडेचार वाजता सूर्यास्त होतो. हा दोन्ही देखावा पर्यटकांनी पाहणे म्हणजे पर्यटकांना  कपिलाषष्टीचा योग होय.
४) पर्यटनाच्या दृष्टीने फोपसंडी परिसरात " कोंबड किल्ला, भदभद्याचा धबधबा,धुळगडीचा धबधबा, धारीचा धबधबा, कावड्याचा धबधबा,चोहडीचा धबधबा, काजवा महोत्सव, आदिवासी नृत्य, निसर्गसॊदर्याने भरलेला  मानखांदा गायदरा, सानदरी, निखळीचा डोंगर, बाळूबाईचा डोंगर, रांजण्याचा डोंगर, टकोरीची खिंड, वारल्याचा कडा, चारण गडद, दोंड्याची गडद, घोडगडद, केमसावण्याचे पाणी, उंबारले,  अनेक गुहा, तसेच कळमजाई मंदिर, बर्डीनाथ मंदिर, दर्याबाई मंदिर, राणूबाई मंदिर इतके प्रचंड निसर्ग सॊदर्याने भरलेले पॉईंट  येथे पहावयास मिळतात. मात्र त्यासाठी किमान तीन दिवस  पायी भटकण्याची तयारी हवी.
५) या गावचे पाणी पिण्यासाठी अतिशय गोड आहे. तसेच धबधब्याखाली आंघोळ केल्यावर शांपू न लावता ही केस कुरळे होतात.
६)पर्यटकांना राहण्याची, जेवण्याची व पर्यटन घडवून आणण्याची व्यवस्था या गावातीलच फोपसंडीचा कायापालट धडवून आणणारे तथा गाईड श्री.दत्तात्रय हनुमंता मुठे यांचे सह्याद्री दर्शन पथिकालय आहे. मात्र त्यासाठी पर्यटकांना 7218327435, 8669754121, 9850989183 या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. वरील मोबाईलला फोपसंडीत रेंज नसल्याने दुसऱ्या गावात आल्यावरच फोन लागतो.त्यामुळे वारंवार फोन लावावा लागेल.
                मॉरिशससारखा छोटा देश आज केवळ तिथल्या सरकारने पर्यटन सुविधेवर भर दिल्याने तिथला निसर्ग पाहण्यासाठी जगभरातील लोक तिथे जातात. भारतात ही फोफसंडी सारखे अनेक निसर्ग सॊदर्य असलेली ठिकाणे आज पर्यटकांपासून वंचित असल्याने तेथील जनतेचा विकास खुंटला आहे.तसेच पर्यटक निसर्ग सॊदर्याला मुकले आहे.चला आपण ही पर्यटनासाठी  या निसर्गरम्य व शांतताप्रिय दरीखोऱ्यातील "फोपसंडी" पर्यटन स्थळांना अवश्य भेट द्या.  पर्यटन करून आल्यावर  तेथील सुवासिक तांदूळ, मध, व चुलीवरच्या तांदळाच्या भाकरी, मासवडी, लज्जतदार शेवंती तसेच  गावरान कोंबडीचाही आस्वाद घ्या.
                     चला तर मग कधी निघताय पर्यटनाला"फोपसंडी"येथे.

Monday, August 24, 2020

शेतकऱ्यांना मदत जाहीर करा

https://www.esakal.com/ahmednagar/former-mla-vaibhav-pichad-demanded-government-provide-employment-farmers-declaring-wet

Sunday, August 23, 2020

भंडारदरा इतिहास

*भंडारदरा धरणाचा इतिहास* 
*इथे येणाऱ्या पर्यटकांना आणि परिसरातील जनतेला अजून भंडारदरा धारणाबद्दल माहितीमध्ये भर पडावी म्हणून ही माहिती*

*इतिहास – समृध्दी आणणाऱ्या आपल्या धरणांचा – भंडारदरा धरण, अकोले अहमदनगर…..*

*शेंडी गावाच्या उशाशी उभ्या असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या भिंतीना जोडल्या गेल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा अवखळ प्रवाह सह्यागिरीच्या कुशीत विसावला… अन भंडारदरा धरणाचा जन्म झाला. तेव्हापासून आजपर्यंत सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर धो- धो कोसळणा-या पावसाचे पाणी भंडारदरा धरण आपल्या पोटात घेत आहे.*

*निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या भांडारद-याचे पाणी जसे शेतात खेळू लागले, तशी समृद्धीची बेट फुलली. सहकारी साखर कारखानदारी उद्योगधंद्याची भरभराट झाली. वर्षेनुवर्षे दुष्काळानं गांजलेल्या भूमिपुत्राच्या उदासवाण्या जीवनात या धरणाच्या पाण्यानं चैतन्याचे रंग भरले ते असे….*

