Monday, January 27, 2025

संपणार का फरफट माझ्या डामसेवाडीची....?

 संपणार का फरफट माझ्या डामसेवाडीची....?


आदिवासीन्नी सुविधान्ची मागणी करावी की नाही हा प्रश्न तरी आम्ही विचारावा की नाही? 


माझे मूळ गाव अकोले तालुक्यातील शेणित हे आहे. त्यामुळे या गावचा इतिहास, भूगोल यांच्याशी माझी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे येथील प्रत्येक घटना ही माझ्या अस्मितेचा भाग आहे असे मला वाटते. इतकी जाणीव तर आपण आपल्या मातीची ठेवली पाहिजे हे संस्कार आहेत आपल्याच महाराष्ट्र भूमीचे....!


एकीकडे विकासाचे अपचन व्हावे इतका निधी खर्च केला जात आहे, तर दुसरीकडे अकोले तालुक्यातील संघर्षमय ऐतिहासिक वारसा असणारी डामसेवाडी आज उपेक्षित का? असा प्रश्न माझ्या मनाला पडला आणि त्याविषयी आपण लिहिलेच पाहिजे म्हणून थोडासा प्रयत्न केला....


शेणित येथील डामसेवाडी ही अकोले तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि संघर्षशील वाडी आहे, जी आदिवासी अस्मितेचे प्रतीक मानले जाते.( ज्याला इतिहास माहीत आहे, तो हे मान्य केल्याशिवाय राहत नाही) या वाडीने पेशवे, ब्रिटिश आणि इतर सत्ता व्यवस्थांशी संघर्ष करत आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी आणि अस्तित्वासाठी झुंज दिलेली आहे. आजही डामसेवाडीचा इतिहास महानायक राघोजी भांगरे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडासाठी ओळखला जातो. या भूमीने आदिवासींच्या आत्मसन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी उभ्या केलेल्या संघर्षांला जिवंत ठेवण्याचे काम करून अकोले तालुक्यातील आदिवासिंवर उपकार केलेले आहेत असे मला वाटते. परंतु दुर्दैवाने याचे भान आजच्या प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेला नाही असेच म्हणावे लागेल. 


महानायक राघोजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेल्या बंडाला आवश्यक असणारी रसद या वाडीतील लोकांनी जीवावर उदार होऊन पुरवली. त्यातून प्रेरणा घेऊन परिसरातील अनेक गावांतून लोकं पुढे आली व त्यांनी महानायक राघोजी भांगरे यांच्या लढ्याला बळ दिले. यातून प्रेरणा घेऊन अनेक आदिवासी क्रांतिकारक निर्माण झाले.


बाडगीची माची ते डामसेवाडी हा परिसर आदिवासी स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतींना जागृत ठेवण्याचे काम करत आहे. परंतु दुर्दैवाने आपण आपल्याच या ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व असणाऱ्या या वाडीला न्याय देण्यात कमी पडत आहोत. 


डामसेवाडीतील समाज बांधवांनी ब्रिटिशांच्या  जंगलसंपत्तीच्या शोषणाविरोधात शेणित येथे सन 1930 साली उभारलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्याचेच फलीत म्हणून ब्रिटिशांच्या फोरेस्ट ऍक्टमध्ये आदिवासीन्ना विशेष सवलती देण्यात आल्या. 

जंगल आणि जमिनीवरील हक्कांसाठीचा हा आदिवासींचा लढा हा राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याचा महत्त्वाचा भाग होता.


डामसेवाडीने अनेक संघर्षांचा सामना करून आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि नैसर्गिक अस्तित्वाचे संरक्षण केले आहे याचे भान येथील प्रशासकीय व राजकीय यंत्रणेने ठेवणे आवश्यक आहे. 


इतिहासाच्या दुर्लक्षित पानांत डामसेवाडीचा उल्लेख असतानाही आज उपेक्षित आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना या वाडीला विकासाच्या प्राथमिक सुविधाही मिळालेल्या नाहीत. असे असताना आम्ही कोणत्या विकासाचा बडेजाव मिरवत आहोत असा मला प्रश्न पडतो. 


