अकोल्याची लढत रंगतदारच होणार?
उपसंपादक दीपक रोकडे यांचे कडे देणेसाठी अकोले , ता . ४: अकोले म्हणजे चळवळीचा आणि डाव्या विचारांचा तालुका म्हणून ओळखला जातो . आदिवासी नि बिगर आदिवासी समाजाची जवळपास सारखीच लोकसंख्या असणाऱ्या या तालुक्याची राजकीय व सामाजिक क्षेत्रात विशेष अशी ओळख आहे . स्वातंत्र्यपूर्व काळात सावकारशाहीचे विरूद्धचे लढे किंवा स्वातंत्र्य चळवळ आणि त्यातल्या जंगल सत्यागृहाच्या चळवळी तालुक्याने पाहिल्या. यशस्वीदेखील केल्या. स्वातंत्र्यानंतर शेतकरी कामगाराचे व्यापक लढे इथे उभारले गेले.
१९८० पर्यंत तालुक्यात डावा विचार प्रभावी होता. त्यामुळेच इथे प्रथम समाजवादी पक्षाच्या आमदारानंतर कम्युनिष्ट पक्षाचा आमदार झाला होता . १९८० नंतर हळूहळू तालुक्यातील समाजवादी व कम्युनिष्ट वर्चस्व संपत गेले.अकोले तालुका पूर्ण काँग्रेसमय झाला . गोपाळराव भांगरे हे तालुक्याचे पहिले आमदार. त्यानंतर त्यांचे पुत्र यशवंतराव भांगरे यांनी १९६२, १९७२, १९७८ अशी तीन वेळा तालुक्याचे आमदार पद भूषविले. १९५७ मध्ये सयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात समाजवादी पक्षाचे नारायणराव नवाळी निवडून आले. तर पुढे १९६७ मध्ये कम्युनिष्ट पक्षाचे कॉ . बी . के . देशमुख आमदार झाले. १९८०पासून पुढे मात्र सातत्याने मधुकरराव पिचड निवडून येत आहेत . १९८०, ८५ , ९० , ९५ , ९९ , २००४ , २००९ या सात निवडणुकांमध्ये त्यांनी यश मिळविले. पहिल्या दोन निवडणुका मध्ये त्यांनी १९८० - ८५ राजाबापू भांगरे व कम्युनिष्ट पक्षाचे सक्रू बुध मेंगाळ यांचा पराभव केला. नंतरच्या ४ निवडणुकामध्ये अशोकराव भांगरे यांना अस्मान दाखविले. अशोक भांगरे यांनी जनतादल , काँग्रेस , अपक्ष , शिवसेना अश्या विविध चिन्हावर निवडणुका लढविल्या. गेली ३० वर्षे तालुक्यात पिचड , भांगरे राजकीय संघर्ष सुरु होता.
मागील (२००९ ) निवडणुकीत शिवसेनेचे तिकीट मधुकर तळपाडे या माजी पोलिस अधिकाऱ्याला मिळाले. त्यावेळी मात्र पारंपारीक लढत भांगरे विरुद्ध पिचड अशी न होता त्यावेळी मुख्य लढत पिचड- तळपाडे अशी झाली. अपक्ष म्हणून उभे राहिलेले अशोक भांगरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. मात्र तळपाडे भांगरे याच्यात झालेल्या मतविभागणीचा फायदा श्री . पिचड यांना झाल्याचे दिसून आले. पिचड यांनी ७ निवडणुका मध्ये सलग विजय मिळविला असला तरी १९९५ च्या निवडणूक याला अपवाद वगळता त्यांना सातत्याने विजयासाठी झुंजावे लागले. राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर सुमारे ३ हजार पासून ९ हजारापर्यंत असेच त्यांचे मताधिक्य राहिलेले आहे . १९९५ मध्ये जिल्ह्यातील काही प्रस्थपित नेत्याच्या आशीर्वादाने तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्री पिचड यांचे विरुद्ध बंडाचे निशाण उभारले मीनानाथ पांडे, विठ्ठलराव चासकर, लक्षण शिंदे यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या जणाचा अपवाद वगळता तालुका पातळीवरील सर्वच कार्यकर्ते या बंडात सहभागी झाले होते! त्यांनी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भांगरे यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले . मात्र या निवडणुकीत जनतेने श्री पिचड यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले . सुमारे ३३ हजार इतक्या मताधिक्यने मिळवून पिचड यांचा दणदणीत विजय झाला .