*उत्तर रतनगडाच्या माथ्यावरील रत्नाबाईच्या गुहेत प्रवरा नदी उगम पावते. पुढे शेंडी गावाजवळ बांधलेल्या दगडी भिंतीमुळे भंडारद-याचा हा प्रचंड जलाशय तयार झालेला आहे. अतिशय राकट आणि डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्र सपाटीपासून २४०० फुट उंचीवर आहे. त्यामुळे देशातील काही मोजक्या, खूप उंचीवरील जलाशयांमध्ये याची गणना होते. त्याच्या निर्मितीपासून आजवरची वाटचालही मोठी रंजक राहिली आहे.* …..

*दुष्काळी भागास पाणी देण्याच्या दृष्टीने एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून पावले टाकायला सुरुवात झाली होती. १९०२ च्या सिंचन आयोगाने प्रवरा खो-यात धरण बांधण्या्च्या गरजेवर भर दिला होता. प्रवरा नदीवरील ओझर येथे सन १८९९ मध्ये बांधलेला बंधारा त्या दिशेने उचललेले पहिले पाऊल म्हणावे लागेल. या बंधा-यातून बारमाही पाणी पुरविणे शक्य व्हावे, यासाठी म्हाळादेवी (ता. अकोले ) येथे मातीचे धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. काही कारणांनी हा प्रस्ताव बारगळला. सर्वेक्षणानंतर शेंडीजवळील दोन टेकड्याजवळ जागा निश्चित करण्यात आली.*
 *९ ऑगस्ट १९०७ रोजी भंडारदरा धरणाला तत्कालीन सरकारची मान्यता मिळाली. धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला तो एप्रिल १९१० मध्ये. तत्कालीन चीफ इंजिनिअर ऑर्थर हिल यावेळी आवर्जून उपस्थित होते.*

 *पाण्याखाली बुडालेली एकूण जमीन होती २२ हजार ९०० एकर. जमिनीच्या संपादनासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आला. धरणाच्या बांधकामासाठी स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली. धरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर साहित्य घोटी रेल्वेस्थानकावर उतरविले जाई. तेथून सध्याच्या घोटी – कोल्हार मार्गावरून पोचवण्यासाठी पेंडशेत चिंचोडी ते भंडारदरा असा ४ मैलाचा नवीन रस्ता तयार केला गेला.*

 *धरणाच्या दगडी बांधकामास आवश्यक दगड मिळवण्यासाठी परिसरातच दगडी खाणींच्या जागा निश्चित करण्यात आल्या. हळूहळू जसजसे धरणाचे काम पुढे जाऊ लागले. तसा भंडारद-याचा शांत परिसर गजबजून गेला. अधिकारी, मजूर यांची निवासस्थाने उभी राहिली. निसर्गाच्या कुशीत भौतिक जगापासून कोसो योजने दूर असलेल्या या भागात दूरध्वनी, टपाल, दवाखाने अशा मुलभूत सोयी सुविधा आल्या. त्यावेळच्या लोकांना याचे केवढे कुतूहल वाटत होते.*

*भंडारदरा धरणाच्या भिंतीच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण काम दगड आणि चुन्यात करण्यात आले. वाळू उपलब्ध नसल्याने दगडांचा चूरा वाळू म्हणून वापरण्यात आला. थोडे थिडके नव्हे तब्बल १ कोटी २६ लाख ४ हजार १४० घनफूट बांधकाम करावयाचे होते. जसजसे बांधकाम उंची गाठत होते, तसे पाणी अडविण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर १९२० मध्ये धरणात २०० फुट उंचीपर्यंत पाणी साठवले होते. त्याच वर्षी सर्वप्रथम धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. बांधकामाने पुढे चांगलाच वेग घेतला होता. नियोजनाप्रमाणे भिंतीची उंची २५० फुटापर्यंत बांधण्याचे ठरले होते. पुढे त्यात बदल केला गेला. ही उंची २० फुटांनी वाढवून २७० फुट करण्यात आली. भिंतीत एकूण चार मो-या असून,त्या अनुक्रमे ७० फुट, १२० फुट, १७० फुट व २२० फुट अशा अंतरावर आहे. या मो-यांचे अर्धा फुट जाडीचे व्यास ३ फुट पाईप आणि त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक झडपा खास इंग्लंडमधून आणण्यात आल्या. ७१.२८ मीटर भिंतीच्या तळाची रुंदी असून, माथ्यावरील रुंदी ७ मीटर आहे.*