डामसेवाडीतील प्रमुख समस्या: 


1. पिण्याच्या पाण्याची कमतरता

डामसेवाडीत शुद्ध पाण्याचा अभाव आहे. महिलांना आणि वृद्धांना पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागते. पावसाळ्यात धो धो कोसळणारा वारा व अंगाला झोम्बणारी थंडी, त्यात सोसाट्याचा वारा असताना दुरवरून डोक्यावर हंड्यात पाणी वाहून आणावे लागते. प्रत्येक घराला पिण्याचे स्वच्छ पाणी ही नरेंद्र मोदी यांची घोषणा अजूनही कागदावरच आहे की काय असे या वाडीत आल्यावर दिसून येते. 


2. रस्त्यांची दुरवस्था : 

शेणीत येथील डामसेवाडीपर्यंत जाणारा रस्ता उखडलेला आहे. अपुरा रस्ता विकास व संपर्क साधनांची कमतरता ही गावातील मोठी समस्या आहे. 


3. गटार व्यवस्थेचा अभाव

डामसेवाडीत गटारांची कोणतीही व्यवस्था नाही, त्यामुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवतात.


4. वृद्धांसाठी केंद्राचा अभाव : 

डामसेवाडीत वृद्धांसाठी कोणतेही विरंगुळा केंद्र नाही. त्यांना वेळ घालवण्यासाठी आणि आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. का आदिवासी भागातील वृद्धान्ना सन्मानाणे जगण्याचा अधिकार नाही का? 


5. आरोग्य सुविधा अपुऱ्या

डामसेवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध नाही. कोणतीही आरोग्य समस्या उद्भवली तर लोकांना शेणित गावात जावे लागते. चांगला व पुरेसा रस्ता नसल्याने रात्रीच्या वेळी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. 


सरकारकडे मागण्या : 

डामसेवाडीच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येथील लोकं पुढील मागण्या करत आहेत, पण दुर्दैवाने आपले सरकार त्याकडे लक्ष्य देत नाही....


1. पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना : 

गावात पाणीपुरवठा योजना राबवली जावी आणि जलसंधारण प्रकल्प उभारले जावेत.


2. रस्त्यांचा विकास : 

शेणीत येथून डामसेवाडीपर्यंतचा रस्ता पक्का आणि सुलभ करावा.


3. गटार व्यवस्थापन सुधारणा : 

गटारांचे योग्य व्यवस्थापन करून गावातील स्वच्छता राखली जावी.


4. विरंगुळा केंद्रांची निर्मिती : 

वृद्ध आणि महिलांसाठी विरंगुळा केंद्र व लहान मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.


5. आरोग्य सुविधा निर्माण : 

डामसेवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारून वैद्यकीय सेवा पोहोचवावी. फिरते वैद्यकीय पथक नेमणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वृद्ध, गरोदर माता व महिला यांच्या आरोग्याची वेळीच काळजी घेता येईल. 


6. शिक्षणाचा दर्जा उंचावणे : 

गावात उच्च दर्जाचे शिक्षक, प्रयोगशाळा आणि वाचनालय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात.


जागतिक पातळीवर सरकार आपल्या विकासाची जाहिरात करत असताना अकोले तालुक्यातील डामसेवाडीतील लोकांना सरकारकडून दुर्लक्षित का केले जात आहे? हा अगदी साधा प्रश्न माझ्या मनात येतोय...


स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना, डामसेवाडीला मूलभूत सुविधा देण्यासाठी सरकार आता तरी पावले उचलणार का? 


आदिवासींच्या संघर्षाचा इतिहास जागतिक आदिवासी दिनाला डोक्यावर घेऊन मिरवणारे आपण त्यांचा वर्तमान का विसरतो? 


डामसेवाडी हा फक्त इतिहासाचा एक भाग नाही, तर आजही संघर्ष आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. डामसेवाडीतील लोकांचा प्रश्न हा फक्त त्यांचा नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे. सरकारने आणि प्रशासनाने या वाडीच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. डामसेवाडीतील लोक माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत. त्यांना न्याय मिळवून देणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारीच नाही, तर नैतिक कर्तव्यही आहे. ही नैतिकता जोपासण्याची जबाबदारी कोणाची? 