मात्र त्याच वर्षी राज्यातील कॉंग्रेसची राजवट गेली आणि भाजप शिवसेना युती सत्तेवर आली. श्री पिचड विरोधी पक्षनेते झाले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आदिवासी समाजातील प्राथमिक शिक्षकच्या घरातील एका तरुणाने मिळविलेले यश निश्चितच तालुक्याच्या दृष्टीने अभिमानस्पद होते . मात्र श्री पिचड यांनी काँग्रेस कार्यकर्त्याबद्दल जनतेच्या मनात असणारा रोष लक्ष्यात न घेता पुढच्या निवडणुकीत त्यांना सोडून गेलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना पुन्हा जवळ केले. एव्हडेच नव्हे तर त्यांना सत्तेची पदे दिली. सन्मान दिला. हि बाब जनतेला रुचली नाही . त्यामुळे तेथून पुढे प्रत्येक निवडणुकीत विजयासाठी संघर्ष करावा लागला १९९९ मध्ये अवघ्या २७०० मतांनी कसेबसे निवडून आले. १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या निर्मिती नंतर श्री पिचड यांनी सोनिया गांधी व काँग्रेस पक्षाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यात जाण्याचा निर्णय घेतला. तालुक्यातील सर्वच काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीत गेला . पण लोकांनी कॉंग्रेसची साथ सोडली नसल्याचे १९९९ च्या निवडणुकीत दिसून आले. तेथून पुढे मात्र श्री . पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची मूळे प्रयत्नपूर्वक तालुक्यात रुजवली. गावागावात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भक्कम फळी निर्माण केली. त्यामुळे राष्ट्रवादी हा तालुक्यातील एक नंबरचा पक्ष बनला . आज तर तालुक्याच्या आदिवासी भागात राष्ट्रवादी अपवाद वगळता अन्य पक्षाचे अस्तित्व फारसे दिसून येत नाही . श्री पिचड यांचे तालुक्यात राष्ट्रवादी वर्चस्व दिसत असले तरी खऱ्या अर्थाने पिचड हाच तालुक्याचा पक्ष खरा आहे. त्यामुळेच तालुक्यात पिचड विरुद्ध अन्य सर्व असा राजकीय संघर्ष सातत्याने सुरु असतो. तालुक्यात एकेकाळी डाव्या विचारांचा प्रभाव होता . मात्र १९८० नंतर हळूहळू डाव्यांचे वर्चस्व कमी होत गेले. १९८०मध्ये कम्युनिष्ट पक्षाचे सक्रू मेंगाळ यांचा पराभव केला होता . मात्र त्यानंतर एकही निवडणुकीत कम्युनिष्ट उमेदवार विजयाच्या स्पर्धेत नव्हता. कम्युनिष्ट पक्षाची जागा हळूहळू शिवसेनेनी घेतली असून, गेल्या १० / १५ वर्षापासून शिवसेना हाच तालुक्यातील प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे .
दुसरीकडे अशोक भांगरे हेही सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून श्री पिचड यांच्याशी राजकीय संघर्ष करीत आहेत. श्री भांगरे आणि शिवसेना जेव्हा एकत्र येतात, तेंव्हा त्यांचा प्रभाव खूपच वाढतो . जसे श्री पिचड हाच पक्ष तसे सत्तेच्या कायम विरोधात असलेल्या कार्यकर्त्यांचा अशोक भांगरे हाच पक्ष असतो. त्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्ते निवडणुकीत जीव तोडून काम करतात. विविध सहकारी संस्था , जिल्हापरिषद , पंचायत समिती निवडणुकांमधून हि बाब दिसून आली आहे . विकास कामे केली असली तरी श्री पिचड मतदार संघात प्रत्येकाच्या सुखदुखात जातात. तसेच भांगरे व त्यांच्या पत्नी सौ . सुनिता भांगरे दशक्रीयाविधी , अंत्यविधी , लग्न , वाढदिवस या कार्यक्रमाना उपस्थित राहतात. २००४ च्या निवडणुकीत श्री भांगरे यांनी शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली. तेव्हा त्यांना आजपर्यंतची सर्वाधिक मते पडली होती. त्यानंतर भांगरे व शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यामुळे मागील दहा वर्षात दोघानाही त्याचा फटका बसला. २००९ मध्ये तर सेनेचे तिकीट भांगरे यांना मिळू शकले नाही. त्यावेळच्या निवडणुकीत त्यांना १७ हजार ९६३ मते शिवसेनेचे मधुकर तळपाडे यांना …. मते मिळाली तर निवडून आलेल्या पिचड यांना …. इतकी मते मिळाली मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे तुळशीराम कातोरे यांनीही आपले नशीब आजमावले त्यांना ७ हजार ४५५ मते मिळाली अर्थात विरोधकांमधील मतांचे विभाजन श्री पिचड यांच्या पथ्यावर पडले व ते सातव्यांदा विजयी झाले पिचड हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत मागील १५ वर्षापासून राज्यात त्यांच्याच पक्षाचे व काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे तालुक्यात राबविली. १९९९ ते २००४ या काळात ते क्याबिनेट मंत्री होते. २००४ नंतर त्यांना मंत्रिपद मिळू शकले नाही. तरी त्यांच्या शब्दाला शासन दरबारी मोठे वजन होते. पुढे ते राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. सुमारे वर्षभरापूर्वी पुन्हा मंत्री झाले . सत्तेच्या माध्यमातून त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात विकास कामे करणे शक्य झाले रस्ते , वीज ,उपसासिंचन योजना , पूल , बंधारा , धरणे , वीजप्रकल्प , आदिवासी उपयोजनेतून आदिवासी व बिगर आदिवासी योजनेतून कोट्यावधी रुपये आणून भविष्यातील ५० वर्षाचे कामे केली.
गाव तिथे शाळा , अंगणवाडी , ग्रामपंचायत इमारत , नळपाणी पुरवठा योजना आदी जनतेच्या दैनदिन जीवनाशी निगडीत योजनाची कामे जि . प. प. स. माध्यमातून त्यांनी केली निळवंडे धरण मार्गी लावण्यात त्यांचा सिहांचा वाटा आहे . त्या प्रमाणे मध्यंतरी मंत्रीपद नसतानाच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात निळवंडे पुनर्वसनाचा संदर्भात लक्ष घातले. "अकोले पॉटर्न " माध्यमातून प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाचा वेगळा आदर्श निर्माण केला. 'आधी पुनर्वसन मग धरण' हि घोषणा प्रत्यक्षात आणली. निळवंडे जलाशयातील उच्च स्थरीय पूल , निळवंडे उच्चस्तरिय कालवे या गोष्टी तर केवळ त्यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले. अकोल्याच्या ३२ गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणारे व निळवंडे तून राबविली जाणारी ३२ गाव पाणी योजना अंतिम टप्प्यात आहे . पर्यटन माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पट्टा किल्ला परिसर शिवाय घाटघर , रतनवाडी , भंडारदरा , कळसुबाई , हरिचंद्र गड अनेक पर्यटन योजना राबविण्यात आल्या आहेत अम्बीत , कोथळे , पाडोशी , शिरपुंजे , अशी एक न अनेक लहान मोठे धरणे पूर्ण झाली असून मुळा खोऱ्याला वरदान ठरणाऱ्या धामणगाव प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे . तर आदिवासी उपयोजनेतून मोटार . , पाईप , शेतीअवजारे दिली गेली आहे . तालुक्याच्या विजेची वाढती गरज लक्ष्यात घेऊन वीज उपकेंद्रांची कामेही दशकभरात पूर्ण झाली आहे . तर कळसुबाई , हरिचंद्र गडावर वीज पोहचविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे . भोजदरी येथे नुकतेच १३२ के व्ही वीज केंद्राचे भूमिपूजन झाले आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहत मार्गी लागण्याची शक्यता आहे . .
