चाळीसगावात पर्यावरणपुरक वटपौर्णिमा

आ.उन्मेश पाटील मित्र मंडळ प्रेरित उमंग
समाजशिल्पी महिला परिवारातर्ङ्गे येथील गजानन महाराज मंदिराच्या परिसरातील
वडाच्या झाडाजवळ विविध उपक्रम राबवून पर्यावरण पूरक वटपोर्णिमा साजरी
करण्यात आली. विशेषतः महिला परिवाराने समाजातील विधवा महिलांनाही पूजेत
सहभागी करून सत्यवानासाठी त्याच्या निधनानंतरही वडाची पूजा करणार्या
सावित्रीचा आदर्श जोपासण्याचा प्रयत्न करून समाजासमोर वेगळा परंपरा निर्माण
करण्यात आली.
उमंग महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. संपदा उन्मेश पाटील यांनी
प्रास्ताविकात सांगितले, की जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने सर्वीकडे
पर्यावरण संवर्धनाचा प्रचार होत असतो. भारतीय संस्कृतीत वृक्षाना देव
मानण्यात येऊन त्यांची पूजा केली जाते. हाच पौराणिक वसा घेऊन वटपूजनाच्या
निमित्ताने परिसरात झाडे लाऊन स्वच्छ परिसराचा संकल्प करण्यात येणार
असल्याचे त्यांनी सांगितले व
महिला परिवाराच्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी मार्गदर्शन
करण्यासाठी भुसावळच्या वरदविनायक संस्थेच्या उर्मिला स्वप्नील चौधरी यांनी
कागदी पिशव्या बनवण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. दरवर्षी प्लास्टिकच्या
वापरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन पावसाळ्यात नाल्यांमध्ये घाण साचते
व पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. तसेच प्राण्यांच्या खाण्यातून पोटात
गेल्यास त्यांचा मृत्यूही ओढवण्याचे प्रमाण वाढते. म्हणून भावी पिढीच्या
उज्वल भविष्यासाठी कागदी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचा आग्रह
महिलांनी धरला पाहिजे व प्लास्टिकमुक्त चाळीसगावचा संदेश यापुढे दिला
पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सूत्रसंचालन डॉ. ज्योती पाटील यांनी केले तर कार्यक्रमासाठी जिजाई महिला
मंडळाच्या मनीषा पाटील, साधना पाटील, ललिता पिंगळे, आरस्ता मालतकर, मेघा
बक्षी, उज्वला ठोंबरे, दिपाली राणा, रत्नप्रभा नेरकर, मनीषा शेजवलकर, मेनका
जंगम, सुनिता निकुंभ, सरला येवले, रत्ना पाटील आदी सदस्या उपस्थित होते.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home