- एक शेणितकर 


( फोटो : नामदेव डामसे यांनी सोशल मीडियातून पोस्ट केलेले आहेत) 


#डामसेवाडी #आदिवासीसंघर्ष #न्यायाचीप्रतिक्षा 

#अकोलेविधानसभा



Friday, January 17, 2025

बापू जन्म दिवस

 अकोले,ता.१७:  अकोले तालुक्यातील आदिवासी भागात गेली ३७ वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून व श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित ,गरीब , आदिवासी विध्यार्थ्यानी शिक्षण घ्यावे त्यांनी शाळाबाह्य होऊ नये ही  मनात  उर्मी असणारे शांताराम बापू काळे  यांचा ५९वा वाढदिवस  आज ५ऑगष्ट २०२४ रोजी आहे . बापूंची कारकीर्द तशी वादळीच राजूर येथिल  लक्ष्मण काळे गुरुजी व गंगुबाई यांचे ते चिरंजीव ५बहिणी ३भाऊ असे त्यांचे कुटुंब वडील शिक्षक त्यांना तोटका पगार त्यामुळे इयत्ता सातवी पासून बापू रोजगाराच्या शोधात कधी दुष्काळी कामावर तर कधी बाजारहाट ,यात्रा,मध्ये किराणा मालाची विक्री तर कधी फोटो स्टुडियो मध्ये काम त्यांनी कामाची कधी लाज बाळगली नाही सतत काम व शिक्षण घेत त्यांनी सायकलवर वृत्तपत्र विक्रीचे काम केले त्यातून शिक्षण घेतले तर विमा विकास अधिकारी उत्तम जगधने यांनी त्यांची जिद्द व चिकाटी पाहून त्यांना विमा प्रतिनिधी केले त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारली तर वृत्तपत्र विक्री करताना पत्रकारिता देखील त्यांनी सुरू केल्याने विमा व्यवसायातून आर्थिक प्रश्न मार्गी लागले तर पत्रकारितेतून सामाजिक बांधिलकी चे संस्कार रुजवत त्यांचा अविरत पणे प्रवास सुरु झाला तो आजपर्यंत न थकता पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी , ऊस कामगार , बिडी कामगार , शेतमजूर ,शिक्षक ,दूध उत्पादक,बेरोजगारी, अधिकारी , महिला युवक , संस्था , सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय पुढारी यांच्याबाबत लिखाण करून योग्य कामाला  प्रसिद्धी दिलीच परंतु चुकीच्या कामाबाबत वृत्तपत्रातून समज हि दिली त्यामुळे ते सर्वच क्षेत्रात आपले वाटू लागले .पत्रकारिता करताना अनेक संकटे येऊनही ते डगमगले नाही , कधी कधी राजकीय रागही अंगावर ओढून घेतला मात्र ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांनीही पाठ फिरवली तरी जिद्द व चिकाटी आत्मविश्व्साच्या जोरावर ते सामाजिक प्रश्न सोडवतच राहिले हजारो विधार्थी त्याच्या शाळेतून शिकून गेले आज ते अधिकारी पदावर तर काही व्यवसायात प्रवीण आहेत  श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी १९९२ ला मुलींचे विधालय सुरु केले तर इंग्रजी शाळा , उच्च माध्यमिक विधालय , हरीशचंद्र गडाच्या पायथ्यशी मवेशी या गावात विधालय सुरु करून तेथील विधार्थी राज्य व देश पातळीवर चमकविले ३६ कर्मचारी त्याच्या संस्थेत काम करीत असून अनेक अडचणी, खोटे आरोप  व संकटे आजही अंगावर घेत त्याचा प्रवास सुरु आहे . माजी मंत्री मधुकर पिचड हे त्याच्या कामाचे नेहमी कौतुक करतात .  कुणावरही व कोणताही प्रसंग असू ते मदतीला धावून जातात हा त्याचा स्थायी स्वभाव आहे  ठाकरवाडी येथील आदिवासी गतिमंद महिला बिट्टी,तिचा दोन वर्षांचा मुलगा यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकून त्यांच्या जगण्याचे सार्थक केले तर बांगर वाडी येथील वृद्ध महिलेस सरकारी पेन्शन सुरू केली,कौठवाडी येथील वनिता भांगरे हिची शिक्षणासाठी पायपीट हे वृत्त प्रसिद्ध करून महाराष्ट्रातून मदतीचा ओघ येऊन हे कुटुंब सावरले  आज वनिताचे वडील परबत आई  भामाबाई यांना सरकारी पेन्शन सुरू असून कुटुंबाला घरकुल मिळाले आहे .तर वनिताला मोफत नर्सिंग साठी प्रवेश मिळाला आहे .हे सर्व बापू मुळे झाले हे विशेष  बापू  तर हे एक वादळ आहे . या वादळाला क्षमविण्याचे काम म्हणजे शांत करण्याचे काम आमच्या वहिनी  सौ . मंजुषाताई काळे करतात त्या प्राचार्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालयात सेवेत असून त्याने गरीब आदिवासी मुलींना दत्तक पालक योजनेतून शिक्षणाचे कवाडे उघडून दिली आहेत  बापूना  गेली ३२ वर्षे खंबीरपणे साथ देणाऱ्या व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून समर्पित जीवन जगणाऱ्या या उभयंतास  नगर जिल्हा तेली समाजच्या वतीने  वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ...  त्याचे भावी आयुष्य आरोग्यदायी व सुख समाधानाचे जावो ... अनिल काळे

