Tuesday, January 2, 2018

भंडारदरावासियांनी फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या जल्लोषात स्वागत केले .हीगर्दी १जानेवारीलाही टिकून होती

   राजूर, ता . २:भंडारदरा येथे थर्टी फस्टच्या रात्री गर्दिचे सर्व प्रकारचे उच्चांक मोडीत निघाले असुन भंडारद-यापासुन ते सांधनदरीपर्यंतचा सर्व परिसर मुंबई पुण्याच्या पर्यटकांनी बहरुन गेला होता .२०१८ सालाचे मुंबईकर व पुणेकरांच्या साक्षिने भंडारदरावासियांनी फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या जल्लोषात स्वागत केले .हीगर्दी १जानेवारीलाही टिकून होती
    विक एंडच्या सुट्टीत थर्टी फस्ट आल्यामुळे भंडारद-यात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची लक्षणे नाताळाची सुट्टी लागल्यापासुनच मिळण्यास सुरुवात झाली होती . त्यात ३१ तारखेला सकाळी ९ वाजल्यापासुनच पर्यटकांचे जथ्थे भंडारद-याच्या दिशेने पावलं टाकताना दिसायला लागली होती . शेंडी गावाला त्यातच आठवड्याचा बाजार आणि त्यात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबई व पुण्याची आलेली पाहुण्यांची गर्दी बघुन जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते . अनेकांनी हेलिकॉप्टरमध्ये हवेत गिरक्या घेत कळसुबाईपासुन ते भंडारदरा धरण, रतगडाचा गडकोटाची सफर केली .  त्यातच भंडारद-याचा अंब्रेला फेसाळताना बघुन कित्येक पर्यटक त्या अंब्रेलाचे तुषार झेलण्याचा प्रयत्न करत होते. जसजसा दिवस मावळतीला जात होता तसतसा भंडारदरा जलाशयाच्या आसपासचा परिसर तंबुमय होत गेला . रिंगरोडवरील प्रत्येक गावच्या अवतीभवती सुरक्षेच्या दृष्टीने अनेक निसर्गप्रेमी सभोवतालीच कापडी तंबुचा डेरा टाकताना आढळुन आली . रात्री बारा वाजेपर्यंत अनेक जण तंबुभोवती केलेल्या शेकोटीचा आधार घेत बारीक आवाजातील साउंड सिस्टमवर थिरकताना आढळुन आली . बारा वाजेच्या सुमारास कळसुबाई अभयारण्याचा परिसर वगळता भंडारदरा जलाशयाच्या परिसरात फटाक्यांची रंगीत आतषबाजीने करत कित्येक पर्यटकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले . जवळजवळ तिन ते साडेतीन हजार परिसरात कापडी टेंट उभारले गेले होते . तर शेंडी ( भंडारदरा ) परिसरात अनेक मोठमोठ्या हॉटेलसने पांरपारीक नृत्य सादरीकरणावर भर दिला . तर ब-याच ठिकाणी ही थर्टीफस्टची मंडळी बुफे जेवणावर ताव मारताना आढळुन आली .  भंडारद-यातील तरुणांनी सोशल मिडीयाचा व नेटवर्किंगचा सहारा घेत पर्यटकांना तंबु निवासाची सोय करुन दिल्यामुळे त्याच्याही हाताला बेकार राहण्यापेक्षा हाताला यामुळे काम मिळुन आल्याने त्यांच्या तोंडावर कुठतरी समाधान आढळुन आलं . 
      भंडारद-यात थर्टी फस्टच्या रात्री झालेली गर्दी बघताना फक्त पावसाळ्यात भंडारदरा चांगला असं म्हणणा-यांना एक प्रकारची चपराकच बसली असुन आता बाराही महिने पर्यटक भंडारद-याला भेट देण्यास उस्तुक असतात . ईतर पर्यटन स्थळांच्या मानाने भंडारदरा आता या निसर्गप्रेमींना सुरक्षित वाटत आहे . तरी पण भंडारद-याला येणा-या या पर्यटकांनी निसर्गाचा समतोल बिघडणार नाही याचं कुठतरी भान ठेवणं गरजेचे आहे . त्यांनी बरोबर आणलेले खाद्यपदार्थांचा कचरा , रिकाम्या पाणी बाटली आजुबाजुला कोठेही न टाकता त्याची विल्हेवाट लावली तरच भंडारद-याचं सौंदर्य टिकुन राहण्यास मदत होणार आहे .  वनविभागाकडुन रात्रभर डी डी पडवळे यांच्या नेतृत्वाखाली अभयारण्यात रात्रीची गस्त आढळुन आली तर भंडारदरा धरणावर शाखाधिकारी रांजेंद्र कांबळे यांनी चोख बंदोबस्त बजावला . राजुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक पी वाय कादरी यांनी कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही यावर जातीनं लक्ष टाकलं . त्यामुळे भंडारद-याचा थर्टीफस्ट तरी शांततेत गेल्याने सर्वानी सुटकेचा श्वास टाकला .
चौकट [ भंडारदरा धरणाच्या आजुबाजुला अनेक बेरोजगार तरुणांनी कापडी तंबुंचा आधार घेत पर्यटकांची सोय केली होती . मुंबई पुण्याचा पर्यटक स्वच्छतेसाठी माहीर असला तरी वेळ थर्टीफस्टचीची असल्याने ईतरत्र थोड्याफार प्रमाणात अस्ताव्यस्त कचरा तयार झाला होता . या कच-याला आपण च जबाबदार आहोत असं समजुन शेंडीतील दयाराम भांगरे , शुभम काळे , अजित भांगरे व किरण भांगरे यांच्या समुहानू संपुर्ण कचरा स्वच्छ केला .]फोटो RJU २प १२

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home