*जून १९२६ मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे काम पूर्ण झाले. त्यासाठी खर्च झाला होता १ कोटी ५० लाख ८३ हजार ४५१ रुपये. ६५० फुट रुंदीचा सांडवा दक्षिण बाजूला ठेवण्यात आला. याच वर्षी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास सुरुवात झाली. पावसाळा आला. शिखर स्वामिनी कळसुबाई अलंग, कुलंग, मदन यासह शिंदोळ्या, रतनगड या सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर कोसळणा-या पावसांच्या सरीमुळे अवतीर्ण झालेले ओढे – नाले कवेत घेऊन प्रवरामाई पहिल्यांदाच काळ्या पाषाणाच्या भिंतीमुळे सह्यागिरीच्या डोंगरद-यांच्या कुशीत विसावली होती. १० डिसेंबर १९२६ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते धरणाचे औपचारिक उदघाटन झाले.*

 *सर्वेक्षणापासून बांधकामात महत्त्वाची भूमिका पार पडलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता ऑर्थर हिल याचेच नाव धरणाच्या जलाशयाला देण्यात आले. परंतु जवळच असलेल्या भंडारदरा या खेड्याच्या नावावरून धरणास भंडारदरा धरण असेच नाव पडले. मात्र असे असले तरी कागदोपत्री आजही हे धरण विल्सन यांच्याच नावाने ओळखले जाते. या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याचे चित्रच पालटले.साठवलेले पाणी नियोजन करून लाभक्षेत्रावरील जमिनीला कालव्यांद्वारे मिळू लागले. दुष्काळाने गांजलेल्या भूमिपुत्रांच्या जीवनाला हिरवे वळण मिळाले. ओसाड – उजाड जागेवर हिरवीगार पिके मोठ्या डौलान डोलू लागली. समृद्धी आली. साखर कारखाने उभे राहिले. उद्योग सुरु झाले. उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झाला. पण सारे कसे व्यवस्थित सुरु असतानाच १९६९ च्या सप्टेंबर महिन्यात धरणाच्या भिंतीला तडे गेले. काळजीचे वातावरण सर्वत्र पसरले. तंत्रज्ञानी जीव धोक्यात घालून अहोरात्र खपून या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड दिले.*

*भंडारदरा जागेचा धरणाच्या दृष्टीने शोध १९०३ मध्ये ऑर्थर हिल या इंग्रज अभियंत्याने लावला. त्यानंतरचे सर्वेक्षण सहाय्यक अभियंता एच. ओ.बी.पुली यांनी कार्यकारी अभियंता एच. ओ.बी.शौब्रीज यांच्या मार्गदर्शनाखाली केले. पुढे धरण बांधण्याच्या कामास १९१० साली तत्कालीन चीफ इंजिनियर ऑर्थर हिल यांच्या हस्ते सुरु झाले. भंडारदरा हे त्याकाळचे भारतातील सर्वात उंच धरण म्हणून ओळखले जाते. ते चुना, वाळू यांच्या मिश्रणातून बांधण्यात आले. पुढे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाने आधार देण्यात आला. धरणाचे काम १९२६ साली पूर्ण झाले. त्याच वर्षी १० डिसेंबर १९२६ रोजी गवर्नर लेस्ली वेलस्ली यांच्या हस्ते धरणाचे उदघाटन करण्यात आले.*

 *धरणाला त्याकाळी विल्सन डॅम तर धरणाच्या पाणीसाठ्याला ऑर्थर लेक यांचे नाव देण्यात आले. धरणाच्या २०० फुटावरील व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडले असता ते खडकावरून खळखळ वाहत नदीपात्रात झेपावते. त्यावेळी ते दृश्य एखाद्या भव्य छत्रीसारखे दिसते. म्हणून या धबधब्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात. छत्रीच्या आकाराचे पाणी नदीपात्रात झेपावते तेव्हा पर्यटक भान हरपून ते दृश्य पाहत असतात. धबधब्यातून उडणारे असंख्य तुषार पर्यटकांना चिंब भिजवून टाकतात.*

 *पावसाळ्यात अतिरिक्त पाणी जेव्हा स्पील वे मधून सोडले जाते तेव्हा ते पाणी प्रचंड वेगाने वाहत जाते. ते दृश्य नक्कीच अनेक वर्ष डोळ्यांसमोर तरळत राहते.*