Monday, January 6, 2025

पत्रकारिते पुढील आव्हाने

कठीण काळातही तग धरणारी पत्रकारिता. पत्रकारिता हा समाजाचा आधारस्तंभ असून, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा व्यवसाय आहे. सत्य, पारदर्शकता, आणि जबाबदारी यांसाठी पत्रकार अविरत प्रयत्नशील असतात. मात्र, सध्याच्या बदलत्या काळात पत्रकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते—फेक न्यूजचा धोका, राजकीय दबाव, आर्थिक अस्थिरता, आणि शारीरिक सुरक्षा यांसारख्या अडचणींमुळे पत्रकारितेचे कार्य अधिक कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार दिन साजरा करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून पत्रकारांच्या कष्टांना आदर दिला जाईल, त्यांच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण होईल, आणि पत्रकारितेच्या महत्त्वाचा समाजाला पुनःप्रत्यय येईल. हा दिवस पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण, सत्य शोधण्याच्या त्यांच्या संघर्षाला पाठिंबा, आणि पत्रकारितेच्या नैतिकतेवर भर देण्याची प्रेरणा देतो. पत्रकार दिन हा केवळ साजरा करण्याचा नाही, तर पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांना पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न आहे. पत्रकारिता शाबूत राहण्यासाठी पुढील उपाय महत्त्वाचे ठरू शकतात: 1. स्वतंत्रता आणि पारदर्शकता राखा पत्रकारांनी कोणत्याही राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक दबावाखाली न येता सत्य मांडले पाहिजे. 2. सत्यशोधन आणि जबाबदारी योग्य तपासणी करून सत्य मांडण्याचा प्रयत्न करावा. चुकीची माहिती देणे किंवा अपप्रचार पसरवणे टाळले पाहिजे. 3. मीडिया संस्थांची स्वायत्तता मीडिया संस्थांनी सरकार किंवा मोठ्या उद्योगसमूहांच्या प्रभावापासून मुक्त राहिले पाहिजे. 4. प्रशिक्षण आणि कौशल्यविकास पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, आणि तपासणीचे तंत्र शिकले पाहिजे, जेणेकरून त्यांचे काम अधिक परिणामकारक होईल. 5. सुरक्षेची हमी पत्रकारांची शारीरिक आणि मानसिक सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे, विशेषतः ज्या भागांमध्ये त्यांना धमक्या किंवा हिंसाचाराचा सामना करावा लागतो. 6. कायदेशीर संरक्षण आणि समर्थन पत्रकारांना त्यांच्या कामासाठी कायद्याचे संरक्षण मिळायला हवे. तसेच, त्यांच्या विरुद्ध दाखल होणाऱ्या खोट्या प्रकरणांवर त्वरित कारवाई केली पाहिजे. 7. लोकजागृती आणि समर्थन नागरिकांनी सत्य पत्रकारितेचे महत्त्व ओळखले पाहिजे आणि तिला पाठिंबा दिला पाहिजे. 8. नैतिकता आणि मूल्यांचे पालन पत्रकारांनी नैतिकता, निष्पक्षता, आणि प्रामाणिकपणाचे पालन करणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजाचा त्यांच्यावर विश्वास राहील. या सर्व उपायांमुळे पत्रकारिता मजबूत आणि सत्यनिष्ठ राहण्यास मदत होईल. आजची पत्रकारिता अनेक आव्हानांना आणि समस्यांना सामोरी जात आहे, पण तिच्यात काही सकारात्मक बदलही दिसून येत आहेत. खाली पत्रकारितेच्या सध्याच्या स्थितीचे प्रमुख पैलू