अकोले तालुक्यात मोठ्याप्रमाणात विकासकामे सुरु असली तरी कामाच्या दर्ज्याबाबत तक्रारी आहे अधिकारी ठेकेदारांच्या भ्रष्ट युतीमुळे कामाचा अपेक्षित दर्जा अनेक ठिकाणी आढळून येत नाही. त्यामुळे ४ते ६ महिन्यात डांबरीकरण उखडले जाते. रस्त्यावर मोठे खड्डे पडतात. मध्यंतरी देवठाण येथील रोजगार हमीचे भ्रष्ट्राचाराचे प्रकरण उघडकीस आले . देवठाण , फोफसंडी हे हिमनगाचे टोक आहे. असे अनेक जन म्हणतात. .त्यामुळे नेतृत्वाने विकास कामे खेचून आणले, तरी कामाचा अपेक्षित लाभ जनतेला होत नाही. आजही रोजगारासाठी आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणात लोक नारायणगाव , जुन्नर , नाशिक , मुबई भागात जातात औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सुटला नाही, त्यामुळे रोजगारनिर्मितीची सोय नाही . औद्योगिक वसाहतीचा भूसंपादनाचा प्रश्न भिजत पडला आहे. अकोले तालुका हा शेती प्रधान तालुका आहे. औद्योगिक विकास झाल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटेल. मात्र गेली २० वर्षापासून हा प्रश्न अनुत्तरीत आहे . बऱ्याच ठिकाणी पाणी योजना मोडकळीस आल्या आहे . आदिवासी भागातील नळपाणी पुरवठा योजनाची वीज बिल न भरल्यामुळे वीज खंडीत होऊन उपसासिंचन योजना बंद आहे. निळवंडे धरणाच्या मुख्य कालव्याचे काम अध्यापही तालुक्यात सुरु झालेले नाही. त्यातच इकोसेन्से टिव्ह चा मोठा प्रश्न नव्यानेच उद्भवला आहे. इकोसेन्सेटिव्ह मुळे आदिवासी भागातील ४२ गावांचा विकासावर परिणाम होणार आहे .
मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या वेळोवेळी होणार्या आंदोलनाला मिळणाऱ्या प्रतिसादाने जनतेच्या असंतोषाचे दर्शन घडताना दिसते. मध्यंतरी जायकवाडी पाणी सोडण्याचा प्रश्न चांगलाच गाजला. त्याचा फटका तालुक्यातील शेतीला बसला. शेतीपुढे विजेचा भारनियमनाचे संकट नेहमीच उभे असते. अनेक अतिवृष्टी ग्रासताना नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतमालाच्या भावामधील चढ उतार मुळे शेतकरी अस्वस्थ असून बऱ्याचदा टोमाटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असते. अकोले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पॉलीटेक्निक कोलेज सुरु झाले.
एम . बी . ए . शिक्षणाची सोय झाली मात्र अन्य उच्च शिक्षणाचा सुख सुविधा नसल्याने तालुक्यातील हुशार तरुणांना बाहेर गावी जावे लागते. ज्यांना शक्य नसते, त्यांना उच्च शिक्षणाचा विचार सोडून द्यावा लागतो . तर डीएड , बीएड कालबाह्य झाले आहे . विकास कामे मोठ्या प्रमाणात व तालुक्याचे अनेक प्रश्न मार्गी लागले असले तरी अनेक प्रश्न वर्षनुवर्षे तसेच आहे काही प्रश्न नव्याने निर्माण होत आहे . जीवनदायी योजना , दारिद्र्य रेषेचे कार्ड , अश्या अनेक योजनाचा लाभ तालुक्यातील जनतेला मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत . अकोले तालुक्याचे सक्षम नेतृत्व म्हणून मधुकरराव पिचड काम करीत असून, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवीन मतदार व 'मोदी इफेक्ट' यामुळे ज्या खासदार सदाशिव लोखंडे यांना कुणी पहिले नाही त्यांना तालुक्यातून सुमारे पाच हजाराचे लीड मिळाले..!
