गुहागरात या वर्षी आंबा उत्पादनात घट
नारळ-सुपारीबरोबरच आंबा
उत्पादनही या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात घेतले जाते; मात्र गुहागरच्या इतिहासात
या वर्षी आंब्याचे सर्वात कमी उत्पादन असल्याची प्रतिक्रिया तालुक्यातील
आंबा व्यावसायिकांनी दिली आहे.

थंडीचे अचानक वाढलेले प्रमाण व ढगाळ
वातावरणाचा फटका आंबा उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे गुहागरी आंब्याचे दरही
गगनाला भिडले असल्याने स्थानिक बाजारात आजही आंबा विक्रीसाठी आलेला नाही.
गेल्या दोन वर्षापासून कोकणातील प्रमुख
नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणा-या आंबा पिकाला साडेसातीच लागली आहे. या
वर्षी अवकाळी पाऊस व सतत बदलत असलेल्या हवामानामुळे बागायतदारांना फटका
बसला होता.
त्यात अचानक वाढलेले थंडीचे प्रमाण आणि
बदलत्या हवामानामुळे मुळात कमी प्रमाणात झालेली फळधारणा गळून पडल्याचे कृषी
अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी सांगितले. त्यामुळे उरलीसुरली फळधारणा
टिकवण्यासाठी बागायतदारांना अनेक प्रकारची औषधे फवारणी करावी लागली; परंतु
उत्पादनावर त्याचा काही परिणाम झालेला दिसला नाही.
कमी उत्पादनामुळे या वर्षी बाजारात पाच
डझनची पेटी सुमारे २५०० ते ३००० दराने विक्री केली जात आहे. आहे त्या दराने
आंबा पेटीची मागणी केली जात आहे; मात्र गुहागरात आंबाच कमी असल्याने
बागायतदार ही मागणी पूर्ण करू शकत नसल्याची शोकांतिका आहे.
गगनाला भिडलेले दर स्थानिक बाजारपेठेतील
ग्राहकांच्या आवाक्याच्या बाहेरचे असल्याने आंबा व्यावसायिकांनी स्थानिक
बाजारपेठेत आंबाच विक्रीला ठेवलेला नाही. मुंबई येथील दरांपेक्षा गुहागरात
आंबा पेटी कमी दरात मिळतील, अशी अपेक्षा पर्यटकांसह मुंबई चाकरमान्यांना
होती; परंतु खुद्द गुहागरातच आंबा विक्रीस नसल्याने त्यांची फार निराशा
झाली.
गुहागरसह हेदवी, नरवण, पालशेत, अडुर या
ठिकाणचा आंबा मुंबई-वाशी मार्केटमध्ये विक्रीस गेला आहे. आता झाडावर
असलेल्या कै-या एप्रिल किंवा मेअखेपर्यंत होतील, असा अंदाज बागायतदार डॉ.
अनिल जोशी यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home