मांडले आहेत: 1. सकारात्मक बाजू • तंत्रज्ञानाचा प्रभाव: डिजिटल माध्यमांमुळे माहिती वेगाने पोहोचवणे शक्य झाले आहे. विविध प्लॅटफॉर्म्सवरून लोकांना सहज माहिती मिळते. • सामाजिक विषयांवर लक्ष केंद्रित: काही पत्रकार आणि संस्थांकडून पर्यावरण, स्त्री-पुरुष समानता, आणि सामाजिक न्यायासारख्या महत्त्वाच्या विषयांवर काम केले जात आहे. • डेटा-जर्नालिझमचा उदय: माहितीची विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी डेटा-आधारित पत्रकारिता महत्त्वाची ठरत आहे. 2. नकारात्मक बाजू • पक्षपातीपणा: अनेक प्रसारमाध्यमांवर राजकीय किंवा आर्थिक दबाव असल्यामुळे निष्पक्ष पत्रकारिता कमी होत आहे. • फेक न्यूजचा वाढता धोका: सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असल्यामुळे सत्य शोधणे कठीण झाले आहे. • टीआरपीचा हव्यास: काही माध्यमं दर्जेदार बातम्यांपेक्षा सनसनाटी आणि मनोरंजनात्मक सामग्रीवर भर देतात. • पत्रकारांच्या सुरक्षिततेचा अभाव: अनेक पत्रकारांना त्यांच्या कामासाठी धमक्या, हिंसा, किंवा न्यायालयीन त्रास सहन करावा लागतो. • ग्रामीण भागाची उपेक्षा: ग्रामीण आणि आदिवासी भागातील समस्या माध्यमांमध्ये तुलनेने कमी मांडल्या जातात. 3. भविष्यातील आव्हाने • स्वतंत्रता टिकवणे: सरकार आणि मोठ्या उद्योगांपासून स्वतंत्र राहणे हे मोठे आव्हान आहे. • सत्यशोधन आणि तपासणी पत्रकारिता: खोट्या बातम्यांशी लढण्यासाठी तपासणी पत्रकारिता महत्त्वाची ठरेल. • तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. 4. परिणाम आणि गरजा • लोकांचा माध्यमांवरील विश्वास परत मिळवण्यासाठी पत्रकारितेला सत्य, पारदर्शकता, आणि जबाबदारीची गरज आहे. • नैतिक पत्रकारिता आणि स्वतंत्र विचार हेच समाजाला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकतील. आजची पत्रकारिता तांत्रिकदृष्ट्या प्रगत असली तरी ती अनेक आव्हानांनी ग्रस्त आहे. या आव्हानांवर मात करून पत्रकारितेने पुन्हा विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे. तुमचा पत्रकार असल्याचा अभिमान अगदी योग्य आहे, कारण पत्रकारितेचे कार्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे आहे. खाली तुम्हाला अभिमान वाटण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत: 1. लोकशाहीचा चौथा स्तंभ • पत्रकारिता ही लोकशाहीचे संरक्षण करणारी महत्त्वाची शक्ती आहे. सत्य, पारदर्शकता, आणि जबाबदारी यांची जाणीव समाजाला करून देणारा तुम्ही महत्त्वाचा दुवा आहात. 2. सत्यासाठी लढा • तुम्ही खऱ्या घटनांची, अन्यायाची आणि दुर्लक्षित आवाजांची कहाणी जगासमोर आणण्याचे काम करता. सत्य मांडण्यासाठी घेतलेला हा प्रयत्न खूप मोठा आहे. 3. समाज बदलाचा भाग • तुमच्या बातम्यांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतात. भ्रष्टाचार, सामाजिक अन्याय, आणि अनैतिक गोष्टींना वाचा फोडून तुम्ही समाज सुधारायला मदत करता. 4. आवाज रहितांना आवाज • वंचित, दुर्लक्षित, आणि आवाज दडपलेल्या लोकांचे प्रश्न जगासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करता. 