मंत्री पिचड यांचा संपर्क विकास कामे व भाऊसाहेब वाकचौरे यांचाही संपर्क व विकास कामे व आपला माणूस आपल्यासाठी या सर्व गोष्टीना मतदारांनी फाटा देऊन महायुतीच्या उमेदवाराला झुकते माप दिले . विधानसभा निवडणुकीत मात्र राजकारणात अनुभवी असणारे श्री पिचड हे योग्य नियोजन करून निवडणूक लढवतील याची खात्री वाटते. यावेळी वैभव पिचड निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व जेष्ठ नेत्यांनी तरुणांना संधी देण्याचे म्हटले होते. असे असले तरी लोकसभेत आघाडीचा झालेला दारूण पराभव, राज्यातळ्या लोकांची सत्ताविरोधी मानसिकता. त्यामुळे राज्यात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी जुन्या जाणत्या नेत्यांना संधी दिली जाईल, असा बोलबाला सुरू आहे. मंत्री पिचड यांनी याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र याचे उत्तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर मिळेल.
काँग्रेस पक्षाचे अशोक भांगरे , शिवसेनेचे मधुकर तळपाडे व पिचडापासून दूर गेलेले कार्यकर्ते यमाजी लहामटे , काशिनाथ साबळे , नामदेव भांगरे यांनी स्वातंत्र्य संग्रामात वीरमरण प्राप्त झालेल्या राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी आदिवासी गावागावात एकत्र फिरून एक एक रुपया जोडत मोठे काम केले. त्यावेळी झालेल्या कार्यकर्ता बैठकीत ज्याला तिकीट मिळेल त्याच्यामागे उभे राहायचे, असे संकेत देऊनही लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराच्या फ्लेक्स बोर्डवरून भांगरे तळपाडे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे समोर आले.
शिवसेनेच्या तिकीट कुणाला मिळणार भांगरे कि तळपाडे व त्यावेळी कोण काय भूमिका घेणार? यावर सर्व गणिते अवलंबून असणार असल्यची चर्चा आहे . मात्र विरोधकांमध्ये जेवढे रणकंदन होईल, तेव्हडे मंत्री पिचड यांच्या फायद्याचे होणार, हे जाणकारांनी सांगण्याची गरज नाही! या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षही विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागला असून त्यांचा उमेदवारही निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे विधानसभा चौरंगी कि पंचरंगी होणार याचे गणिते आज तरी लावणे घाईचे ठरेल. मात्र खरी लढत पिचड - भांगरे यांच्यातच होणार कि पुन्हा तळपाडे मुसंडी मारणार हे काऴ च ठरवेल. सध्या तरी राष्ट्रवादीचा उमेदवार बाप की बेटा? याविषयी गावोगाव चर्चा रंगत आहेत. मुलाला संधी देणार की गेल्या बारीला माझी ही शेवटची निवडणूक आहे असे म्हणणारे पिचड स्वतः च पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार? हे लवकरच स्पष्ट होईल. ते काहीही असो अकोल्याची निवडणूक नेहमीप्रमणे रंगतदार होईल असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे!
सोबत
फोटो पाठवीत आहे . निळवंडे धरण , भोज्दारी येथील वीज प्रकल्पाचे उद्घाटन ,
डाळिंबाचे गारपीट मुले झालेले नुकसान , फोफ्संदी येथील कामात झालेला
भ्रष्ट्राचार akl ६p १,२,३,४,akl ७ p ३akl ११p ११,५९k

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home