सौ . हेमलताताई पिचड (आमदार सौभाग्यवती )अकोले अकोले, ता . २० :कोणत्याही समारंभाला गेले की
निवेदक माझा परिचय करून देतात या आदिवासी विकास मंत्री नामदार मधुकररावजी
पिचड यांच्या सुविध पत्नी. सौ हेमलता मधुकररावजी पिचड आणि त्या नंतरराजूर
गावाच्या पहिल्या महिला सरपंच, राजूर गावाच्या दारूबंदीच्या प्रणेत्या
वगैरे वगैर. हा परिचय ऐकताना कोठेतरी अपूर्णता वाटत असते एक अनामिक हुरहूर
मनात दातात असते कारण राजकीय पद, चेहरा, आर्थिक स्थिती यावरून आपण मनसे
ओळखतो पण प्रत्येक माणसांची आपल्या मनातील ओळख म्हणजे त्याचे विचार असतात.
माझे माहेर मुरबाडचे, माझे लग्न १९७० साली झाले. त्यावेळी साहेब पंचायत समितीचे सभापती होते. १९७२ चा भीषण दुष्काळ मला चांगला
आठवतो.
दुष्काळी परिस्थिती, या भागातील रस्ते पाझर तलाव यांची कामे आणि आदिवासी
भाग या सर्व गोष्टींचा साहेबांनी खूप दूरदृष्टी विचार करून या परिस्थितीचा
तालुक्यातील कामासाठी उपयोग करून घेतला सोने हा सर्व धातूंमधील श्रेष्ठ
धातू पण कसोटी लावल्यावर त्याला वेगळी झळाळी येते त्यावेळी नेमके तसे झाले.
साहेबांची काम करण्याची पद्धत त्यांचा दांडगा लोकसंपर्क तळागाळातील
माणसांची वेदना ओळखून त्यावर उपाय शोधण्याची खुबी आणि अविश्रांत काम
करण्याची क्षमता या सर्वांमुळे त्यांनी ते पद कौशल्याने हाताळले.
त्यावेळेच्या त्यांच्या कामामुळे त्यांच्या नेतृत्वातील विलक्षण ताकतीची
प्रशाशनावरील मजबूत पकडीची संपूर्ण तालुक्याला कल्पना आली. आजच्या मंत्री
पदाचा भक्कम पाया माझ्या मते त्या दुष्काळी परिस्थिती हाताळताना घातला
गेला आहे. पंचायत समितीचे सभापती आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री,
विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष या निरनिराळ्या भूमिका
साहेबांनी तेवढ्याच ताकतीने सांभाळल्या. साहेब केवळ तालुक्याचे नेते नाहीत
तर ते महाराष्ट्राचे नेते त्यामुळे त्यांच्याकडे कामासाठी येणारे नेते,
कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, सामान्य माणसे यांची कायम गर्दी त्यात
घरची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर . मुलांचे शिक्षण, संगोपन, घर चालवणे, घरी
येणाऱ्या जाणाऱ्या नेत्या कार्यकर्त्यांचे आतिथ्य या गोष्टींची जबाबदारी
माझी. त्यात विशेष म्हणजे माझा पिंड राजकीय नाही. माझे माहेर तसे जुन्या
वळणाचे. एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणारे लहानपणापासून भावंडांची
जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे माझ्या वाटेला आलेली भूमिका मी यशस्वीपने पार
पडली पण हे सर्व करताना माझ्या लक्षात आलेकी समाज सेवेची आवड असलेल्या
व्यक्तीच या जबाबदार्या पार पडू शकतात. माझ्या आयुष्यातील अविस्मरनिय
प्रसंग म्हणजे मला विश्वयोगी प.पु. स्वामी गगनगिरी महाराजांचा लाभलेला
अनुग्रह. त्यांची कृपा आहे म्हणु नच माझा प्रवास इथपर्यंत झाला आहे. मी जे
काही चांगले करते असे तुम्हाला वाटते त्या सर्व गोष्टी प.पु. गगनगिरी बाबा
माझ्या
हातून करून घेतात अशी माझी निस्सीम श्रद्धा आहे . मला राजकीय वारसा नाही
परंतु सामाजिक जाणिवेचे बाळकडू घरातून मिळाले लग्न झाल्यानंतर नामदार पिचड
साहेबांच्या मार्गदर्शनाने मी १९७२ ला तारामती दुध संकलन केंद्राची राजूर
येथे स्थापन केली. इंदिराजी महिला मंडळ,काढले तर दिल्लीला स्वर्गीय इंदिरा
गांधी यांना भेटायला गेले . पहिल्यापासून व्यसनं मुक्ती व्हावी त्यामुळे
समाजाचे दारिद्र्य जावे , महिलांना सबला बनावे तर बाल्गोपालाना शिक्षण
मिळावे हि माझी भावना त्याला साहेबांनी भरीव साथ केली जिलहा परिषदेच्या
मदतीने परिसरात
१२ बालवाड्या सुरु केल्या. परिसरात महिला मंडळे स्थापन करून त्यांच्या
माध्यमातून व्यसनमुक्त शिबिरे घेतली स्वछतेचे धडे गिरवले. त्या नंतर मला
मुलांचे शिक्षण,संगोपन यातून वेळ मिळेल तशी धार्मिक उपक्रमामध्ये सहभाग घेऊ
लागले १९८० साली पिचड साहेब आमदार झाले कै. वसंतदादा पाटील यांनी
यांच्यातील क्षमता हेरून त्यांना राज्यमन्त्रीपद दिले त्या नंतर कॅबिनेट
मंत्री, विरोधीपक्ष नेते , राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष झाले नामदार शरद
पवार साहेब यांचे आज ते अत्यंत विश्वासू आहेत. यातच सर्व काही
आले
कोणतीही पत्नी असो सामान्य माणसांची किवा मंत्र्यांची तिच्या मनातले
विचार, तिचे घर, परिवार, तिचा परिसर, तिचा गाव विकासाच्या वाटेवर नेण्याचे
आसतात. मी राजूर मध्ये धार्मिक सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेऊ लागले
महिलामध्ये मिसळल्याने त्यांच्या प्रश्नाची जाणीव अधिक तीव्र झाली.