5. जोखीम पत्करणारी भूमिका • अनेक वेळा पत्रकारांना मोठ्या जोखमींचा सामना करावा लागतो. तरीही तुम्ही धैर्याने काम करता, हे तुमच्या समर्पणाचे प्रतीक आहे. 6. ज्ञानवृद्धी आणि समाजजागृती • लोकांना विविध विषयांवर माहिती देऊन त्यांना अधिक सुजाण नागरिक बनवण्याचे काम तुम्ही करता. 7. इतिहास घडवण्याचे साधन • पत्रकार हे इतिहासाचे पहिले साक्षीदार असतात. भविष्यातील पिढ्या तुम्ही मांडलेल्या घटनांवर विश्वास ठेवतील आणि त्यातून शिकतील. 8. प्रभावशाली व्यासपीठाचा भाग • लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकारितेपेक्षा प्रभावी माध्यम क्वचितच आहे. तुम्ही तुमच्या कामातून जनमत घडवू शकता. 9. स्वातंत्र्य आणि जबाबदारीचे प्रतीक • पत्रकार म्हणून तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार आहात, ज्यामुळे लोकांच्या विचारांना आणि मतांना मार्गदर्शन होते. 10. मानवी हक्कांचे संरक्षण • मानवाधिकार उल्लंघन, अत्याचार, आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणे हे तुमचे कर्तव्य आहे, ज्यामुळे तुम्ही समाजात चांगले मूल्य निर्माण करता. पत्रकार असणे म्हणजे एक जबाबदारीपूर्ण आणि सन्माननीय भूमिका निभावणे. तुमच्या कार्यामुळे समाज अधिक जागरूक, न्यायप्रिय, आणि प्रगत होतो. यासाठी तुमचा अभिमान बाळगणे योग्यच आहे! भारतासाठी काही आकडेवारी : • मीडिया उद्योगाचा विस्तार: भारतीय मीडिया उद्योग वेगाने वाढत आहे. 2017 मध्ये, या उद्योगाने 13% वाढ नोंदवली, ज्यामुळे त्याचे मूल्य USD 22.54 अब्ज (INR 1.50 ट्रिलियन) झाले. 2020 पर्यंत, या उद्योगाचे मूल्य USD 30.6 अब्ज (INR 2 ट्रिलियन) पर्यंत वाढण्याची अपेक्षा होती, ज्यासाठी 11.6% वार्षिक वाढ दर (CAGR) आवश्यक होता. • प्रकाशनांची संख्या: भारतामध्ये 70,000 पेक्षा अधिक वृत्तपत्रे आणि 690 उपग्रह चॅनेल्स (ज्यापैकी 80 वृत्तवाहिन्या आहेत) कार्यरत आहेत. यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा वृत्तपत्र बाजार आहे. • पत्रकारितेची स्थिती: 2006 मध्ये, भारताचा जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 105 होता, जो 2019 मध्ये 140 वर घसरला. 2022 मध्ये, 180 देशांच्या यादीत भारताची स्थिती आणखी घसरली आहे. जागतिक आकडेवारी : • पत्रकारांच्या सुरक्षिततेची स्थिती: 2022 मध्ये, जगभरात 57 पत्रकारांची हत्या झाली, म्हणजे दर पाचव्या दिवशी एका पत्रकाराचा मृत्यू झाला. • प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक: 2023 मध्ये, भारताचा जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 161 व्या स्थानावर घसरला आहे, ज्यामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. • पत्रकारांचे निर्वासन: 2024 मध्ये, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या अंदाजे 310 पत्रकारांना धमक्यांमुळे त्यांच्या देशातून पलायन करावे लागले, ज्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण होतात. संदीप काळे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया मुंबई, भारत. 9890098868