Wednesday, June 11, 2014

लाख मोलाची साग शेती … प्रकाश शहा

Shantaram Kale <kaleshantaramlaxman@gmail.com>

6:10 PM (14 hours ago)


to Nagar, nagarsm, punesm
अकोले ता:११
सागाची शेती व्यापारी तत्वावर करणे आधुनिक युगात क्रमप्राप्त ,तितकेच अपरिहार्य ठरले आहे . पण या शेतीत केलेली गुंतवणूक आणि त्या तुलनेत ( दीर्घ काळानंतर ) सुरु होणारा उत्पन्नाचा काळ पाहता सागशेतीत खरी कसोटी मानसिक आणि आर्थिक गुंतवणुकीचीच  लागते,असे म्हटल्यास वावगे ठरू नये . नगर जिल्ह्यात व्यापारी तत्वावर सागाची शेती करणारा शेतकरी तसा दुर्मिळच . या शेतीत काही लाखांमध्ये केलेली गुंतवणूक शेतकऱ्याला उत्पन्न सुरु झल्यावर किती तरी जास्त पट  फायदा देते, हे खरेच. एक-दोन नव्हे ,तब्बल आठ-दहा वर्ष आपल्या मानसिकतेचे यात कसोटी असते . त्यामुळेच मंग आपल्या भागात सागाची शेती फुल्ली आहे ,हेच आपणा  साठी दुष्प्राप्य ठरणारे उदहरण …
                       या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राजूरचे ध्येयवेडे  शेतकरी प्रकाशशेठ सुमतिलाल  शहा यांनी दोन एकर जमिनीत केलेली सागाची शेती मैलाचा दगड ठरावा. राजूरच्या ओसाड माळरानावर,शहा यांनी कोल्हार-घोटी मार्गालगत आपल्या 'स्वप्नातल्या शेतीची ' मुहूर्तमेढ रोवली . सुमारे १५  वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याने चांगलेच बाळसे धरले आहे .
                      सागाची शेती करण्यापूर्वी  त्यांचा या जमिनीत उडिद ,खुरासणी, टोमॉटो,  ज्वारी हि खरिप पिके घेण्याचा त्यांचा परिपाठ राहत असे परंतु जमिनीतील उभ्या पिकांना होणारा जनावरांचा उपद्रव त्यांना स्वस्त बसू देत नव्हता. त्यातूनच त्यांनी सागाच्या शेतीचे लाख मोलाचे स्वप्न पहिले आणि त्या दिशेने धडाक्यात  प्रयत्नही आरंभिले व वन अधिकारी ए.एन. कदम सत्यानिकेतन संस्थेचे सचिव एम. एल. मुठे , जोशी तसेच कृषी खात्यातील जाणकारांच्या मार्गदर्शनाच्या शिदोरी वर प्रकाश भाऊ शहा यांनी सागाच्या शेतीस उपयुक्त माहिती मिळविणे सुरु केले संगमनेर ,शहापूर, नाशिक येथून त्यांनी सागाचे "स्टम्प" प्राप्त केले त्यात कोकणी कलम केलेले  स्टम्प आणून लावले दोन हजार २०० स्टम्प लावले त्यातील दीड एक हजार झाडे जगली सागाची झाडे ३०  फुटांपेक्षा अधिक उंचीची झाली आहेत. १५  वर्षात ही  मजल गाठली आहे. लगेच सागाचे लाकूड विकण्यास त्यांची घाई   नाही. उलट आणखी एवढाच काळ  थांबावयास प्रकाश भाऊ तयार आहेत. तोपर्यंत म्हणजे आणखी काही  वर्षांनी सागाच्या लाकडाला मिळणारा दणदणीत भाव काय आणि किती नफ्याचे  माप त्यांच्या पारड्यात टाकेल,त्यांची कल्पना केलेली बरी! त्यावेळी सागाला भला थोरला भाव  मिळेलच मिळेल . आजची गुंतवणूक ही  भविष्याची , स्वप्नवत वाटणारी परंतु त्याला वास्तवाची कृतार्थ गुरुकिल्ली आहे . प्रकाश भाऊ यांनी हे स्वप्न पहिले आणि  त्यांनी आज मारलेली मजल , हा प्रयोग आणि त्यातील आर्थिक गणिताचा मतितार्थ या दृष्टीने ही  शेती करू पाहणार्यांसाठी नवा उर्जा स्तोत्र नक्कीच ठरावा… चौकट >>>>तीस वर्षाचा उत्पन्नाचा आलेख सागाच्या तयार झाडाचे पाच दहा वर्षे "मार्केटिंग "करायचे ठरविल्यास त्याची किमत सुमारे दीड लाख असेल त्यानंतर१० ते २० वर्षानंतर   ५ते७  लाख रुपये प्राप्ती होण्याची शक्यता असल्याचे वनविभागाचे एस . व्ही साळुंखे , आर . जी सागभोर , व जाणकारांचे मत आहे वन विभाग सागाची लागवड करीत नाही किंबहुना ते परवडणारे नाही राजूर विभागात सागाची लागवड करणारे प्रकाश उर्फ भाऊ हे  शेतकरी आहे . <<<<<<,
                        कोल्हार- घोटी रस्त्यावरून भंडारदरा  कडे जाताना २ एकरांत फुललेली ही  सागाची शेती प्रवासी , पर्यटक आणि शेतकऱ्यांना तिथे मोठ्या मेहनतीने रुजलेल्या लाख मोलाच्या प्रयोगाची महती देते .पूर्वी म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वी अकोल्याचा आदिवासी भाग सागाच्या डेरेदार वृक्षराईने नटून , फुलून गेलेला दिसे . परंतु जंगल तोड , वन खात्याची उदासीनता यामुळे या वृक्षराईला जणू ग्रहण लागले आज तर सागाची झाडे  शोधायची या भागात स्पर्धाच लावावी लागेल , अशी स्तीथी आहे. त्यामुळेच राजुर सारख्या ठिकाणी तेही मध्य वस्तीत फुललेली सागाची शेती पहावयास मिळणे कौतुकाची बाब ठरते. सोबत फोटो akl ११ p ९
5 Attachments

Shantaram Kale <kaleshantaramlaxman@gmail.com>

6:12 PM (14 hours ago)


to agrowon
5 Attachments

2 Comments:

At April 1, 2017 at 3:55 AM , Blogger सागवान (साग ) लागवड़ said...

टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे ,लॅब ,1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,आतरपिके घेता येतात, सरळ वाढ ,कमी पाणी लागते ,2 वर्ष गॅरटी ,सागवान बाग पाहण्यासाठी ,8ते9 वर्षात तोड़णीस,लाखात उत्पादन संपर्क -सिमा बायोटेक कोल्हापूर मो 9822050489 /8830336625

 
At April 1, 2017 at 3:55 AM , Blogger सागवान (साग ) लागवड़ said...

टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे ,लॅब ,1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,आतरपिके घेता येतात, सरळ वाढ ,कमी पाणी लागते ,2 वर्ष गॅरटी ,सागवान बाग पाहण्यासाठी ,8ते9 वर्षात तोड़णीस,लाखात उत्पादन संपर्क -सिमा बायोटेक कोल्हापूर मो 9822050489 /8830336625

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home