*अधिकृत नाव : भंडारदरा. विल्सन* *डॅम / ऑर्थर लेक*
*अडवलेली नदि: प्रवरा*
*स्थान : शेंडी.*
*सरासरी वार्षिक पाऊस : ३२२० मिलिमीटर.*
*उंची : ५०७ मीटर.*
*रुंदी : (तळाशी) ८२.२९.*
*बांधकाम सुरू: १९१०.*
*उद्घाटन दिनांक: १९२६*.
*बांधकाम खर्च: १,१३,९०,०६०*
*क्षमता : 11 टीएमसी*
*भौगोलिक माहिती: निर्देशांक १९.५४८२, ७३.७५७० गुणक: १९.५४८२, ७३.७५७०.*
*दरवाजे: प्रकार : S – आकार लांबी : १९८.१० मी.*
*सर्वोच्च विसर्ग : १५१४.९९ घनमीटर / सेकंद संख्या व आकार : २, ( १२.५ X ७.९२ मी).*
*पाणीसाठा: क्षेत्रफळ : १५.५४ वर्ग कि.मी.*
*क्षमता : ३१२.५९५ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य*
*क्षमता : ३०४.१० दशलक्ष घनमीटर*
*ओलिताखालील क्षेत्र : १५५५ हेक्टर.*
*कालवा: डावा कालवा लांबी : ७७ कि.मी. क्षमता : २६.३६ घनमीटर / सेकंद*
*ओलिताखालील क्षेत्र : ५९६२५ हेक्टर*
*ओलिताखालील शेतजमीन : ४००९० हेक्टर.*
*उजवा कालवा: लांबी : ४५ कि.मी.* *क्षमता : ६.८२ घनमीटर / सेकंद*
*ओलिताखालील क्षेत्र : २९८६६ हेक्टर*
*ओलिताखालील शेतजमीन : २३६५० हेक्टर.*
*वीज उत्पादन: टप्पा १*
*जलप्रपाताची उंची : ६५ मी*
*जास्तीतजास्त विसर्ग : १९.२६* *क्यूमेक्स*
*निर्मीती क्षमता : १० मेगावॅट*
*विद्युत जनित्र : १ X १० मेगावॅट.*
*टप्पा २*
*जलप्रपाताची उंची :*
*५० मी जास्तीतजास्त विसर्ग : ७७ क्यूमेक्स*
*निर्मीती क्षमता : ३४ मेगावॅट विद्युत जनित्र x:*
*१ X ३४ मेगावॅट*
*धरणाची माहिती :*
*बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम उंची :*
*८२.२९ मी (सर्वोच्च) लांबी : ५०७ मी.*

