सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये
रानमेव्याच्या खजिन्याची ताटे भरू लागली आहेत. त्याच्या दरबारात जायचे असेल
तर ‘मी’ पणा सोडायला हवा. काटय़ांचा आणि दगडांचा रोष मानून चालणार नाही.
कुठची फांदी तुम्हाला कधी अडवेल हे सांगता यायचे नाही. आडव्या
आलेल्या फांदीला पायदळी देत तुडवून जाता कामा नये. त्या फांदीची हळुवार
समजूत काढावी अथवा तलवार चालविल्याप्रमाणे हातातील शस्त्र चालवावे म्हणजे
वाट मोकळी होईल. पावलापावलावर विविध फळांचे रांजण भरलेले दिसतील. कोकिळेची
कुहुकुहुऽऽ जेथे सुरू असते. त्या ठिकाणी तुमचे सहज लक्ष जाईल. येथेच
तोरणांचे माणिक-मोती तुमच्यासाठीच असतील. तोरणे म्हणजे साखरेच्या पाकातले
रसगुल्लेच.. काटेरी फांद्यांवर पाचूंप्रमाणे हे पांढऱ्या द्राक्षांचे घोस
लगडलेले असतात.
चैत्रारंभानंतर सृष्टीचे रूप आणखीनच
साजिरे-गोजिरे होते. सह्याद्रीत जेव्हा-जेव्हा भ्रमंती कराल तेव्हा-तेव्हा
मिळणारे अनुभव वेगवेगळे असतात. प्रत्येक ऋतूतला साजही वेगळा असतो. चैत्रात
सह्याद्रीतला फेरफटका म्हणजे खायची चंगळ.. थोडसं आहारज्ञान असले आणि कधी
कुठचे फळ खायचे याची प्राथमिक माहिती असली म्हणजे घेता येणारा आनंद हा
स्वर्गाहूनही रम्य असाच. आपण फक्त पावले सांभाळावीत, निसर्गाचे बुफे पदार्थ
तयारच असतात. हव्या त्या चवीत आणि हव्या त्या प्रकारचे! कोणते खावे, कसे
खावे हे तुमच्या आवडीनिवडीवर ठरलेले.
सह्याद्री हा रामोशासारखा उभा, आडवा,
भक्कम छातीने उभा असलेला. या दिवसात फुलांच्या बहरातून, मधमाशांच्या
गुंजनातून तो बराच सावरला आहे. मधाची पोळी आता मोठी-मोठी होत आहेत. असं
एखादं पोळं मिळालं तर खाण्यापूर्वी जरा विचार करा! नाहीतर हा मध
प्यायल्यावर आपण हवेतच तरंगत आहोत की काय असा भास होतो.
झिंग उतरता उतरत नाही. आणि एकदा का आपण
कुठचाही मध घेताना आपल्या शरीराला किती पचेल हे लक्षात घ्यायला हवे. एक
मात्र सह्याद्रीत फिरताना गंमत असते.तुमची रपेट सुरू झाली की, घामाच्या
धारा मुक्त होतात. आणि तुम्ही जे काही सेवन कराल ते-ते शरीर स्वीकारू
लागते.
सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये एव्हाना रानमेव्याच्या खजिन्याची ताटे भरू लागली आहेत. त्याच्या दरबारात जायचे असेल तर ‘मी’ पणा सोडायला हवा.
सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये एव्हाना रानमेव्याच्या खजिन्याची ताटे भरू लागली आहेत. त्याच्या दरबारात जायचे असेल तर ‘मी’ पणा सोडायला हवा.
काटय़ांचा आणि दगडांचा रोष मानून चालणार
नाही. कुठची फांदी तुम्हाला अडवेल हे सांगता येणार नाही. तिला थेट सामोरे
गेलात तर परिणाम भयानक होतील. त्या फांदीची हळुवार समजूत काढावी अथवा तलवार
चालविल्याप्रमाणे हातातील शस्त्र चालवावे म्हणजे वाट मोकळी होईल. पण पाऊल
जपून, कारण हे जंगल त्यांचं असतं, येथे फिरणाऱ्या प्राण्यांचा त्यावर हक्क
असतो. आपण पाहुणे असतो, काही क्षणाचे! पावलापावलावर याचे भान ठेवून भल्या
पहाटे सुटावे जंगलात.
कोकिळेची कुहुकुहुऽऽ जेथे सुरू असते. त्या
ठिकाणी तुमचे सहज लक्ष जाईल. येथेच तोरणांचे माणिक-मोती तुमच्यासाठीच वाट
पाहत असतील. तोरणे म्हणजे साखरेच्या पाकातले रसगुल्लेच..
काटेरी फांद्यांवर पाचूंप्रमाणे हे
पांढ-या द्राक्षांचे घोस लगडलेले असतात. ही फळे चवीला फारच छान असतात.
परंतु, ती मिळविताना काटय़ांचा विचार करावा लागतो. तोरणांच्या
जाळय़ांप्रमाणेच हिरवे, पिवळे वाटाणेच काही झाडांवर पैंजन अडकवल्याप्रमाणे
लोंबकळत असतात. हिला आटकन म्हणतात. तीही याच कुळाचारातली. फक्त चव
आंबट-गोड..
सह्याद्री पार करायचा तर करवंदांना
अव्हेरून चालणार नाही. माघ महिन्यापासूनच त्यांची लगबग सुरू होते. आता
परिपक्व झालेली करवंदे रंग बदलू लागली आहेत. आंबट-गोड करवंदांचा आस्वाद
पुढील पंधरा दिवसांपासून सुरू होईल. डोंगरची काळी मैना तिला का म्हणतात हे
डोंगरात फिरत-फिरत रानातल्याच एखाद्या पानाचा खोला करून (पानाचा द्रोण)
त्यात ती घ्यावीत आणि मनाप्रमाणे त्याचा आस्वाद घ्यावा.
आता या करवंदांचा हिरवा साज पाहायला
मिळतो. खिरमटीच्या थाळीत केव्हा-केव्हा यांच्याही उभ्या-आडव्या भेशी पडतात.
असं म्हणतातहिरडय़ांमधून येणारे रक्त करंवदं खाताच चटकन बरेही होते. आताशी
भ्रमंती करायची तर भूक क्षमविण्याचा प्रश्नच नाही. सह्याद्रीच्या भ्रमंतीत
मीठ, मसाला, चवीपुरते गूळ घेतले म्हणजे झाले. बाकी काही नको. आपली जीभ भली
की आपण.. खायचे किती आणि कसे हेच समजत नाही.
चांदवड अथवा कुडयाच्या पानावरून ही डिश
समोर येते. खिरमट केल्यानंतर जिभेला गोडगोड हवे असते. मग पावले हेळयाच्या
झाडाखाली वळतात. सूरमाडाच्या परिसरात तीन पाकळय़ांची पिवळी फुले आणि
सुपाऱ्यांचा पसाराच पडलेला असतो.
No comments:
Post a Comment