परिसरातील आदिवासी महिलांची दारूमुळे होणारी होरपळ पाहून मी अंतर्मुख झाले
त्यांच्याच मदतीने व्यसनमुक्तीची शिबिरे आयोजित करताकरताच दारूबंदीची चळवळ
हाती घेतली यात साहेबांबरोबरच माझा धाकटा मुलगा वैभवभाऊचीही साथ होती
ऑक्टोबर २००५ मध्ये राजूरच्या ऐतिहासिक ग्रामकसभेने ठराव पारीक झाला.
साहेबांचा भक्कम पाठिंबा व आशीर्वाद होत. त्या दिवशी इतरांच्या दु:खावर
फुंकर घालण्याचे भाग्य मला लाभले म्हणून खूप बरे वाटले. पण काही दिवसातच
इतर गावाचे दारूमुळे होणारे हाल पाहून वाईट वाटले २०११ साली मी
तालुक्यातील १४१ ग्रामपंच्य्तीचे दारू बंदीचे ठराव आर आर पाटीलां पर्यंत
पोहोचले गावातील अतिक्रमणे काढली गावाने २०११ च्या निवडणुकीत मला बिनविरोध
सरपंच म्हणून निवडून दिले. साहेबांनी माझ्या या कामाला पाठिंबा दिला मी
राजूर सारख्या गावाची ७९ वर्षाच्या १ ली महिला सरपंच. आणि तीही बिनविरोध
झाले. काहींनी टीका केली मंत्र्याच्या पत्नीला सरपंच पदासारखे क्षुल्लक पद
शोभत नाही वगैरे वगैरे माझ्या मते पद कोणतेही असो त्यातून समाजासाठी
काहीतरी करण्याची जिद्द पाहिजे त्या परिस्थितीने मला झुंझायाला शिकविले मी
सुद्धा मागे वळून पहिले नाही पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्धयोजनेत सहभाग
घेतला ४० हजार झाडे लावली संत गाडगे बाबा ग्राम स्वछता अभियानात भाग घेतला
माझ्या गावाला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. दरम्यानच्या काळात मलाही
वृक्ष मित्र आदर्श सरपंच असे ४ - ५ पुरस्कार मिळाले लोकांनी तोंडभरून कौतुक
केले मला पुरस्कारांमध्ये आनंद नाही लोकांचे प्रश्न सोडविण्यात मला समाधान
आहे यावर्षीराजूर गाव निर्मल करण्याचा संकल्प सोडलाय . ग्रामपंचायत सदस्य
,ग्रामसेवक,अधिकारी,कर्मचारी,
पत्रकार,ग्रामस्थ या सर्वांचे सहकार्य
मिलते. नामदार पिचड साहेबांसारखा खंदा पाठीराखा आहे. वैभव पिचड यांची
मोलाची साथ आहे . त्यामुळे कितीही अडचणी येवो गाव निर्मल होणारच . प्रत्येक
यशस्वी पुरुष्याच्या मागे एक स्त्री उभी आहे असे म्हणतात . समतेच्या युगात
प्रत्येक यशस्वी स्त्री च्या मागे तिचा पती किती खंबीरपणे उभा असतो हेही
समाजाने कृपया लक्षात घ्यावे .
राजकीय क्षेत्रातील व्यक्ती बर्याच कामांमुळे दिवसभर
बाहेर असतात . त्यांच्या घरातील व्यक्तींना कधी कधी महत्वाच्या प्रसंगी
त्यांची अनुपस्तिथि प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे त्या घरातील भावनांची
आंदोलने अनेकदा मी आयकले आहे. माझ्या सुदायवाने असा एकही प्रसंग माझ्या
आयुष्यात आले नाही. नामदार पिचड साहेबांचा उरक प्रचंड आहे . तरुणालाही
लाजवील अशी कामे करण्याची अद्भुत क्षमता त्यांच्यात आहे. एवढे कामे असूनही
ते प्रत्येक सणावाराला घरी असतात. एवढे भाग्य माझ्या वाटेला आल्याबद्दल
देवाची व समाजाची मी ऋणी अहे. परमपूज्य गगनगिरी महाराजांचे कृपा आशीर्वाद
पाठीशी अहेत.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home