*माहितीस्तव- *

Saturday, August 22, 2020

आदिवासी स्त्रिया आणि हरितालीका*

*आदिवासी स्त्रिया आणि हरितालीका*
     आदिवासी समाजातील स्त्रीया नवऱ्याकडुन नविन कपडे मिळावेत म्हणून धरतात हरितालीका.....कारण संपूर्ण पावसाळा भर शेताची काम उरकुन कुठतरी आता पाऊस कमी पडत चालेला असतो आणि अशात हा हरितालीका सण येतो यात आदिवासी स्त्रिया मोठ्या प्रमाणात उपवास धरतात पण या उपवासामागच खर कारण धार्मिक भावना किंवा इतर काही नाही आदिवासी अनेक स्त्रीयाशी या सणाबद्दल विचारल असता कोणीही परिपूर्ण माहिती देत नाही परंतू एक मात्र नक्की कि या सणाला नवऱ्याकडुन नविन कपडे मिळतात म्हणून उपवास धरला जातो अस समजत....
        *मुळात हरितालीका हा सण आणि ही प्रथा मुळातच आदिवासी मध्ये नाही* कारण जेव्हा आम्ही एखाद्या साठ सत्तर वर्षाच्या *आजीबाईला ह्या सणाबद्दल  विचारतो तेव्हा त्यांना या सणाबद्दल काही च माहिती नाही* अस समजत मग आता आलेला हा ट्रेंड काय आहे तर हे आदिवासी स्त्री शिक्षणातील मागास पणा यातुन प्रामुख्याने समोर येतो आणि जी आदिवासी समाजातील स्त्री शिक्षणातील पहिली पिठी शिक्षण घेऊन आज मिरवत होती ती पुन्हा अशा बाह्य संस्कृती ची शिकार झाली.....
        भारतीय हिंदु संस्कृती ही मनुवादी विचारावर आधारातीत आहे. आदिवासी हे हिंदु नाहीत त्यामुळे तसा आदिवासी चा आणि या सणाचा काही संबंध येत नाही ही *ब्राम्हणांनी बनवलेली  एक अर्थनिती आहे स्वतः च्या समाजाला जिंवत ठेवण्यासाठी व इतरापेक्षा स्वतःला श्रेष्ठ दाखवणे तसेच आपल्या समाजातीलच काही निवडक लोकांचच कस इतर समाजावर वर्चस्व राहील हे यात काटेकोर पण बघितलेल आहे तसेच संपूर्ण वर्षभराच्या दिवसांच मोजमाप करून आपल आर्थिक गणित कस मांडता येईल याचा अगदी बारिक सारीक विचार करून आर्थिकनिती मांडलेली आहे* ....मग यांचे सण असोत उत्सव असोत लग्न सिजन असो,धार्मिक विधी असोत यात्रा उत्सव,देवदेवतांच्या मुर्ती स्थापना व विसर्जन असो हे तेव्हाच येतात जेव्हा लोकांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पिक असते किंवा ते काढुन बाजारात विकण्याची वेळ असते तुम्ही जर भारतातील कार गाड्या किंवा अनेक मोठ्या मौल्यवान वस्तू ची खरेदी विक्री बघितली तर जेवढी वर्षे भरात होत नाही तेवढी ती संप्टेबर आणि आँक्टोबर महिन्यात होते कारण भारतीय हिंदु लोक दिवाळी दसरा हे मुहुर्त शुभ मानतो आणि याच वेळेत गरिब ,शेतकरी ,कष्टकरी ,मजुर आपल्या हातातील पैसे मार्केट मध्ये टाकतो किंवा त्याला प्रभावित केल जाते आणि टपुन बसलेल्या लोणी खाणाऱ्यांना हीच संधी असती आपला माल बाजारत अव्वाच्या सव्वा भावाने विकण्याची असाच या हरितालीका सणाच पण आदिवासी स्त्रिया या पावसात शेतात काम करतात आणि हीच वेळ असते कि त्याच्या हातात पैसे असतात मग त्यांना मार्केट मध्ये कस आकर्षित करायच तर अशाप्रकारे सणाच थोतांड सांगुन लोकांना मानसिक गुलाम बनवायच *ज्या स्त्रिया थोड्याफार शिकलेल्या आहेत किंवा काही उच्च शिक्षितही आहेत तरी पण आपल्या तर्कबुध्दीचा वापर न करता अशा घटनांना सपशेल बळी पडतात* ....
         असो कोनी काही सांगतो म्हणून आपण तसच वागायच का आपण हे किती वर्षापासून करत आलोत नक्की याचा आपणाला किती व कसा फायदा झाला तसेच तोटा कोणता झाला हे ही लक्षात घ्याव लागेल आज तोटा जरी वयक्तिक दिसत नसला तरी सार्वजनिक मात्र नक्कीच झाला कारण एकदाच बाजारात वाढलेल्या मागणी मुळे वस्तुच्या किंमती वाढतात हा अर्थशास्त्राचा नियम आहे अशा वेळी भांडवलदार आपल्या निकृष्ठ दर्जाच्या वस्तू ही चांगल्या किंमतीच्या बरोबरीने विकतात...मग या सर्व गोष्टी चा आपल्या कुटुंबावर काय परिणाम होतात हे ही लक्षात घेण गरजेच आहे...
       ही झाली स्त्रीयांच्या बाबतीत असलेल्या सणाची गोष्ट पण दुसऱ्याच दिवशी गणपती बसतो मग गावातील मंडळे सजतात आणि काही महाभाग वर्षेभर दारू पित असतात पण गणपती मंडळाचे अध्यक्ष म्हणून मग मोठा गाजावाजा करत आख्या गल्लीला आणि गावाला वेठिस धरून वर्गणी मग सांउड सिस्टम ,जुगार शेवटी डिजेची वरात, या बाप्पाचा आणि आदिवासी समाज संस्कृती चा काही संबध नाही जर असेल तर तसा कळवावा देखिल *ज्या आज्या ,पंजाला मंदिरात गेला म्हणून खांबाला बांधुन मारल जायच आज त्याचेच वंशज ती मुर्ती घेऊन नागिण नाचतात* ....आदिवासी समाजात शिक्षणाच्या बाबतीत दर्जेदार शिक्षणांचा आकडा  खुप कमी  आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात येत नाहीत पण जर गावातील जि.प.शाळेसाठी कधी कोणी मदत मागितली तर हेच तरूण एक रूपया सुध्दा शाळेला देत नाहीत किंवा दहावी बारावीत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांचा सत्कार करत नाहीत पण मंडळावर वीस पंचवीस हजार मात्र खर्च करतात हे गावच्या समाजाच्या आणि स्वतःच्या किती फायद्याच आहे
 हे आज आदिवासी समाजातील तरूणांनी विचार करण्याची गरज आहे .